Welcome to misalpav.com
लेखक: निलरंजन | प्रसिद्ध:
कल्की अवतार हा विष्णूचा अंतिम अवतार आहे असे म्हटले जाते की कलियुगा मध्ये अशी वेळ येईल की लोक खूप वाईट वागतील. जगाला हया संकटातून मुक्त करण्यासाठी कल्की अवतार पृथ्वीवर येतील, आणि जगातून वाईट गोष्टी नष्ट करेल तो जे वाईट वागेल त्याला ठार मारेल. लोक नंतर बदलतील, आणि चांगले लोक तयार होतील. त्यानंतर नवीन टप्पा सत्ययुग सुरू होईल पाशवी लोकांना बुद्ध अवतारात समज दिली, तो अवतार झाल्यावर कल्की अवतार येतील जे लोक बदलले नाही त्या लोकांना शिक्षा करेल कल्की अवतार या millenium मधे होईल. तो भारतात जन्म घेईल. भविष्यवाणीनुसार कल्की अवतार संपूर्ण जगाचा राजा असेल संपूर्ण पापनाश केल्यानंतर संपूर्ण पृथ्वीवर न्यायाची स्थापना करेल तो वाईट लोकांना शिक्षा देईल पापी लोकावर तो दया करणार नाही. कल्की अवतार एक सुवर्णयुग स्थापन करेल कलियुगा आधी, हे कृष्णाने रणांगणात अर्जुनाला सांगितले की त्याच्या मृत्यूनंतर, कलि युग सुरूवातीस होईल. तो 5000 वर्ष त्याच्या मृत्यूनंतर (6000 B.C.) म्हणतात कलि युग आत सुवर्णयुग येतील. चालेल जे कलि युग सुवर्णयुग नंतर अंदाजे 10,000 वर्षे नंतर स्थापन होईल
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

पाशवी लोकांना बुद्ध अवतारात समज दिली,
तरी त्यांचे पाशवीपण सरायला काही तयार नाही. बाकी सहमत आहेच. पण
चालेल जे कलि युग सुवर्णयुग नंतर अंदाजे 10,000 वर्षे नंतर स्थापन होईल
आमच्या मते ते अंदाजे १०,१०१ वर्षांनंतर स्थापन होईल. बाकी जाणकारांच्या मतांच्या प्रतीक्षेत.

हां ना राव. चांगली आहे बिचारी. मला मिपावर आले की तिचीच आठवण येते. माझा एक लै चांगला मित्र सेम तिच्यासारखा दिसतो अन हसतो. ;-)

पहिल्या पिक्चर मध्ये अभय देओल बरोबर एकदम झक्कास काम केले आहे. ति हिरोबरोबर बोलत असताना तिच्या चेहर्‍यावर कॅमेरा आल्यावर हमखास किस करावा लागणार असे तिचा चेहर्‍यावर कायम भाव असतो अन ते खरे हि असते.

कलि युग सुरूवातीस होईल. तो 5000 वर्ष त्याच्या मृत्यूनंतर (6000 B.C.) म्हणतात कलि युग आत सुवर्णयुग येतील. चालेल जे कलि युग सुवर्णयुग नंतर अंदाजे 10,000 वर्षे नंतर स्थापन होईल वरील वाक्यांचा अर्थ कळला नाही. कलियुग आत सुवर्णयुग येईल म्हणजे कलियुगाच्या आंतच सुवर्णयुग येईल असे म्हणायचे आहे का ? चालेल जे कलियुग सुवर्णयुग नंतर याचा काय अर्थ? म्हणजे सुवर्णयुगानंतर पुन्हा कलियुग येणार आहे का ? कृपया मार्गदर्शन करावे. जाताजाता:- ह्या धाग्यावर तर २०२५ सालीच असेंडिंग कलियुग संपेल असे लिहिले आहे. त्यानंतर असेंडिंग द्वापारयुग चालू होणार म्हणे. खरे खोटे तो कल्कीच जाणे. http://www.grahamhancock.com/forum/DMisraB6.php काही म्हणा, माझ्या स्वाक्षरीने इतके लोक प्रभावित होतील हे माहित नव्हते.

