Welcome to misalpav.com
लेखक: विजुभाऊ | प्रसिद्ध:
कु. सुमार केतकर यांचे व्यक्तीमत्व रजनीकांथ आलोकनाथ इतके उंच आहे. ( नावात थ अक्षर नसले म्हणुण काय झाले?) त्यांच्या बद्दलची काही नव्या उजीलाटा ( उचलली जीभ लावली टाळ्याला ) १) कु सुमार केतकर जे लिहीतात त्याला भविष्य कालीन वर्तमान इतिहास म्हणतात. २) कु सुमार केतकर यांचे व्यक्तीमत्व इतके उत्तुंग आहे की चिमण्या कबुतरे तिथे शिटण्या अगोदर विचार करतात ३) कु सुमार केतकर हे जेंव्हा काही लिहायला घेतात तेंव्हा त्यांच्या मनात विचार येण्या अगोदर कागदावर उमटतो ४) कु सुमार केतकर जे लिहीतात त्याला विचार असे म्हणतात ५) कु सुमार केतकर याम्ना युवरांज्याबद्दल इतके प्रेम आहे की त्यानी त्यांच्या घरातील सर्वप्रीय प्राण्यांची नावे युवराज अशीच ठेवली आहेत. उदा: युवराज झुरळ , युवराज उंदीर , युवराज ढेकुण.ई. ६) कु. सुमार केतकर जेंव्हा एखाद्या वाईट म्हणतात तेंव्हा त्याचा अर्थ चॅनल साठी बाईट असा होतो ७) कु सुमार केतकर जेंव्हा पेन वापरतात तेंव्हा पेन कागदावर फ्रिअण्याऐवजी कागदच पेनाखाली फिरतो. ८) कु. सुमार केतकर यांच्यासाठी कोणताही दिवस हा सोनियाचा दिवसच असतो.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

आपल्या विरुद्ध कोणी काही बोलले,लिहिले,प्रतिक्रिया दिली तर बर्याच जणांची अवस्था सहनही होत नाही नि सांगताही येत नाही अशी होत असावी. त्यातूनच अशा विचित्र नि दुसऱ्याला कमी लेखणाऱ्या प्रतिक्रिया प्रसवल्या जातात.

आपल्या विरुद्ध कोणी काही बोलले,लिहिले,प्रतिक्रिया दिली तर बर्याच जणांची अवस्था सहनही होत नाही नि सांगताही येत नाही अशी होत असावी. त्यातूनच अशा विचित्र नि दुसऱ्याला कमी लेखणाऱ्या प्रतिक्रिया प्रसवल्या जातात.
ह्म्म्म.. मी तुमची मानसिक स्तिथी समझू शकते!

सचिन राव नाव सार्थ केले बघा ! मिसळपाव वरील म्याग्रा , अख्तर , वॉर्न ,ली इत्यादींचा अगदी खऱ्या खुऱ्या सचिन ला लाजवेल असे समर्थपणे तोंड देत आहात अर्थात चीकीखाऊ पंचाची पण कृपा आहेच म्हणा ! कीप इट अप ! बाकी तुमचे भिडू पवेलिअन मध्ये परतलेले दिसत आहेत ?

बघा साधर्म्य... (मिपावर आणि मिपा बाहेरही) नाद खुळा - Wed, 08/01/2014 - 11:03 कुरापती थयथयाट माथेफिरू भाषण तीब चाटुगिरीचा दा डिवचणारे बाष्कळ)धागे चिवट कि(चिकट) पणा चमचागिरीचा को तिथे नाक खूपसून (स्वत:ची वैचारीक बद्ध्कोष्ठ्ता/अपचन्)जगजाहीर करण्याचा कळस बाकी चालू द्या...(काही नोंदी अद्ययावत केल्या आहेत)

सचिन हे नाव एकंदरीत मनोरंजनासाठीच प्रसिद्ध आहे. तेंडुलकरांचा सचिन क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेटप्रेमींचे मनोरंजन करत होता तर तितके रूपेरी पडद्यावर खेडेकरांचा व पिळगावकरांचा सचिन प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. संगीताच्या माध्यमातून बर्मनांच्या सचिनने संगीतप्रेमींचे मनोरंजन केले. तर इथला नुसताच सचीन भारंभार विनोदी लेख पाडून मिपाकरांचे मनोरंजन करत आहे.

