Welcome to misalpav.com
लेखक: Rahul Bhuskute | प्रसिद्ध:
नमस्ते मंडळी माझा पेशा अध्यापन असला तरी मी समाजाच्या कष्टकरी वर्गातूनच आलेलो आहे . हा मिसळपाव . कॉम वर लिहिण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे तर आजचा मुद्दां असा आहे की तंबाखू च्या सेवना वर नानाविध पद्धतीने बंदी आणून सरकार असे भासवण्याचा प्रयत्न करीत आहे ,की त्याना देशातील जनतेच्या आरोग्याची फारच काळजी आहे …। इत्यादी . परंतु ग्यानबाची मेख अशी की सिगारेट व दारू महाग आणि कथित उच्चभ्रू व्यसनांवर कोणी बंदीची कुर्हाड आणू इच्छित नाही . परंतु गोरगरीब कष्टकरी जनतेला आपल्या रोजच्या रोजीरोटी च्या चिंतेवर आणि श्रम परिहार म्हणून घटका भर रिलीफ देणार्या " चैतन्य -चूर्ण " स्वस्त आणि मस्त तंबाखू वर या सरकारची वक्रदृष्टी का बरे? जर तंबाखू मुळे Cancer होतो ,तर तो सिगारेट व दारू मुळे ही होऊ शकतोच की !
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

फार निराळा विशय काढला की राव ... इकडे अनेकजण रेडी आहेत काथ्या कुटायला ...

अगदी अगदी! मिपावरच्या बर्‍याच धाग्यांवर त्यांच्या (संभाव्य) प्रतिक्रियांची कल्पना करून बर्‍याचदा मी एकटाच खुदखुदतो. (एका पायाची घडी घालून ... वगैरे..)

त्या बाईंना टुकारबाई असे नामाभिधान काही वर्तुळांत आहे. त्यांना याचि देही याचि डोळा पाहण्याचे भाग्य मिळालेल्या नरपुंगवांपैकी अस्मादिक एक आहेत म्हटलं!!!

काय सांगतांव! त्या खर्‍या आहेत होय? मला वाटलं ते एक फिक्शनल कॅरेक्टर आहे! मुक्तपीठ प्रतिक्रिया लेखकांचे पण कट्टेबिट्टे होतात की काय? अवांतरः "टुकारबाई" नाव ठेवणारं हे वर्तुळ कोणतं?

सर्वविषयपारंगत अखिलब्रह्मांडज्ञानसागर स्वभानसम्राट दत्तोबांचं काय म्हणणं आहे ह्या विषयावर?

तंबाखू च्या सेवना वर नानाविध पद्धतीने बंदी आणून
केवळ १८ वर्षे वयाखालिल व्यक्तिस तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी घातल्याचे पाहिले होते. त्याखेरीज आपण उल्लेखलेल्या नानाविध पद्धती कृपया उलगडून सांगाव्या. मिपावर स्वागत आहे.

चैतन्य चूर्णाने खाणाऱ्यांना गारवा मिळतो का ?त्याने कर्करोग होतो का ? माहित नाही . हे लोक (आणि खाइके पान वाले ) पिंका टाकून घाण फार करतात . रेल्वे स्टे आणि सार्वजनिक जागा रंगवण्याचा हक्क यांच्याकडे आहे . घरातल्या कोपऱ्यात नक्षी काढा ना .

अगदी सहमत. सगळ्यात घाणेरडा प्रकार म्हणजे तंबाखू मळून झाली की हे महाभाग त्यांच्या उपयोगाचा नसलेला तंबाखूचा भाग जिथे बसले असतील तिथे टाकून देतात. म्हणजे घरी बसले असतील तर तिथेही!!

दारू आणि सिगरेट पिवुन कोणी पचापचा थुंकत नाहीत. तुम्ही तंबाखू खावुन इथे तिथे पचापच थुंकणार नसाल तर तुम्हाला सूट मिळू शकेल

अतीसमांतर- अता न खाणारे या धाग्यावर किति तथुंकता ते बघायचं ! +१ तंबाखू खाणारे पचापचा थुंकत नाहित . ते काम मावा सुपारि आणि गुटखे खाणारे करतात.