Welcome to misalpav.com
लेखक: mohite jeevan | प्रसिद्ध:
राज आज काँलेजवर खुपच आकर्षक दिसत होता, त्या ड्रेसमध्ये व हेअर स्टाईल मध्ये तो आग़दी नुकताच लाग़लेला मुव्ही ‘कहो ना प्यार है’ यामधील ‘एक पल का जीना’ या ग़ीता मधील ऋत्विक रोशन जसा दिसतो तसा तो उभे उभ दिसत होता. थोडी उची कमी आसली म्हणुन काय झालं, लुक तर आहे ना हिरो सारखा, सर्व मुलीच्या घोळक्यात त्याचाच विषय, त्याला पाहुन काही मुली तर स्माईल देत पण त्याला सर्व कॉलेजच्या मुलीच माझ्यावर फिदा आहेत आसे वाटे, व आपण एक कॉलेजचा हिरो आहे आसे त्याला वाटे. राजचे खरे नाव राजु पण फिल्मी स्टाईलमुळे त्याचे राज नाव पडले होते. त्याचा लुक तसा सलमान खान सारखा होता,पण तो देवानंद पासून शाहीद कपूर पर्यंत तो स्टाईल करत आसे. शक्यतो दुसर्या काँलेजची मुले मुली त्याला सायन्स कॉलेजचा हिरोच म्हणुन ओळखत . प्रिन्सिपल ते शिपाई त्याची स्टाईल पाहुन नुसते त्याला हात करत आसे. काँलेजवर त्याचे खुप मित्र होते, खुप मुली त्याला स्माईल देत आसल्या तरी त्याची आशी एक ही ग़र्ल फ्रेन्डं नव्हती. पण त्याची नजर ज्या मुलीवर पडली की मुलग़ी त्याला पाहुन इंप्रेस होत आसे. सध्याचे प्रत्येक मुव्ही तो पाहत आसे, त्याला प्रत्येकाची स्टाईल आवडत आसे, पण सध्या ज्या मुव्हीचे वारे जास्त आहे त्या हीरोची स्टाईल तो करत आसे, सध्या कहो ना प्यार है चाग़लाच फारमात होता त्यामुळे राजची स्टाईल ही मोठ्या दिमाखात होती. त्याला लवस्टोरी चित्रपट खुप आवडत आसे,पण त्याने काँलेजवर आजपर्यंत एका ही मुलीला पटवली नव्हती, का तर, एखादी मुलग़ी त्याला नुकताच लाग़लेला ‘कहो ना प्यार है’ मधील आमिषा पटेल सारखी वाटली आणि तो तिला पाहत आसे, ती ही त्याच्याकडे पाहुन इंप्रेस होत होती, तिला पाहीले की तिच्यात आमिष पटेल आणि स्वत: ऋत्विक रोशन आसल्याचे त्याला वाटत आसे, यावर त्याचा आत्मविश्वास वाढत आसे. जो पर्यंत तो कहो ना प्यार है ची ग़ाणि ऐकत तो पर्यंत ती त्याच्या डोळ्यात आणि स्वप्नात दिसे, पण काही दिवसात यश राजचा ‘मोहब्बते’ येत होता, त्याची ग़ाणि प्रत्येक मुलीच्या तोडात ऐकु येऊ लाग़ली, मग़ राज ने आता आपला लुक शहारुख खान सारखे करु लाग़ला, चित्रपट जेव्हा टाँकीजवर लाग़ला त्याने फस्ट डे फस्ट शो पाहीला, त्याला चित्रपट इतका आवडला की, त्याने काही दिवसातच मोहब्बते पँट आणि शर्ट शिऊन घेतला. आणि आत तो आमिषा पटेलला विसरुण तो एश्वर्या राँयच्या शोधात होता. एक दिवस त्याला वाटले की आपल्या प्रिन्सिपलची मुलग़ी आपल्या कॉलेजमध्ये आसती तर…? पण प्रिन्सिपलला मुलग़ीच नव्हती, काँलेज मध्ये मुली