मला वाटते आय डी च्या नामाभिधानावरून टिपण्णी नसावी.इथे सचिन हे नाव खोटे देखील असू शकते. तेंव्हा अशा टिपण्णीचा कितीसा उपयोग होणार ? दुसरे असे की सचिनना त्यांचा एक दृष्टीकोन आहे , असू शकतो. त्यांच्या त्या "दृष्टीकोनावर" टीका होऊ शकते त्यांच्यावर नाही.

नम्र विनंती आपण प्रतिसाद काळजी पूर्वक पाहील्यास लक्षात येइल कि टिप्पणी हि "त्यांच्या" दृष्टीकोनावरच आहे. सदर स्तंभ लेखक (कुमार केतकर्/वा मि.पा.चे कु.के.) यांच्या सोनिया/काँग्रेस भलामण व (अचाट)हुजरेगिरीबद्दलच प्रतिवाद आहे. तस्मात यांचे आय डी नामनिधान "पहिलवान्/छत्रपती/न्यायाधिश/सरसेनापती" असा असता तरी प्रतीसाद देणार्या लोकांना फरक पडला नसता. सबब या आय्डी मुळेच कोणी प्रतीवाद करत आहे असे समजू नये. स्तंभ लेखकू (मिपावरील व मिपा बाहेरिल) कुमार केतकर यांचे आद्याक्षारात त्यांचे (सुप्तगुण) सामर्थ्य दडले आहे ते आम्ही प्रकट सांगितले ईतकेच. त्यांच्या लेख्/प्रतीसाद यांच्या दृष्टीकोनामधिल विशीष्ट गूण हेच या स्तंभ लेखकूंचे

"आ(वा)गळे पणआहे.

सुस्वागतम...!!! तुमचे स्वागत असो...!!! तुम्ही एक उत्तम व निष्णात वकील अहात हे आता सिद्ध झाले निर्विवाद, तुम्हाला किती मिळातात हो त्या कुसुमाराकडुन ??? जरा सान्गितलेत तर बरे होइल, जमल्यास तसे त्या नरेन्द्रला कळौन, त्यालाही तुमच्याकदे पाठ्वण्याचा प्रयत्न केल्या जाइल. बाकी लगे रहो, अगदी तब्येतीने खिन्ड लढवताय, सर्वान्ना तोन्ड देउन, अर्थात .... ते विचारु नका. ढन्यवाद

९)कु.सुमार केतकर विसाव्या शतकात जे बोलतात ते बाविसाव्या शतकात खरे ठरते. १०) मंगळाच्या पत्रीकेत कडक कु,सुमार केतकर आहेत. १२) कु.सुमार केतकर भाषण करायला उभे रहात नाहीत. पृथ्वीच त्यांच्या विचारांच्या वजनाने खाली दबली जाते. १३) कु.सुमार केतकर भाषण करण्या अगोदरच ते पेप्रात छापुन प्रसिद्ध होते. १४) कु.सुमार केतकर यांच्या जाज्वल्य वाणीमुळे त्याच्या फोनचा माउथ पीस नेहमीच आगीत धगधगत असतो. ते त्यावरच सिगारेट पेटवतात.( त्यावरुनच फोन लायटरची कल्पना सुचली) १५) कु सुमार केतकरांनी कु.सुमार केतकरांसाठी बोललेले ( उजीलाटा ) कु सुमार केतकरांचे विचार.म्हणजे अभिव्यक्ती स्वातन्त्र्य

सध्या अमेरिकेत जी भयंकर थंडी आहे, ती मोदींना व्हिसा नाकारल्यामुळे त्यांनी घेतलेला सूड आहे असं ओबामांना कुमारांनी सांगितलं म्हणे.

