'विथ रेफरन्स टु धिस ऑफिस लेटर डेटेड सिक्स्थ डिसेंबर, वी आर टु इनफॉर्म यू दॅट ...'
'बीप बिपीप ...बीप बिपीप..' लँडलाइनच्या आवाजाने मी सेक्रेटरीला देत असलेले डिक्टेशन मधेच खंडित झाले.
सकाळपासून मी ते महत्वाचे पत्र कागदावर उतरवण्याचा प्रयत्न करीत होते. पण भेटायला येणाऱ्या लोकांच्या एकसारख्या फ्लोमुळे ते काही बेटे मूर्त स्वरूपात येईना. अखेर सेक्रेटरीला बोलावून मी ते पूर्ण करण्याचा निकराचा प्रयत्न चालवला असताना पुन्हा या लँडलाइनने घात केला.
'ओह शिट...हॅलो ?' पहिले दोन शब्द अर्थातच मी रिसिव्हर उचलण्यापूर्वी म्हटले होते.
'हा, उपकार्यकारी अधिकारी , शहर विभाग यांच्या ऑफिसातील फोन आहे ना ?'
'होय...' बोलण्याच्या अंदाजावरून मला कामाचा साधारण अंदाज आला.
'मी उपकार्यकारी अधिकारी मॅडमशी बोलतोय का ?'
'अर्थात !' आता माझी खात्रीच पटली. इतक्या अदबपूर्ण ऑफिशियल भाषेत चौकशी म्हणजे ...तक्रार !
'नमस्कार. मी सुभाषनगरमधून चांडक बोलतो.'
'नमस्कार. बोला साहेब .'
'चार डिसेंबरला मी आपल्याकडे एक अर्ज दिला होता, माझ्या इंडस्ट्रीमधील जोडणीमध्ये दोष असल्याबद्दल...'
'हां, हां..मग ?'
'त्यावर आपण काय कारवाई केली याचे उत्तर मला अद्याप मिळाले नाही.'
माझ्या अचूक तर्कबुद्धीचा लगेच प्रत्यय आला. तक्रार !
तांत्रिक विषयात असलेल्या अगाध (?) ज्ञानामुळे आमचे अति जागरूक ग्राहक जरा कुठे खुट्ट झाले की ताबडतोब फुलपेज तक्रार देतात. त्यांचे आकाशगामी ज्ञान धरापातळीवर आणण्यासाठी मी अन माझे सब ऑर्डीनेट्स यांना प्रत्येकी किमान वीस मिली रक्त आटवावे लागते.
खरे तर सर्व तक्रारी प्रथम फिल्ड ऑफिसरकडे द्यायच्या असतात. तिथे त्यांचे निराकरण झाले नाही तर माझ्या ऑफिसकडे येतात. पण या शहरात गंगा उलटी वाहत असते. मीच सर्व तक्रारींचे भारे फिल्ड ऑफिसरला पुरवत असते.
'सॉरी, आपला अर्ज पाहिल्याचे मला आठवत नाही.' मी बावळटपणे बोलले.
'मॅडम , आपली पोच आहे माझ्याकडे...'
'असं का ?ओह, माझ्या इनवर्ड क्लार्कने दिली असणार... पण हा अर्ज तुम्ही फिल्ड ऑफिसला द्यायला हवा .'
'अनुभव असा आहे की तिथे काम होत नाही.'
'आपला काहीतरी गैरसमज झाला आहे...' मी ठामपणे बोलले.
'असं ? पाहू ना ! ...त्यानंतर १४ तारखेला मी आपणास एक स्मरणपत्रही दिले आहे..'
'दहाच दिवसात ?' माझा बावळट प्रश्न.
'दहा 'च' ? हं....' पलीकडून अतीव खेदाचा सुस्कारा.
'असो, मी आज दुसरे स्मरणपत्र घेऊन माझ्या मुनीमजीला पाठवले आहे. त्याची पोच अवश्य द्यावी. आणि आता तरी त्यावर कारवाई व्हावी अशी एक प्रामाणिक ग्राहक म्हणून माझी वाजवी अपेक्षा आहे.'
'हो, हो..'माझ्या बावळटपणा अधिकच घनदाट झाला .
'आपले काम अत्यंत प्रॉम्प्ट आणि चांगले आहे, असे मला श्री बलदोटा यांनी सांगितले आहे! '
बापरे ! चांडकसाहेबमजकुरांनी माझ्यावर भलताच गंभीर आरोप केला.
