Welcome to misalpav.com
लेखक: मुक्त विहारि | प्रसिद्ध:
भायखळ्याचं जिजामाता उद्यान. जवळजवळ ५० एकर विस्तीर्ण परिसरावर दीडेकशे वर्षांपासून उभं असलेलं हे उद्यान मुख्यता प्राणिसंग्रहालय म्हणून प्रसिद्ध. इथे लोक येतात ते प्राणी-पक्षी बघायला. हल्ली तिथे फार थोडे प्राणी शिल्लक आहेत. मात्र प्राणिसंग्रहालय असलेल्या या उद्यानात अनेक दुर्मीळ आणि आगळेवेगळे वृक्षही आहेत, हे फार थोड्यांना माहीत असेल. हे एक समृद्ध बोटॅनिकल गार्डनच आहे. निसर्गाने फुलांच्या रूपाने रंगांची मुक्त उधळण केली की इथलं वृक्षवैभव जास्तच खुलून दिसतं. अगदी न चुकवण्यासारखी ही रंगपंचमी निसर्गवेडे दर वर्षी बघतातच. आता फुलोरा यायला सुरुवात झाली आहे, मग रसिक मिपाकरांनाही तो बघायला नक्कीच आवडेल, म्हणून हा ‘भटकंती कट्टा’. दिनांक : २६ जानेवारी २०१४ वेळ : सकाळी ९:३० ठिकाण : जिजामाता उद्यान , भायखळा येथील तिकीटाची खिडकी. साधारण वेळे नुसार कार्यक्रम. सकाळी १० ते ११:३० पर्यंत झाडांची माहिती घेणे. त्या दिवशी माटूंगा येथील "उडिपी श्रीक्रुष्ण बोर्डींग" ह्या हॉटेल मध्ये फीस्ट आहे.जवळ पास १६ ते १८ पदार्थ ते १६० किंवा १८० रु.त देणार आहेत.त्यांनी १२ वाजेपर्यंत यायला सांगीतले आहे.तेथे जेवून मग कट्ट्याचे विसर्जन करण्यात येईल.खर्च प्रत्येकाने आपला आपण करायचा आहे. दरवेळी आपण फक्त मिपाकरच भेटतो.ह्यावेळी आपण आपल्या कुटुंबासकट भेटू या. मी आणि माझी बायको मुले नक्की येत आहोत.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

काही दिवसांपूर्वी मुलुंड कट्ट्यादरम्यान उपस्थित मिपाकरांना मनातला विचार सहजच बोलून दाखवला होता, की या जानेवारी-फेब्रुवारीच्या दिवसात भायखळ्याच्या जिजामाता उद्यानातल्या दुर्मीळ वृक्षांना फुलोरा येतो, तो बघायला आपण जाऊ या. कट्ट्याला उपस्थित मिपकरांनी ही कल्पना उचलून धरली आणि नंतर विमेनी कट्टा वृत्तान्तामध्ये या कल्पनेची ‘झाकली मूठ’ ठेवूनही, कट्टा वृत्तान्ताला प्रतिसाद देणाऱ्या (सूड, पैसा, जोशी’ले) मिपाकरांनी या ‘सस्पेन्स’ कल्पनेची वाट पाहत आहोत, असं लिहिलं. त्यामुळे मग हे मनावर घेऊन, सर्वेक्षण करण्यासाठी मी आणि विलासराव यांनी २९ डिसेंबरला उद्यानात एक चक्कर मारली. त्या वेळी विशेष फुलोरा आला नव्हता, पण नंतरच्या आठवड्यात मात्र फुलोऱ्याची चिन्ह दिसायला लागली होती. मग मुक्त विहारिंशी सतत संपर्कात राहून शेवटी २६ जानेवारी ही तारीख ठरवली आहे. तेव्हा सर्वांनी स.कु.स.प. या. सर्वांचाच, सुधांशुनूलकर

आता तुम्हीच पुढचा कट्टा ठरवा....किंवा तुमच्या सोईने सवडीने बोलवा आम्ही सगळे नक्की येवू... चांगल्या माणसांना भेटायला माझी नेहमीच तयारी असते.

भेटण्यासाठी तुमचा पत्ता नक्कीच कट केला आहे... तुम्ही मिपाच्या बल्लवाचार्यांपैकी एक असल्याने तुम्हाला भेटण्यात नाही तर तुमचे अपहरण करण्यात जास्त इंटरेस्ट आहे...

