Welcome to misalpav.com
लेखक: mohite jeevan | प्रसिद्ध:
माझा बाप लहानपनीच वारले,पुढे आईने मला वाढविले, जस जसा मोठा होत होतो तसा मी मला सर्व काही कळत होते. पण आचानक आईने ही साथ सोडली, आता मला माझी मावशी मला साभळंते. ती काळी आसल्याने तीला काळी मैना म्हणतात.आत ग़ेले पाच वर्ष तीच्या बरोबरच आसतो.तीची दोन मुलं,एक मुलग़ा व एक मुलग़ी आसते. मावशीला मी काळे म्हणतो, मावशीचा नवरा तो एक ग़वंडी आहे.त्याना मी काका म्हणतो. काळी मावशी नेहमी तबांखु खात आसते, कायम तीच्या ओठाखाली तबांखु ठेवलेली आसे. एक रात्री आम्ही सर्व आमच्या पडक्या घरात झोपलो आसता,छतावर चोर आला, काळी मावशी त्यावेळी नेमकी जाग़ी झाली, बिछान्यात न उठता तोंड वाकडे करुन समोर आसलेल्या ग़लासातील पाण्याचा घोट घेत,चुळ भरत तीने जवळच्या नाहणी मध्ये थुंकले आणि तीची नजर छतावर ग़ेली. मी जाग़ाच होतो. ‘आरे चोरा साभांळुन जरा ही झोपडी पडकी हाय पडशील,’ काळी मावशी त्या चोराला म्हणाली, थोड्या वोळाने चोर म्हणाला,’ बरं बरं,तु झोप मला चोरी करु दे’, ‘ आरे चोरी करायला हे घर कसं काय शोधलयसं,’ काळी मावशी म्हणाली, ‘मग़ काय करु सावकर लोकच्या घरी चोरी करायचं म्हणजे आवघड आसतं,’ चोर म्हणाला, ‘माझ्याकडं काय मिळणार तुला, तीन पोरं आहेत,त्याच्या जेवनाचे वांदे आहेत,आसं कर दुसरं घर शोध,’मावशी म्हणाली, ‘चोर कसा सापडला की मी चोर नाही म्हणतो तसे तर तु करत नाही ना,’चोर म्हणाला, ‘हे बघ तुला एक सल्ला देतो पुढे थोड्या आतंरावर,सावकराची घरे आहेत तेथे काही,प्रयत्न कर,’मावशी म्हणाली, ‘नको आसाच एकदा मी सावकराच्या घरी सापडलो आणि खुप मार खाल्ला होता,’चोर म्हणाला, ‘मग़ काम का करत नाहीस?,’मावशी म्हणाली, ‘काम करतो की पण तेवढ्यावर भांग़त नाही,’चोर म्हणाला, ‘का?’ मावशी म्हणाली, ‘घरात बायका पोरं आहेत,आई आहे,मग़ तेवढ्यावर कसे चालेल, ‘चोर म्हणाला, ‘पण तुला इथं कय पण मिळणार नाही,’मावशी म्हणाली, ‘ जरा चहा तर करुन देशील का?’चोर म्हणाला, ‘चहा करण्यासाठी घरात कायपण नाही?’,मावशी म्हणाली, ‘ठीक आहे जातो मी,’चोर म्हणाला, ‘ संभाळुन जा रे चोरा, तुझ नावं तर सांग़,’ मावशी म्हणाली, ‘चोरच नाव आहे माझं,जातो आत,’ चोर म्हणाला, ‘येत जा रे पुढच्या वेळी नक्की चहा देईन’,मावशी म्हणाली, आणि चोर ग़ेला, मावशीने तंबाखु खाल्ली, मी झोपलो, सकाळी उठुन विचार करत होतो की कोण चोर आसेल तो..
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

लेख-लेखक-प्रतिसाद पाहुन सरळ धाग्याचे पान उंदराच्या सहाय्याने खाली खेचुन पयले प्रतिसाद देत हाये.आता वाचावयास "वर" जाइन म्हणतो. धन्यवाद. पहिला प्रतिसाद मुविंचा च असणार याची खात्री बाळगु काय ?

