Welcome to misalpav.com
लेखक: प्रचेतस | प्रसिद्ध:
मुक्त विहारि यांनी आधी टाकलेल्या घारापुरी कट्ट्याची तारीख आधी १ किंवा ८ मार्च ह्या गोंधळात अडकलेली होती. आता हा घारापुरी भ्रमंती कट्टा १ मार्च २०१४ रोजी करण्याचे नक्की झाले आहे. त्यामुळे येथे त्यासाठी जाहीर धागा टाकत आहे. कट्ट्याची सर्वसाधारणपणे योजना खालीलप्रकारे असेल. पुण्याहून शनिवारी दि. १ मार्च रोजी मी, धन्या, सूड, नाद खुळा, प्रशांत आणि अत्रुप्त आत्मा असे सिंहगडने निघून साधारण ९.४५ च्या सुमारास छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पोहोचू. तिथून गेट वे ऑफ इंडियापर्यंत साधारण १०/१०.१५ पर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. मुंबईकरांपैकी माझ्या माहितीप्रमाणे मुविकाका, स्पा, किसन शिंदे, दिपक.कुवेत,पिंगू शेठ हे नक्की येत आहेत. अजून कोणी मुंबैकर येणार असतील तर त्यांनी श्री मुवि यांना व्यनि करावा. तर पुणेकर इच्छुकांनी मला व्यनि करावा. सर्वांनीच १० पर्यंत गेट वे येथे जमणे अपेक्षित आहे. तिथे फेरीबोटीचे तिकिट काढून घारापुरी येथे उतरून स्थलदर्शन, निवांत गप्पा टप्पा. मग साधारण संध्याकाळी ४/५ पर्यंत परत गेट वे ला येऊन मग फोर्ट, चर्चगेट परिसराची भटकंती असा ढोबळमानाने कार्यक्रम आहे. खादाडी पण अधूनमधून होत राहील. अधिक माहिती मुवि देतीलच. आम्ही परतीचे रात्रौ ८ च्या महालक्ष्मी एक्स्प्रेसचे आरक्षण केले आहे. त्यामुळे तसा बर्‍यापैकी निवांत वेळ आहेच. चला तर मग मिपाकरांनो, एक मस्त भटकंती होऊन जाऊ देत.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

आयला मोठी दिग्ग्ज मंडळी भेटायला मिळणार म्हणजे पंचयोगच(दुग्धशर्करा वगैरे)जुळुन येणार की. पण आम्ही अभागी. आमच्या मते ही मंडळी म्हणजे महाभारतातील पात्रच जणु. वल्ली :- भीष्म बॅटमॅन( आला तर) :- युधिष्ठिर अत्रुप्त आत्मा :- अर्जुन -------------

स्वगत:-

वल्ली:-आयला भीष्म म्हणजे परत शपथ घ्या अविवाहित राहण्यासाठी

बॅटमॅन:- हं काहीतरी कुट प्रश्न विचारला पाहिजे म्हणजे हा परत मी.पा.वर येणारच नाही.

अत्रुप्त आत्मा:- च्यायला मी भुतांवर शरसंधान करतो तर माणसांचे काय? पण साला दौपदीला कुठुन शोधुन *SCRATCH* आणू?.

आयला कांडी टाकली. आता पळा.

माझं नक्की नाहीये , शुक्रवारची वीकेन्ड पार्टी 'मापात' झाली आणि शनिवारी 'व्यवस्थित' आणि 'वेळेत' उठलो तर नक्की ;) !

१ तारखेला हापिसात जाऊन कळफलक बडवण्याचे काम असल्याने मला दुर्दैवाने :( घारापुरी कट्टयाला यायला जमणार नाही आहे. यावेळी सचित्र सविस्तर वृत्तांत वाचुन मनाचे समाधान करून घ्यावे लागेल.

खीS S क *lol* चला आता कट्ट्याला शुभेच्छा देवुया ! सर्व पक्षीतिर्थकरांनी कृपया सोनेरी तिर्थ घेताना थोडी हवेत शिंपडावी. इथे "एकच प्याला" चा तळीराम संवाद आठवला. ही ही ही *lol* (कधीच न घेणारा) पम्या

करावि म्हणतो कशे अपडेट्स वल्ली - Sun, 16 / 02 / 2014 - 09 : 43 आतापर्यंत नक्की झालेले आणि पुण्याहून सिंहगडने येत असलेले सदस्य. मी प्रशांत नाद खुळा अत्रुप्त आत्मा धन्या सौंदाळा सूड पिंगू चिमी -------------------------------------------------------------- उत्तरतो हिमवन्तो दाहिणतो सालिवाहणो राञा समभारभरक्लान्ता तेण न पल्हत्थ पुहवी ||

I want to come. But i could not yet reserve the seat. I do not have much experience to go by train. Nor i m much aware of mumbai. Can someone pls advice? Excuse me for English usage. Bt cant type devnaagari well through mobile.

पुणे स्टेशनला पहाटे ५.१५ पर्यंत पोच. स्टेशनवर ५० फक्त आणि धन्या भेटतील. तिकडे सिंहगडचे टिकिट काढ. जनरल मध्ये सिंहगडला जागा मिळेल. नैतर आज तत्काळमध्ये रिजरवेशन मिळतेय का बघ. बहुधा मिळावे. येतांना आपण अ‍ॅडजस्ट करून येऊ नैतर तू एसटीने पण परत येऊ शकशील.