कल्कीच्या जन्मानंतर पाशवी लोकांचा नाश होईल आणि त्यानंतर सुवर्ण युग असेल आणि पुन्हा उलट गिनती सुरू होईन म्हणजे परत सत्य| कृत| ञेता| द्वापार युगांचा खेळ सुरूच राहिल

कल्की हसी मुक्कालात के लिए आआआआआआआज रात के लिए हम्तुम खुदा हो जाते है अच्छा चलो खो जाते है !

असे म्हणतात की कल्कीचा जन्म दक्षिण भारतातला असेल त्यांच्या कडे पांढरा अश्व असेल जो उडण्याची क्षमता ठेवेल असे ही सांगितले जाते की युगानयुगे जिवंत असलेले हनुमान त्यांच्या कामात मदत करतील आणि शेवटी जीवन त्यागतील

त्या दोन नालायकांचे नाव सुद्धा घेऊ नका दोघे अप्पलपोटी स्वार्थी देवा चा कणभरहि लवलेश नाहीये त्यांच्या कडे आणि बाय द वे हयाआधी उडणारे घोडे अस्तित्वात होते त्यांना उडण्यासाठी पक्षासारखे पंख होते उत्काती मधे ते नामशेष झाले त हरकत नाही हा संशोधनाचा विषय असेल

आणि बाय द वे हयाआधी उडणारे घोडे अस्तित्वात होते त्यांना उडण्यासाठी पक्षासारखे पंख होते उत्काती मधे ते नामशेष झाले त
पण त्यांना घोडे म्हणायचे का?

हे तर काहीच नाही ! ३०० वर्षांपूर्वीपर्यंत मादागास्करमध्ये हत्ती-पक्षी (एलेफंट बर्ड्स) होते. फ्रेंच वसाहतवद्यांनी त्यांना शिकार करून नामशेष केले. आता मिळालेल्या त्यांच्या अंड्यांच्या अवशेषातून डि एन ए वेगळा करून त्यांना परत जिवीत करण्याचे प्रयत्न चालू आहेत !

(१२) अत्त - वर्ग : उत्तना व कतं पापं अत्तना संकिलिस्सति । अत्तना अकतं पाप अत्तना व विसुत्र्झाति । सुद्धि असुद्धी पच्चतं नात्र्यमत्र्य विसोधये ।। अर्थ : आपण केलेले अकुशल कर्मच (पाप) आपल्याला मलीन करते व अकुशल कर्म (पाप कर्म) न करणे, कुशल कर्म करणे आपल्याला शुद्ध करते. अशा तऱ्हेने मानवाची शुद्धी - अशुद्धी स्वत:वरच अवलंबून आहे. विवेचन : तथागत बुद्ध आपल्या कोणत्याच संदेशात 'कर्म करा आणि फळाची अपेक्षा करू नका' असे सांगत नाहीत. उलट केलेल्या कर्मास निच्छितच तुंम्ही स्वत: पात्र आहात. बुद्धाच्या शिकवणीचा सार विचारात घेतल्यास निष्क्रिय व आळसावलेला मानव हा एखाद्या भंगारात पडलेल्या इंजिनसारखा भूमीला ओझे वाटतो. परंतु कर्म कसे असावे, त्याबाबत मात्र बुद्धाने समर्पकता मांडली आहे. कर्म हे कुशल कर्म (सत्कर्म) असावे. ज्याने तुमची उन्नती होईल. इतरांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही. स्वत:चा उत्कर्ष बुद्धाला मुळीच नको नव्हता परंतु आपल्या उत्कर्षाने इतरांचे अकल्याण, नुकसान मात्र झालेले नसावे. तुमच्या कर्माने जेंव्हा इतरांना शून्यवत सुद्धा हानी पोहचत नसते, तेंव्हा तुमचे कर्म शुद्ध व योग्य असे पात्र ठरते. या प्रकारे तुमचे कर्म घडत नसेल तर पापास लायक ठरते. असे पाप झाले तर ईश्वरवादी धर्म हे पाप धुवून काढण्यासाठी शुद्धता प्राप्त करून घेण्यासाठी अग्नी, होम करतात. असे होम करून पापाचे डाग किती धुतले जातात हे ईश्वरवाद्यांनाच माहित. परंतु बुद्ध मात्र अशाप्रकारचा कोणताही शुद्धतेचा उपाय सुचवत नाहीत. बुद्ध म्हणतात एकदा झालेले अकुशल कर्म (पाप कर्म) पुन्हा केव्हाही न करणे हेच खरे प्रायश्चित ठरावे. परंतु ही वेळ मानवावर यावी तरी का ? असा बुद्धाच्या शिकवणीतून अर्थ निघतो. त्याचा विचार केल्यास मन अशुद्ध विचारांशी वश होत गेल्यास मानवावर अशी वेळ येवून ठेपते. त्यामुळे मन व मनातील विचार नेहमी शुद्ध ठेवावे आणि हे आपल्या अगदी आवाक्यात असते, असे तथागत बुद्धाचे मत आहे. थोडक्यात मानव स्वत:ला स्वत:च घडवू शकतो. आपणच स्वत: स्वत:चे कुंभार आहोत दुसरा कुणीही नाही. बाही तुमची मर्जी ..... (बुध्द हा अवतार होता असा विनोदी विचार मांडणे आणि संपादकानी त्याकडे दुर्लक्ष करणे , दरवेळी त्याला दुजोरा देणे हे वा त्यावर गप्प बसणे हे संस्थळ व निर्दयी संपादक प्रगल्भ झाल्याचे लक्षण का मानु नये ?? )