'नाही हो, म्हणजे, हो, अं म्हणजे तसं काही नाहीये..' आता माझ्या बावळटपणाच्या घनतेची मात्रा वाढून त्याचा गोळीबंद पाक तयार झाला.
'नाहीये ?' आरोपाची तीव्रता वाढली अन त्यात छद्मीपणाची एक झाकही डोकावली.
'हं, म्हणजे बरोबर आहे... बलदोटा यांच्या कामात मी लक्ष घातलं होतं खरं..' माझा स्वर विनाकारण चोरटा अन अपराधी का व्हावा ?
'धन्यवाद !' चांडकसाहेबांनी माझ्या कार्यक्षमतेविषयीचा वाद मिटवला !
चरफडत मी पत्राचं डिक्टेशन संपवलं अन सेक्रेटरीला कम्प्लेंटसची फाईल घेऊन यायला फर्मावले. सुदैवाने माझ्या सहायक अभियंती (?) कु. वैष्णवीला चांडकमहाशयांचं पत्र लगेच मिळालं. माझ्या तीन फिल्ड ऑफिसर्सपैकी सदामतेचं गाडं अंमळ गचके खात असे. त्याच्या भागातली ही तक्रार होती आणि ती त्याला पोचवली गेली होती. त्याच्याकडे नॉर्मपेक्षा ग्राहकसंख्या जास्त होती. त्यामुळे तक्रारीसुद्धा जास्त होत. बिचारा शर्थ करून, आहे त्या स्टाफमध्ये कामे अन (त्यापेक्षा जास्त ) तक्रारींचा निपटारा करण्याचा प्रयत्न करीत असे. पण पत्रापत्री करायला काही त्याला सवड मिळत नसे. मग मी कुणालातरी त्याच्या मदतीला देऊन किवा माझ्या सहायक अभियंतीला सांगून ते काम करून घेई.
मी सदामतेला भ्रमणध्वनी केला.
'अहो, त्या चांडकच्या इन्स्टॉलेशनचा काय प्रॉब्लेम आहे ?'
'मेडम, चार दिवसापूर्वीच स्टाफ त्यांच्या फॅक्टरीत जाऊन इन्स्पेक्शन करून आला आहे. त्यांच्या फ्युजबॉक्समधील फ्युजेस फॉल्टी आहेत....'
'मग ?'
' त्या कपॅसिटी चे फ्युजेस स्टोअरच्या स्टॉकमध्ये शिल्लक नाहीत.'
'आधी रिक्वायरमेंट द्या डिव्हिजन ऑफिसला अन लगेच चांडकना उत्तर द्या, लेखी..' मी
'काय म्हणून ?' सदामतेचा प्रश्न.
'हेच की, दोनशे अॅम्पिअरचे फ्युजेस वरिष्ठ कार्यालयाकडून उपलब्ध होताच बॉक्स बदलून दिला जाईल, म्हणून !'
'मॅडम , त्यापेक्षा चार दिवसांनी फ्युजेस मिळाल्यावर घालूनच देऊ ना...' माझ्या अडाणीपणाची कीव सदामतेच्या स्वरात स्पष्ट डोकावली.
' हो, पण तोपर्यंत चौथे रिमाइंडर येईल ना ?' मी.
' होय, मॅडम !'
'काय होय ?'
'म्हणजे देतो उत्तर लगेच. अन रिक्वायरमेंटपण !'
दुसऱ्या दिवशी सदामतेने स्पेशल मेसेंजर पाठवून पत्र पोच केले. पण श्री चांडक बाहेरगावी गेले असल्याने पत्र त्यांच्या मुनिमजीने घेतले.
दोन दिवसांनी मला चांडकांच्या तक्रारीची आठवण झाली. चौकशी केल्यावर समजले की फ्युजेस अजूनही मिळाले नाहीत.
मी वरिष्ठ कार्यकारी ऑफिसरना फोन लावला अन त्यांच्या कानावर रिक्वायरमेंट घातली.
'तुम्हाला यापूर्वी दिलेल्या स्टॉकचे युटिलायझेशन द्या आधी, मग नवीन मिळेल.'
' लास्ट मंथचे युटिलायझेशन मेल केले आहे सर. सर, चांडक आपले व्हीआयपी ग्राहक आहेत....'
'मॅडम , ग्राहकांच्या इतकी कंपनीची काळजी घ्याल तर तरून जाईल ना कंपनी ?'
'येस सर !' मी मूक.
आणखी चार दिवस गेले. चांडकांचा एकदा फोन येऊन गेला. मी कोणतेही ठोस आश्वासन न देता गोड बोलून वेळ मारून नेली. वरिष्ठ ऑफिसरना पुन्हा एकदा विनंतीवजा मागणी केली.
