Welcome to misalpav.com
लेखक: निलरंजन | प्रसिद्ध:
कल्की अवतार हा विष्णूचा अंतिम अवतार आहे असे म्हटले जाते की कलियुगा मध्ये अशी वेळ येईल की लोक खूप वाईट वागतील. जगाला हया संकटातून मुक्त करण्यासाठी कल्की अवतार पृथ्वीवर येतील, आणि जगातून वाईट गोष्टी नष्ट करेल तो जे वाईट वागेल त्याला ठार मारेल. लोक नंतर बदलतील, आणि चांगले लोक तयार होतील. त्यानंतर नवीन टप्पा सत्ययुग सुरू होईल पाशवी लोकांना बुद्ध अवतारात समज दिली, तो अवतार झाल्यावर कल्की अवतार येतील जे लोक बदलले नाही त्या लोकांना शिक्षा करेल कल्की अवतार या millenium मधे होईल. तो भारतात जन्म घेईल. भविष्यवाणीनुसार कल्की अवतार संपूर्ण जगाचा राजा असेल संपूर्ण पापनाश केल्यानंतर संपूर्ण पृथ्वीवर न्यायाची स्थापना करेल तो वाईट लोकांना शिक्षा देईल पापी लोकावर तो दया करणार नाही. कल्की अवतार एक सुवर्णयुग स्थापन करेल कलियुगा आधी, हे कृष्णाने रणांगणात अर्जुनाला सांगितले की त्याच्या मृत्यूनंतर, कलि युग सुरूवातीस होईल. तो 5000 वर्ष त्याच्या मृत्यूनंतर (6000 B.C.) म्हणतात कलि युग आत सुवर्णयुग येतील. चालेल जे कलि युग सुवर्णयुग नंतर अंदाजे 10,000 वर्षे नंतर स्थापन होईल
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

चर्चा , धम्माचा अभ्यास , एकेकाळी राजधम्म असलेला धम्म भारतातुन जवळपास नामशेष का झाला ह्याची कारणे वगैरे चर्चा हे मस्त टाळलेत ... गूड ! आता तुम्ही श्लोक टाकला मग मीही एक श्लोक टाकतो :P असुर्या नाम ते लोका अन्धेन तमसाऽऽवृताः। ताँस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये के चात्महनो जनाः॥३॥ असो . ज्ञानेश्वरमाऊलीं तुमच्यावर कृपा करो अशी प्रार्थना करुन ही अनुत्पादक चर्चा थांबतो ! राम कृष्ण हरी !!

तुम्ही सर्वात आधी अवतार म्हणणे थांबवा गोडबोले , अन्यथा चर्चेला काही अर्थ रहाणार नाही , मुळात ज्या कुठल्याही गोष्टीला आधार नाही, त्या गोष्टीवर मी तरी मान्य करणार नाही आणि कितीक सा वेळ लागेल वरचा स्क्रीन शॉट घेवुन त्रिरत्न संघाकडे जायला ? आता जरा नामशेष होण्याविषयी, जगभर पसरलेला आहे धम्म ! , बाकी वेद, वेदांत, शंकराचार्य ही , गोडबोले, कुलकर्णी , देशपांडे , कर्णिक, यांच्यामध्य्रे सिमीत असल्याची कारचे शोधा आधी , हा आमचा फुकट्चा सल्ला

बुद्ध धर्माच्या वाढत्या प्रभावामुळे राम, कृष्ण यांना विष्णूचे अवतार प्रचलित करण्याबरोबरच बुद्धालाही हिंदू धर्मात सामावून घेतले गेले. बाकी भारतातून बौद्ध धर्म नामशेष होण्याची अनेक कारणे आहेत. इस्लामिक आक्रमण, बौद्धांचा धर्मप्रचार हाच एक प्रमुख धर्म बनून राहणे, पुराणांद्वारे केले गेलेले दैवतीकरण, हिंदू धर्मात अहिंसेची मूळे रुजवणे, शंकराचार्यांचे तत्वज्ञान, तत्कालीन राजांनी बांधलेली अतिशय भव्य, नेत्रदिपक अशी शैव वैष्णव मंदिरे. ह्याच विषयावर एस एल भैरप्पा यांची 'सार्थ' नामक अतिशय सुंदर कादंबरी आहे. तत्कालीन बदलत जाणार्‍या कालखंडाचा अतिशय सुरेख आढावा त्यांनी ह्या कादंबरीत घेतलाय. बाकी हा बघा शंख, चक्रयुक्त विष्णूचा बुद्धावतार. a