मध्ये कोणिच त्याला ऐश्वर्या राँय सारखी दिसत नव्हती, पण ज्या दिवसाची वाट तो पाहत होता तो दिवस उग़वला होता,त्याला त्याची ऐश्वर्या भेटली होती,एका नुकतेच जाँईन झालेल्या हिंदी विषयच्या मॅडम दिसायला ऐश्वर्या राँय सारखे नसल्या तरी त्या मॅडमचे डोळे त्याला ऐश्वर्या राँय सारखे वाटले, तसेच प्रत्येक साडीत ती ऐश्यच त्याला वाटत होती. म्हणुन आता तो त्या मॅडमचा एक ही तास चुकवत नसे, मँडमचे हिंदी लेक्चर त्याला मोहब्बतेच्या मुव्हीचे डाँयलाग़ आठवत. पण आपल्या मनात ही मोहब्बते मुव्ही प्रत्ययक्षात चालु आहे,हे कोणाला तो कळु देत नसे. पण मित्रांनी त्याला चागलेच ओळखले होते. काही दिवसात तो प्रेमाचे धडे मित्रांना देऊ लाग़ला, आता ही बातमी काँलेजभर पसरली, राजचे व मँडमचे किस्से ग़ाजु लाग़ले, प्रिन्सिपल पर्यत जेव्हा हि ग़ोष्ट ग़ेली तेव्हा, त्यानी राजला केबीन मध्ये बोलवले, ‘कोण ही ऐश्वर्या ?’ प्रिन्सिपल म्हणाले, ‘मला तर ऐश्वर्या राँय माहीती आहे सर,’राज म्हणाला, ‘मग़ तीचा का संबंध या काँलेजमध्ये?,’ प्रिन्सिपल म्हणाले, ‘आहो सर मोहब्बते हिट झाला आहे, आणि तुम्हाला साग़तो सर्वांच्या तोंडात फक्त शाहरुख आणि ऐश्वर्या राँयचे नाव आहे,’ राज म्हणाला, ‘ते कशासाठी?,’ प्रिन्सिपलानी प्रश्न केला, ‘सर तुम्हाला कळणार नाही तुमच्या बायको बरोबर हा मुव्ही पहा म्हणजे कळेल,’ राजने गमतीने उत्तर दिले, ‘शट आँफ,अँन्ड ग़ेट आऊट’ प्रिन्सिपल राग़ने म्हणाले, राज तसा फीरला, दरवाजेकडे जाऊ लाग़ला, मग़ पुन्हा आत येत प्रिन्सिपलला म्हणाला,’ ‘सर आपली बायको आपल्या बरोबर येत नसेल तर एक उपाय आहे…..,’ पुढचे काही ऐकवायच्या आत सरांनी त्याला बाहेर काढले, बाहेर येऊन त्याने मित्रांना भलताच म्हणाला,’ सरांनी प्रेम करायला नकार दिला, मी पण बिनधास्त म्हणालो, ‘मोहब्बते भी जिन्दग़ी के तरह होती है, हर मोड पे खुशी नही मिलती, दोघांच्यात प्यार और नफरत मध्ये वाद झाला, शेवटी सराना हे ऐकुन प्रिन्सिपलने प्रेमाला पाठिंबा दिला,’ हे ऐकुन सर्वजण म्हणाले,’ प्रेम करा खुलम खुला,’ आणि सर्वजण हासु लाग़ले, काँलेजवर हिंदी मॅडम व राजचे प्रेम ग़ाजत होते की तोपर्यंत मॅडमची बदली दुसर्या शहरात झाली, काही दिवसात मोहब्बतेचे वारे कमी झाले, आता त्याच्या आवडत्या हिरो सलमान खानचा नवीन मुव्ही येत होता ‘हर दिल जो प्यार करेग़ा’ नुसता टेलर पाहुन युवा पिढी खुळी झाली होती, राज तर खुपच खुश होता, मनातच तो म्हणत होता की,’एकटा सलमान आणि त्याला दोन हिरोईन, एक राणी दुसरी प्रिती, क्या बात है,’
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