तुमच्याशी एकदा बौध्द तत्त्वज्ञानावर वादविवाद करायला नक्की आवडेल ... (त्या निमित्ताने आमचाही अभ्यास होईल वैदिक धर्माचा ... आचार्यांच्या साहित्याचा ) फक्त आपण नुसता वाद विवाद करायला नको ... तुम्ही मते पटली तर स्विकारणार का ? की अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री असे म्हणुन सोडुन देणार ???

तुमच्याशी एकदा बौध्द तत्त्वज्ञानावर वादविवाद करायला नक्की आवडेल ... (त्या निमित्ताने आमचाही अभ्यास होईल वैदिक धर्माचा ... आचार्यांच्या साहित्याचा ) >> तुम्हाला संवाद असे म्हणायचे असावे. फक्त आपण नुसता वाद विवाद करायला नको ... तुम्ही मते पटली तर स्विकारणार का ? की अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री असे म्हणुन सोडुन देणार ??? >> तुम्ही स्विकाराल ? जस मंदीरात जाता तसे विहारात जावुन हात जोडणार का ? (अवतार मानता ना ? )

वाद म्हणजे संवादच म्हणायचे होते ..
जस मंदीरात जाता तसे विहारात जावुन हात जोडणार का ?
हो मी आत्ताही बुध्दाला हात जोडतोच ... आणि त्याचे तत्त्वज्ञान पटले तर का नाही स्विकारणार ? हां , फक्त एक आहे की बुध्द धर्मात जातिव्यवस्था नव्हती म्हणुन बुध्द धर्म ग्रेट असे काही मुद्दे मांडणार असाल तर चर्चा नको . चर्चेला खालील तत्त्व ठेवुयात
आपण ज्ञान , तत्त्वज्ञान, कर्म , आत्मा , परमात्मा , तर्क , जीव शिव , मुर्तीपुजा वगैरे तात्विक मुद्दे आणि वैदिक आणि बौध्द मतातील फरक आणि त्यातील कोणते लॉजिक बिनतोड असेल तो धर्म ग्रेट
चालेल ?