त्रिरत्न संघ ? हे काय प्रकरण आहे ?
जगभर पसरलेला आहे धम्म
पण भारत सोडुन कारण शंकराचार्यांनी फक्त भारतातच प्रवास करुन बौध्द्मतातील लॉजिकल प्रॉब्लेम्स दाखवुन देले ! जगभर फिरायला त्यांच्याकडे काय फक्त ते एकच काम नव्हते !! आणि राहता राहिला प्रश्न अवताराबद्दल .... अहो इथे हिंदु प्रत्येकालाच अव्यक्त ब्रह्म मानतात त्यामुळे बुध्दच काय तर तुम्ही आणि मी सुध्दा अवतारच आहोत :P

चर्चा संपवायच्या आधी त्रिरत्न संघ हे काय प्रकरण आहे हे क्लीयर कराच कारण
कितीक सा वेळ लागेल वरचा स्क्रीन शॉट घेवुन त्रिरत्न संघाकडे जायला ?
ह्या वाक्यातुन त्रिरत्नसंघ हे कोणीतरी मुतव्वा टाईप लोक आहेत आणि तुम्ही माझी तक्रार त्यांच्याकडे घेवुन जाणार असा काहीसा सुर येतोय. तुम्ही काय मला धमकी वगैरे देत तर नव्हता ना ...तेही ओपन फोरमवर ? :P

अहो इथे हिंदु प्रत्येकालाच अव्यक्त ब्रह्म मानतात त्यामुळे बुध्दच काय तर तुम्ही आणि मी सुध्दा अवतारच आहोत
विष्णुचा ?

ज्ञानेश्वरमाऊलीं तुमच्यावर कृपा करो अशी प्रार्थना करुन ही अनुत्पादक चर्चा थांबतो ! राम कृष्ण हरी !!
एक शकां आहे. ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या ओव्यांमधे एक वाक्य आहे जो जे वांछिल तो ते लाभो प्राणिजात. मीच या मताचे खंडन करतो. हे घडणेच शक्य नाही किंबहुना, जगाच्या ज्ञात आणी अज्ञात इतिहासात हे अर्थातच कधीही घडलेले नाही. घडणार नाही . इट अल्टीमेटली मिन्स एंड ऑफ युनिवर्स!

आणि राहता राहिला प्रश्न अवताराबद्दल .... अहो इथे हिंदु प्रत्येकालाच अव्यक्त ब्रह्म मानतात त्यामुळे बुध्दच काय तर तुम्ही आणि मी सुध्दा अवतारच आहोत >>> पुन्हा हिंदु ? असो विनोदाच्या पातळीवर घेतलं हे वाक्य मी , तात्पुरत म्हणायला ठिक आहे दारू पिवुन बायकोला मारहाण करणार्‍यामध्ये रामाचा अवतार शोधावा का मग ? किंवा बलात्कार करणार्‍या वर तु कृष्ण म्हणुन अवतार घेतला आहे बाबा , असं करू नकोस ते ... त्रिरत्न संघ ....सांगावेसे वाटेन तेव्हा सांगेन , थोडा अभ्यास वाढवा असे म्हणेन मी !! तिसरी गोष्ट ओपन फोरम आहे म्हणुन च साम्गतो आहे , एका विशीष्ट समुदायाचे असताना, दुसर्‍या समुदायावर चुकीचे आरोप करणे थांबवा ...कोणताही बौध्दजन हे मानत नाही की "बुध्द हा अवतार होता " आणि तुम्ही, गोडबोले , ओपन फोरम वरच लिहीता आहात , फोरम ओपन आहे पण कल्की विषयी लिहीताना कल्की विषयीच लिहाव माणसाने , उद्या त्या समुदायाने आक्षेप घेतला तर ? समजुतदार दिसता, सुशिक्षीत ही , मग थोडी ओपन फोरम ची जाण ठेवायला काय हरकत आहे ?? मध्यंतरी याच मिपापर घडलेल्या असल्या जातीवाच़क घडामोडींमुळे मालकाने त्या विषयावर लिहायला बंदी घातली होती, अगदी मेन बोर्डावर डिसक्लेमर टाकावे लागले .. राहिली माझी गोष्ट , तुम्हाला धमकी द्यावी लागेल इतका छोटा माणुस नाहीये मी :) , दुसरं म्हणजे मी मुळात विष्णुच मानत नाही, तर बुध्द ( मी आणि तुम्ही तर लांबच राहिलात) हा त्याचा अवतार होता हे कधी मानायचो... (संपादित)

