Welcome to misalpav.com
लेखक: मुक्त विहारि | प्रसिद्ध:
मागच्याच दिवाळीच्या सुमारास आपला मंगळ कट्टा (http://www.misalpav.com/node/25976) छान पार पडला.तिकडून परत येतांना मला पण काही कॉकटेल्स सुचली.(मंगळाचा गूण...दुसरे काय?)सुदैवाने परतीच्या प्रवासात मी आणि सोत्री एकत्रच बसलो होतो.मला सुचलेले कॉ़कटेल मी सोत्रींना सांगीतले.त्यांनी पण ही संकल्पना उचलून धरली. ऑक्टोबर हीट चालू झाली.आणि मला काही तरी थंड पेय प्यावे असे वाटायला लागले.आणि अशा कडाक्यात आंबा नसेल तर काय अर्थ तरी आहे का? असो. नमनाला थेंबभर तेल खूप झाले. आता जिन्नस.... १. आपल्याला जितकी पचते तितकी व्होडका. २. माझाचा मेंगो ज्युस ३. मेंगो आइस्क्रीम ४. भरपूर बर्फ ५. मिरपुड् + दालचिनी पुड् + सुंठ पूड (थोडी मिरमिरीत चव असेल तर आणि तरच ह्या कॉकटेलला रंग जमतो.) , ६. सर्वात महत्वाचा जिन्नस म्हणजे माहौल.... छान रविवार असावा.बाहेर कडक उन असावे.उत्तम मासे, खास आपल्यासाठी म्हणून कोळीणीने मुद्दाम बाजूला काढलेले असावेत.(आमची कोळीण म्हातारी असल्याने,बायकोला नको त्या शंका येत नाहीत.)आदल्याच दिवशी उत्तम नाटक पाहिल्याने घरची ग्रुहिणी ठाक-ठीक असावी.पापलेट आणि कोलंबी स्वच्छ करून त्यांना बायकोच्या स्वाधीन करावे.घरची सगळी मंडळी खूष आहेत,ह्याची खातरजमा करून आपण आता क्रुतीच्या मागे लागावे. तसा मी स्टीलच्या ग्लासातूनच मदिरास्वाद घेतो.(कारण लिहायला परत एखादा लेख टाकायला लागेल.)पण ह्यावेळी मला काचेच्या ग्लासातून मदिरास्वाद घेता आले.तर मंडळी,आता ह्या ग्लासात भरपुर बर्फ आणि पहिल्या वेळी जितकी घेता तितकी व्होडका टाका.हे करण्यापुर्वी बायकोने तेल तापायला ठेवून, कोलंबीला पीठात बुडवलय का? ह्याची खात्री करून घ्या. , त्या रसायनाला थोडी चव आणण्यासाठी त्यात मँगो ज्युस टाका.तेल तापत आलेले आहे आणि बायकोने आता पापलेट्ला रवा लावायला घेतला आहे की नाही, हे पण हळूच बघून या.(कारण दुसरा ग्लास पापलेट बरोबर आहे.) , आता त्या रसायनाला थोडे ढवळून घ्या आणि थोडे मँगो आइस्क्रीम टाकून परत एकदा ढव़ळून घ्या.थोडे आइस्क्रीम टॉप अप करून मग त्यावर आपली मिरपूड्+दालचिनीपुड्+सुंठ पुड भ्रुरभरून टाका.तो पर्यंत स्वैपाक घरातून कोलंबी भज्जीचा खंग्री वास आला असेलच. , बायकोने केलेली कोलंबी भज्जी आणि हे कॉकटेल ह्याचा आस्वाद घेता घेता साउंड ऑफ म्युसिकची व्ही.सी.डी. शोधून ठेवा. दुसर्‍या ग्लासला तळलेले पापलेट आणि सुंदर सिनेमा आणि बायको ह्यांच्या बरोबर रविवार साजरा करा. डिस्क्लेमर : दारु पिणे प्रक्रुतीला हानीकारक आहे. हे कॉकटेल सोत्री गुरुजींना अर्पण.तळलेल्या कोलंबीचे आणि पापलेटचे फोटो मुद्दामच टाकलेले नाहीत."साउंड ऑफ म्युसिक" हा बघण्याचा विषय आहे.लेखनाचा नाही.मी जगातील सगळ्यात "ढ" फोटोग्राफर असल्याने, जे काही फोटोसारखे दिसत आहे, त्याला फोटो म्हणा.माझ्या लेखातील शुद्धलेखन,व्याकरण ह्यांच्या कडे जास्त लक्ष न देण्याची वाचकांना सवय झाली असेलच.झाली नसेल तर सवय लावून घ्या,ही विनंती.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

Mangifera piper खुलासा : मॅंजिफेरा इंडिका = आंबा. पायपर निग्रम (नायग्रम)=मिरी

व्होडका + माझा जरा जास्तच चिंगाट असतंय असं ऐकिवात आहे, खरंय का ? (व्होडका इतकीशी नाही आवडत मला ) , असे एखादे कॉकटेल अस्तित्वात आहे का बकार्डी लिमोन (लाईम स्वादाची व्हाईट क्युबन रम)+ बर्फ (तुम्ही गल्लासात भरलाय तसाच)+ऑरेंज ज्युस + ऑरेंज वेजेस (उगा आपला साहेबीणीचा मेकअप ) नसल्यास हा आमचा आदाब अर्ज आहे!! असे समजा (फोटु नाहीत) कारण दारु पोटात गेली अन गल्लास धुवुन ठेवला.