सोनियाजी अंतरात्मा की आवाज सुनती हय! कुमारजी अंतरात्मा की सुनते हय. विजु भौ कुमारकी की सुनते हय (कान पे पडेंगा तो सुनाई देंगाच की!) अशारितीने विजुभौ अंतरात्मा की सुनते हय. बास्स.

सु.कुमार केतकर लहान असताना ग म भ न लिहू लागले.संपादकीय,एडिटोरियल हे शब्द त्यानंतर प्रचलित झाले.

सु(कु)मार केतकरांचे तर्कशास्त्र अगाध आहे. - मागे एकदा ते म्हटले होते की ९० च्या दशकापासून धार्मिक पर्यटन वाढीला लागले त्याचे मुख्य कारण हिंदू "अतिरेक्यांनी" बाबरी मशीद पाडली होती हे आहे. अतिरेक्यांच्या त्या कारवाईमुळे हिंदू उन्माद उफाळून वर येऊन धार्मिक पर्यटन वाढले. १९९० च्या दशकापासून आर्थिक उदारीकरण व विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामुळे काही व्यक्तींची भरभराट झाली. विमानसेवा, कार इ. गोष्टी काही जणांच्या आवाक्यात आल्या. त्याचा परीणाम म्हणून सर्वच क्षेत्रात पर्यटन वाढले. पण हे विद्वान मात्र याचा संबंध बाबरी मशीदीशी जोडून मोकळे झाले. - परवाच्या मुलाखतीत त्यांनी अशी मुक्ताफळे झाडली की सोनियामाता इटलीहून भारतात येऊन इथली संस्कृती अंगिकारून निवडून आल्या व त्या पंतप्रधान पदापर्यंत पोचल्या होत्या. शरद पवारांना इटलीत जाऊन तिथला नगरसेवक होणे तरी शक्य आहे का? इटली या देशात, जो जन्माने इटालियन नागरिक नाही त्याला साधी ग्रामपंचायतीची निवडणू़क सुद्धा लढविता येत नाही. त्यामुळे शरद पवार काय प्रत्यक्ष राहुलला सुद्धा इटलीत साधा ग्रामसेवक सुद्धा होता येणार नाही. भारत सोडून इतर कोणत्याही देशात जन्माने त्या देशाचा नागरिक नसलेल्याला पंतप्रधान, अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश, सैन्यातील प्रमुख पदे इ. भूषविता येत नाहीत. भारत धर्मशाळा असल्याने इथे कोणत्याही देशाचे नागरिक येउन मंत्री, खासदार अगदी पंतप्रधान सुद्धा होऊ शकतात. या वस्तुस्थितीकडे मुद्दाम दुर्लक्ष करून केतकरांनी आपला लाळघोटेपणा जाहीररित्या सिद्ध केला. - काल एका वाहिनीवर बोलताना केतकरांनी वेगळेच तारे तोडले. ठाकरे कुटुंबीय व पर्यायाने इतर मराठी माणसांना कलेची भूक आहे. त्यांना नुसतेच राजकारण व पैसा, व्यापार इ. चालत नाही. याउलट मोदी फक्त राजकारण, राजकारण, काँग्रेस भ्रष्ट आहे इ. बोलतात. त्यांच्या बोलण्यात कलेचा अंशही नसतो. त्यांचे सगळेच व्यवहार, भाषणे इ. कलेच्या अभावी बटबटीत असतात. एकंदरीत गुजराती माणसे व्यापार, स्टॉक एक्स्चेंज इ. पलिकडे जात नाहीत. कलेपासून ते दूर असतात. गुजराती फक्त पैसा पैसा करतात, कलेचा त्यांच्याकडे दुष्काळ आहे हे अत्यंत मूर्खपणाचे विधान आहे. चित्रपटसृष्टीत केतन मेहता, परेश रावळ, अरविंद त्रिवेदी इ. अनेक नामवंत कलाकार आहेत. काही प्रसिद्ध चित्रकारही गुजराती आहेत. महाराष्ट्राची लावणी फारशी महाराष्ट्राबाहेर गेली नाही, पण गरबासारखे गुजराती नृत्यप्रकार देशभर लोकप्रिय आहेत. केतकरांना या वस्तुस्थितीचा जाणीव नसावी याचे आश्चर्य वाटते. ते गांधी-नेहरू घराणे प्रेमाने व मोदीद्वेषाने इतके आंधळे झाले आहेत की आपण काहीतरी अतार्किक, हास्यास्पद विधाने करून आपले हसू करून घेत आहोत हे त्यांच्या गावीही नाही. नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केले ते सप्टेंबर २०१३ मध्ये. दाभोळकरांची हत्या झाली २० ऑगस्ट २०१३ ला. तरीही या दोन घटनांचा बादरायण संबंध त्यांनी जोडला आहे. तसा संबंध लावायचा तर 'आप'चा उदय किंवा २०१३ मध्ये राहुल गांधींची काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून झालेली निवड इ. गोष्टींचाही संबंध लावता येईल. केतकर राज्यसभेची खासदारकी किंवा पद्मभूषण पुरस्कारासाठी गांधी घराण्याची चमचेगिरी करत आहेत असे वाटत नाही. गांधी-नेहरू घराण्याची भक्ती त्यांच्या नसानसात मुरली आहे. त्यामुळे कोणत्याही लाभाच्या अपेक्षेने ते ही चमचेगिरी करत आहेत असे वाटत नाही.

