Welcome to misalpav.com
लेखक: मुक्त विहारि | प्रसिद्ध:
, प्रिय मिपाकरांनो, कसे आहात? गेले ७/८ दिवस सीकेपी हॉल्,ठाणे इथे सीकेपी खाद्य पदार्थांची जत्रा आहे, असे तुम्हाला समजावे आणि आम्ही काही मिपाकर मंडळी पण तिथे जाणार आहोत, अशा अर्थाचा एक धागा मी काढला होता. तशी लहानपणा पासून मला ह्या ना त्या निमीत्ताने, ह्या पदार्थांची चव घ्यायला मिळत असे.मित्र तर सीकेपी होतेच पण आमचे शेजारी पण सीकेपी होते.आम्ही करतो ती करंजी आणि सीकेपी लोक करतात ते कानोले.हा फरक फार पुर्वीच लक्षांत आला होता. एकदा एका सीकेपी मैत्रीणीला, तुमच्या करंज्या छान होत्या.असे म्हणालो होतो.पुढे काय झाले हे सुज्ञ खवय्यांनी ऑळखले असेलच.पण सुदैवाने ती थोडी समजूतदार होती.तिने मग करंजी आणि कानोल्यातला फरक समजावून सांगीतला.करंजी हातात घेवून लगेच खाल्ली तरी चालते.पण कानोला खायची एक पद्धत असते. आधी तो कानोला नुसता डोळ्यांनी बघायचा.त्याला जास्तीत जास्त पिवळसर रंग चालतो.चॉकलेटी रंग तर नकोच आणि काळपट झाला तर, त्याला आफ्रीकन कानोला म्हणतात. मग तो हातात घ्यायचा आणि खूळखूळा कसा वाजवतो, तसा वाजवायचा.सारण कमी भरले असेल तर कानोला वाजतो.तो असा वाजला की त्याला खूळखूळा-कानोला म्हणतात. त्यानंतर त्याला मधून न तोडता किंचीत चतकोर तोडायचा आणि पापुद्रे मोजायचे. पापुद्रे जितके जास्त तितका कानोला चांगला. आता मग थोडे सारण हातात घेवून वास बघायचा.वेलदोड्याचा वास आलाच पाहिजे. मग सारणातील इतर घटक म्हणजे खोबरे,साखर इ. वेगळे-वेगळे दिसायला नकोत. आता मग थोडे सारण खावून बघायचे.अति साखर असेल तर कानोला नापास. अशा कमीत कमी ७/८ चाचण्यांमधून पास होतो तो कानोला.दिवसाला जास्तीत जास्त २०/२५ कानोले तयार होतात. असे मौलिक ज्ञान तिने मला दिले आणि ज्या माणसाला धड कानोला माहित नाही, त्या माणसाबरोबर मैत्री करण्यामुळे माझे कुठलेही भले होणार नाही, असे वदून ती माझ्या आयुष्यातून तेंव्हा तरी निघून गेली. थोडक्यात काय? तर जो समाज एका कानोल्यासाठी मित्रांना तोडतो, तो खव्वयेगिरीसाठी काय काय करत असेल? हा प्रश्र्न माझ्या मनांत त्यावेळी तर आला होताच.माझे खाद्य प्रेम मित्रांना माहीत असल्याने ते पण कधी कधी माझ्या साठी खीमा भाकरी (तांदूळाचीच), कोलंबी भात किंवा जवळ्याची चटणी आणत असत.कधी तरी एकदा सोडे घालून केलेली वांग्याची भाजी खाल्ली होती.तिची चव अद्याप जीभेवर आहे.आमच्या डोंबिवलीत मालवणी हॉटेले आहेत पण अशी खास सीकेपी पदार्थ देणारी हॉटेल्स नसल्याने माझी जरा पंचाईत झाली होती. अशा वेळेस आमच्या सारख्या माणसांची सोय व्हावी, ह्या उद्देशानेच अशा खाद्द्य जत्रा होत असतात. असो, तर ठरल्याप्रमाणे मी आणि आमचा मोठा मुलगा (हे आमच्या पावला वर पावूल टाकून आहेत.त्यांना पण आमच्यासारखीच खव्वयेगिरी करायला आवडते.) साडे-अकरा वाजता सीकेपी हॉलला पोहोचलो.मला काही पत्ता माहीत न्हवता.पण देवाने तोंड दिलेले आहे आणि लोकांना पत्ता विचारायला मी संकोच करत नाही.माझ्या चेहर्‍याकडे बघून लोक पण मला व्यवस्थित पत्ता देतात. पण आजकालच्या मुलांना गप्प बसा,तोंड उघडू नका अशी शिकवण शाळेत मिळालेली असते.ती पुढे कॉलेजला गेल्यावर अधिक घट्ट होते.मुलाने त्याचे जीपीएस का काय ते सुरु केले आणि मोबाईलचा वापर करुन आम्ही व्यवस्थित पोहोचलो.तोपर्यंत श्री.भाते तिथे पोहोचलेच होते आणि आमची वाट बघत उभे पण होते. नेहमी प्रमाणे मी मुलाच्या हातात कॅमेरा सोपवला आणि भाते ह्यांच्याबरोबर खाद्य पदार्थांचा आस्वाद घ्यायला निघालो.प्रवेश फी आणि इतर सोपस्कार आटोपून आम्ही आत प्रवेश केला.खरे तर आम्हाला पाण्याची बाटली हवी होती.पण ती न मिळाल्याने, त्यांनी (आयआम्हाला) आम्हाला पुस्तके दिली.त्यात ५१ कायस्थ पाकक्रुती आहेत.त्यात खाजाच्या कानवल्यांची क्रुती आहे का? हे आधी बघीतले.तर त्यात आहे. सुदैवाने आम्ही थोडे लवकर गेलो आहोत, असे वाटले.कारण बरेच स्टॉल रिकामे होते.तिथल्या विक्रेत्यांना विचारले, तर त्यांनी सांगीतले की, साडेबारा वाजता त्यांचे पदार्थ येणार आहेत.थोडासा रिकामा हॉल आणि थोडा भरलेला हॉल. , , मग आधी थोडा फेर फटका केला.एके ठिकाणी खीमा-मिसळ-पाव आणि खीमा पॅटीस होते.