Welcome to misalpav.com
लेखक: विदेशी वचाळ | प्रसिद्ध:
तुम्हाला तारा तुटताना पाहायला आवडते का? असेलच ना? सगळ्यांनाच तसे ते आवडते. पण मला का कोण जाणे त्यात मोठी खीन्नता वाटते. माझ्यासाठी तारा हे अनेक गोष्टींचे प्रतीक आहे. ध्रुवाच्या त्या अढळ पणाचे प्रतीक म्हणजे तारा. माझ्या मुलींची बापा कडून असणारी अपेक्षा म्हणजे तारा. माझ्या आईची मुलाकडून असणारी अपेक्षा म्हणजे तारा. मला भेटायला येणारी प्रेयसी म्हणजे चांदणी, म्हणजेच तारा. मला माझ्या अनेक शिक्षका बद्दल असणारी भावना म्हणजे तारा. आपल्याला आपल्या आयुष्या कडून असणार्‍या अपेक्षा म्हणजे पण तारा. असा मी बराच वाहावत जाईन. पण मला सांगा मग अशा या आढळतेच्या प्रतीक असणार्‍या सन्केतास तुटतान पाहून चांगले कसे वाटावे?
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

तुम्ही ज्याला तारा म्हणताय तो खरेतर धुळीचा एखादा कण किंवा लहान दगड असतो. तारे त्या तुलनेत सहस्त्रअब्जावधी पटीने मोठे असतात तारा तुटणे कोसळणे हे शक्य नाही. तार्‍यांचा स्फोट होतो. ते त्यानंतर मृत सुद्धा होतात.

माझे भाष्य हे एका दृष्या वर आहे. आणि त्या दृश्याने प्रेरित असलेल्या भावानांवर आहे. भावनाना साइन्स चे बंधन नसते हो वीजुभाऊ.

कारण तशा वेळेलाच मी तारे बघायच्या फंदात पडलेला असतो. इतर वेळी डिकॅप्रिओच्या द बिच मधिल पुढिल वाक्यालाच मी प्रमाण मानतो. When you develop an infatuation for someone you always find a reason to believe that this is exactly the person for you. It doesn't need to be a good reason. Taking photographs of the night sky, for example. Now, in the long run, that's just the kind of dumb, irritating habit that would cause you to split up. But in the haze of infatuation, it's just what you've been searching for all these years.

माउ, दुध,लोणी,तूप इकडे डोळा ठेवायचे सोडुन तारा तुटताना पाहण्याचे काय म्हणतेस ? ;) बादवे... मी २ वेळा तारा तुटताना पाहिला आहे.

आणि मनात कुठेतरी मॅ.म. सुचित्रा कृष्णमुर्तीची स्माईल चमकुन जाते. क्वचीत, शारुख त्याच सिनेमावर थांबला असता तर किती बरं झालं असतं, हे ही आठवुन जातं. (ओळखा पाहु कुठला सिनेमा :) )

कभी हं कभी नां. या शिनेमात शाहरुख आहे हे लक्षातच आलं नव्हतं. आम्ही सुचित्रा कृष्णमूर्तीला पहायला गेलो होतो. बर्‍याच वर्षां नी शारूकच्या या पहिल्या काही सिनेमांबद्दल काहीतरी वाचले तेंव्हा लक्षात आले.

शारुख टॉलरेबलच नाहि तर खुप आवडला होता या सिनेमात. सुचित्रा तर काय भन्नाट आवडायची. बाकी पब्लीकने पण मस्तं कामं केली होती. टिक्कु तलसानिया, नसिरदादा, गोगा कपूर... आणि त्याचा वॉस्को.

बर्याच जणाल म्हणजे तुम्हाल एकट्याल? मिसळपावचे जुने धमाल वातावरण जाऊन सगळी बुळबुळीत भेंडीची भाजी उरली आहे असं कधीकधी वाटतं.

