Welcome to misalpav.com
लेखक: वेल्लाभट | प्रसिद्ध:
२० मिनिटात होणारा सर्किट ट्रेनिंगचा व्यायाम बरीच जणं करतायत असं कळलं :) तर, त्या २० मिनिटाच्या व्यायामाचं जे प्रिन्सिपल म्हणजे तत्व होतं, की वेळ कमी, आणि त्यात व्यायाम जास्त प्रभावी; तेच तत्व साधणारा आणखी एक व्यायामप्रकार तुम्हाला सांगावा म्हणतो. असंच `हे वाच ते वाच' करताना मला कळलेल्यांपैकी ही एक गोष्ट. या व्यायामाचं नाव, `बर्पी'. हा व्यायामाचा प्रकार नाही; तर एरोबिक प्रकारात आणि काहीसा प्लायोमेट्रिक प्रकारात मोडणारा एक व्यायाम आहे. पण हा व्यायाम सॉलिडा प्रभावी आहे. सर्वांगाला व्यायाम देतानाच कार्डिओ म्हणजेच ह्रुदयाला व्यायाम देणारा, किंवा स्टॅमिनाचाही कस लावणारा असा हा व्यायाम, `बर्पी'. केवळ हाच व्यायाम आणि जोडीला स्ट्रेचिंग, किंवा काही योगासनं, असाही दिनक्रम ठेवून तुम्ही तुमचं फिटनेस चं उद्दिष्ट साध्य करू शकता. हे काय असतं ब्वा, कसं करायचं?... ते असं. १. ताठ उभं रहा. नजर समोर. २. पुढे खाली वाकून पावलांच्या बाजूस (अगदी बाजूस नसले तरी किंचित पुढे, फार नको) दोन्ही हात ठेवा. (इथे गुडघ्यात वाकल्यास हरकत नाही.) ३. दोन्ही पाय मागे फेकत `पुशअप पोजिशन' मधे या. ४. एक पुशअप करा. (न जमल्यास ही स्टेप वगळा) ५. पाय पुन्हा उडी मारून हाताजवळ आणा. (स्टेप २) ६. हात उंच करत बसल्या स्थितीतून उडी मारून स्टेप १ च्या स्थितीत या. a तूनळी वर याचे अनेक व्हिडियो मिळतील, आंतरजालावर बरीच माहिती मिळेल. हा सुद्धा साधारण सगळ्या वयोगटांना जमू शकणारा व्यायाम आहे. तेंव्हा वेळ कमी असेल, फिटनेस तरीही महत्वाचा असेल, तर बर्पीसाधना करायला हरकत नाही. हमखास फरक जाणवेल, तुम्हाला आणि पर्यायाने इतरांनाही. एक बर्पी चॅलेंज म्हणून प्रकार करतात काही जण. १ बर्पी पासून सुरुवात करून रोज १ अशा प्रकारे संख्या वाढवत न्यायची आणि १०० दिवसा अखेर तुम्ही न थांबता एका दमात १०० बर्पी करायच्या. .... ऐकायला कदाचित कठीण वाटेल पण ट्राय करायला हरकत नाही ना! १०० नाही ५० तरी होतीलच एका दमात. मुद्दा काय, आपला स्टेमिना आहे त्यापेक्षा चांगल्यापैकी वाढला पाहिजे... त्यातच विजय आहे..
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

पण कसं आहे, की दुसर-या स्टेप मधे हॅमस्ट्रिंग्स ना स्ट्रेच, पुशअप पोजिशन मधे शोल्डर, पुशअप ने पेक्स म्हणजे चेस्ट, ट्रायसेप्स, शोल्डर्स, काही अंशी लॅट्स, तसंच पुढे स्क्वॉट थर्स्ट मधे क्वाड्रासेप्स, काफ्स, ग्लूट्स....असं सगळंच अ‍ॅड्रेस होतं की.... झालंच ना सर्वांग नाही!! फक्तं एव्हढ्यालाच सर्वांग कसे म्हणता येईल? :)
सूर्यनमस्कार फार वेगळे आहेत, त्यात १२ स्थितींमधे ठहराव असतो, ज्यायोगे स्नायू आकुंचन - प्रसरण पावतात. याच्याशी सहमत. :) जोरांमधे ठहराव कमी असतो. Vigour जास्त असतो. कबूल :) आणि बर्पीज हा तुलनेने पटापट करायचा प्रकार आहे. न थांबता एका मागोमाग आवर्तनं केली की याची खरी गंमत कळते. म्हणून हा एरोबिक व्यायाम होऊ शकतो. माझ्या आधीच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे हा व्यायाम चांगला आहे यात शंका नाही, पण याच्या काही मर्यादा खाली देते आहे १) व्यायाम एका लिनीअर दिशेने होतो २) ज्याला तुम्ही " ठहराव" म्हणता ते ... सस्टेन्ड पोझिशन नसल्यामुळे कुठल्याच स्नायुला योग्य / पुरेसा स्ट्रेच होत नाही. ३) रिस्क / पोटेन्शियल फॉर इन्जुरी : ज्यांना अपर बॉडी स्ट्रेन्ग्थ नाही / व्यायामाची ज्यांना सवय नाही / गरोदर / किंवा इतर काही आजार असलेले अश्या होतकरूंनी व्यावसायिक देखरेखी शिवाय केल्यास इन्जुरीची शक्यता मला स्वतःला तुम्ही दिलेले प्रोग्रेशन ( १ ते १००, रोज प्रत्येकी एक वाढवून ) एरोबिक फायदा लक्षात ठेवून सुद्धा अयोग्य वाटते. ( माझे वैयक्तिक मत आहे, तुमच्यावर टीका करण्याचा हेतू नाही, तेव्हा गैरसमज नसावा :) )

मी कुठे तुमच्या प्रतिसादाला टीका समजलोय... मुळीच नाही. मी माझं understanding सांगितलं, तुमच्याशी पडताळून बघायला. बास. त्यावर तुमचा वरील प्रतिसाद बरोबरच आहे.. I agree with it. Aerobic progression numbers were just as a reference to what certain people/groups of people do. तसे दुवे गूगल वर मिळतात. `असं किती वेळा करायचं' या प्रश्नाला नेमकं उत्तर नव्हतं, म्हणून हे उदाहरण दिलं जेणेकरून त्या उत्तराचा क्लू मिळेल अपोआप.

या अबबतीत असंच सांगेन की मधुमेही काय किंवा हार्ट पेशंट काय; इन फॅक्ट तुमचा साधा खांदा नाजुक असेल तरी तुम्हाला एखादा व्यायाम वर्ज्य ठरू शकतो तेंव्हा अशी कुठलीही शंका असेल तर डॉक्टरांना विचारणंच योग्य आहे. मी इतकंच सांगू शकतो, की when in doubt; don't do it.