बुकोवस्की ३-४ दिवसांपुर्वी अचानकच सापडला, आणि मग त्याने झपाटलेच. अतिशय सरळ, रोजच्या बोलण्यातली भाषा. अगदी रांगडी किंवा कधीतरी शिवराळ म्हणता येईल अशी...रोजच्याच घटना, पण बघण्याचा त्याचा एक 'खास' दृष्टीकोन. बुकोवस्की आजपर्यंत माहित कसा नव्ह्ता हेच कळत नाही. काहिही असो. पण त्याची भाषा, त्याचे अनुभव, त्याचा अविष्कार हे मला खूपच जवळचे वाटले. त्याच्या कवितांशी एक वेगळेच नाते जुळले.
आधी ब्लॉगवर लिहिल्याप्रमाणे बुकोवस्कीची 'Bluebird' वाचली आणि ती फारच खोलवर रुतली. गेल्या वर्षी बुकोवस्की माहितही नव्ह्ता तेंव्हा साधारण तशाच कल्पनेवर आधारीत माझ्या काही ओळी खरडल्या होत्या. आता काल बुकोवस्कीची ब्ल्यूबर्ड वाचल्यावर ते भूत काही मानेवरून उतरत नाही. It is indeed haunting & inspiring poem. त्याच तंद्रीत अजून काही ओळी लिहिल्या आणि ही कविता पुर्ण केली. लिहितांना बुकोवस्कीच्या ब्ल्यूबर्ड चा अनुवाद करायचा नाही किंवा संपुर्ण त्या कवितेवर आधारीत कविता लिहायची नाही हे नक्की होतं. नंतर लिहिलेल्या काही कडव्यांवर अर्थातच बुकोवस्कीचा प्रभाव जाणवेल, पण तरीही ती बर्यापैकी स्वतंत्र झाली आहे असं मला वाटतं. बुकोवस्की माहित नसतांना जी कविता मनात जाणवली होती पण शब्दात उतरली नव्हती, ती शब्दबध्द करण्याचा प्रयत्न केलाय...

निळा पक्षी
पाठीवर सारे निळे आभाळ घेऊन,
माझ्या खिडकीत बसलेला निळा पक्षी
गाणे स्वच्छंदी आकाशाचे गातो.
खुर्चीतुन पाहणारा मी,
एक मोठा उसासा टाकून
काँप्युटरवर काम करत बसतो.
एक कॉफिचा मग घेऊन,
कुठलीतरी एक मेल उघडून
मी स्क्रीनकडे बघत राहतो,
निळा पक्षी निळाईतच झेपावतो,
मग खिडकीकडे एक नजर टाकून
मी माझ्या खुर्चीत विसावतो
माझ्या आतले निळे आभाळ,
आणि आत चिवचिवणारा निळा पक्षी
आतल्या आतच हिरमुसतो
मनातले आभाळ डोळ्यात
अजिबात उतरू न देता,
मी सराईतपणे सावरतो.
कधीतरी रात्रीच्या नीरव वेळी
स्वांनंदी गाणारा निळा पक्षी
माझ्या आतच गुणगुणतो
त्याच्या सुरात सूर मिसळून
डोळ्यातल्या पावसात त्याला भिजवून
मी हलकेच त्याला गोंजारतो
एरवी स्वतःला कामात गुंतवून,
आणि जगापासून त्याला लपवून,
मी अगदी इतरांसारखाच वावरतो!
खरंतर ही कविता 'जे न देखे रवी...' मधे हवी होती, पण त्यात माझी इतरही बडबड यात असल्याने 'जनातलं, मनातलं' ह्यातच टाकली. निदान काही लोकं धागा उघडतील तरी! :P
बुकोवस्कीची मुळ कविता ब्ल्युबर्ड इथे वाचता येईल. त्याच्या इतर कवितासुध्दा त्याच साईटवर वाचता येतील.
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
छान आहे.
बुकोवस्की यांचं काहीही वाचलं
इथे वाचता येईल -http:/
हेच म्हणायचं होतं.
सुंदर!
आवर्जुन प्रतिसाद देणार्या
क्षमा कसली मागताय ?
मस्त
मस्त
बुकोव्हस्कीची कविता माझ्या
मराठीत निळा पक्षी म्हटलं की
हे वाचून बघा - बुकोवस्कीच्या