जो जन्माने इटालियन नागरिक नाही त्याला साधी ग्रामपंचायतीची निवडणू़क सुद्धा लढविता येत नाही.
Cécile Kyenge बद्दल ऐकलं आहे का काही?
भारत सोडून इतर कोणत्याही देशात जन्माने त्या देशाचा नागरिक नसलेल्याला पंतप्रधान, अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश, सैन्यातील प्रमुख पदे इ. भूषविता येत नाहीत.
नक्की? हे असलं काही पहिल्यांदाच ऐकतोय... कदाचित असेलही काही देशात खरं, पण... तिकडे "दी" अमेरीका मधे Ted Cruz तर पार अमेरीकेच्या अध्यक्षपदाची स्वप्न बघतोय म्हणे (बाप क्युबन, आई अमेरीकन, दोघे रहायचे कॅनडात. ह्यांचा जन्म कॅनडामधे) अजून इतर देशात सुद्धा असे प्रकार असणारच (कॅबिनेट मंत्र्यांची उदाहरणे चालत असतील तर कॅनडाकडे बघा, वर इटली आहेच आणि इतर अजूनही नक्की असतील)
भारत धर्मशाळा असल्याने इथे कोणत्याही देशाचे नागरिक येउन मंत्री, खासदार अगदी पंतप्रधान सुद्धा होऊ शकतात.
कैच्याकै... *lol* भावनेच्या भरात नागरीकशास्त्राची पार एक करताय राव. :D बाकी कुके, राजकारण, नेते याविषयीच्या गफ्फा/पक्षानुयायी युद्धे हव्या तशा चालूद्या. पण निदान उगाच भावनेच्या भरात कैच्याकै बोलून आपल्याच देशाची इज्जत आपल्या तोंडून काढली जाऊ नये इतकी माफक अपेक्षा.