बिछान्यात न उठता तोंड वाकडे करुन समोर आसलेल्या ग़लासातील पाण्याचा घोट घेत,चुळ भरत तीने जवळच्या नाहणी मध्ये थुंकले हे कोडं काही उलगडलं नाही भौ! म्हंजी कितीपण व्हिजुयलाइज करायचा प्रयत्न केला तरी डोळ्यांसमोर काय हा व्हिडिओ येत नाही राव! हां, म्हणजे एकतर न्हाणीला एकदम खेटून झोपलं तर शक्य आहे. संवादांतून मावशी आणि चोराची प्रतिमा चांगली उभी केली आहे. मावशीची आणि चोराची वेव्हलेंथ चांगली जुळलेली दिसते. माझी स्वाक्षरी एवढी मनावर घेऊ नका राव!

मावशीची आणि चोराची वेव्हलेंथ चांगली जुळलेली दिसते.
त्यांचं बरंच काय काय जुळलं होतं असं दिसतंय. त्याला "टाका भिडणे" म्हणतात. पण.
मी जाग़ाच होतो.
यामुळे हा संवादांचा फार्स मावशीबैंना रचावा लागला.

जेपी जेपी....अहो चुकलात तुम्ही तंबाकु नाय काय ते तबांखु असे आहे. याचाच अर्थ या धाग्याला तुम्ही निव्वळ टाईमपास समजता !

इथे टिबाटिंबाला महत्व आहे. ते तंबाकु नाही आणि तंबाखु पण नाही. ते "तबांखु" आहे. हल्ली ग खालचे टिंब गेल्याने बरेच वाचक नाराज आहेत यावरून समजून घ्या एका टिंबाला किती महत्व आहे ते.

अरे वा... काळा पहाड आणि काळी मावशी :) ह. घ्या. प्लीझ. अवांतर - मला पूर्वी ह.घ्या म्हणजे हसून घ्या असे वाटायचे, खरा अर्थ नंतर कळला.

कट्टा मंत्रालय हातात आल्याने मुविंचे जीवन्भौं च्या धाग्यावर झालेले दुर्लक्ष आक्षेपार्ह आहे.

आगामी कट्ट्यावर एक परिसंवाद आयोजित करा आता. विषय - १. "तुम्हाला समजलेले जीवनभाऊ" २. "जीवनभाऊंच्या कथा आणि प्रतिसाद" ३. "जीवनभाऊ नि मिपाला काय दिले" आणखी काही विषय असतिल तर सुचवा

४. जीवन भाऊंचे वांगमय आणि तासगावची वांगी - एक तुलनात्मक अभ्यास. ५. Impact of Jeevan-bhou's literature on the personality and coping styles of working women from various professions ६. नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण योजने अंतर्गत कार्य करणार्या ग्रामसेविकांवर जीवन भाऊंच्या साहित्याचा झालेला आर्थिक व सामाजिक परिणामः एक अध्ययन.

मी पण आमुचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो.. जिवन आम्हा कळले हो.. जिवनभौ आम्हा कळले हो.. 'काळी मावशी' कळली आणीक नशीब हे फळफळले हो.. जिवन आम्हा कळले हो.. जिवनभौ आम्हा कळले हो.. :))

धाग्यावरी लोकांची प्रतिभा एवढी का बरे फुलुन येत असावी. (चपाती, भाकरी, पिटा ब्रेड, खुबुस, तळलेली पुरी )

मोजी एक डु-ऐडी आहे. पोषक वातावरण तयार करुन देणे, वाचनमात्र सदस्यांना लिहायला लावणे या जबाबदार्‍या (संपादक मंडळाकडुन !) त्यांना देण्यात आल्या आहेत. :)) म्हनुन्श्यान- ह्याच्च धाग्यावरी लोकांची प्रतिभा एवढी फुलुन येत असावी.