मिपाच्या अलिखित नियमाप्रमाणे आधी तेच विकत घेतले.खाली फोटो देत आहे. , कमी-खीमा आणि भरपूर तेल असलेली मिसळ खावून पोट तर भरले न्हवतेच आणि जीव्हा पण त्रुप्त झाली न्हवती.तरी पण काही तरी वेगळे खायची इच्छा होतीच.मग परत हॉल वर आलो. तिथे एका बाजूला जरा जास्त गर्दी दिसली.म्हणून गेलो तर, एक बाई स्टेजवर उभ्या होत्या आणि इतर लोक पण जमले होते. , तिथेच बाजूला जरा जास्त गर्दी होती. , चौकशीअंती, कोंबडी-वडे घेण्यासाठी इतकी गर्दी जमली होती, असे समजले.रांगेत उभे राहून हा नेहमीचाच पदार्थ विकत घेण्यापेक्षा दुसरे काही तरी बघू या, असा विचार केला.आणि आम्ही कोलंबी पोहे विकत घेतले.त्याच वेळी (ऐसी अक्षरे , कट्याला ओळख झालेले सुनील, भेटले.) त्यांची आणि भाते ह्यांची ओळख करून देत होतो.तर इतक्यात किणकिणाट ह्यांचा फोन आला.ते पण त्याच हॉल मधल्या तिसर्‍या मजल्यावर होत असलेल्या एका लग्नाला आले होते.आधी कोलंबी पोह्यांचा फोटो काढला आणि मग ते खाल्यावर आम्हा मिपाकरांचे एक छोटेसे विचार-विनिमय झाले. , , , आमच्या गप्पा होत आहेत तोपर्यंत, आमचे चिरंजीव सगळी कडे फिरून फोटो घेत होते. , , आमच्या थोड्या गप्पा-टप्पा झाल्या, आणि आम्ही परत बाहेर आलो.तोपर्यंत स्टेज वरच्या ताईंचा कार्यक्रम संपला होता.त्यांची सही घेवून ठेवावी (सह्या घेणे, हा आमचा एक छंद आहे) ह्या उद्देशाने, त्यांची सही घ्यायचा प्रयत्न केला.नेहमी प्रमाणे, अशा ठिकाणी होते,तशी आयोजकांची आणि माझी , थोडी चर्चा झाली.पण मिसळपाववर लेख टाकायचा आहे, असे सांगून, मी त्या तराजूचे मांप मिपाकडे ओढून घेतले. , , आता गर्दी खूपच वाढायला लागली होती.पदार्थ विकत घ्यायला पण रांगा लागत होत्या.आम्हा सगळ्यांनाच रांगेत उभे राहून पदार्थ विकत घ्यायचा कंटाळा आला होता.तितक्यात स्टेज वर अजून एक कलाकार आला. , मुलाला विचारले, हा कोण? धोंडो भिकाजी आणि शंकर्‍या धोंडो परत जिवंत झाले.आपल्या वडीलांचे अगाध ज्ञान बघून त्याला एकदम गहिवरून आले.त्याने शेवटी घरी चला असा फतवा काढला.पण मला पिडांनी सांगीतल्या प्रमाणे सोडे-खिचडी चाखायचा मोह आवरत न्हवता.मुलाने ती इच्छा मान्य केली, आणि मी ती लगेच प्रत्यक्षांत आणली. , आमचे खावुन होत आहे, तोच, काय मुवि काय म्हणताय? असा प्रश्र्न ऐकायला आला.मागे वळून बघतो, तर २ ऐसी अक्षरेकर.आता दोन नद्या एकत्र भेटल्यावर जसा संगम होतो तसा झाला.आता हा संगम नक्की किती वेळ चालेल? हे काही सांगता येत नाही,ह्याचा अनुभव मुलाने घेतला असल्याने, एक अर्ध्या तासांतच त्याने चला, असे सांगीतले.दर ५ मिनीटाने त्याने तोच घोषा लावला.शेवटी भात्यांनी मध्यस्ती केली आणि आम्ही डोंबिवलीला निघालो. गाड्यांना प्रचंड गर्दी असून पण आम्ही लगेच आलेली गाडी पकडली आणि सुखरूप डोंबिवलीला आलो.उतरल्यानंतर ठरल्या प्रमाणे पुस्तक खरेदीसाठी बोडस सभाग्रुहाकडे प्रस्थान केले.तिथे २/४ पुस्तके खरेदी केली.थोडे पुढे गेलो.तर समजले, की इथेच एके ठिकाणी जंगली पक्षी आणि प्राण्यांचे प्रदर्शन लागले आहे. खावून मला पण जरा सुस्ती आलीच होती आणि भात्यांना पण जरा इच्छा होतीच.मग काय? घुसलो सरळ प्रदर्शन बघायला. तिथले काही फोटो टाकत आहे. , , , , , , फोटो काढत असतांनाच, तिथे ज्यांनी प्रदर्शन भरवले होते, ते श्री.अभिजित बक्षी, तिथे आले. त्यांनी माझ्या बर्‍याच प्रश्र्नांची उत्तरे दिली.माझी फोटोग्राफी चांगली नाही, ही अडचण मी त्यांना सांगीतली.त्यांनी आधी कॅमेरा बघीतला आणि सांगीतले की , कॅमेरा उत्तम आहे. ते माहिती देत असतांना, मी काही फोटो घेतले.त्यांना विनंती करून एक फोटो, त्यांच्या बरोबर पण काढून घेतला. , , , , त्यांच्या बरोबर परत एकदा प्रदर्शन बघीतले आणि त्यांच्या कडून अजून थोडी माहिती मिळवली.मी मिसळपाव डॉट कॉम वर एक लेख टाकणार आहे.हे पण त्यांना सांगीतले.लेखात हे फोटो टाकू का? हे पण त्यांना विचारले.कुठलेही आढे-वेढे न घेता, त्या सद्ग्रुहस्थाने , एक फोटो वगळता, इतर सगळे फोटो टाकायला परवानगी दिली. मला खरे तर त्या खाद्य-जत्रे पेक्षा हे प्रदर्शनच जास्त आवडले.मला आवडलेला एक फोटो टाकून मी हा लेख संपवतो. ,
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

