Welcome to misalpav.com
लेखक: mohite jeevan | प्रसिद्ध:
गणेशरावानी आता पर्यंत अनेक लोक पाहिले आहेत व पण स्वत: आदर्श व्यक्ती होण्याचा कल आसला तरी माणसाच्या स्वभावाचा आभ्यास करण्यास त्याना खुप रस आसे.म्हणुनतर समोर माणुस कसला ही आसला तरी ते त्याच्याशी चांगले बोलत,तसे त्याला अनेक प्रश्न करुन त्याचे निरक्षण करी,व त्या निरक्षणा वरुनच मग त्याच्या मनात एखादी व्यक्ती आशी आहे तशी आहे ठरवत. खुप ठीकाणी त्यानी नोकरी केली पण आज ज्या नोकरीवर आहेत ते आँफीस काम आसले तरी एक समस्या होती. ती म्हणजे कधी रातपळी केली नव्हती पण या कंपनीत मात्र तसे करावे लागत होते. गणेशरावानी ते ही सोसलं, शेवटी पोटा पाण्याचा प्रश्न होता. एक आठवडा दिवसपाळी तर एक आठवडा रातपाळी आसे करत दिवस जात होते,पण आता रातपाळी गणेशरावाना बरी वाटु लागली.कारण रातपाळीला काम कमी गप्पा जास्त होऊ लागल्या. रात्री गणेशरावबरोबर एक शिपाई आसायचा पण तो एका बाकावर बसुन झोपा काढत आसे.पण गणेशराव फावल्या वेळेत कोणी गप्पा मारायला मिळतात का ते पाहत, पण आजकल जो तो आप आपल्या नादात आसतो, पण शेवटी त्याना एक पर्मनंट मोकळा निवांत आसा मनुष्य सापडला. तो होता गेटवरचा दगडु नावचा वाँचमन. मुलगाच हो तो पंचवीशीतील आणि गणेशराव चाळशीतील , दोघांच्यात खुप गप्पा होत. प्रत्येक रात्री तासभर गप्पा व्हायच्या पण मनोसोक्त होत आसे, मग त्या मध्ये दगडुला घरची परिस्थिती विचारीत, तसेच लग्नाचा कस काय बघणार आहे, हे त्याच्या कडुन जाणुन घेत.मग गणेशराव आपले किस्से त्याला सांगत. तर कधी कधी त्याच्या समोर आपल्या ज्ञानाचा भंडार त्याच्या समोर ओततं, तर दगडु ते ज्ञान ऐकुन आचिंबित होत आसे. मग दगडु आपल्या मनातील अनेक प्रश्न त्याना विचारीत. त्याचा प्रतिसाद पाहुन ते ही त्याला उत्सुकतेने सांगत आसत. हाळु हाळु आता गणेशरावाच्या मनात त्याची एक प्रतिमा निर्माण झाली, एक सामान्य व गरीब घरातील दगडु आपले घर चालावे म्हणुन काम करतो, शिकायचं वय आसताना त्याला काम करावे लागत आहे,मग गणेशरावाना वाटु लागलं की याला चांगली मुलगी मिळावी,त्याचा संसार चांगला चालावा,गरिब का आसेना पण माणुसकिने तो चांगलाच आहे. एके दिवशी रातपाळीला गणेशराव आले, कंपनीतील सर्व काम आवरून ते शेकोटी साठी ते गेटवर जायला निघाले. आपण गेटवर जायचं वाँचमन दगडु आपल्यासाठी शेकोटी पेटवणारा मग एका मागुन एक विषय निघणार हे त्याच्या मेँदुत बसलेलं तत्रं झालं होतं. गणेशराव गेट वर पोहचतात, दगडु एक सारखा त्याच्या कडे पाहत आसतो, कोणी आनोळखी व्यक्ती आसल्या सारखे त्याला वाटत आसते.पण गणेशरावानी त्याची ती नजर ओळखली, व तो झोपेत आसेल म्हणुन त्याला मोठ्याने म्हणाले, 'काय आज शेकोटी पेटवतोस ना?,' 'शेकोटी कशाला?,'दगडु म्हणाला, 'आजुन झोप गेली नाही वाटतं दगडु,' मग दगडु जागा झाल्यासारखा म्हणाला, 'पेटवतो की तुम्ही हाय होय मी ओळखलचं नाही,' त्याला शेकोटी पेटवयाला सांगीतली तसे त्याने शेकोटी पेटवली, गणेशराव खुर्चीवर बसले व तो आपला शुन्य नजरेने त्या जाळाकडे पाहत होता. त्याच्याकडे पाहुन गणेशराव म्हणाले, 'काय दगडु आज गप्प गप्प आहेस?,' दगडुने आपली नजर वळवत तो म्हणाला,' 'काय सांगु साहेब एक काम होतं तेच राहीलं,' 'कोणतं रे?,' 'आहो तेच तर आठवत नाही?मगाच्यानं विचार करतोया', 'कोणतं कामच आठवत नाही तर राहीलं कसं काय म्हणतोस?,' 'काय माहीत उगाच डोकं विचार करीत बसलं आहे,' 'आरे आजारी वैगेरे आहेस का?,' 'हा हा आठवतय व्हय व्हय साहेब,'दगडु चमकुन म्हणाला, 'बहुतेक मग औषध घ्यायचा विसरला आसशील,' 'होय होय आता आठवलं , गोळी खायची राहीलया,' 'पण कशाची गोळी?', 'तेच तर माहीत नाही साहेब,' शेवटी गणेशराव आशा उत्तरानी बोर झाले, हा आसा का बोलतोय हे त्याना समजेना. शेवटी ते आँफीसात आले, व त्याना आँफीसची मंडळी त्याची चेष्टा करत आसताना आठवले, स्टोर किपर कांबळे तर नेहमीच दगडुला म्हणत की,'बहुतेक दगडुने आज गोळ्या खाल्ल्या नाहीत वाटतं,' व त्यावर सर्वजण हासत आसत. पण ह्या गोळ्या मागे कोणते रहस्य दडलया हे गणेशरावनी शोध घेतला नाही. दुसर्या दिवशी त्यानी त्या बाबत चोकशी केली तर कळाले की दगडु मानसिक रोगी आहे व त्याला गोळ्या चालु आहेत आणि गोळ्या चुकल्या तर त्याची स्मरण शक्ती क्षीण होते. हे कळताच गणेशरावाना त्याच्या पेक्षा स्वत:चंच हासु आलं व ते गालातल्या गालात हासु लागले.त्याना वाटु लागलं की वेडा कधी ही मी वेडा आहे म्हणुन सांगत नाही. त्या विचारातच ते घरी जाण्यासाठी स्टाँडवर आले, व पेपर स्टँालवर एक नजर फिरवली, मग एस.टी. कडे ते पाहीले त्या एस. टी.वर लिहले होते, 'मानसिक रोगो का इलाज हो सकता है' ते वाचुन गणेशराव मनातच म्हणाले , 'होय,हो सकता है,'
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