एका विशीष्ट समुदायाचे असताना, दुसर्‍या समुदायावर चुकीचे आरोप करणे थांबवा ...कोणताही बौध्दजन हे मानत नाही की "बुध्द हा अवतार होता "
सर्व सश्रध्द हिंदुंच्यामते बुध्द हा विष्णुचा अवतारच आहे ... ह्यात काहीही चुकीचा आरोप नाही ... हा ज्याच्या त्याचा श्रध्देचा भाग आहे . तुम्हाला अगदीच त्रास होत असेल तर सुप्रिम कोर्टात जनहित याचिका दाखल करुन "बुध्दाला विष्णुअवतार मानणे हे कायद्याने गुन्हा आहे" असे डीक्लीयर करुन घ्या . बघुया कोर्ट काय म्हणते ते ! बाकी तुम्ही जातीयतेचा मुद्दा का काढलात हे कळाले नाही . चर्चा बुध्द आणि वैदिक हिंदु धर्म अशी चालु होती , शिवाय मी कोणाच्याच जातीचा उल्लेख केलेला नाहीये ( उलट तुम्हीच २ -३ वेळा माझ्या जातीचा उल्लेख केला आहे ) शिवाय एकदा बुध्द झाल्यावर जातीयतेचा प्रश्न येतोच कुठे ? बुध्द कोणा विशिष्ठ जातीजमातींची मक्तेदारी नाही . बुध्द जितका तुमचा आहे तितकाच आमचाही आहे ! असो , तुमच्याशी चर्चा करण्यात अर्थ नाही , तुमची गाडी वैदिक बौध्द तत्वज्ञान सोडुन इतरत्रच घसरत आहे ... त्यामुळे हा पुर्णविराम घ्या . मी कोणा तरी सेन्सिबल 'बुध्दा'कडुन बौध्द तत्वज्ञान समजुन घेईन ! __________________________________________________________________

मी कोणा तरी सेन्सिबल 'बुध्दा'कडुन बौध्द तत्वज्ञान समजुन घेईन ! >> म्हणजे साधं तत्वज्ञान माहीत नसताना , तो अवतार च होता हे म्हणणे कसे काय पटते ब्वा तुम्हाला स्वतःला ? समजुतदार समजत होतो मी ......हे म्हणजे उगा चार बुक वाचुन दुसर्‍याला शहाणपणा शिकविण्यासारखे आहे .....अनुभवशुन्यता म्हणतात याला माझ्या भाषेत आणि ते कोर्टा-बिर्टाचे चॅलेज काय ? आणि कुठे करताय ? ते कळतय का तुम्हाला ? मी ओपन फोरमची साधी व्याख्या सांगतोय आणि तुम्ही पार कोर्टाच्या व्याख्या करताय, गोडबोले , आवरा च !! अवतारच आहात ब्बाबा तुम्ही ... पुर्णविराम

अवतारच आहात ब्बाबा तुम्ही ...
कसे का होईना , शेवटी तुम्हीही मान्य केलेतच की ...मगाशी वर तर नाही म्हणत होता =)))) असो आता अवतार आहोत ना आम्ही मग त्या अधिकाराने तुम्हाला आशिर्वाद देतो हे घ्या " अत्त दीप भव | "
"Never forget the glory of human nature! We are the Greatest God...Christ and Buddha are but waves on the boundless Ocean which I AM." - स्वामी विवेकानंद अमेरिका १८८५

विनोद तर विनोद ही सही ... तुम्ही बोललात ह्यातच आले ! अहो उरफाट्यानामासाठी | वाल्मिक तरला उठाउठी || तुम्ही कसेही म्हणा ... आम्ही आशीर्वादच देणार :) अत्त दीप भव ! बुध्द बना बौध्द नको !