जरा उशीरा उत्तर देतोय. >>> Cécile Kyenge बद्दल ऐकलं आहे का काही? या व्यक्तीबद्दल माहिती गुगलून मिळाली. एकंदरीत माझ्या माहितीचा स्त्रोत चुकीचा होता. इटलीत स्थलांतरीत मंत्री झाल्याचे हे पहिलेच उदाहरण असावे. पण इतर देशांप्रमाणेच इटलीत अध्यक्षपदाची निवडणुक स्थलांतरीतांना लढविता येत नाही हे नक्की. >>> भारत सोडून इतर कोणत्याही देशात जन्माने त्या देशाचा नागरिक नसलेल्याला पंतप्रधान, अध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश, सैन्यातील प्रमुख पदे इ. भूषविता येत नाहीत. > नक्की? हे असलं काही पहिल्यांदाच ऐकतोय... कदाचित असेलही काही देशात खरं, पण... तिकडे "दी" अमेरीका मधे Ted Cruz तर पार अमेरीकेच्या अध्यक्षपदाची स्वप्न बघतोय म्हणे (बाप क्युबन, आई अमेरीकन, दोघे रहायचे कॅनडात. ह्यांचा जन्म कॅनडामधे) अजून इतर देशात सुद्धा असे प्रकार असणारच (कॅबिनेट मंत्र्यांची उदाहरणे चालत असतील तर कॅनडाकडे बघा, वर इटली आहेच आणि इतर अजूनही नक्की असतील) - अमेरिकेच्या नागरिकत्वाच्या कायद्यानुसार जन्माने अमेरिकन नागरिक नसलेल्या व नंतर अमेरिकेत स्थलांतर करून नियमानुसार नागरिकत्व मिळविलेल्या नागरिकांस अमेरिकेच्या अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपदाची निवडणुक लढविता येत नाही. गुगलून बघा. या कायद्याविषयी असंख्य संकेतस्थळे सापडतील. टेड क्रूझ हा एखाद्या राज्याचा गव्हर्नर किंवा खासदार किंवा केंद्रात मंत्री होऊ शकतो. पण तो स्थलांतरीत असल्याने कधीही अमेरिकेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष होऊ शकणार नाही. पूर्वी हेन्री किसिंजर आणि अलिकडच्या काळातील मॅडलीन ऑलब्राईट याच कारणांमुळे अध्यक्ष/उपाध्यक्ष होऊ शकले नाहीत. इतर अनेक देशात असाच कायदा आहे. स्थलांतरीतांना सर्वोच्च पदावर पोचू देणारा कदाचित भारत हा एकमेव देश असावा. >>> भारत धर्मशाळा असल्याने इथे कोणत्याही देशाचे नागरिक येउन मंत्री, खासदार अगदी पंतप्रधान सुद्धा होऊ शकतात. कैच्याकै... भावनेच्या भरात नागरीकशास्त्राची पार एक करताय राव. भारतात ७ वर्षे वास्तव्य केल्यानंतर कोणताही परदेशी नागरिक भारताचा कायदेशीर नागरिक होऊ शकतो व घटनेनुसार भारताचा नागरिक असलेली कोणतीही व्यक्ती कोणत्याही पदाची निवडणूक लढवू शकते. सोनिया गांधी हे याचे अगदी उत्तम उदाहरण आहे. आसाममध्ये तर कायदेशीर्/बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांनी एक पक्ष स्थापन करून निवडणुका लढविलेल्या आहेत. आता तर असं बोललं जातंय की २०१६ किंवा २०२१ मधला आसाममधील मुख्यमंत्री हा एक कायदेशीर/बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरीत असेल. बिहार/बंगालमधून एक नेपाळी बेकायदेशीर काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाल्याचा खटला न्यायालयात आहे. एकंदरीत स्थलांतराविषयी फारसे कडक नियम नसल्याने व भ्रष्टाचारामुळे बेकायदेशीर स्थलांतरीत भारतात घुसून कोणत्याही सर्वोच्च पदापर्यंत पोचू शकतात. बाकी कुके, राजकारण, नेते याविषयीच्या गफ्फा/पक्षानुयायी युद्धे हव्या तशा चालूद्या. पण निदान उगाच भावनेच्या भरात कैच्याकै बोलून आपल्याच देशाची इज्जत आपल्या तोंडून काढली जाऊ नये इतकी माफक अपेक्षा.

