Welcome to misalpav.com
लेखक: माहितगार | प्रसिद्ध:
कॅलेंडर तयार करणारे चूकतात ? का जन्म घेणारे ? माहीत नाही; पण ज्यांचा वाढ दिवस नेमका २९ फेब्रुवारी त्यांचा वाढदिवस केव्हा साजरा करावा खासकरून व्यक्ती महाराष्ट्राची माजी मुख्यमंत्री आणि भारताची माजी पंतप्रधान असेल तर. आता काही जण म्हणतील माहितगारांना काय झाले एकदम मोरारजींचा वाढदिवस साजरा करावयास निघाले; म्हणोत बिचारे त्यांना बदलता काळ थोडाच समजतो तेलंगाणाच वेगळ राज्य होऊ लागल की चिरंजिवी म्हणतात निजाम हिरो होते; विदर्भाची मागणी जशी पुढे जाईल तसे हुतात्माचौकाचे नामकरण फ्लोरा फाऊंटेनचे कारंजे करावे आणि मोरारजींना हिरो मानावे; ज्याचा त्याच देव निराळा :) या मोरारजी देसाईंची इंग्रजी विकिपीडियावरील सध्याची ओळख येणे प्रमाणे :
Morarji Desai (29 Feb 1896 – 10 April 1995), was a notable Indian independence activist and the fourth Prime Minister of India from 1977 - 1979. He was also the first Prime Minister to head India's first non-Congress Government. At foreign fronts, Desai holds international fame for his peace activism and made notable efforts to initiate peace between two-rival South Asian states, Pakistan and India. After India's first nuclear explosion in 1974, Smiling Buddha, Desai helped restore friendly relations with China and Pakistan, and vowed to avoid armed conflict such as Indo-Pakistani war of 1971. Desai has the credible distinction of being the only Indian national to be conferred with Pakistan's highest civilian award, Nishan-e-Pakistan, which was conferred on him by President Ghulam Ishaq Khan in 1990 in a colorful ceremony. Domestically, he played crucial role in Indian nuclear program after it was targeted by major nuclear powers after conducting a surprise test in 1974. Later, his policies promoted social, health and administrative reforms in the country. संदर्भ :Morarji Desai. (2014, February 21). In Wikipedia, The Free Encyclopedia. Retrieved 02:47, February 28, 2014, from http://en.wikipedia.org/w/index.php?title=Morarji_Desai&oldid=596526550
ज्यांना मोरारजींचा वाढदिवस साजरा करावयाचा आहे त्यांना स.का. भाऊंची वेगळी ओळख सांगण्याची आवश्यकता नाही ते आठवण करतीलच परंतु ज्यांना नाही त्यांच्या करता त्यांची मराठी विकिपीडियावरील ओळख खालील प्रमाणे आमचा मुख्य उद्देश आम्हाला विकिपीडिया करिता सदाशिव कानोजी पाटील, यांच्या पुण्यतिथीची तारीख म्हणजे मृत्युदिनांक हवा आहे.
सदाशिव कानोजी पाटील, तथा स.का. पाटील, (१४ ऑगस्ट, इ.स. १९०१ - मृत्युदिनांक अज्ञात १९८३ ? ) हे मराठी, भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. इ.स. १९५७ ते इ.स. १९६७ या कालखंडात ते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री होते. सदाशिव पाटील मुळचे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील होते.[१] पाटलांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. सुरुवातीस पत्रकार म्हणून काम केल्यानंतर त्यांनी काँग्रेसमधून राजकारणात प्रवेश केला. त्यांनी मालवणला राष्ट्रीय शाळा सुरू केली व त्यात शिक्षक म्हणून काम केले. [२]बॉम्बे मिल मजदूर युनियन ची स्थापना केली पण नंतर हि युनियन राष्ट्रीय मिल मजदूर संघ मध्ये विलीन केली.[३] मुंबईत रात्रशाळेत शिकवण्यासाठी वेळ दिला [४] मुंबईचे माजी महापौर, जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींच्या (१९५७ ते १९६७ ) काळात ते भारतीय संघराज्याचे मंत्री होते. स.का.पाटलांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीस विरोध केला आणि खास करून मुंबई हे बहुसांस्कृतिक शहर असल्याने महाराष्ट्रात सामील करू नये अशी वादग्रस्त भूमिका घेतली. [१४]या विश्वात जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही, अशा स.का. पाटलांची वल्गना होती. पण जनतेच्या जोरदार चळवळीमुळे जवाहरलाल नेहरूंना मुंबईसकटच्या महाराष्ट्राच्या निर्मितीला मान्यता द्यावी लागली. [१५][१६] स.का. पाटलांच्या या कृत्यामुळे त्यांना पुढील लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईतच हार पत्करावी लागली. संदर्भ : सदाशिव कानोजी पाटील. (२०१३, नोव्हेंबर २४). विकिपीडिया, एक मुक्त ज्ञानकोश. Retrieved ०२:५३, फेब्रुवारी २८, २०१४ from http://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2&oldid=1211815.
सोबतच मराठी आणि इंग्रजी विकिपीडियाकरता या निमीत्ताने जमल तर: *हुतात्मा चौक, मुंबई १) फ्लोरा फाऊंटेन कारंजे नेमके केव्हा बांधण्यात आले १८६४ कि १८६९ ? २) ऐतिहासिक दृष्ट्या तसा आलिकडील कालावधी ब्रिटीशांची नोंदी व्यवस्थीत ठेवण्याची सवय तरी सुद्धा फ्लोरा फाऊंटन कारंज्याच्या नेमका का कुणी आणि केव्हा बांधला या बाबत इंटरनेटवरील संदर्भात क्रेडीट घेऊ इच्छित एका पेक्षा अधिक दावेदार मिळताहेत.ब्रिटीश , ज्यू आणि पारसी . फ्लोरा फाऊंटन कारंजे विभागाच्या मांडणीपुढचा हा यक्ष प्रश्न आहे. संदर्भा सहित खात्री लायक माहिती हवी आहे. ३) कुणाला वेळ काढता आलच तर Talk:Flora Fountain येथील चर्चाही अभ्यासावी.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

