पाककृती
सोप्पी शेवेची भाजी
Primary tabs
साहित्यः जाड शेव, कांदे, दालचिनी, लवंगा, खसखस, जिरे, धने, आले लसुण पेस्ट, सुक्या खोबर्याचा किस, लाल तिखट, मीठ, पाणी व फोडणीचे साहित्य.
शेव सोडुन सर्व साहित्य एकत्र वाटा...
नंतर तेलाची फोडणी करुन त्यावर वरिल वाटण परतुन घेणे..खमंग वास आला की त्यात जेवधी पातळ भाजी हवी असेल तेवधे पाणी घाला...चांगले उकळवा...जेवायच्या आधि थोडा वेळ वरिल आमटित शेव घाला..वरुन लिंबुरस घाला व गरम गरम भाजी, पोळी किंवा फुलक्यावर ताव मारा...
काय सही पा.कृ...
फोटु का नाही गं दिलास?
आताच करुन खावीशी वाटत आहे.
मी ही भाजी करताना कांदे आणि सुक्या खोबर्याचा किस तेलात वेगवेगळा परतून घेते.
आणि मग सर्व साहित्य एकत्र वाटून घेते.
त्यामुळे वाटणाला खमंगपणा येतो. आणि भाजी अधिक चवदार होते.
चिंटी,
मा़झ्याकडे तर कांदा, खोबरे मसाला ४/५ दिवसाचा एकदमच तयार करून ठेवते.
आता नक्की करून पाहिन शेवेची भाजी.
:)
पाककृती. इथे एकदा भुसावळकडच्या एका कुटुंबाने शेवभाजीचा सुरेख बेत केला होता त्याची याद आली -
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
धन्यवाद नंदन मस्त्त्त्त्त...फोटो बद्द्ल...
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
माझी एकदम आवडती पाकृ...
धन्यवाद!!!
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
तयार आमटीत शेव घातल्यावर पुन्हा उकळायची का नाही?
रेवती
आग एकदा शेव घातली कि मग नाहि उकळायची, नाहितर शेवेचा खुप र्हाडा होतो...त्यामुळे जेवायचा थोडा वेळ आधिच ती आमटित टाकायची...
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
तोंडाला पाणी सुटलंय...
मीपण करून बघणार...
फार उत्साहाने पाककृती उघडली पण प्रमाणे दिली नसल्यामुळे हिरमोड झाला. असो. ज्याची त्याची पद्धत.
तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
पेठकर म्हणतात त्याप्रमाणे प्रमाणे असती तर आवडले असतेच पण अंदाजपंचे करून पहावेच म्हणते. ;)
पाककृती चांगली वाटते आहे, गुजराती प्रभाव आहे का?
आणि पाककृती सांगायची पध्दत माझ्यासारखी आहे.. :-)
त्यामुळे कोणाला पाककृती देताना फार विचार करावा लागतो. चिंच लिंबाएवढी घातली का बोराएवढी हे आठवावे लागते!
अगदी बरोबर आहे..:) आगे २इंच आले म्हणजे किति हे मला कधिच कळाले नाहि...आणी आले पट्टि घेउन कसे मोजणार :)
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
छान आहे, झटपट होणारीसुद्धा!!!!!!
बाकी सांगायची पध्दत पण छान सुटसुटीत....
वरील सर्वांशी सहमत...
ही आपली आवडती पाकृ..!
मलाहि खुप आवडते हि भाजि. तुम्हि सोपि शेवभाजि अस नाव दिलय म्हणुन एक शंका ह्याच भाजिचि अजुन एखादि कृति आहे का?
http://www.manogat.com/node/1774
तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
नक्की करून बघायला पाहिजे.
हि जळ्गाव ची पक क्रुति आहे.
प्रमाण दिले असते तर छान झाले असते.
लगेच करून चव बघेल.
सगळ्यांनी च प्रमाण हावे असे म्हटले..:) पण खरे सांगायचे तर ते मला पण माहित नाहि..मी कधिच प्रमाणे लक्षात ठेवित नाहि..मला अंदाजाने घातलेले जास्त आवडते.. किंवा दुसर्यांनि प्रमाण दिले तरि मि ते माझ्याप्रमाणे आल्टर करते..जे सगळ्याचजणि करत असतील..
असो..पुधच्यावेळिस नक्कि लक्षात ठेवीन...
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
चिंटी,

तुम्ही दिलेली पाक़कृती भन्नाट आहे... मी आज करून बघितली.. आईला मी केलेलं काहिहि चालतं ;) बाबाही कधीतरी स्तुती करतात.. मात्र आज कधी नव्हे ते भावाला मी केलेला पदार्थ आवडला (अतिशय दुर्मिळ घटना.. दशकातून एक्दा येत असावी :) )
हे बघा फोटू
शेवभाजीचा रसः
नुकतीच शेव घालल्यावर

अर्धी शेवभाजी चट्टामट्टा केल्यावर ;)
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
अप्रतिम, अतिशय योग्य रंग्/तवंग आलाय शेव भाजीला. झालात तुम्हीही बल्लवाचार्य. अभिनंदन.
अर्धी शेवभाजी चट्टामट्टा केल्यानंतर काढलेले छायाचित्र पाहून जबड्याच्या दोन्ही बाजूंना एक अस्वस्थ करणारी संवेदना झाली आणि तोंडात लाळ जमू लागली. लगेच प्रतिसाद लिहावयास घेतला.
तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
मग आम्हाला कधी आमंत्रण? ;-)
अदिती
पाकृ किती भन्नाट आहे ते नंदन आणिऋषिकेशने टाकलेल्या फोटोंवरून लग्गेच समजतेय.. फक्त पेठकर म्हणतात त्याप्रमाणे मापे दिली असतीत तर... पण मस्तच दिसते आहे!
स्वाती
आम्ही पण केली होती शेव भाजी... मस्त झणझणीत झाली होती.... बघाच तुम्ही खालच्या फोटो मधे.....
खुप च छान. पन मी ना लिम्बु एव्जी ट्मेट्ओ घाल्ते. आनी खोब्र नाही घाल्त.पन आता अशी बनवुन बघेल.
वरील सर्वांशी सहमत...
मग आम्हाला कधी आमंत्रण?
जो पिणार तोच सोनार !