पाककृती

उपवासाचे बटाटावडे

Primary tabs

साहित्य---३-४मोठे बटाटे,मिरच्या,कोथिंबीर्,जिरे,मीठ्,शिंगाडा पीठ्,तिखट,
कृति---प्रथम बटाटे उकडून घ्यावेत्.ते कुस्करून घेऊन त्यात वाटलेली मिरची,जिरे,कोथिंबीर,मीठ घालून छोते गोल गोळे करावेत्.शिंगाड्याच्या पीठांत तिखट-मीठ ,पाणी घालून पीठ साधारण जाडसर भिजवावे.बटाट्याचे गोळे पीठात बुडवून तुपात अगर तेलात तळावेत.
ह्या वड्यांबरोबर खोबरे किंवा शेंगदाण्याची थोडी पातळ चटणी छान लागते.

किट्टु

रेसिपि बद्दल धन्यवाद!!

मस्त फोटो आहे. आताच खायची इच्छा झाली.

:)

-- किट्टु

निसर्ग

सोपी आणि झटपट रेसिपी.
फोटू पण मस्त...

वडाप्रेमी--- निसर्ग
" DON'T AIM THE TARGET...
....JUST ACHIVE IT "

सखाराम_गटणे™

सहम्त
-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
:)

विसोबा खेचर

चला! आता खास या वड्यांकरता तरी एखादी संकष्टी पकडेन म्हणतो! :)

डॉक्टरीणबाई, येऊ द्यात अजूनही अश्याच छान छान पाकृ..

तात्या.