...नंतरच्या आठवड्यात मात्र फुलोऱ्याची चिन्ह दिसायला लागली होती. या अनवट कट्ट्याला शुभेछा ! भरपूर फोटोंसकट वर्णन त्वरीत हवे हे नोंदवून ठेवत आहे :)

प्राणी म्हणजे चार पायांचे प्राणी आणि पक्षी म्हणजे पंखामुळे आकाशात ऊडता येणारे पक्षी असे सविस्तर लिहा. :) दोन पायांचे चालतेबोलते प्राणी आणि पक्षी :) बघायला प्राणिसंग्रहालयात कशाला यायला पाहिजे? ते तर कुठेही दिसतात. कुठे ते वेगळे सांगायची गरज नाही आहे. :) आधी सांगितल्याप्रमाणे, यावेळी मी विमेकाका येणार असतिल तरच येणार आहे. मला पुन्हा एकदा रिस्क घ्यायची नाही आहे. आधीच सांगतो, यावेळी कट्टयाचा वृत्तांत लिहिण्याची जबाबदारी घेणे मला जमणार नाही. आता नेहमीच्या सवयीप्रमाणे काही शंका… ११:३० पर्यंत भायखळ्याला जिजामाता उद्यानात थांबल्यावर १२ वाजेपर्यंत माटुंग्याला उडिपी श्रीकृष्ण बोर्डींग येथे पोहोचणे शक्य आहे का? नाही, तुम्ही वरती म्हणल्याप्रमाणे हॉटेल मध्ये फीस्ट असल्याने, आपल्याला जायला उशिर झाल्यास (पुणेकरांसारखा अपमान करून) हॉटेलमध्ये घेण्यास नकार दिला तर? भेटण्याचे ठिकाण जिजामाता उद्यान, भायखळा येथील तिकीटाची खिडकी आणि भा.प्र.वे. सकाळी ९:३० आहे. काही कारणाने (रविवार, मरे चा मेगा ब्लॉक, गणराज्य दिनाची गर्दी इ.) चुकुन येण्यास उशिर झाल्यास काय? जाताजाता, भारतात, २६ जानेवारीला गणराज्य दिनानिमित्त कोरडा दिवस आहे. त्यामुळे शनिवारी २५ तारखेला…

११:३० पर्यंत भायखळ्याला जिजामाता उद्यानात थांबल्यावर १२ वाजेपर्यंत माटुंग्याला उडिपी श्रीकृष्ण बोर्डींग येथे पोहोचणे शक्य आहे का?
जवळच पर्शियन दरबार आहे. रौवार साजरा करु.

जिजामाता उद्यान कट्ट्याला शुभेच्छा. मला त्याच वेळेस झेंडा वंदनासाठी जावे लागणार आहे.

कट्ट्याला दूरुनच शुभेच्छा... पानाफुलांची आणि वृक्षराजीची ओळख करून घेण्यास खूप आवडले असते परंतु नाईलाज आहे.....

आताच १४ ते १७ जानेवारीला येथे मुंबई महानगरपालिकेचा फ्रूट फ्लॉअर ट्री शो झाला . खूप चांगली रोपे मिळतात .कोलकात्यापासूनचे नर्सरीवाले फळझाडे विकायला आणतात .पण यावर्षी शनि रवि आले नाहित . :(

या कट्ट्याची कल्पना आवडली. भारताबाहेर असल्याने दुरूनच शुभेच्छा!! फोटोजसकट वॄत्तांताची प्रतिक्षा राहील.

एक मिपाकर आणि इतर ४-५ नॉन मिपाकर मित्र अशा ग्रुप आला तर चालेल का?

हा कौटंबिक कट्टा आहे. तुम्ही एकटेच या किंवा तुमच्या जोडीदाराला घेवून या. येण्यापुर्वी महाभारत मात्र नक्की वाचून या. त्यात श्रीक्रुष्णाने दुर्योधनाकडे न जेवता विदुराकडे जेवण घेणे का पसंत केले? ह्याची फार सुंदर कारण मीमांसा केली आहे. (बाय द वे.... इतर काही लोकांसारखे, तुम्हाला पण नीट वाचता येत नाही, असे दिसत आहे.)

बाय द वे.... इतर काही लोकांसारखे, तुम्हाला पण नीट वाचता येत नाही, असे दिसत आहे व् येण्यापुर्वी महाभारत मात्र नक्की वाचून या. ..... ही परस्पर विधाने कशाच्या भरात केली ?

