एकुश्ये म्हणजे बंगाली भाषेत २१. जगाच्या इतिहासात चार वर्षांच्या अंतरात २१ तारीख दोनदा आली जेव्हा लोकांनी मातृभाषेच्या प्रतिष्ठापनेकरीता बलिदान केले पहिली होती एकुश्ये फेब्रुवारी १९५२ जेव्हा बांग्लादेशी हुतात्म्यांनी बंगाली भाषेला राजभाषेचा दर्जा मिळावा म्हणून पाकीस्तानी गोळ्या छातीवर झेलल्या.(याच १९५२च्या डिसेंबरात पोट्टी श्रीरामलूंनी एक भाषिक राज्याकरता बलिदान केले) चार वर्षांच्याच अंतरानी अजून एक २१ तारीख आली ती होती नव्हेंबर १९५६ची जागा होती मुंबईचे फ्लोरा फाऊंटेन.
इ.स.१९५६ च्या नोव्हेंबरातील २१ तारखेची ती संध्याकाळ होती. सकाळपासून फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने खवळून उठली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून त्याचा जळजळीत निषेध होत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगार आणि पांढरपेशांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या विवेकशून्य सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार होता. दुपार टळल्यानंतर, म्हणजे मुंबईतल्या शंभर-सव्वाशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चा निघेल, असा अंदाज होता. पण त्याला छेद देत पांढरपेशांचा प्रचंड जनसमुदाय, एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमू लागला. हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळला जाईल, असा अंदाज होताच. कारण फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी केली होती. सर्व कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांना घरी पाठविले होते. जमावबंदीचा भंग करून, मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यानंतर थोड्या वेळातच विपरीत घडले. सत्याग्रहींना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात आला. मात्र, तरीही ते चौकातून हटत नाहीत म्हटल्यावर पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आला. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे "दिसताक्षणी गोळ्या" घालण्याचे पोलिसांना आदेश होते. प्रेक्षणीय फ्लोरा फाउंटनाच्या कारंज्यातील पाण्यासारख्याच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या निदर्शकांच्या रक्ताच्या चिळकांड्या काळ्याभोर रस्त्यावर उडू लागल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जानेवारी, इ.स. १९५७ पर्यंत जे १०५ आंदोलक हुतात्मे झाले, त्या मालिकेची ही सुरुवात होती. संदर्भ२१ फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय भाषा दिनाच्या निमीत्ताने माझे एकुश्येचे मनोगत खालील प्रमाणे अशा जगाचे स्वप्न प्रत्यक्षात आणा कि जगातील हव्या त्या प्रत्येक भाषेतील ज्ञान , माहिती आणि संवाद मराठीत आणि मराठीतील माहिती , ज्ञान आणि संवाद जगातील प्रत्येक भाषेत तत्काळ आणि मुक्त पणे उपलब्ध होतील .”
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
लिहिण्यासारखे काही नाही,
+१...
मातृभाषा
"आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन" बरोबर
धाग्यातील भावनेशी पूर्ण सहमत
प्रतिसादाकरता धन्यवाद
हुतात्मा चौक, मुंबई आणि फ्लोरा फाऊंटेन कारंजे