मदिराचार्य "सोत्रि" गुरुजीच ह्या कॉकटेल बाबत जास्त माहिती सांगू शकतील. बाय द वे, व्होडका म्हणजे Smirnoff असे माझे मत आहे. व्हाईट मिश्र्चिफ पण ट्राय करुन बघीतले. पण Smirnoffची मजा़ काही वेगळीच.

आपली आपली चॉईस आहे हो देवा, फॉर मी , जर सुट्टी असेल ड्युटीज चा ताप नसेल तर मस्त दुपारी ग्लेन्फिड्डीच किंवा ग्लेनमोरेंज (१२ इयर्स मॅच्युर्ड) सोबतीला खरपुस कोंबडीची टांग. अन थोडं हेक्टीक असेल पण रिलॅक्स व्हायचं असेल तर मस्त एक लार्ज ओल्ड माँक किंवा कुठली ही रम ऑन द रॉक्स बियर हे भुलोकीचे अमृत "दारु" म्हणुन हिणवु नये ही आमची श्रद्धा!!!! माईल्ड फेसाळती बियर अन सोबत बार्बेक्यु किंवा तंदुरी ( बटाटे ते बदक काहीही) :)

भाऊंना कथा लिखाणासाठी ह्या पेयाची आवश्यकता भासत असेल असे वाटत नाही. पण पण पण भाऊंच्या कथेला प्रतिसाद देतांना , कथा पचवायला , कथेचा आस्वाद घ्यायला... हे पेय जवळ असेल तर उत्तम... हाच मुख्य फरक आहे..

कल्पक आहे कॉकटेल. यह जाम मो जी के नाम. तुमचे आवडते लेखक मोजी यांचेच नाव का नाही देत? मोजी कॉकटेल - जो पिये एक बार, वोह पिये बार बार!!

खरे तर भाऊंच्या "अपहरण की खूण" (हो, त्यांनी "खून"च्या जागी "खूण" हाच शब्द वापरला होता.) ह्या अनेक भागी कथेचा आस्वाद, सोत्री आणि इतर मंडळींबरोबर घेता घेताच, हे कॉकटेल सुचले. भाऊंनी ते कथा भाग इथे प्रकाशित केले तर......

मोजी कॉकटेल - जो पिये एक बार, वोह पिये बार बार!!
त्यापेक्षा ए जी ( टँव टँव ) ओ जी ( टँव टँव ) लो जी पियोजी, ये है मँगो "मोजी".... पिता हु मै भी अब तुम भी पियोजी... वन टु का फोर.. फोर टू का वन.. माय नेम ईज जीवन... माय काम इज लेखन.... सजनों का भजन,, मेरा नाम है जीवन!! *DRINK* ही जिंगल कशी वाटतेय?.

वाहव्वा, भनाट प्रयोग! नाव मॅन्गो टॅन्गो, जे ऑलरेडी लाउंजमध्ये कव्हर झाले आहे,'मॅन्गो टॅन्गो' नावानेच. काही गोष्टी सुचवाव्याशा वाटताहेत त्या अशा: 1. आइसक्रीम असल्याने "मिरपुड् + दालचिनी पुड् + सुंठ पूड" असे दणदणीत गार्निशिंग कितपत चव वाढवू शकेल याची कल्पना नाही. माझ्यामते चव बिघडेल. (अर्थात हा पर्सनल चॉइसचा मामला आहे!) 2. आंबा आइसक्रीम आणि व्होडका असल्याने हे कॉकटेल 'digestif' ह्या कॅटेगरीत मोडायला हवे. कोलंबी भज्जी किंवा पापलेट रवा फ्राय ह्या कॉकटेल बरोबर जुळणार नाही. दोन्ही चवींची जातकुळी पार वेगळी आहे. म्हणजे असे की आमरसाबरोबर कोलंबी भज्जी किंवा पापलेट रवा फ्राय खायला कसे वाटेल? 3. कॉकटेल बनवताना साहित्याचा मापात वापर महत्वाचा असतो, चव आणि कॉकटेलची गंमत त्यावर बहुतांशाने अवलंबून असते. अर्थात, हे तीन्ही मुद्दे फक्त कॉकटेलविषयीच्या आणि कॉकटेलच्या आस्वादाच्या कळकळीतुन आलेले आहेत. ह्या प्रयोगाबद्दल आणि प्रयोगशीलतेबद्दल आदर आहेच. कॉकटेल बनविणे इज अ‍ॅन आर्ट ऑफ मिक्सॉलॉजी! - (साकिया) सोकाजी

ह्या कॉकटेलच्या पूर्व तयारीत इतर जिन्नसांबरोबरच 'गृहीणी' नामक जहाल जिन्नस अंतर्भूत असल्याने

'मँगो ज्वाला'

असे नांव सुचवावेसे वाटते. बाकी, चवी बाबत सोत्रींशी सहमत.