माझा लोकलनामा:- भाग १
आपण सारे अर्जुन
मुंबईची लोकल म्हणजे मुंबईची जीवन वाहिनी आहे. लोकल ट्रेनने प्रवास करणे हा लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भागच बनला आहे. याच लोकल ने मी ही प्रवास करतो, डब्यात चढलं नी पाठीवरची बॅग रॅकवर ठेवली कि माझी नजर पोहचते तिथ पर्यंत मी पाहतो, तेव्हा मला विविध रंगी, विविध ढंगी, विविध जाती, धर्म, पंथाचे लोक एका छोट्या जागेत सामावलेले पाहायला मिळतात. या मध्ये कोणी काळा तर कोणी गोरा, कोणी ऊंच तर कोणी ठेंगू , कोणी केसांची झुलपे वाढवलेला तरुण कॉलेज कुमार, तर कोणी निवृत्तीला आलेले सदगृहस्त, कोणी नीटनेटका कडक इस्त्री केलेल्या कपड्यात, तर कोणी गबाळा, कोणी घार्या डोळ्यांचा, कोणी निळा, कोणी काळा, तर कोणी तपकिरी डोळ्यांचा. प्रत्येकाची चण वेगळी, शरीराची ठेवण वेगळी. हे सगळे जण कसे आपआपल्या उद्योगात मग्न. कोणाचे पेपर वाचन, तर कोणाचे पुस्तक वाचन, कोणाचे जपमाळ ओढीत आपल्या देवाचे नामस्मरण , तर कोणी mobile वरती गाणी ऐकण्यात मग्न, तर कोणी डोळे मिटून आपल्याच नादात / विचारात तल्लीन, या प्रवासात जे रोज भेटतात त्यांचा एक समूह (Group ) तयार झालेला असतो. आणि मग त्यांच्यात एक प्रकारचे वेगळे नाते तयार झालेले असते. काही वारकरी भजन मंडळ असते जे रोजच भजन म्हणत कामाला जात येत असतात. या भावनिक बंधातून एकत्र येवून स्वखर्चाने दसरा आणि आषाढी एकादशी सारखे सण साजरा करतात. या दोन दिवशी संपूर्ण गाडी आणि गाडीच्या डब्यामध्ये पताका,फुले यांनी गाडी सजवून देवी / देवतांचे फोटो लावून पूजा केली जाते सर्व गाडीतल्या प्रवाशांना प्रसाद वाटला जातो. इतर दिवशीही रोजाचा ढोकळा, इडली, सामोसा असा काहीना काही नाश्ता ते लोक (वर्गणी काढून) करतात. पण हि लोकल पकडायची म्हणजे एक कसरतच असते. हि ठराविक लोकल सहसा कोणी चुकू देत नाही. जणू काही हि ट्रेन पकडली नाही तर अपमान अगदी घोर अपमान असे वाटावे. आणि याच बाबतीत आपण सारे अर्जुन असतो असे मी म्हणतो. तुम्ही स्टेशन वर पोहोचता तेव्हा platphorm खचाखच गर्दीने ओसंडून वाहत असतो. त्यात ट्रेन जर पाच, दहा मिनटे उशिरा आली तर गर्दीचा महापूर नुसता. आणि मग जसा ट्रेनचा पहिला डब्बा platphorm मध्ये शिरतो तसे सगळेच सज्ज होतात , आपला डबा कधी येतोय यावर मन एकाग्र . आपापले पाकीट,बॅग, इतर वस्तु आणि महिला आपल्या पर्स, दागिने सांभाळून आपल्या समोर आलेल्या डब्याच्या handel वर लक्ष केंद्रित करतात. अशा वेळी म्हणजे या क्षणी आपण सगळेच आजूबाजूचे सर्व जग विसरून जातो किंबहुना इतर सर्व गोष्टी अपोपाच धुसर होतात आणि आपल्याला दिसत असते ते फक्त दरवाजाचे handel किंवा मधला खांब अगदी तसाच जसा अर्जुनाला फक्त पोपटाचा डोळाच दिसत होता. आणि एकदा ते handal हाती लागले कि मग तुम्ही जणू काही लढाई जिंकल्याचा आनंद होत असतो. मग आपल्या इच्छित स्थळी जायला मोकळे. खरच हा प्रवास म्हणजे एक वेगळे विश्व आहे माझ्यासाठी. पुढिल लेखात प्लॅटफॉर्म वरिल वेगवेगळॅ नमुने, जुन्या बांधकाम शैलीतील रेल्वे स्टेशनचे, रेल्वेच्या डब्याच्या आतमधले वेगवेगळे फोटे काढलेत ते दाखविन. माझे मिसळपाववरील लेखन
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
चांगलंय
(No subject)
पुढिल लेखात प्लॅटफॉर्म वरिल
+१
खरच हा प्रवास म्हणजे एक वेगळे विश्व आहे माझ्यासाठी.
खरंय
माझा अनुभव....
आधी वाटलं लोकलमधल्या विविध
+१
खुप पोन्टेशियली लिहु शकतोस
मुक्त विहारि , सुहास.. प्रतिसादाबद्दल धन्यवाद
हा भाग