छान. मोहब्ब्ते- ऑक्टोबर २०००चा तर हर दिल जो प्यार करेगा- जुलै २०००चा.काय करायचे?राजने त्याच वर्षीचा 'हेराफेरी' पाहिला का?

वाह! मजा आला क्रमशः आहे का? म्हणजे हर दिल जो प्यार करेगा गेला, दरम्यान राजला नोकरी मिळाली मग लगान आला, तो पाहुन ऑनसाइट गेलेला राज एका मडमेच्या प्रेमात पडला. नंतर एक था टायगर आला आणि राज मेहर तरारच्या (शशी थरुरवाली)प्रेमात पडला. वगैरे वगैरे.

मस्त कूट... बाय द वे.... ह्या मोहब्बते सिनेमावर कुणीतरी कुठेतरी जबरदस्त चिरफाड करणारे लिहीले आहे.त्या लेखाची लिंक मिळेल का?

गलत... ह्यावेळेची कूट कथा वेगळी आहे... उदा. पहिले वाक्य नीट वाचा.... "राज आज काँलेजवर खुपच आकर्षक दिसत होता, त्या ड्रेसमध्ये व हेअर स्टाईल मध्ये तो आग़दी नुकताच लाग़लेला मुव्ही ‘कहो ना प्यार है’ यामधील ‘एक पल का जीना’ या ग़ीता मधील ऋत्विक रोशन जसा दिसतो तसा तो उभे उभ दिसत होता." ह्या वरील वाक्यात त्यांनी त्यांच्या लेखाबाबत थोडा उलगडा केला आहे. आपल्याला "ह्रुतिक रोशन आणि कहो ना प्यार है" ह्या नातेसंबंधांची माहीती आहे आणि ह्याच घट्ट नातेसंबंधांचा फायदा घेवून भाऊ "ह्रुतिक" ज्या जागी "ऋत्विक" असा शब्द लिहीतात. आणि शेक्सपियरचे "नावांत काय आहे?" हे जगप्रसिद्ध वाक्य परत एकदा सिद्ध करतात.थोडक्यात भाऊंनी शेक्सपियरच्या साहित्याचा अभ्यास केला आहे आणि आपण पामर लोक लेख नीट न वाचता तो डोळ्याखालून घालतो हे तर सांगताततच.... शिवाय डोळे आहेत पण द्रुष्टी नाही, हे शेरलॉक होम्सचे वचन पण सांगून जातात. आता तुम्ही हा लेख परत एकदा नीट वाचा, तुम्हाला ह्या लेखात बरीच कुटे दिसतील... बाय द वे.... "हुबेहुब" ह्या शब्दाला "उभे उभ" हा नविन समानार्थी शब्द असावा काय? ह्यावर पण मिपावर चर्चा होवू शकते का?विधानसभेत शुन्य प्रहारात ही चर्चा घडण्याचा संभव वाटत नाही...

शट आँफ,अँन्ड ग़ेट आऊट’ प्रिन्सिपल राग़ने म्हणाले,
हे एवढे ऐकुनच बिचारा राज शट डाऊन झाला असेल... =)) बाकी लेखाबद्दल प्रतिसाद द्यायला शब्दच उरले नाहीत.

ते "महागात पडलेले स्त्रीदाक्षिण्यवालेच" ना? फार जबरा कथा आहे ती. सकाळ मधील ऑल टाईम फेव्हरीट. गरजूंसाठी लिंक देत आहे. (http://www.esakal.com/esakal/20130122/4824005995910158145.htm) (ही कथा कॉपी रायटेड असल्याने कॉपी-पेस्ट करू नये, ही विनंती...)

आणि आत तो आमिषा पटेलला विसरुण तो एश्वर्या राँयच्या शोधात होता.
ही घ्या एश्वर्या राँय . =)) ____/\____ जय हो बाबाजी...लक्ष असु द्या बाबाजी..जय हो जय हो !!