मोजींची कथा बरी आहे आवडली. अवांतर आपल्याकडे रंगाचा उल्लेख वस्तुतः वर्णवादी नसतो ती चांगलीच गोष्ट आहे. या कथेत लेखकाचा उद्देशही हिणवण्याचा नाही. पण इतर देश आणि प्रदेशातून येणारे लोक हेच उल्लेख तेवढेच सहजतेने घेउ शकणार नाहीत हे आपले लोक बर्‍याचदा लक्षात घेत नाहीत. दुसरंतर आपल्या कडे रंगाच फारसंप्रस्थ कधी नव्हत पण क्रिम विकणार्‍या नवनव्या कंपन्या जाहीरातींच्या माध्यमातून नवीन पिढीत भावना वाढवत आहेत असे वाटते.

‘हे बघ तुला एक सल्ला देतो पुढे थोड्या आतंरावर,सावकराची घरे आहेत तेथे काही,प्रयत्न कर,’मावशी म्हणाली,
मला येक सांग़ा.. काळी मौशी म्हंजी बाई हाय काय बाईमानुस हाय?? ;) आनी हे 'आतंरावर' म्हंजी काय?

त्या कूट कथा असतात.हे आम्ही बर्‍याच वेळा सप्रमाण सिद्ध केले आहे.शिवाय तर्क शास्त्राच्या नियमाप्रमाणे, एकाने लढवलेला तर्क, दुसर्‍या व्यक्तीला पसंत पडेलच असेही नाही. असो, तर आपण ह्या कथेकडे वळू या. ================================================ नेहमीप्रमाणेच ह्या कथेत देखील भाऊंनी बरेच क्ल्यु दिले आहेत. उदा. कथेचे नांव. ह्या कथेतील मावशीचे नांव गुणावरून न देता तिला तिच्या वर्णावरून दिले आहे.म्हणजे सामान्य माणूस आधी गूण न पाहता वर्णच पाहतो,शिवाय माय मरो आणि मावशी जगो, हे एक अंग पण लेखक सांगून जातो.) "अंग किती गोरं आहे नाही?" हा फेमस डायलॉग तुम्ही आठ्वले,शहाडे आणि मं.त ऐकला असेलच. दुसरा क्ल्यु : "ती काळी आसल्याने तीला काळी मैना म्हणतात." आता ही काळी मैना कुठे सापडते तर कोकणांत.कोकणच्या माणसाला मुळातच अर्धपोटी आणि उघडे राहावे लागते.त्यामुळे भारतातील एका विशिष्ट पक्षाला कोणीही तिथे विचारत नाही.हे सर्वमान्य मत कुणालाही ठावूक असेलच. तिसरा क्ल्यु : "ग़ेले पाच वर्ष तीच्या बरोबरच आसतो." इथे पाच वर्षे हा एक क्ल्यु देवून लेखक पुढील क्ल्यु देतो.... चौथा क्ल्यु : तीची दोन मुलं,एक मुलग़ा व एक मुलग़ी आसते. आता कुठल्या बाईला एक मुलगा आणि एक मुलगी आहे, ते ओळखा.तरी पण न ओळखता आल्यास, लेखक अजून एक क्ल्यु देतो. पाचवा क्ल्यु : "मावशीचा नवरा तो एक ग़वंडी आहे." इथे गवंडी असणे हे प्रतिकात्मक आहे.गवंडी घरे बांधून देतो आणि त्याबदल्यात पैसे कमावतो.तुम्हाला पण असे बरेच गवंडी माहीत असतील. सहावा क्ल्यू : "काळी मावशी नेहमी तबांखु खात आसते, कायम तीच्या ओठाखाली तबांखु ठेवलेली आसे." इथे तबांखू हे प्रतिकात्मक आहे.व्यसनी माणसे सहसा आपले व्यसन सोडत नाही.आता जिचा नवरा गवंडी आहे, तिला तंबाखू तरी का होईना पण व्यसन हे असणारच.त्यासाठी लागणारा पैसा ती कुठून तरी आणत असणारच.तर तो पैसा ती कुठून आणते, ते पण भाऊंनीच सांगीतले आहे. सातवा क्ल्यू : "बिछान्यात न उठता तोंड वाकडे करुन समोर आसलेल्या ग़लासातील पाण्याचा घोट घेत,चुळ भरत तीने जवळच्या नाहणी मध्ये थुंकले आणि तीची नजर छतावर ग़ेली." बघा इतकी लांब चूळ फेकली.अगदी तोफेतून सुटलेल्या एखाद्या तोफगोळ्यासारखीच आणि नजर कुठे गेली तर छतावर.म्हणजेच आकाशांत आणि तिला चक्क चोर छतावर दिसला.म्हणजेच तिची द्रुष्टी भिंतींचा अडथळा पार करू शकत होती. थोडक्यात तिला दिव्य द्रुष्टी होती. आठवा क्ल्यू : "आरे चोरा साभांळुन जरा ही झोपडी पडकी हाय पडशील," मावशी झोपडीला पडकी म्हणते.का तर तिच्या झोपडीतून (म्हणजेच पक्षांतून) बरीच माणसे बाहेर गेली आहेत. पुढचे बरेच क्ल्यू आहेत.... उदा. "सावकर लोकच्या घरी चोरी करायचं म्हणजे आवघड आसतं," "‘माझ्याकडं काय मिळणार तुला, तीन पोरं आहेत,त्याच्या जेवनाचे वांदे आहेत,आसं कर दुसरं घर शोध," "‘नको आसाच एकदा मी सावकराच्या घरी सापडलो आणि खुप मार खाल्ला होता," "‘काम करतो की पण तेवढ्यावर भांग़त नाही," "जरा चहा तर करुन देशील का?’चोर म्हणाला, ‘चहा करण्यासाठी घरात कायपण नाही?’,मावशी म्हणाली. "येत जा रे पुढच्या वेळी नक्की चहा देईन." (ह्याला म्हणतात आश्वासन.) आता गेल्या १५/२० दिवसांतल्या राजकीय घडामोडी आठवा आणि चोर कोण असेल ते ओळखा. ================================================================ हा लेख तद्दन विनोदी आणि फालतू असून, मी कुठल्याही पक्षाचे किंवा व्यक्तीचे नांव घेतलेले नाही.तरी पण भारतातील काही पक्षांशी आणि व्यक्तींशी साधर्म्य आढळल्यास, तो योगायोग समजावा. =================================================================