वाचता येत नाही, असे दिसत आहे व् येण्यापुर्वी महाभारत मात्र नक्की वाचून या. ..... ही परस्पर विधाने कशाच्या भरात केली ?
ते महाभारत वाचल्यावर कळेल :P

आधी पोटोबा मग .... असे केले तरी चालेल. पण सगळे मिपाकर काय म्हणतात ते बघू या. फीस्ट्,फुलोरा आणि प्राणी , हे जर ३ कार्यक्रम असतील तर.. फुलोरा आणि फीस्ट वर्षातून कमीवेळा एकत्र येतात.प्राणी कधीही बघता येतात. त्यामुळेच आम्ही, फुलोरा आणि फीस्ट अशी सांगड घातली. शिवाय, संध्याकाळी ४ नंतर होणारी लोकलची गर्दी पण टाळायची आहे. असा थोडा फार विचार करून हा कार्यक्रम आखला आहे.

सोबत लहान मुले असतांना. म्हणुन मी प्राणी देखील त्यात समाविशले. ४-६ वर्ष्याच्या मुलांना त्यातच जास्त रस. असो. काही हरकत नाही. म्हणजे या मंडळीना घरी ठेऊन येणे क्रमप्राप्त.

उद्यानात फारसे प्राणी-पक्षी उरलेच नाहीयेत. फुलोरा बघता बघता प्राणी-पक्षीही बघू. मुलांना प्राणी-पक्ष्यांचीही माहिती सांगू. सकाळी येताना भरपूर न्याहरी करून येणं जास्त चांगलं. कारण उद्यानात कोणतेही खाद्यपदार्थ नेता येत नाहीत. (म्हणजेच, 'आधी पोटोबा' घरूनच करून यायचं.) पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मात्र जागोजागी आहे. सर्वांचाच, सुधांशुनूलकर

विनोदी, अर्धवट माहितीवर आधारलेले धागे काढणार्‍या काही लोकांना बरोबर घेऊन जा, वाघाबिघांचे पिंजरे दाखवा. ह्या मंडळीस आत्मपीडनाची जबरदस्त संवय असल्याने पुढचे ते स्वतः आणि ते वाघसिंह बघून घेतील. तदनंतर तुमचा कट्टा आनंदात पार पडावा :)

"विनोदी, अर्धवट माहितीवर आधारलेले धागे काढणार्‍या काही लोकांना बरोबर घेऊन जा, वाघाबिघांचे पिंजरे दाखवा. ह्या मंडळीस आत्मपीडनाची जबरदस्त संवय असल्याने पुढचे ते स्वतः आणि ते वाघसिंह बघून घेतील." मिपा वरची मंडळीच अशा लोकांना ठीक करतील. बाय द वे, वरील प्रतिसाद, प्रदीप ह्यांनाच आहे. इतर सुज्ञ मंडळींनी अनावश्यक मध्येच लिहू नये.

हा 'बर्फाळलांडगा' नक्कीच कोणाचातरी डुआयडी आहे, जो संपादक मंडळाकडुन हाकलुन दिलेला आहे किंवा/आणि लाजेखातर केवळ महिनाभरापुर्वी याने आपला आयडी बदलला आहे. संपादक मंडळ, माझा प्रतिसाद चुकीचा वाटल्यास अवश्य ऊडवा.

संपादक मंडळ, माझा प्रतिसाद चुकीचा वाटल्यास अवश्य ऊडवा.
सम चुकीचे वाटले म्हनून प्रतिसाद उडवत नाही रे. ते आक्शेपाहार्य असावे लागतात. थोड्याक्यात त्यात सम वर आक्षेप अथवा इतरांवर निसन्धिगद अर्वाच्य शब्दात चिखल फेक हावी अन्यथा माझेवर डु आयडी असल्ताचा बिन्बुडि आरोप तुला इथून निष्कासित व्हायला पुरेसा होता

एक आगळावेगळा कट्टा होतोय ह्याचीच जबरदस्त उत्सुकता आहे. तेव्हा कट्टा झाल्यावर "फोटोसहित वर्णन" त्वरीत टंकावे हि विशेष विनंती.

ह्यालाच पुणेरी काड्या म्हणायचे का? (अहो साहेब, जरा मस्करी करतोय हां.....तुम्ही रागावणार नाही ह्याची खात्री आहे.... नाहीतर उगाच मध्ये तोंड घालायला आम्हाला काही मुद्दामहून गहन विचार कर्रून हिमअस्वल चावलेले नाही, हे तुम्हास माहीत आहेच.)