त्यांनी देशाच्या कठिण काळात केंद्रीय अन्नमंत्री आणि रेल वे मंत्री म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली
रेल्वेचे ठाऊक नाही परंतु अन्नमंत्री असतना अमेरिकेतून आयात धान्य (PL 480) बद्दल म्हणताय ना? अत्र्यांनी (त्यांच्या शैलीनुसार) अनेक पुढार्‍यांना काळ्या अथवा गोर्‍या रंगात रंगवले. आणि तत्कालीन मध्यमवर्गीय मराठी माणसांनी त्या व्यक्तींची तीच प्रतिमा कायम जपली. सका काय किंवा मोरारजी काय यांची मराठी-द्वेष्टे ही प्रतिमा बनण्याचे कारण हेच.

आतापर्यंतचे इथले सर्व अभिप्राय विकीवर अवलंबून आहेत असे वाटले. मूळ ग्रंथवाचन फारसे दिसले नाही. त्याची कारणे कोणतीही असोत पण त्यामुळे लिखाणात वरवरचेपणा (उथळ नव्हे, सुपर्फिशिअल) येतो. मुद्दा शाबीत करता येतो कारण आपल्याला हवे तसे दुवे सापडू शकतात. पण साकल्याने आणि समग्र माहिती मिळत नाही. लिखाण आपल्या नकळत एकांगी बनते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे व्यवस्थित आकलन होण्यासाठी लालजी पेंडसे, य.दि.फडके, गोविंद तळवलकर, आचार्य अत्रे, एस एम जोशी (आत्मचरित्र) ना.ग.गोरे, श्री. डांगे यांचे वाचन आवश्यक आहे. इतरही अनेक आहेत. हे ग्रंथ प्रचंड मोठे आहेत हे खरे पण मराठी विकीपीडियासारख्या माहितीचा स्रोत असणार्‍या ठिकाणी सकल, त्यातल्यात्यात संक्षिप्त आणि अचूक माहिती हवी. नाही तर उगमापासूनच गंगा मैली होऊ लागेल. म्हणूनच प्रतिसादाचा पुढील भाग इतक्यात लिहीत नाही आहे. लिहिण्यासाठी मला पुनर्वाचन आवश्यक वाटले.