आमचं येणं यावेळेस होत नाहीसं दिसतंय. :-( बरेच जणांना माहिती असेल तरीही नवीन जाणार्‍यांसाठी काही माहिती. १. जाण्यायेण्याचे एकत्रच तिकिट मिळते. २. फेर्‍यांचे वडाप(भरली की बंदराहून सुटते) चालू असते, आणि दर दहा-पंधरा मिनिटाला भरतेच. त्यामुळे अर्धापाऊण तास इकडेतिकडे झाला तरी काही फरक पडत नाही. ३. अर्ध्या तासात रपेट किंवा घारापुरी अशा दोन वेगवेगळ्या बोटी/सेवा असतात, त्यामुळे तिकिट घेण्यापूर्वी/बोटीत बसण्यापूर्वी खात्री करून घ्यावी. ४. डेकवर जाण्याचा वेगळा आकार पडतो, आधी दहा रूपये घ्यायचे आता बहुधा वीस रू. घेतील. वरून बंदरात आतपर्यंत नांगरलेल्या बोटी, मोठी जहाजे, मधूनच भाभा अणुशक्तीकेंद्र दिसतं आणि छान मोकळी हवा मिळते. ५. जाताना बंदर सोडल्यानंतर दहाएक मिनिटांत एका बेटावर नौदलाची पांढरी इमारत दिसते. त्या दिशेने दुर्बिणी रोखणे, फोतो काढणे असे प्रकार करू नयेत. म्हणे नौदल याची नोंद ठेवतं आणि ज्या बोटीवरून हे प्रकार झाले त्यांवर कारवाई करतं. त्यामुळे बोटीवरचे लोक कुणी असं केलं की जाम ओरडाओरडा करतात. ६. सगळ्यात महत्वाचं- बेटावर प्रसधनगृह पटकन दिसण्यासारखं नाही, खरंतर मला माझ्या २-४ भेटींत कधीच दिसलं नाही. तेव्हा जाण्यापूर्वी गेटवे ऑफ इंडियाच्या इथे असलेल्या सशुल्क सेवेचा वापर केलेला इष्ट.

उद्या सकाळी ठीक ९:३० ला सी.एस.टी. वर भेटू या. समजा काही कारणामुळे उशीर झाला तर थेट घारापुरीला भेटू या.

कारण पुणेकरांना त्याच दिवशी परतीची गाडी पकडायची आहे. उगाच आपल्यामुळे त्यांचा खोळंबा नको. (मुंबईकरांवर राग काढायला पुणेकरांना निमीत्त मिळायला नको.)

कट्टे पे कट्टा कट्टे होडी होडीमे निकली किनकी सवारी ? थोडे खिल्लाडी थोडे अनाडी पेटमे किसके जायेगी ब्र्यान्डी ? मुवी रसीले बुवा रंगीले धन्या टमाटा वल्ली बटाटा गामा बनेगा ऐसा खिलाडी कोण काढील कुणाची खोडी........टर डर, डर टर, डर डर डा ... हार्दिक शुभेच्चा ! अच्चा बाय बाय !

आमच्यापण कट्ट्याला अश्याच रंगबेरंगी शुभेच्छा... वृत्तांताची वाट पाहतोय.

मित्रा, तू शीर्षकात रंगांची उधळण करून बहार आणलीस... पुर्वी मला ही अशी रंगपंचमी करून धागा सजवायला आवडत असे. मात्र कांहींच्या डोळ्याला ते रंग खुपायला लागले व फर्माईश झाली की आता पुरे ..... म्हणून आता कृष्ण-धवलावरच मला समाधान मानावे लागते. तरीही आपल्या रंगारीपणाचे अभिनंदन

जबरदस्तच झाला कालचा घारापुरी भ्रमंती कट्टा. पेठकर काका आणि शशिकांत ओक काका यांनी उपस्थित राहून आश्चर्याचा धक्काच दिला. उपस्थित सर्व मिपाकरांचे आभार. आत्मुबुवा लवकरच सविस्तर वृत्तांत टाकतीलच.

हो. दोन वृत्तांत येतील. मिपाकरांची मौजमजा आत्मुबुवांकडून व् आमचेकडून लेणीदर्शन.

आणि लेण्यांची माहितीसुध्दा! सातवीला असताना एलिफंटाला गेले होते. आता फक्त एवढेच आठवतेय की माकडाने माझ्या हातातली केळी पळवली होती. आणि एकत्र गोल बसून भेळ खाताना आमच्यामधे माकडंही येऊन बसली होती भेळ खायला!

त्यांची मुले पण जास्त हुषार झाली आहेत. शीतपेयांच्या बाटल्या तर पळवतातच, पण शिवाय त्यांचे बूच उघडून, शीतपेयांचा आस्वाद पण घेतात.

अनन्या, अग, त्यांच्या हुशार मुलांनी बूच उघडून शीतपेयाची चव चाखण्याची प्रगती केली. तहान भागवली व शिवाय पेयाच्या चवीचा आनंद मिळवला. त्यांच्याप्रमाणे आमच्या मुलांनी, पुर्वी फक्त आपली नावे कोरून इमारतींवर आपला प्रासाद सोडायला आवडे यातून प्रगती करून, आता त्या वास्तूचे ऐतिहासिक व वास्तूशिल्पाचे अध्ययन करून त्यातील सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा असतो हे तथ्य जाणून मिपाचे काही, वल्ली सोबत एकत्र जमून आले...