Welcome to misalpav.com
लेखक: मन | प्रसिद्ध:
पेप्रात बरीच सदरं येतात. त्यातली काही "विचारा तुमच्या शंका" किंवा "इथे मिळतील सल्ले" स्टाइल असतात. त्यातील काही टिपिकल प्रश्न गविकाकांना विचारावेत म्हटलं. त्यांचाही झटकन प्रतिसाद आला. तुम्हालाही काही प्रश्न व शंका असल्यास गविकाकांना सल्ला विचारु शकाल. एक टेम्प्लेट केस येथे देत आहे. प्रश्न: काका, मी इयत्ता दहावीत आहे. आमच्या शेजारी एक ताई राहते. तिच्याविषयी माझ्या भावना वेगळ्या आहेत. मला ती खूप आवडते. ती जाता येता माझ्याशी बोलते. नुकतीच ऑफिसला जाताना एकदा ती मला "बाsय" असं म्हणाली. यामुळे तिच्याही मनात फीलिंग्ज आहेत हे मला समजलं. तेव्हापासून माझं तिच्याकडेच लक्ष लागलेलं असतं. तीही जाता येता माझ्याशी बोलते. मी तसं अजून तिच्यापाशी बोललो नाहिये. पण मी सुरुवात कशी करु याविषयी कृपया सल्ला देणे. माझे अभ्यासाचेही नुकसान होत आहे. एक विद्यार्थी. . . गविकाकांचे उत्तरः श्री. रा.रा. विद्यार्थी, नमस्कार. गहन आहे प्रश्न.. पण करतो प्रयत्न. तुम्ही दहावीत आहात. एका शैक्षणिक वर्षास एक मानवी वर्ष या प्रमाणात तुमचे आजपावेतोचे शिक्षण झाले आहे असे मी गृहीत धरतो. म्हणजेच आपण अंदाजे १४ वर्षाचे आहात. तुम्ही उल्लेख केलेली "ती" ऑफिसात जाताना तुम्हाला निरोप घेण्यासदृश हावभाव आणि अविर्भाव करते. बालकामगार गुन्ह्याचे या बाबतीत उल्लंघन झालेले नसून "ती" नोकरी करण्याच्या कायदेशीर वयाची आहे असंही मी गृहीत धरतो. शिवाय ती ऑफिसात कामावर जाते, (बांधकामावर नव्हे) असं उल्लेखावरुन दिसत असल्याने तर्कदृष्ट्या ती किमान डिग्रीपर्यंत शिकली असावी. तस्मात तिचे वय वीस वर्षांच्या वर आहे असेही मी गृहीत धरतो. याचाच अर्थ ती तुमच्यापेक्षा किमान सहा वर्षांनी मोठी आहे. तसे असण्यास काही हरकत नाही. तसे असल्यास ती आवडण्यासही काही हरकत नाही. पण जग हरकतींपेक्षा शक्यतांवर चालत असते हा एक मोठा दु:खद नियम आहे. त्यामुळे कु. (हेही एक गृहीतक मांडायचे अंमळ विसरलो) "ती" हिज आपण आवडत असलात तरी लैंगिक पुनरुत्पादनाच्या उद्देशाने (ज्याला अंकुरावस्थेत प्रेम असेही म्हणतात), आवडत असाल अशी शक्यता बिंदुवत वाटते. त्यामुळे तुमच्या भावनांशी पूर्णपणे सहानुभूति ठेवूनही तुम्ही उल्लेखलेली "ती" तुमची "ही" होण्याची शक्यता नगण्य असल्याने आपण खुद्द हपीसात जाण्याच्या वयापर्यंत कळ काढून त्या वेळी तत्कालीन दहावीतल्या "तीं"ना "हाय" करावेत असे सुचवून पाहतो. तोसवर आपल्या भावनांचे दमन करण्याची गरज नाही. नैसर्गिक गोष्टींना अनैसर्गिक समजू नका इतकेच सांगतो. बाकी दहावीत असल्याने तुम्हांस अधिक स्पष्टीकरण नकोच अशी आशा. आपला का?का?. गवि. . . . ता.क.: वाचकांनीही आपल्या आयुष्याशी संबंधित प्रश्न विचारावेत. दर आठवड्याला किंवा गविकाकांचे जेवण उत्तम झाले असल्यास केव्हाही निवडक प्रश्नांची उत्तरे देण्यात येतील. द.ही.: फाजील प्रश्नांना प्रश्नकर्त्याचे दुर्दैव समजले जाईल. --मनोबा व गविकाका
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