वा मुक्त विहारि, जीवनभौच्या कथेचे इतके सविस्तर आणि समर्पक विश्लेषण केलेत! अभिनंदन.

हे सामान्य लेखक नाहीत. त्यांच्या लेखांचे विश्लेषण करणे हे येरागबाळ्याचे काम नोहे. फार अभ्यास करून मोजी आणि पेशवा लेख लिहायचे. जमल्यास पेशवा ह्यांचा खालील लेख वाचा... http://www.misalpav.com/node/21359

कथा अतिशय सुंदर आणि आशयाने खचाखच भरलेली आहे . तुमच्या मावशीचे खरेच कौतुक वाटते . काळी असुनहि तुम्हाला तीने सांभाळले . झोपायला पडके घर वापरत होती मावशी म्हणजे किती दुरद्रुष्टी आहे मावशीला तुमच्या .तबांखु खाउन म्होरीत थुंकणे , दाताखाली तबांखु धरणे वगैरे जे वर्णन आहे त्यामुळे कथेतले कितीतरी बारकावे तुमच्या लेखनीने हेरलेत हे ध्यानात येते. लिहित रहा , तुमच्या कथेंमुळे मिपा ला एक वेगळीच पेहेचान मिळालेली आहे हे लक्षात घ्या . जीवन भौ लेखनीला थांबवु नका , _/\_

लुनावाल्या ब्रम्हेंच्या बालपणीची अजुन एक गोष्ट. हा नवीन होता...म्हणजे आहे !

अबाबाबाबाबा भयंकर जब्राट प्रतिसाद सगळे ! कथेमधून एव्हढाच बोध झाला की काळ्याकुट्ट रात्रीच्या काळोखात काळ्या मावशीने चोराच्या मनातलं काळबेरं शोधून त्याला काळा-निळा करण्याऐवजी काळाचं भान ठेवून काळाकाळीची विनंती केली. (दुसरीकडे चोरी करण्याची.) भगवान ऐशी काळी मौशी सबको दे.