अत्त दीप भव ! >> हे नंतर उगा काढलेले ...हे ओरिजनल ... " सब्बे सत्ता सुखि भवन्तु " असो ..चष्मा काढला असता तर छान चर्चा झाली असती ... ( च्यायला पब्लिक बी ...अंडरवेयरची जाहिरात बुरखा घालुन करतीया )

>>>कितीक सा वेळ लागेल वरचा स्क्रीन शॉट घेवुन त्रिरत्न संघाकडे जायला ? >>> हे वाक्य ब्रिगेडी पद्धतीचे वाटले आहे. ही बुद्धाने शिकवलेली सहिष्णुता नव्हे. >>> बाकी वेद, वेदांत, शंकराचार्य ही , गोडबोले, कुलकर्णी , देशपांडे , कर्णिक, यांच्यामध्य्रे सिमीत असल्याची कारचे शोधा आधी , >>> हे वाक्यही काही जातीच्या रोखाने टाकलेले आहे. गोडबोलेंनी तर कोणाचे नाव घेतलेले न्हवते.

माझा उल्लेख स्पष्ट आहे आणि प्रश्न ही , त्या प्रश्नाचे उत्तर नसेलच...अजुन दिले गेलेले नाही.. ( मी अजुनी तोच प्रश्न विचारतो ? ) जर नामशेष होण्याची कारणे विचारता आहात तर मला देखील हक्क आहे प्रश्न विचारण्याचा ( मिपा काय कोणा एका समुदायाचे नाही ) ...शिवाय नामशेष होण्याची कारणे माझ्या आधीच वल्ली ने दिलेली आहेत ... आणि जातीचा उल्लेख न करता, डायरेक्ट बुध्दाला हात घातल्या गेला आहे याची नोंद घ्यावी. ( उद्या ..उद्या कशाला...अजच म्हणतो ... मी एखाद्या धाग्यात कृष्ण स्त्री - लंपट होता किंवा गणपती लेखनिक होता असे म्हटले तर ?? )......हे आजच्या समाजात वावरणारा कोणीही सांगेल की " बौध्दजन बुध्दाला अवतार मानत नाही " मग उगा चिघळ्त जाणारा विषय कशाला ?? मी ताशेरे ओढताना सपादकांवर ओढले आहेत , त्यावर संपादकानी उत्तर दिले असते तर वेगळी गोष्ट ! किमान धागकर्ती ने ...उगा त्यात नाक खुपसायची गरज नव्हती ..हे म्हणजे गीता वाचायची आणि त्यात अर्थ मात्र स्वता:चा घालायचा ? ...

राम खरा विलन व रावण हीरो , तुकाराम महाराजांचा खून केला गेला, जसे ज्याला वाटते त्याने तस सप्रमाण म्हणावे. व मुळ संहितेतिल मताचे वयक्तिक पातळीवर खंडन सुधा करावे यात गैर नाही. पण जेव्हा तत्वज्ञानाच्या दोन शाखा एकाच व्यक्ती बाबत(बुध्द) दोन अधिकृत परंतु भिन्न मते व्यक्त करतात तेंव्हा संपादक त्यात कोनाचिच बाजू न घेता निपक्ष राहणे पसंत करत असावेत.

>>>> डायरेक्ट बुध्दाला हात घातल्या गेला आहे >>>>> इथल्या कोणत्याही प्रतिक्रियेत भगवान गौतम बुद्धाला तुम्ही म्हटल्यासारखी स्त्री-लंपट / लेखनिक इ. विशेषणे लावून अपमान केल्याचे दिसले नाही. उलट त्याला अवतार म्हणजे सामान्य माणसापेक्षा खूप श्रेष्ठ असे देवत्व दिले जात आहे. >>>> उगा त्यात नाक खुपसायची गरज नव्हती .. >>>> इथे परत तुमचेच वाक्य उद्धृत करणे आवश्यक आहे. >>> हा ओपन फोरम आहे. >>>>