प्रश्न तुमचा उत्तर राजा गोसावींचे या सदराची आठवण झाली. आता आमचा प्रश्नः धर्म्/विज्ञान,जात्-पात,राजकारण,पुरोगामी/प्रतीगामी,निवासी/अनिवासी यावरील बिनबुडाचे वाद या पल्याड ही काही जग आहे हे जालीय (स्वयंभू)विचारवंताना *new_russian* \m/ \M/ कधी कळेल (आणि पचनी पडेल)*blush* :-[ :[ ;'> ;-. :blush:

आलटून्/पालटून(१) वापरण्याची प्रथा(२) आहे बुवा(३)... तळटीपा: १.आलटून्/पालटून म्हणजे तुमची बाजू कुठली "धागा कर्त्याची की विरोधी पक्षाची" त्यानुसार सोईस्कर. २.प्रथा म्हणजे परंपरा नव्हे "परंपरा" म्हटले की तुम्ही रूढीवादी अगदी बुरसट्लेल्या विचारांचे गणले जाल. ३ सदर माहीती "जुण्या आणि जाणत्या" मिपाकराने नाव न सांगण्याचे अटीवर दिली आहे तेव्हा ईत्यलम.

माननीय बर्फाळलांडगा, सदर धागा हा प्रश्न विचारुन उत्तरे मिळवण्यासाठी आहे. प्रश्न विचारुन पेच निर्माण करण्यासाठी नाही. तेव्हा प्रश्न विचारण्यामागे उत्तर मिळवण्याचा उद्देश असावा, उत्तरकर्त्याची उत्तरपूजा बांधण्याचा उद्देश नसावा. स्त्रीपुरुष एकसमान आहेत असं म्हणून पाहतो.

जीवन भाऊ हे फार उत्तुंग व्यक्तीमत्व आहे.त्यामुळे त्यांनी स्वतःचा ब्लॉग पण काढला आहे. आपण तिथे जावून त्यांना हवे ते विचारू शकता. त्यांच्या ब्लॉगचा पत्ता देत आहे. http://agakke.blogspot.in/2013/04/jay-maharastra.html

ह्या अशा जीवनरंगी लेखांच्या बाबतीत आम्ही फर्स्टच आहोत आणि असणार. त्याचे काय आहे, मुद्दाम गहन विचार कर्रुन पाडलेल्या बिन-केशरी आणि घट्ट पाकातल्या लेखांपेक्षा (प्रतिसादांपेक्षा) हे बरेच नाही का?

गविकाका, उलाला उलाला... हे गाणे पाहुन माइंड "डर्टी" झाल्यास काय करावे ? ;)

न उडणारे प्रतिसाद द्या. मग ऑपॉप संपादक कसं व्हायचं ते कळेल.

तेच तर विचारले आधी. त्याचे धड कुणी उत्तर देत नाही. याचाच अर्थ न उडणारे प्रतिसाद कसे द्यायचे कुणालाच माहित नाही. याचाच अर्थ आताचे संपादक त्या निकषानुसार संपादक झालेले नाहीत. म्हणूनच वरचा प्रश्न विचारला.

जीवन भौंचा साल्ला बर्फाळलांडगा - Fri, 10/01/2014 - 15:16नवीन सदर कवा सुरु व्हनार ? हा साल्ला कोण???

कारण बराच गहन विचार आणि मुद्दाम वेळ खर्च कर्रून पण इथे बर्‍याच जणांना ते जमत पण नाही. ह्यासाठी बहूदा नावीक होवून , चीनच्या समुद्रात बर्फाच्या रंगाच्या प्राण्याची सोबत घेत टंकत असावेत. वरील उप-प्रतिसाद सूड यांनाच आहे. हे वेगळे सांगायला नकोच.

कोणाच्याही डोक्यावर मिरे वाटण्याची स्टँडर्ड ऑपरेटिङ्ग प्रोसिजर काय ?
संपादक व्हावे. त्यांच्याही डोक्यावर मिरे वाटायचे असतील तर सामनामध्ये सदरलेखन करावे.

गविकाका आपले लाडके नसलेल्यांचा धागा,त्यांची रनिंग कॉमेंट्री डोक्यात जात असेल तर इस्त्री शक्तीची जाज्वल्य पावर दाखवुन भरकटवावा का?

प्रत्येक्ष संपादकांचा पाठिंबा!!जय हो,जय हो ,बाबाजी!!