व्वा काय सुंदर लेखन!! - मुक्त विहारि सही====> नानू सरंजामे म्हणाला, "मी झोपतो करून हिमालयाची उशी.मुद्दाम गहन विचार करणार्‍यांची आम्हाला गरज नाही."====

हा आला मधे श्रेय लाटायला.... :-\ @ मुवि काका ... बस्स का !!!! तुमच्यासाठी कायपण! तुमच्या जागेवर कोणाला बी येऊन देत नाय बगा! फिकर नॉट,,,, :)

अर्धवट राहिलीये का? पुढे काय होतं दगडुचं? ईलाज होउन गणेशराव त्याचं लग्न करुन देतात का? मग दगडुचा संसार कसा होतो? त्याला परत वेडाचा झटका येतो का? त्या वेड्याच्या भरात त्याला मुलं होतात का? किती???

आपण इथे नविन दिसता. हे असे प्रश्र्न, जीवन भाऊंच्या कथे विषयी विचारायचे नसतात. तुम्ही जर कथा नीट वाचली नसली तर परत एकदा नीट वाचा. मुळात भाऊंच्या कथा , ह्या कूट कथा असतात.गेल्या २/३ महिन्यातल्या लेखांचा आणि प्रतिसादांचा आढावा घेवून ते लेख लिहीतात. थोडी हिंट देतो.... "एक आठवडा दिवसपाळी तर एक आठवडा रातपाळी आसे करत दिवस जात होते,पण आता रातपाळी गणेशरावाना बरी वाटु लागली.कारण रातपाळीला काम कमी गप्पा जास्त होऊ लागल्या." " गणेशराव फावल्या वेळेत कोणी गप्पा मारायला मिळतात का ते पाहत, पण आजकल जो तो आप आपल्या नादात आसतो, पण शेवटी त्याना एक पर्मनंट मोकळा निवांत आसा मनुष्य सापडला.दगडु नावचा वाँचमन.मुलगाच हो तो पंचवीशीतील आणि गणेशराव चाळशीतील " "गणेशराव आपले किस्से त्याला सांगत. तर कधी कधी त्याच्या समोर आपल्या ज्ञानाचा भंडार त्याच्या समोर ओततं, तर दगडु ते ज्ञान ऐकुन आचिंबित होत आसे. मग दगडु आपल्या मनातील अनेक प्रश्न त्याना विचारीत. त्याचा प्रतिसाद पाहुन ते ही त्याला उत्सुकतेने सांगत आसत." "गणेशरावाना त्याच्या पेक्षा स्वत:चंच हासु आलं व ते गालातल्या गालात हासु लागले.त्याना वाटु लागलं की वेडा कधी ही मी वेडा आहे म्हणुन सांगत नाही." "'मानसिक रोगो का इलाज हो सकता है' ते वाचुन गणेशराव मनातच म्हणाले , 'होय,हो सकता है,'" आता गेल्या काही दिवसातील डु-आय डी संदर्भात आलेले लेख किंवा प्रतिक्रिया वाचल्या असतील तर भाऊंचा रोख नक्की कुणावर आहे ते समजायला जड जायला नको. वेडा आपले वेडेपण जसे कबूल करत नाही. तसेच हे डू-आयडी पण आपला पण डू-आय डी आहे, हे कबूल करत नाहीत...