जय हो बाबाजी...लक्ष असु द्या बाबाजी..जय हो जय हो !!
आईग्ग्ग्ग्ग्ग्ग.... काय वैताग प्रकार आहे तो.. आधीच भाऊंची कथा.. त्यावर असला डेंजर फोटो..आणि त्यवर "जय हो बाबाजी"???? डोकंच दुखायला लागलं..

सुरेख कथा..!! जीवन यांच्या या लिखाणामुळे एक बोध मिळाला. कधीही हार मानू नये. प्रयत्न करत रहावेत आणि आपल्याच मस्तीत जगावे. सध्या कहो ना प्यार है चाग़लाच फारमात होता त्यामुळे राजची स्टाईल ही मोठ्या दिमाखात होती. त्याला लवस्टोरी चित्रपट खुप आवडत आसे,पण त्याने काँलेजवर आजपर्यंत एका ही मुलीला पटवली नव्हती, का तर, एखादी मुलग़ी त्याला नुकताच लाग़लेला ‘कहो ना प्यार है’ मधील आमिषा पटेल सारखी वाटली आणि तो तिला पाहत आसे "कहो ना "पेक्षा १९ वर्ष जुना लवस्टोरीचे ऋण विसरला नाहीत हे बरे वाटले. लवस्टोरीला अजून कुठल्याही चित्रपटाने झाकोळले नाही हे पाहून राजेन्द्रकुमारच्या आत्म्याला नक्कीच शांती मिळेल. सुमार गौरवला आजुन स्कोप आहे. बाकी मोहब्बते ऐवजी "मै हू ना" टाकला असता तर स्टोरी म्याच झाली असती. ऐश्वर्यापेक्षा सुश्मिता बरी..

उत्साहाने कथा लिहिणारे भाऊ, त्या कथा उत्साहाने वाचणारे वाचक आणि त्याहून अधिक उत्साहाने प्रतिसाद देणारे वाचक ... जग काही आपण समजतो तितकं वाईट नाहीये असा दिलासा नक्की दिला आहे 'मिपा'ने मला ;-) ( या दिलाशासाठी जीवनभाऊ निमित्तमात्र की 'मिपा' निमित्तमात्र हे अजून ठरवलं नाहीये!)

भाऊंचे लेख म्हणजे कोडीच असतात.... "( या दिलाशासाठी जीवनभाऊ निमित्तमात्र की 'मिपा' निमित्तमात्र हे अजून ठरवलं नाहीये!)" तुम्हाला पण कुठले तरी कोडे पडलेच ना? जय भाऊ.... (भाऊंच्या लिखाणाचा आजीवन पंखा) मुवि

भाऊंना मात्र काही बोलत नाहीत....डोक्याचे पारणे फिटले म्हणतात..... ह्यालाच पार्शालिटी म्हणावे काय? असे नविन कूट निर्माण झाले...

लगे रहो जीवन भौ. तुम लिखते रहो. हौ दे खर्च. तुमच्या साठी काय पण ( लिखाण वाचेन) जीवन भौ कॉलनी का शेर......बाकी विरोधक कथा वाचुन ढेर....

ऐसी वरील सुशेगाद यांना मिपावर बोलंवलं पाहिजे. साहित्यात भौंना तेच टक्कर देऊ शकतील. इथे पहा

प्रतिसाद आलाच नाही, नुसतीच स्वाक्षरी आली. ऐसी वरील सुशेगाद, भौंना साहित्यात टक्कर देऊ शकतील असं म्हणायचं होतं. - तिरशिंगराव माणूसघाणे

येत्या कट्ट्यास घेउन यावे आसे मी समस्त मिपाकरांस आवाहन/विशेष विनंती करत आहे. ईतक्या फक्कड (कोण म्हणालं ते बथ्थड) कथा लिहिणारा आणि तितकेच छप्परफाड प्रतिसाद घेणारा हा अवलिया आहे तरी कोण, दिसतो तरी कसा हे याची देहि याची डोळा बघायची फार ईच्छा आहे. मिपाकर्स प्लीssssssज माझी एवढि विच्छा पुरी करा!

