आंध्र प्रदेशात सोनिया गांधी ह्यांचे मंदिर उभारण्यात आलेले आहे त्यात सोनियाजींचा फोटो लावून दररोज नियमित पूजा केली जाते. सोनियाजींमुळेच तेलंगाना राज्याचे स्वप्न साकार झाल्यामुळे तेलंगणातील जनतेला त्यांच्या बद्दल खूपच आदर वाटतो व ते सोनिया गांधीना यांना देवी मानतात.
तर अखंड आंध्रच्या समर्थकांनी स्व इंदिराजींचे स्मारक उभारले आहे. या मंदिराचे करीम नगर येथील तेलंगाना चौकात उद्घाटन झाले .या मंदिराच्या शेजारीच इंदिराजींचा पूर्णाकृती पुतळा आहे..
एखाद्या व्यक्तीचे मंदिर बांधणे हि तसे पाहिले विचित्रच गोष्ट आहे. ह्या पूर्वी मद्रास मध्ये खुशबू, हरियाणामध्ये धर्मेंद्र,जोधपूरमध्ये हेमामालिनी तसेच अनेक चित्रपट अभिनेत्यांचे मंदिरे आहेत. पण माझ्या मते एखाद्या राजकारणी व्यक्तीचे ती हयात असताना बांधलेले कदाचित हे पहिले मंदिर असावे.
भारतात अनेक महान नेते होवून गेले सद्य स्तिथीत भारताचे महान नेतृत्व सोनियाजी आहेत ह्या बद्दल कोणाच्याच मनात शंका असण्याचे कारण नाही.त्यांच्या वर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही त्यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे देश प्रगतीपथावर जात आहे .त्या एखाद्या राज्यात प्रभाव असलेल्या नेत्या नव्हेत त्या संपूर्ण भारतातील धर्मनिरपेक्ष, गोरगरीब, दलित दुबळ्या जनतेच्या त्या आशास्थान आहेत.
विरोधी पक्षात नेतृत्वाचा दुष्काळ आहे हीही बाब तितकीच खरी.सोनियाजींच्या उत्तुंग व्यक्तिमत्वापुढे विरोधी पक्षातील नेते हे खुजे वाटतात त्यांच्याकडे राष्ट्रीय नेतृत्वाचा अभाव आहे.
हे सर्व जरी खरे असले तरी मंदिर बांधण्याची कृती हा व्यक्तीस्तोम माजवण्याचा प्रकार आहे असे मला तरी वाटते. एखाद्या व्यक्ती बद्दल आदर असणे वेगळे नि त्याचे अंधभक्त असणे वेगळे.
मागे एकदा पु ल देशपांडे ह्यांचे एक वाक्य वाचले होते 'ज्यांच्या पायावर आदराने डोके ठेवावे असे पायच राहिलेले दिसत नाहीत. ह्यालाच अनुसरून सध्या भारतात ज्यांच्या बद्दल आदर वाटावा अशा नेत्यांचा दुष्काळ पडलेला आहे. त्यातूनच सध्या राजकारणात असलेले एकमेव आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून सोनियाजींचे मंदिर आंध्रातील जनतेने उभारलेले असावे.
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
?
+१११११११११११११११
अहो फ्री लान्सिंग पत्रकार
बुलफ्रॉग नंतर आरामात पिणार....
रात का नशा अभीतक गया नही....
मुद्दाम गहन विचार करणार्
स्वंय संपादित .
२५.२६
म्हणून
http://online3.esakal.com
पैकीच्या पैकी
मोदी असताना विपक्षात आपण
डोके आणि पाय...
हॅहॅहॅ... उगाच राहुल बाबांचे
हाण्ण्ण!!
पायावर डोके ठेवण्यासारखे
मु.विंची जागा चुकलीच.
आई ग !!!! कस काय होणार ह्यांचे!!!!
पायावर डोके ठेवण्यासारखे
आत्ताचा हाती आलेल्या
पुजारी बनण्यासाठी जे
आत्त्त्त्त्त्त्त्ता काय
लै भारी गब्रिएल
भारतात अनेक महान नेते होवून गेले सद्य स्तिथीत भारताचे महान नेतृत्व सोनियाजी आहेत ह्या बद्दल कोणाच्याच मनात शंका असण्याचे कारण नाही.त्यांच्या वर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही त्यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे देश प्रगतीपथावर जात आहे .त्या एखाद्या राज्यात प्रभाव असलेल्या नेत्या नव्हेत त्या संपूर्ण भारतातील धर्मनिरपेक्ष, गोरगरीब, दलित दुबळ्या जनतेच्या त्या आशास्थान आहेत.यापेक्षा अधिक विनोदी वाक्य वाचले नव्हते बर्याच दिवसात!भारतातील सर्वधर्मीय लोक
भारतातील सर्वधर्मीय लोक ज्यांना मानतात असे..
>>> यापेक्षा अधिक विनोदी
चला... मिपाकर शहाणे झाले