अतिवास आणि खेडूत यांच्या लिखाणामुळे प्रेरीत होऊन एक शतशब्द कथा लिहायचा प्रयत्न करतोय...कोठेतरी वाचलेल्या एका संवादाचे हे एक छोटे रुपांतर आहे... चु.भू.द्या.घ्या.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
"बाबा लवकर उशीर होतोय मला..." सातव्यांदा गुणेश खेकसला..”च्यायला रिक्षा/टॅक्सीचा आजच संप असावा आणि आजच बॉसने लवकर ऑफिसला बोलवावे.?”
अरे बाबा, तुला उशीर होतोय तर मी एकटाच जातो. आता जवळच आहे..
नको नको, जड बॅग घेऊन या उन्हात तुम्हाला चालवेल?
जमेल रे, हळू हळू जातो…. बसेन हवे तेव्हा वाटेत..
माझे ऐका, तुम्हाला सापडणार नाही तो वृद्धाश्रम, तुम्हाला सोडले की जाईन पळत.... खुप गल्ल्या आहेत. चुकाल कोठेतरी..मी फोनवरच बोललो आहे त्यांच्याशी म्ह्णून मला ही रस्ता शोधायचाच आहे..
काळजी नको करूस, मी तुझ्या आजोबांना मी येथेच सोडले होते.. माहीत आहे रस्ता..
आहो पण मला ही माहीत हवा ना रस्ता? तुमच्या नातवाचा काय भरवसा?
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
छान
हम्म..
उत्तम विषय.... पर कुछ कमी हैं
छान लिहीले आहे.....
आवडली !!
चांगल लिहिल आहात अजुन लेखांच्या प्रतिक्षेत
आवडल .
चांगला प्रयत्न.
चांगला प्रयत्न. कथा आवडली.
पेराल तसे उगवते ......
कथा जमली आहे