याबाबतीतले नियम Obtain citizenship by registration. The Central Government may, on an application, register as a citizen of India under section 5 of the Citizenship Act 1955 any person (not being an illegal migrant) if he belongs to any of the following categories:------- •a person of Indian origin who is ordinarily resident in India for five years before making an application for registration; •a person of Indian origin who is ordinarily resident in any country or place outside undivided India; •a person who is married to a citizen of India and is ordinarily resident in India
for seven years
before making an application for registration;

पण इतर देशांप्रमाणेच इटलीत अध्यक्षपदाची निवडणुक स्थलांतरीतांना लढविता येत नाही हे नक्की
माझ्या मते इटलीमधे सुद्धा आपल्याप्रमाणेच पार्लिमेंटरी सिस्टीम आहे, प्रेसीडेंशीअल नव्हे. त्यामुळे असेंब्लीमधे निवडून गेलेला कुठलाही नेता अध्यक्ष होण्यास पात्र ठरेल आणि आपल्या प्रमाणेच ह्या नेत्याला असेंब्लीने निवडावे लागेल. अध्यक्षपदासाठी वेगळे नियम फक्त प्रेसीडेंशीअल सिस्टीममधे असतात (कारण तिथे या पदासाठी थेट लढत असते.)
इतर अनेक देशात असाच कायदा आहे. स्थलांतरीतांना सर्वोच्च पदावर पोचू देणारा कदाचित भारत हा एकमेव देश असावा.
आणि पार्लिमेंटरी सिस्टीम राबवणार्‍या अनेक देशात असा कायदा नाही सुद्धा. टेडचे उदाहरण निव्वळ अशासाठी दिले होते की अमेरीकेसारख्या प्रेसीडेंशीअल सिस्टीम राबवणार्‍या आणि नॅचरल बॉर्न सिटीजनचा नियम असलेल्या देशातही असे गोंधळ होत आहेत. मग पार्लिमेंटरी सिस्टीम जी नियमानेच निवडून आलेल्या प्रत्येकाला पंतप्रधान होण्याचा हक्क देते त्या ठिकाणी हे चूक कसे? आणि तरीही भारतात आजवर किती स्थलांतरीत पंतप्रधान झाले आहेत?
भारतात ७ वर्षे वास्तव्य केल्यानंतर कोणताही परदेशी नागरिक भारताचा कायदेशीर नागरिक होऊ शकतो व घटनेनुसार भारताचा नागरिक असलेली कोणतीही व्यक्ती कोणत्याही पदाची निवडणूक लढवू शकते.
हेच्च... हेच तर म्हणतोय. वर तुम्ही लिहीलं होतं "इथे कोणत्याही देशाचे नागरिक येउन मंत्री, खासदार अगदी पंतप्रधान सुद्धा होऊ शकतात" आणि म्हणून मी तुम्हाला नागरीकशास्त्राची एक करू नका अशी विनंती केली होती. एकदा भारतात नागरीकत्व घेतले की ते भारताचे नागरीक होतात, आणि नियमानुसार तोवर ते निवडणूका लढवू शकत नाहीत. स्थलांतरीतांचा प्रश्न मोठा आहे आणि तो जगभर आहे. वर उदाहरण दिलेली Cécile Kyenge ही एक बेकायदा स्थलांतरीत होती. तिने नंतर एका इटालिअन माणसाशी लग्न करून नागरीकत्व मिळवले आणि आता केंद्रिय मंत्री आहे. कॅनडामधे स्थलांतरीत लोक मंत्री आहेत. अगदी अमेरीकेतसुद्धा खालच्या पातळीवरच्या निवडणूकात हे घडतं, आणि स्थलांतरीतांची मुले वरच्या निवडणूका लढवतायत. अमेरीकेत तर बेकायदा स्थलांतर कैच्याकै झालंय आजवर. आपल्याकडे फक्त स्थलांतराचा प्रश्न नसून बेकायदेशीर स्थलांतरविरोधी कायद्यांच्या अंमलबजावणीतल्या कामचुकारपणाचा आहे. पण म्हणून ते थेट निवडणूका लढवू शकत नाहीत. हे कायदे जर नीट अंमलात आणले तर मुळात भारतात रहाण्यासाठी परवानगी होती का हे दाखवावं लागेल, इथेच बरेच बेकायदा स्थलांतरीत उमेदवार लटकतील. आणि कायदेशीर रीत्या राहीले तर मग त्यांना नियमानुसार नागरीकत्वासाठी अर्ज करावा लागेल. एकदा ते नागरीक झाले की त्यांनाही ते हक्क मिळतील जे इतर भारतीयांना आहेत. यात चुकीचं काय आहे? आणि भ्रष्टाचारामुळे हे नियम धाब्यावर बसवले गेले तरी निवडून देणे न देणे कुणाच्या हातात आहे?