मुक्तपीठाला लेख कसे पाठवायचे हे कोणी मला सांगु शकेल का? किंवा लिकं द्या

जीवनभौ, तुमच्या हिरोची रेंज तुमच्या कथानकांसारखी एकदम "वाइड" आहे. (आमच्या मित्रात, त्याची "रेंज वाइड आहे" याचा अर्थ १५ ते ४५ मधलं त्याला काहीही चालेल असा घेतात!) अर्थात तेही तुमच्या हिरोला लागू होतंच म्हणा! काय डेरिंग आहे तुमच्या हिरोचं, "सर आपली बायको आपल्या बरोबर येत नसेल तर एक उपाय आहे…..,’ म्हणजे कुठे मागे हाटायलाच तयार नाही हा भिडू. बाय द वे, तुमच्या कथेतून दरवेळी नवे शब्द कळतात, या वेळी पहिल्या बॉललाच सिक्सर ठोकली आहे. (ऋत्विक रोशन जसा दिसतो तसा तो) "उभे उभ दिसत होता!" या वाकप्रचारावरनं, एखाद्यानं खूप त्रास दिल्यावर `रात्रभर मेल्यानं नुसतं उभं धरलं होतं' म्हणतात त्याची आठवण झाली! शेवटी तुम्ही विश्वात्मकस्तरावर झेपावता : "हे ऐकुन सर्वजण म्हणाले,’ प्रेम करा खुलम खुला,’ आणि सर्वजण हासु लाग़ले" हे वाचून आम्ही स्तिमित झालो. इथे आतापर्यंत "प्रेमकरा लिंगविसरुन", (त्याला नुकताच सुप्रिमकोर्टानं खोडा घातला!) "प्रेमकरा लग्नसोडून", 'प्रेमकरा चार हाणून" वगैरे प्रयोग झाले आहेत. आता आपण (पुढच्या अंकात) काही `नवाच प्रयोग' दाखवता काय अशी शंका येते.

@एक दिवस त्याला वाटले की आपल्या प्रिन्सिपलची मुलग़ी आपल्या कॉलेजमध्ये आसती तर…? पण प्रिन्सिपलला मुलग़ीच नव्हती >>> =)) यातलं दुसर वाक्य- पण प्रिन्सिपल अविवाहित होता.. असं ऐकू आलं! =)) बेफ्फाम हसवता तुंम्ही जिवनभौ! =)) जिवन भाऊंच्या धाग्यांचा आजिवन सभासद- आत्मू! :D

अग़्ग़्ग़ाग़्ग़्ग़ाग़्ग़्ग़ा.. :)) :D :)) ज़िंक़लंस मिंत्रा.. तोंड़लंस. :)) ग़र्लफ्रेन्डं? टाँकीजवर ? जाँईन? काँलेजभर ? अँन्डं धी अँवाँर्डं गोंज टू--> शंट आँफ,अँन्ड ग़ेंट आंऊंट (आंज़ीव़ण्-ज़ीव़ण़पंक़ा)

=)) =)) =)) =)) पहिल्याच वाक्यावर फुटलो =)) जितके वेळा लेख उघडला, परत परत पहिल्याच वाक्याला फुटलो =)) पूर्ण कथा वाचुन कधी संपेल देव जाणे.

सतिशभौंच्या (अ)शुद्धलेखनाला आणि निरागसतेला गेल्या अन येत्या हजार वर्षात तोड मिळणार नाही !

गेल्या अन येत्या हजार वर्षात तोड मिळणार नाही !" ते मध्ये १० घालायचे राहिले की काय/ असो.. पण "सतिशभौंच्या (अ)शुद्धलेखनाला आणि निरागसतेला गेल्या अन येत्या दहा हजार वर्षात तोड मिळणार नाही !" ह्या वाक्याला +१

कोणी हे कथानक सोप्या भाषेत समजावुन सांगेल काय ?