इथल्या कोणत्याही प्रतिक्रियेत भगवान गौतम बुद्धाला तुम्ही म्हटल्यासारखी स्त्री-लंपट / लेखनिक इ. विशेषणे लावून अपमान केल्याचे दिसले नाही. उलट त्याला अवतार म्हणजे सामान्य माणसापेक्षा खूप श्रेष्ठ असे देवत्व दिले जात आहे. >> नाही !!! माझा अवतार ला च विरोध आहे ......सामान्य माणुस हा अवतार असायला , परीटाची सामान्य टिपणी ऐकुन , मातृत्वाची देणगी भेटलेल्या बायकोला बाहेर काढणार नाही , चोळी चोरून तमाशा बघणार्‍याला, रासलिला म्हणेल ( छाती बघायची अवताराला, दोन ठिकाणी दुध प्यायला !! ), किंवा डुकराच्या जन्मात , .....असो ...लिहायला बरेच काही आहे ...........याची बायको त्याला मिळावी म्हणुन सरळ खुन करणारा ( नथ्थु रामाचे आपण ही फॅन आहोत...पण खुन ?? ..नकोच ) .........त्यापेक्षा त्याला सामान्य माणुस च राहु दे ब्वा ......... माझी ही सरळ सोट अपेक्षा .....सामान्य माणुसच .....उगा एखाद्याला अवतार कशाला ? दोन क्षणापुर्वी आम्हाला बी अवतार केले ( अरे किमान बी हॉनेस्ट , अवतार तर स्साला पिच्चर पण आहे ........) आणि येव्हढा अवतार मानत असाल तर उद्यापासुन सरळ विहारात जायच आणि वन्दना करायची , मेणबत्या जाळायच्या , ........ बुध्दंम शरणम गच्छामि , धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि " म्हणायच ............( पांढरे कपडे घालुन या , दिक्षा देतो हवे तर ) .......हा पण अवतार ना .......मग या की !! ऑलवेज वेलकम ..........

मात्र एक गोष्ट सहज लक्षात आली. इतर कोणी भगवान गौतम बुद्धाला किंवा इतर कोणालाही फक्त आदर दिला आहे पण तुम्ही मात्र सातत्याने इतर देव/अवतार यांच्याबद्दल अनादराने बोलत अहात.

ते जे सांगताहेत ना , दुर्लक्ष कर ई. ई.. ई. त्यांना हे ही सांगा अनादर कसला ? हेच लिहिले आहे ना .....काय त्या रामायण महाभारतात ....मी तर एक पैलु दाखवितो आहे .......अजुन बरेच आहेत मुक्ती ताई .....अजुन लिहिले तर वाट लागेल या महा काव्यांची ! ( अभ्यास फक्त एक विशीष्ट समाज करत नाही )

रामायण-महाभारताचे अनेक पैलू आहेत. जो म्हणाल तो पैलू इथे हजर आहे. तसेच बोलायचे झाले तर मग सांसारिक जबाबदारी सोडून रानावनात भटकायचे कारणही बुद्धाला नव्हते. एक मेलेला माणूस काय पाहिला आणि घर सोडून पळून गेला वगैरे बरेच बोलता येते. राळच उडवायची असेल तर कुणावरही कशीही उडवता येते. स्वमताच्या आग्रहासाठी 'विरुद्ध' पक्षावर राळ उडवण्यात कितपत हशील आहे ते मात्र मला माहिती नाही. बौद्ध तत्वज्ञान आणि त्याचे शंकराचार्यांनी केलेले खंडन हा तसा फेमस विषय आहे, पण वैयक्तिकरीत्या आचार्यांचे ते मुख्य योगदान आहे असे मला वाटत नाही. असो, तो विषय नंतर कधीतरी. अन अद्वैत वेदांत आचरणारे जसे अत्यल्प होते तसेच बौद्ध धर्माची तत्त्वे आचरणात आणणारेही थोडेच होते. कुठल्याही धर्माबद्दल असेच म्हणता येईल. अन उच्चनीचतेबद्दल बोलायचे झाले तर मग ते महायान-हीनयान वैग्रे भानगडी कशाला आल्या मग बौद्ध धर्मात? धर्माची मूळ तत्त्वे अन आचरणात फरक हा नेहमीच असतो. तो एकाच बाजूकडचा फरक अधोरेखित करण्यात काही अर्थ नाही. असो.