जस मंदीरात जाता तसे विहारात जावुन हात जोडणार का ?
ह्याच्यावरुन आणखी एक आठवले ... तुम्ही नक्की कोणत्या बौध्दमताचा अभ्यासकरुन पॉईंट मांडणार ? हीनयान ? महायान ? वज्रयान ? की अजुन कोणत्या ? मला स्वतःला वैदिक मतातील वेदान्त आणि सांख्यमताचा अभ्यास करुन कळाले तेवढे मत मांडायला आवडेल

मी धम्मपद, बर्‍यापैकी जातककथा वाचल्या आहेत. बुद्धाची शिकवण अवडली, पटली. पुढे योगायोगाने टिक न्हात हान या सध्या फ्रान्समध्ये वास्तव्य असलेल्या व्हिएतनामी बौद्ध भिक्खूने लिहिलेली रिकन्सिलिएशन - हीलिंग दी इनर चाईल्ड आणि अँगर ही दोन पुस्तके वाचली. लेखकाने पुस्तकांमध्ये जे काही लिहिलं आहे त्याला तो बौद्ध मानसशास्त्र (बुद्धीस्ट सायकॉलॉजी) म्हणतो. या दोन पुस्तकांनी अक्षरशः मनाचा तळ गाठला. जे काल परवापर्यंत केवळ "ईंटेलिजन्सच्या" पातळीवर होतं ते या पुस्तकांनी जाणिवेच्या पातळीवर आणलं.

ह्याच्यावरुन आणखी एक आठवले ... तुम्ही नक्की कोणत्या बौध्दमताचा अभ्यासकरुन पॉईंट मांडणार ? हीनयान ? महायान ? वज्रयान ? की अजुन कोणत्या ? >> माझा प्रश्न सरळ आहे , आणि शिंपल ही ......उगा वेटोळे कशाला ? तुम्हाला जर बुध्द हा कितवा सा अवतार वाटत असेल तर तुम्ही इतर बौध्दजनांसारखं विहारात वन्दना का करत नाही .... @ धन्या ...तु तोच आहेस ना " बुध्दाला जर त्याचा वडिलांनी सोशलाईज केले असते तर बुध्द झाला असता का " अशी अपर्णाच्या एका वाक्याची कॉपी सहीत घेणारा ... मग बोलणे खुंटले .....लेखन सीमा

@ धन्या ...तु तोच आहेस ना " बुध्दाला जर त्याचा वडिलांनी सोशलाईज केले असते तर बुध्द झाला असता का " अशी अपर्णाच्या एका वाक्याची कॉपी सहीत घेणारा ... मग बोलणे खुंटले .....लेखन सीमा
होय. मी तोच आहे. गौतमाला त्याच्या वडीलांनी जर सोशलाईज्ड केलं असतं तर तो तत्कालिन इतर राजकुमारांप्रमाणे युद्धविदयेत प्रविण झाला असता, राज्यकारभार कसा हाकावा हे शिकला असता आणि पुढे जाऊन सम्राट गौतम बनला असता. एक राजा म्हणून आयुष्य जगला असता. मात्र त्याच्या वडीलांनी त्याच्या भविष्याचा धसका घेऊन त्याला कुठल्याही दु:खाची जाणिव होणार नाही याची काळजी घेतली. मात्र जेव्हा दु:ख अचानकपणे समोर आले तेव्हा तो धक्का गौतम सहन करु शकला नाही. जगात दु:ख आहे याची त्याला पहिल्यांदा जाणिव झाली. त्याने दु:खाच्या कारणांचा शोध सुरु केला. आणि गौतमाचा गौतम बुद्ध झाले. त्या सहीतील वाक्याचा मतितार्थ हाच तर होता. :)

त्या सहीतील वाक्याचा मतितार्थ हाच तर होता. >> छान ..मतितार्थावरून आठवल ..कुठेतरी वाद घालत होतो ...मित्र मुस्लीम होता ..शेवटच वाक्यावर मला प्रतिवाद करता आला नाही .. : हनुमान पण आमचाच रे !! जस सलमान, सुलेमान, रेहमान ..तसंच हनुमान !! : संभ्रम