थॉर माणूस, आपल्या प्रतिसादावर दुपारी ३ च्या सुमारास एक दीर्घ प्रतिसाद टंकलेला होता. एखाद्या देशात स्थलांतर करून नागरिकत्व मिळविलेल्यांना सर्वोच्च पदे देणे हे कसे अयोग्य आहे व इतर देशांना कसे त्याचे वाईट अनुभव आले होते हे त्यात सोदाहरण लिहिले होते व त्याच कारणामुळे इतर देशात अशा नागरिकांना सर्वोच्च पदाची निवडणुक लढता येत नाही हेही सोदाहरण लिहिले होते. परंतु "प्रकाशित करा" या गुंडीवर टिचकी मारल्यावर "मिसळपाव १५:०० ते १७:०० या काळात बंद राहील" असा संदेश दिसला आणि माझा प्रतिसाद नष्ट झाला. आता परत एवढा मोठा प्रतिसाद टंकण्याची इच्छा नाही.

गुजराती फक्त पैसा पैसा करतात, कलेचा त्यांच्याकडे दुष्काळ आहे हे अत्यंत मूर्खपणाचे विधान आहे. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>केतकर सर बरोबर बोलतायत खेळ, विज्ञान,लष्कर, साहित्य ह्या क्षेत्रात गुजराती पार पिछाडीवर आहेत.गुजरात हा आर्थिकदृष्ट्या आघाडीवर आहे. पण इतर आघाड्यांवर फारच पिछाडीवर आहे. लष्करात अनेक प्रांतांच्या रेजिमेंट आहेत गुजरातची सोडून 1965 साली भारतीय सैन्याने गुजरात रेजिमेंट उभारायचा प्रयत्न केला होता, पण तो प्रयत्न फसला, कारण गुजरात मधून कोणी भरती व्हायलाच तयार झाले नाही.

लष्करात अनेक प्रांतांच्या रेजिमेंट आहेत गुजरातची सोडून 1965 साली भारतीय सैन्याने गुजरात रेजिमेंट उभारायचा प्रयत्न केला होता, पण तो प्रयत्न फसला, कारण गुजरात मधून कोणी भरती व्हायलाच तयार झाले नाही.
व्वा ! बरोबर आहे, कारण महार रेजिमेंट मध्ये फक्त महारच लोकं असतात आणि मराठा मध्ये मराठा आणि पंजाब मध्ये पंजाबी ! तुमच्या आकलन क्षमतेच्या प्रदर्शनाने तुम्ही तुमच्या आराध्याचीच खोलून लायकी काढता आहात असे नाही का वाटत ?