सुहासदादा, धर्म मानणे, ना मानणे; कोणाला देव अथवा अवतार मानणे, ना मानणे या पूर्णपणे वैयक्तिक गोष्टी आहेत. "बौद्ध धम्मात बुद्धाला अवतार मानत नाहीत" किंवा "मी बुद्धाला अवतार मानत नाही." येवढेच लिहून थांबला असतात तर सर्वांनीच त्याबद्दल कौतुक केले असते, काहींनी अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री म्हणत पुढे काही बोलले गेले नसते. परंतु, तुम्ही त्याबरोबर कित्येक अनावश्यक विधाने केलीत. त्रिरत्न संघाकडे स्क्रीनशॉट पाठवणे काय, अवतार म्हणणे थांबवा काय, अन मी लहान माणूस नाही म्हणणे काय; हे सगळे एखाद्या मुतव्वाच्या फतव्यात शोभून दिसते. ओपन फोरमवर न्हवे. तुमच्या श्रद्धास्थानावर कोणीही चिखलफेक केलेली नाही आणि तरीही "त्याने केली तर मीही करेन" असे म्हणणे हे तथागताची शिकवण तुमच्यापर्यंत पोचली नाही हेच ठळकपणे दाखवून देते. सर्वसामान्य हिंदू माणूस बुद्ध किंवा बौद्ध यांना स्वतःपासून वेगळे समजत नाही. नसलेले भेद उभे करून वातावरण बिघडवायचा प्रयत्न कोणीच करू नये. तुम्ही बुद्धाला अवतार मानत नसाल तर त्या भावनेचा आदर आहे, तसाच आणखी कोणी अवतार मानत असेल तर त्याचाही आदर आहे. कारण भगवान गौतम बुद्धासारख्या महामानवाला "आमचा-तुमचा" अशा संबोधनात जखडून ठेवता येणे शक्य नाही. ते तर सगळ्या जगाचे असतात.

मी अजुन ही म्हणतो , अपप्रचार करू नका की बुध्द हा अवतार होता !! आणि स्क्रीन शॉट बद्दल ...ओपन फोरम बद्दल उत्तर देवुन केव्हाच झाले आहे. वाचा नेमके काय लिहीले आहे ते, समजले नसेल तर पुन्हा सांगेन ...... ज्यांना आस्था असते ते मनात प्रिज्युडाईस ( विष्णुचा अवतार म्हणे ) ठेवुन येत नाहीत .बेसीक्स मध्येच गडबड असली तर कन्सेप्ट काय कप्पाळ समजणार !! लहान मी देखील नाही, ज्या संकल्पनेने १००० वर्षे समाजाचा चुथडा केला, त्या संकल्पनेला धरून रहाण्याइतपत तर नक्कीच नाही

छोडो कल्की बाते कल्की बात पुरानी नये धागे पे खरडेंगे हम मिलकर नयी कहानी हम मिपास्थानी हम मिपास्थानी !

+++१११ टू अवतारबाबा! @छोडो कल्की बाते कल्की बात पुरानी नये धागे पे खरडेंगे हम मिलकर नयी कहानी हम मिपास्थानी हम मिपास्थानी ! >>> http://www.sherv.net/cm/emoticons/yes/yellow-okay-hand-smiley-emoticon.gif

@बॅट्या बेटा चल आपली बिट लागली, १०००००००० रुपयाची तू ३०० वर्शाने चुकला आहेस.

धाग्याचे शिर्षक वाचुन कल्की कोचलीन संबंधी काहीतरी असेल या अपेक्षेने धागा ऊघडला होता. पण हा धागा तर भलताच निघाला! जाऊ द्या, हा माझा विषय नाही. बाकी तुमचे चालु द्या.

कल्की जन्मल्याबरोबर तो 'अवतार' आहे हे कळणार?, की ते तो मोठा झाल्यावर समजेल? तुमचे लेखन वाचल्यापासून, कल्कीचा बालपणापासूनचा इतिहास कसा जतन करता येईल याची चिंता मला लागली आहे.

पुढे युगे सुरू राहतील, त्यात वाईट लोक असणार नाहीत का? म्हणजे आणखी अवतार का येणार नाहीत म्हणे?