'मॅडम आत्ता मी डायरेक्टरना भेटायला निघालो आहे, किरकोळ इश्शूज उद्या पाहू. '
माझा युधिष्ठीर झाला. नरो वा कुंजरो वा. 'होय' ही नाही अन 'नाही'ही.
चार दिवस गेले तरी चांडक यांचा फोन आला नाही हे पाहून मला टेन्शन आले.
अन पाचव्या दिवशी माझी शंका खरी ठरली.
कार्यकारी ऑफिसरांचा फोन आला.
'अरे, काय एका साध्या कम्प्लेंटचा निकाल लावता येत नाही मॅडम तुमच्या फिल्ड ऑफिसरना ?'
'काय झाले सर ?'
'अहो, माझ्या समोर बसलेले श्री चांडक आपले व्हीआयपी ग्राहक आहेत, त्यांच्या इन्स्टॉलेशन मधील प्रॉब्लेम दोन दिवसांपेक्षा जास्त पेंडिंग कसा राहतो ?'
'सर, ते फ्युजेस अॅव्हेलेबल नव्हते ना...'
'अरे, मग रिक्वायरमेंट द्यायची ना लगेच ?'
'दिली होती सर ...'
'मग ?'
'आपण बिझी होतात ?'
'अरे, मी काय इथे तुमच्या रिक्वायरमेंटच फक्त पाहायला बसलो आहे का ? तुमच्या फिल्ड ऑफिसरचं काम नव्हतं का लेटर घेऊन माझ्याकडे यायचं ? इतके इम्पॉर्टंट इश्शूज काय असे टपालातून पाठवायचे ?'
'सॉरी सर ..' मी बावळटपणे म्हणते.
'लगेच पाठवा सदामतेला अन घेऊन जा फ्युजेस. ग्राहकांचं समाधान करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे, काय ?'
'येस सर' मी पुन्हा बावळटपणे.
दुसऱ्या दिवशी चांडकमहाशय स्वत: माझ्या कार्यालयात उपस्थित झाले.
'मॅडम धन्यवाद.'
'धन्यवाद कसले ? अहो, फ्युजेस बदलून देणं हे तर आमचं कामच आहे.'
'अंहं, त्याबद्दल नव्हे, '
'मग ?'
'आता इथून पुढे तक्रार अर्ज कोणत्या ऑफिसला करायचे, हे दाखवून दिल्याबद्दल !'
माझा पुन्हा एकदा युधिष्ठीर झाला....भीम अन दुर्योधन दोघांच्या मध्ये सापडलेला !
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
धन्य आहात आपण !
कठीण आहे!!
टाकतो लवकरच तुला सांगितलेला
कठीण आहे.
मज्जा.
क ठी ण..
सेम प्रॉब्लेम . फक्त आमी
गळचेपी.
मस्त !!!
छान वर्णन
सरकारी यंत्रणेबद्दल आदर आहे.
सॉरी.
फक्त?
अर्थात.
(No subject)
कटकट आहे राव!
एका प्रामाणीक
औघड आहे....दोन्ही बाजूंनी
तरी यांचे खाते जरा बरे आहे,
छान !!
सरकारी अधिकारीही माणुसच असतात
छान लेख.
सर्व प्रतिसादकांचे आभार !
साधारणपणे केंद्रात बसलेले
साधारणपणे केंद्रात बसलेले
साधारणपणे केंद्रात बसलेले सगळे शहाणे अन फिल्ड वर काम करणारे मूर्ख अशा काहीशा पद्धतीने सरकारी कामकाज चालते. खाजगीकारण हा याला खरंच योग्य पर्याय आहे का ? सरकारी सत्तेचे विकेंद्रीकरण हा पर्याय का विचारात घेतला जात नाही ?सरकारी असो अथवा खाजगी, ज्या संस्थाचे लक्ष्य फलनिष्पत्ती असते (आउटकम-ओरिएंटेड ऑर्गॅनायझेशन्स) तेथे असा केंद्र आणि फिल्डचा संघर्ष आपोआप कमी होतो. सरकारी संस्थांत बहुतेक वेळेस वरच्या पदावर बसलेल्यांना हवी असलेली फलनिष्पत्ती (आउटकम) आणि प्रत्यक्ष काम करणार्यांना योग्य वाटत असलेल्या फलनिष्पत्तीत असलेल्या फरकाने हा संघर्ष (कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट) होतो. कारण वरिष्ठाना हवी असलेली फलनिष्पत्ती प्रत्यक्ष काम करणार्यांना स्पष्ट सांगितली जात नाही अथवा ती स्पष्ट सांगणे सोईचे नसते. लेखातल्या उदाहरणात साहेबांनी लेखिकेला अगोदर दाखवलेले "खायचे दात" आणि नंतर गिर्हाईकासमोर दाखवलेले "दाखवायचे दात", हे याचे उत्तम उदाहरण आहे. खाजगी क्षेत्रात या संघर्षाचे प्रमाण कमी असते कारण तेथे बहुदा सगळ्यांचे ध्येय कंपनीचा (भागधारकांचा) फायदा हाच मुख्य उद्देश धरून त्यावर साहेबासकट इतर सगळ्यांचे बोनस व प्रगती अवलंबून असते. अर्थात बारकाव्यात गेल्यास यालाही (स्वार्थ, कंपूबाजी, वगैरेमुळे) अपवाद असू शकतात... पण सरकारी संस्थांपेक्षा खूप कमी प्रमाणात आणि कमी तीव्रतेचे.करेक्ट एक्काजी!