"सही" घेतानाचे मुविंच्या चेहर्‍यावरचे तेज अक्षरशः पहावले जात नाहीए ! ;)

मस्त ! नशिब असावं तर मुविंसारखं असं वाटायला लागलं आहे. ज्यांची सही घेतली त्या आसावरी जोशी आहेत वाट्ट !

तुस्सी मान गये और छा तो गेयेहि! काय भरभरुन आयुष्य जगताय हो. फार हेवा वाटतोय. फुड फिस्ट काय, प्रदर्शन काय, काहि काहि म्हणुन सोडत नाहि. शीवाय मजा करुन वरती ईथे जळवणारे फोटो पण टाकता. असो तुमच्या ह्या मुशाफिरीसाठि ऑल दि बेस्ट आणि असचं भरभरुन जगत रहा. बाय दे वे मी येईस्त हा फुड फिस्ट आहे का?

मस्त जळजळजळजळ झालेली आहे, जल जल के धुँवां हो गयेला है.. "सही" घेतानाचे मुविंच्या चेहर्‍यावरचे तेज अक्षरशः पहावले जात नाहीए ! - खरोखर!

असेल ही....हमको नहीं पता... हम कु कुछ नहीं पता.... कारण सही तर तिने "आसावरी" ह्याच नावाने केली. गेली २/३ वर्षे जास्त टी.व्ही. न बघीतल्याने....ते कलाकारच माझे नांव विचारतात.

मला नाही माहीत... मुलाला विचारले तर त्याने घरी चला, अशीच आज्ञा वजा विनंती केली. रात्री मग आमची जरा कौटुंबिक चर्चा पण रंगली.अशा चर्चेत बायकोने पण थोडे मला ज्ञान द्यायचा प्रयत्न केला. जावु दे... अज्जुन डोके दुखत आहे.

प्रियदर्शन जाधव आहे तो दुसरा कलाकार! टाइमपासचा संवाद लेखक आणि चांगला कलाकारही आहे.

सही रे सही . हेतर खरं फ्रान्स ,इटली मध्येच राहायला हवेत . ठाणे डोंबिवलीतही यांना वादी आणि ओअॅसिस सापडतात . आमचा अगदी पिरामिड झालाय .

व्वा व्वा... लगे रहो कट्टाश्री :) खाण्याच्या फोटोंकडे दुर्लक्ष केले गेले आहे, याची नोंद घ्यावी ;-) ते फोटोंचे प्रदर्शन सहीच... कधी पर्यंत आहे ते? काही कल्पना?