आज स्वयंचलित वाहनांच्या युगात उडण्याची क्षमता असलेला पांढरा घोडा हे कल्कीचे वाहन असेल असे म्हणणे खुळचटपणाचे आहे. ज्या कुणाच्या सुपिक डोक्यातून हजार दोन हजार वर्षांपूर्वी ही अवताराची कल्पना निघाली असेल त्याला अर्थातच पुढे दोन तीन हजार वर्षांनी येणार्‍या यंत्रयुगाची कल्पना नसेल. म्हणून त्याने तेव्हा आपल्या तेव्हाच्या कुवतीनुसार उडणारा पांढरा घोडा ही कल्पना रंगवली.

त्याने नक्कइच यंत्र युग पाहिले असणार हो, तुमि लिहून घ्या... पण सालं त्या वेळच्या इतराना ते पट्वाय्चा प्रयत्न करणे आज लोकांना मंत्र शक्तीचे अनुभव विषद करणे इतकच कठिन असणार म्हणुन तो धोका पत्करला नसावा. कसं आहे की त्यावेळी मुर्ख लोक डायरेक कापाकापी करायचे. बुध्द अध्यात्मात होता अन महात्मा गांधिचाहि जन्म झाला न्हवता.

सफेद घोडा साभार: इस्रो हा घोडा उडवणारे कस्तुरी रंगन कि अब्दुल कलाम? हा कल्की अवतार आपल्या पुढच्या पीढीला सुरक्षितपणे पृथ्वीवरून दूर कोठल्या परग्रहावर घेऊन जाणारा तर नसेल?

माझ्या मते आपण वैज्ञानिक द्रुष्टीने जगापेक्षा प्रगत होतो उत्तरेकडून होणारे सततची परकीय आक्रमण आणि नंतरचे इंग्रज यामुळे कुठे तरी आपण आपले ज्ञान विसरून गेलोय गंमत पहा रामायण काळात आपल्या कडे पुष्पक विमान होते पण आपल्याला विमान कळाले राईट बंधू नी पेटंट घेतल्यावर ऋग्वेद सामवेद सारखे वेदांमधे हे ज्ञान लपून आहे त्याला संस्कृत आणि विज्ञान याची जोड देऊन बरेचसे आणखी शोध लागू शकतात बाकी ज्यांना अवताराचा ईतिहास लिहावे असे वाटते त्याने योग साधनेने अंतर्ज्ञानी व्हावे कारण अस कुणास भगवंत दश॔न होत नाही

हिंट्स देउ नयेत ! बाकि हो, होते पुश्पक विमान आपल्या पुर्वजांकडे ? पण त्याचा सामान्यांना काय उपयोग ? त्याचा सामान्यांना उपयोग करणे तेंव्हाच शक्य झाले जेंव्हा राइट बंधुनी पेटंट घेतले. हिच गोश्ट बहुतांश पेंटंटची आहे. उगा आपल्याकडे यांव होते त्यांव होते च्या गमज्या नकोतच जर त्या सुविधांचा सामान्य जनतेकडुन वापर होत नसेल तर. सिलीकॉन वेलीचे खरे मुल्य याच कारणामुळे आहे.

ते ज्ञान कालही होते अन आजही आहे महत्व आहे ते वैज्ञानिक भाव ठेवून ते आपल्याला जनकल्याणासाठी कसे वापरता येईल याला शून्यात राहून ते कसे साध्य होईल? आणि राईट बंधु नी आपल्या कडील विमानाचे डिझाईन वापरले जे मुंबई च्या एकाने तयार केले आणि इंग्रजानी तुटपुंजा पैसा देवून विकत घेतले शेवटी व्हॅली तरी कोण जास्त आहेत ...भारतीय च ना पण आपल्या ला सवय लागली स्वतः ला देशाला नाव ठेवायची आणी दूसरया देशाचे गोडवे गायचे

जनकल्याण म्हणजे नक्की काय करायचं? आणि ते वैज्ञानिक भावानी कसे करायचे? काहितरी वैज्ञानिक असेल तर तिथे 'भाव' कसा काय येइल? आणि 'भावना' वैज्ञानिक कशी काय असेल? काहीच कळेना! :(

जनकल्याण म्हणजे एखाद्या शोध किंवा ज्ञानाचा रोजच्या वापरासाठी किंवा फायदयासाठी केलेला वापर भाव धार्मिक असण्याऐवजी वैज्ञानिक असावा म्हणजे त्यातून नक्कीच काहीतरी फायदा होईल कळ्ळलं....