बघा तुम्हाला पण पटले की नाही... जीवन भाऊ जसे हुषार आहेत तसेच आपले पुर्वज पण हुषार होते... चोराच्या मनांत चांदणे आणि सुंभ जळला तरी पिंड जात नाही अशा चपखल म्हणी त्यांनी उगाच नाही सांगीतल्या....

मानसिक रोगोंका इलाज होय सकता है पण, वेड पांघरके लिहिणेवालेका इलाज नही होय सकता!

'टाईमपास'च्या सिक्वेलची ष्टोरी रिव्हील केलीत का? पेपर टाकणारा दगडू पराजक्ताच्या विरहापायी वेडापिसा होतो... 'आपण आत्ता मोठ्ठा माणूस होणार... टायवाला' असं त्याने मनातल्या मनात ठरवलेलं असतं. म्हणून थोडं मोठं झाल्यावर टायचा समावेश असलेल्या युनिफॉर्म देणा-या सिक्युरिटी एजन्सी मध्ये तो रुजू होतो. त्याला सुरुवातीला जी हाऊसिंग सोसायटी मिळते तिथे तो लग्न झालेल्या प्राजक्ताला सुखाने नांदताना बघतो. तिचं लग्न झालंय हे कळल्याचा जबर धक्का लागून तो बेशुद्ध पडतो आणि डोक्यावर पडतो. त्याचा स्मृतिभ्रंश होतो आणि प्लस तो मनोरुग्ण सुद्धा होतो (!) मग त्यावर उपचार होतो, मग तो गणेशरावांच्या हाफिसबाहेर रुजू होतो... आणि मग जीवनभाँची ष्टोरी सुरू... कदाचित दगडू पूर्ववत व्हावा म्हणून गणेशराव त्या प्राजक्ताला घेऊनही येतील. ;)

'जीवना'कडे (पक्षी: सभोवताली) संवेदनशीलतेने पाहण्याचा आदर्श ठरावी अशी ही कथावस्तू. गहन खोली (पक्षी: डेप्थ) असलेले सामाजिक विषय ज्या निरागसपणे आणि मुग्धतेने लेखक मांडतो तो सामाजिक विषयांना हाताळण्याचा एक आदर्श वस्तुपाठ ठरावा. 'केल्याने होत आहे रे...' ह्या धर्तीवर माणूस कसाही असला तरीही 'बोलल्याने होत आहे रे आधि बोललेच पाहिजे' हा सामाजिक संदेश ही कथावस्तू अगदी हळूवारपणे आणि समर्थपणे वाचकांपर्यंत पोहोचवते. त्याचप्रमाणे, शिकायचे वय असलेल्याला चांगली मुलगी मिळायलाच हवी हा एक अभिनव आणि पूरोगामी विचार ह्या कथेतून समोर तर येतोच पण संसार चांगलाच चालायला हवा ही सामाजिक कळकळही प्रकर्षाने वाचकांपर्यंत पोहोचते, त्यासाठी सर्वांनी आपल्या ज्ञानाचे भंडार कसे सतत रिते करत रहावे ह्याबद्दल यथायोग्य मार्गदर्शनही वाचकांच्या गळी उतरवण्यात कथावस्तू यशस्वी ठरते. 'वेडा कधी ही मी वेडा आहे म्हणुन सांगत नाही' हे कोणासही माहिती नसलेले आणि कोणीही असा विचार न करू शकणारे अगाध तत्वज्ञान मांडले जाते ह्यातच ह्या कथावस्तूचे (पक्षी: लेखकाच्या अगाधतेचे) यश समावलेले आहे. 'होय,हो सकता है,' ह्या समारोपाने लेखकाचा दुर्दम्य आशावाद अधोरेखित होत कथावस्तू एका वेगळ्याचा उंचीवर पोहोचते. जीवनभौ , 'यानां आपले म्हणा' ह्या विख्यात (की प्रख्यात?) घोषणेची आठवण करून देणारी ही कथावास्तू मिपासाहित्यात एक मैलाचा दगड ठरेल यात काय संशय! - (आ-जीवन समीक्षक) सोकाजी

काहीतरी तरल द्रवपदार्थाचे सेवन करून सोत्रिची बुद्धी तरल झाली आणि म्हणून असा प्रवाही प्रतिसाद सुचला आहे!!

सोत्रि - Mon, 20/01/2014 - 16:15 हे असं दिसलं नि घोळ झाला. वेळेचा घोळ लक्षात आला. सोत्रि, तुम्ही 'माप' 'ओलांडत नाही' ना पण! ;)

एकामागून एक अश्या खतरनाक गोष्टी तुम्हाला सुचतात तरी कश्या? तुमची कल्पनाशक्ती अपूर्व/अद्वितीय्/वगैरे वगैरे आहे.