तुम्हाला जर बुध्द हा कितवा सा अवतार वाटत असेल तर तुम्ही इतर बौध्दजनांसारखं विहारात वन्दना का करत नाही
कारण बुध्द अवतार असला तरी त्याचे तत्त्वज्ञान मुळातच खंडीत आहे .... तर्कशुध्द नाही ...हे कुमारिलभट्ट ह्यांनी मीमांसेच्या आधारे आणि श्रीमदाद्यशंकाराचार्यांनी वेदांताच्या आधारे सातव्या शतकाच सप्रमाण सिध्द केले आहे !! "एकेहाती दन्तु | जो स्वभावता खंडीतु | तो बौध्दमत संकेतु | वर्तिकांचा ||" श्लोक क्र. बारा ज्ञानेश्वरी अध्याय पहिला असे माऊलींनीही म्हणुन ठेवले आहे ... अवांतर : आपले मःपुर्वक आभार ! आपण खरेच वाद संवाद करुयात , निव्वळ प्रतिसाद द्यायचा साठी आज कित्येक दिवसांनी ज्ञानेश्वरी उघडली ... चर्चा सुरु झाल्यावर खरेच अजुन अभ्यास होईल . जय जय रामकृष्णहरी !!

हसायला देखील आले नाही त्या श्लोकामुळे ..कुमारभट्टील काय आणि शकराचार्याच्या कालखंडाची पार वाट लावलीत ( तुम्ही शंका राचार्य लिहीले आहे, चुकीचे वाचले त्याबद्दल आम्ही स्वता ला माफ केले ! ) मग माउलींचा संदर्भ काय ?? अहो माझ्या सारख्या कालगणनेतच निराधारी असलेल्या माणसाला किमान मराठी दिनी आणि शिवशंकराची ' महाशिवरात्री दत्ताच्या गुरुवारी कशी आली याचाच घोळ समजेना ..त्यात तुम्ही असे महा-अवघड प्रतिसाद ताकल्यावर कसे व्हायचे आमचे . तुम्ही जिंकलात .....धन्यवाद ...पण जाता जाता ........ १३) लोक - वर्ग : अन्धभुतो अय लोको तानुकेत्य विपस्सात । सकुन्तो जाल मुत्तो व अप्पो सग्गाय गच्छामि ।।। अर्थ : हे जग आंधळे आहे. हे थोडेच लोक पाहू शकतात आणि जाळ्यातून मुक्त झालेल्या पक्षाप्रमाणे स्वर्गाला घिरट्या घालतात. विवेचन : स्वर्ग म्हणजे ईश्वरवादी धर्मातील देवांचे राजमहालांचे ठिकाण नव्हे. तर बुद्ध धम्मात स्वर्गाचा अर्थ विकारी विचारांचा खालसा असा लागतो. जिथे व्यथा विवंचना लोभ मोह माया अशा असंख्य विकारी विचारांपासून मुक्तता असते ती अवस्था. अशा अवस्थेला सद्विचारी माणूस पोहचू शकतो. असो . परंतु जग डोळस आहे. अंध व अंधकाराच्या काटेरी कुंपणात खितपत पडलेले आहे. तिथे आपली सुद्धा जागा आहेच. ज्याप्रमाणे व्यक्ती त्याच्या अनेक प्रकृती असतात त्या प्रमाणे जे दिसते तसे असतेच असे नसते. परंतु हे पारखून पहाण्यासाठी आपल्याकडे बुद्धी असते ही बुद्धी आपल्यासारखी इतरांनाही असतेच असते. अगदी आपण ज्याला मूर्ख म्हणतो त्या मुर्खाला मूर्ख होण्याइतपत बुद्धी असते ते नाकारता येत नाही. तिच्या वापराच्या पद्धतीवरून इतर व आपण यात नेमका फरक पडतो. ज्याला आपण दूरदृष्टी असे म्हणतो. परंतु दूरदृष्टीत सुद्धा योग्यता अयोग्यता म्हणजेच सत्यता असत्यता येतेच येते. जो बुद्धीचा वापर सत्यविचारातून करत असतो. तोच मानव विश्वातील अंधकाराला थेटपणे ओळखू शकतो व तो या काटेरी कुंपणातून स्वत: भरारी घेतो. परंतु इतरांना सुद्धा तो बळ पाठी ठेवून जातो. जो सदाचार आणि सद्विचारांशी इमान राखतो. त्याचे जीवन प्रफुल्लीत होते....... वाश्या ....शेवटी वाश्याच !!