कारण गुजरात मधून कोणी भरती व्हायलाच तयार झाले नाही.
ह्यामागे अनेक सामाजिक्,आर्थिक कारणे असतात.दावूद्,छोटा राजन आणि त्यांचे अनेक टोळी सदस्य हे मराठी आहेत्.म्हणून मराठी माणूस गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे असा अनुमान काढायचे का?भ्रष्टाचार्,गुन्हेगारी टोळ्या,बिल्डर लॉबी ह्यात महाराष्ट्राचा वरचा क्रमांक लागतो.मग मराठी माणूस भ्रष्ट आहे असे म्हणायचे का?

ह्म्म हे बरोबर आहे. पुण्यात मराठा रेजिमेंट असा बिल्ला असलेल्याला मी मराठीत पत्ता विचारला तर त्याने बिहारी हेल असलेली हिंदी बोलायला सुरवात केली :D

सचीनजी, आपण प्रतिसाद सुद्धा उलटे (खालुन वर) वाचता असे आपल्या प्रतिसादावरुन जाणवते.

श्रीगुरुजी हे **** पुढे गीता वाचायचा प्रयत्न करत आहे. श्रीगुरुजी तुम्हाला अनेकानेक शुभेच्छा, देव तुम्हाला बळ देवो.

कुमार केतकर : मिपाश्री, मिपाभूषण. कुमार केतकर : मिपाचे आलोकनाथ. कुमार केतकर : मिपावर केतकर को मार

ह्या प्रश्न येथे विचारुन पहा... कदाचित ऊत्तर मिळेल.

http://www.youtube.com/watch?v=EdP4SpRaUvs ही क्लिप पाहिलीत तर केतकरांची बिनडोक तारेतोड दिसेल. साहित्य संमेलनात राजकारण आणले ते पुरेसे नव्हते की काय म्हणून आता राजकारणात साहित्यिक मनोवृत्ती आणण्याचा आचरटपणा. काय तर म्हणे मोदींना साहित्याचा गंधही नाही. निव्वळ स्टॉक मार्केट आणि काँग्रेसद्वेष इतकेच भांडवल. याउलट बाळ ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मनाने साहित्यिक (!). त्यामुळे त्यांच्यात आणि मोदींमधे कुरबुरी सुरु झाल्या आहेत म्हणे. ठाकरी भाषा जी बाळासाहेबांनी सुरु केली आणि जी राज ठाकरे पुढे चालू ठेवत आहेत त्या भाषेला एका साहित्यिकाची भाषा म्हणणे जअअअअअअअअअअरा अतीच होते आहे असे मला वाटते. काही सडकछाप डायलाग इतकेच ह्या लोकांच्या भाषेबद्दल म्हणवते. ते लोकांना भावतात, त्याला टाळ्याही पडतात. उदा. महाराष्ट्रात आप कशाला तिथे त्यांचा बाप आहे की! हा एक ताजा डायलॉग. पण केतकर आता सोनियास्तुतीपाठक वा गांधीगुणगायक ह्या भूमिकेतून आता शकुनीमामाच्या भूमिकेत उतरु पहात आहेत. येनकेन प्रकारेण भाजपा, शिवसेना आणि मनसे ह्यांच्यात फूट पाडायचे मनोरथ शिजत आहेत. तसेही शिवसेना आणि मनसे एकमेकांशी ३६ चा आकडा ठेवून आहेतच. पण जर मनसे भाजपापासून दुरावला तर आपल्या लाडक्या काँग्रेसचे पारडे थोओओओओओओओडे जड होईल आणि आपले राज्यसभेचे पारडेही जड होईल असा काही डाव असावा. चालू द्या. आमचीही थोडी करमणूक होईल.

सन्माननीय श्री कुमार केतकर सरांविषयी अद्वा तद्वा, वाईट, व अविचारी बोलणे बोलुन महात्मा गांधीसमान असणार्‍या व्यक्तिमत्वावर चिखलफेक करणार्‍या तुम्हा सर्वांचा देवबाप्पा कान कापेल. आणी किनई तो तुमचे घर किनई उन्हातच बांधेल......बघाच तुम्ही !