@खडांगळे साहेब , माझ्या प्रतिक्रीयेतील शुद्धलेखनाच्या चुका शोधण्यापेक्षा तुमच्या लेखात काय चुकल हे पाहिल असत तर धागा उडाला नसता . आणी तुमच्या मते जुने धमाल वातावरण आले असते . ( नविन मिपाकर) जेपी

@जेपी आहेब, धागाच न उरल्यामुळे आता पुन्हा वाचता येत नाही. तरीही आठवून पाहतो. त्या धाग्यात अर्वाच्य शब्दप्रयोग, शिवीगाळ कुणावर वैयक्तिक टीका स्त्रियांना रुचणार नाही अशी भाषा यांपैकी काहीही असल्याचं मला आठवत नाही. मग? तुमच्या भावनांचा आदर करूनही विचारतो, की केवळ संपादनाचे (अधिकृत असो वा अनधिकृत) अधिकार मिळाले आहेत म्हणून कचाकच कात्री चालवत सुटणं कितपत योग्य आहे? माझ्याकडून मी आता आवरतं घेतो.

धागा मी पण वाचला नाही . फक्त मिपावर आहे कळाले आणी वाचनापुर्वीच उडाला . बाकी मी भावी संपादक आहे सध्या नाही :-) मी एक साधा प्रतिसाद दिला तुमी सिरिशली घेतला . मी बी आवरतो बाकी काय असल तर खव मध्ये या .

आपल्याला तारा म्हटल्यावर अढळ पणाचा बोध होतो .सबब आपण आपल्या आयुष्यात अढळ राहाव्यात अशा सर्व गोष्टी तारा या स्वरूपात पहाता. अशा गोष्टी संपूच नये असे वाटते. उदा आपल्याला आईचे अढळ प्रेम मिळत रहावे म्हणून ती आपल्या अगोदर मरूच नये असे वाटेल पण हे निसर्गाला मान्य नसते. शब्दशः अर्थाने तारा तुटत वगैरे काही नाही. तो इतका मोठा असतो की तो दुसर्‍या तारका प्रणाली मधे शिरू शकत नाही. सबब आतापावेतो या भूतलावर तारा पडताना कोणी ही पाहिलेला नाही. " अरे तारा पडला ! तो पहा ! " अशी स्थिती माझ्या ६० वर्षाच्या आयुष्यात किमान दहा वेळा तरी आली आहे. हे पहाणे फार रंजक असते. पण जो पडतो तो तारा वगैरे तर सोडाच तर एखादा ग्रह देखील नसतो. अवकाशात फिरणारे अश्म वा अश्मकण धरतीच्या गुरूत्त्वात सापडले की खेचले जातात.वातावरणाशी घर्षण झाल्याने प्रकाशमान होतात. बाकी काहीही नाही,

प्रत्येकाला आकाशातील लुकलुकत्या चांदण्या/तारे पाहायला आवडते, व हे निरीक्षण इतके महत्वाचे आहे की त्यामुळेच कालगणना सुरु झाली आहे व आज आपल्या सर्वांच्या घरात/कार्यालयात/pc वर असणारे कॅलेंडर हा एक अविभाज्य भाग बनला आहे.

१९ ऑक्टोबर २००१ ला उल्कावर्शाव होता , तसा तो मागल्या वर्षीही (२०००) होता पण तेव्हा लोकांचा फारच अपेक्षाभंग झान्याने २००१ साली फारच कमी लोक उत्सुक होते. लोंब्या, हर्‍या नच्या ।ऋष्या शिवा आणि मी अशी ५ च माणसे आम्ही यवतेश्वरच्या पठारावर गेलो ... अक्षरशः सुन्न शांतता एक चिटपाखरु ही नव्हते ... संध्याकाळच्या वेळेला मॅगी बनवली शेजारच्या शेतातुन २-४ ज्वारीची कणसं काढुन आणली , हुरडापार्टीही झाली... आणि मग १०-११ च्या सुमारास शेकोटी शांत केली आणि निरभ्र आकाशा कडे डोळे लावुन बसलो ... आणि १२ वाजता जी आतिषबाजी सुरु झाली की काय सांगु .... मान हलवायची गरज पडत नव्हती सगळ्या बाजुंनी उल्का पडत होत्या .... निव्वळ अप्रतिम ... एक उल्का पुर्वक्षितीजावरुन थेट पश्चिम क्षितिजा पर्यंत पडताना पाहिली .... तो क्षण मी आयुष्यात विसरु शकत नाही :) तेव्हा पासुन मला तुटलेला तारा अर्थात उल्का पहायला प्रचंड आवडते !! आता पुढील उल्का वर्षव कधी आहे ते पहायला हवे ...

मस्त. तसंही कुठल्याही अंधार्‍या ठिकाणाहून तासाला १०/१२ उल्का तरी दिसतातच तर बरेच वेळा संथपणे जाणारे कृत्रिम उपग्रह पण दिसतात.