खाजगी क्षेत्रात या संघर्षाचे
मात्र तुम्ही जर कंपनीचे
मात्र तुम्ही जर कंपनीचे अन्नखाते (कॉस्ट सेंटर) असाल तर कंपनीचं ध्येय तुमच्यावर होणारा खर्च कमी कमी करत जाणे (कामावर परिणाम होऊ न देता, अर्थात) असं आहे. मग बोनस/प्रगतीला एक मर्यादा पडते.याचे उत्तर माझ्या वरच्या प्रतिसादाच्या खालील वाक्यात आहे.कारण तेथे बहुदा सगळ्यांचे ध्येय कंपनीचा (भागधारकांचा) फायदा हाच मुख्य उद्देश धरून त्यावर साहेबासकट इतर सगळ्यांचे बोनस व प्रगती अवलंबून असते.आउटकम ओरिएंटेड संस्थांत ज्या विभागांचा / कर्मचार्यांचा प्रभाव आऊटकमवर (संस्थेचा म्हणजेच पर्यायाने भागधारकांचा फायदा) जास्त त्यांच्याकडे आपोआप जास्त लक्ष आणि जास्त फायदा (बेनेफिट्स) जातात. अर्थात प्रॉफिट सेंटर्सकडे जास्त लक्ष आणि केवळ कॉस्ट सेंटर्स असलेल्या सपोर्ट विभागांकडे (उदा अन्नखाते, इ) कमी लक्ष हे सहाजिकपणे होते. येथे ते "बरोबर आहे की चूक" हा मुद्दा नसुन "अशी वस्तुस्थिती का निर्माण होते त्याचे विश्लेशण आहे". अवांतरः आपले कामाचे क्षेत्र निवडताना वरची वस्तूस्थिती लक्षात घेऊन मगच निर्णय करणे फायद्याचे ठरते. अन्नखाते हे मुख्य व्यवसाय (कोअर आक्टिविटी) असलेल्या कंपनीत, उदा. आतिथ्य व्यवसायातल्या संस्थात (हॉस्पिटॅलिटी, हॉटेल्स, इ) प्रॉफिट सेंटर असते तर इतर बहुतेक व्यवसायातल्या संस्थात (आयटी, मेकॅनिकल इंजिनियरिंग, सेवा पुरवणारी ऑफिसेस, इ) कॉस्ट सेंटर असते. ज्याला अन्नक्षेत्रात प्रगती करायची असेल त्याने प्रॉफिट सेंटरमध्येच शिरकाव केला तर निराशेने ध्येय बदलण्याची पाळी येण्याची शक्यता बरीच कमी होईल.अवांतराशी एकदम सहमत!
जबरी!
छान खुसखुशीत लेखन.
मस्त लिखाण स्नेहातै.
खुसखुशीत लेख.. छान शैली आहे
आवडला
सरकारी खात्यात विशेषतः जिथे
चांगला मार्ग
कळीचा मुद्दा
अगदी शंभर टक्के.सरकारी नोकरी
आमचा अनुभव
इट्स नॉट करप्शन
समजा.. समजा हं... त्याने
हुशार आहात !
>>> योग्य मार्गाने गेले अन
गेल्या वर्षी असाच पोलिस खात्याचा अत्यंत वाईट अनुभव आला.
वैताग आहे!
जबरा खेळवता राव तुमी साहेब लोकं कस्टमरला.
खूप छान अनुभव!
विद्युत अभियांत्रिकीचे ज्ञान
सरकारी अधिकार्यांकडून काम
???
Pagination