या सर्वच चर्चात मूळवाचन सहसा कमी असते. विकि काही प्रमाणात स्मरणातील आणि थोडेफार गूगलने जे काही उपलब्ध केले त्यातून इन्फर्मेशन गॅप तसेच माहिती तफावत त्रुटी येतात. चर्चांचा व्यवस्थीत उपयोग वाचन करून लिहिलेले इतरांनी पडताळण्यात होतो. जसे रजनीभाई पटेल हे नाव मी कधी ऐकलेच नव्हते. ते या चर्चेत पुढे आले या चर्चेच्या निमीत्ताने गोदावरी परूळेकरांच्या वारली आदीवासी कार्याबद्दल गूगल वरून माहिती मिळाली असे अनुषंगिक फायदे होतात. आपल्या सवडीने लेखन करा घाई नाही. मराठी विकिपीडियाकरता प्रताधिकारमुक्त धागा असे स्वरूप असले तरी खात्री पडताळणी केल्या शिवाय तिकडे लेखन घेतले जाण्याची खूपशी शक्यता नाही. अर्थात स.कां पाटीलांची मृत्यूची तारीख; फ्लोराफाऊंटेनच्या इतिहास लेखनात येणार्‍या तफावती इत्यादी छोटी छोटी माहिती आलीतरी कणाकणाने कामही पुढे गेले तर चालते. अवांतरः ऑनलाईन पुस्तकविक्रीकरणार्‍र्या प्रकाशकांनी मराठी आंतरजालावरील मोजक्या लेखकांना अधिक मजकूर उपलब्ध करून देण्याचे काही मार्ग उपलब्ध केल्यास या गोष्टीस गती येऊ शकेल. मागे लोकप्रभाच्या संपादकांनी मराठी विकिला समोरूअ प्रस्ताव दिला पण आमच्या कडेच माणूसबळ कमी पडते जास्तीचे काम कसे घेणार असेही होते.

लालजी पेंडसे, य.दि.फडके, गोविंद तळवलकर माधव गडकरींनी संयुक्त महाराष्ट्रावरून सामान्य वाचकांसाठी लिहीलेले माहीत आहे, वाचलेले देखील आहे. लालजी पेंडसे, य.दि.फडके, यांच्या संदर्भात माहीत नाही, पण तळवळकरांनी कधी संयुक्त महाराष्ट्रावरून काही लिहील्याचे आठवत तरी नाही. किंबहूना (बरोबर-चूक संदर्भात म्हणत नाही) ते सीमा लढ्याचे कायम स्वरूपी टिकाकार देखील राहीलेले आहेत.

महाराष्ट्र टाईम्सचा एक लेखक म्हणतो हे ब्रिटीश वसाहतवादाच प्रतीक आहे, तो लेख वाचताना तेही खरच वाटल होत. हा प्रहार मधील लेखArthur Wellesley, 1st Duke of Wellington (इंग्लिश विकिपीडिया दुवा) या विषया बद्दल तुम्हाला काय वाटत ?

वेल, तो बघणार्‍याचा दृष्टीकोन असू शकतो. भारतावर ब्रिटिशांनी १५० वर्षे राज्य केले ही वस्तुस्थीती आहे. त्यामुळे या काळात त्यांनी बांधलेल्या सर्वच इमारती या केवळ त्यांनी बांधल्या म्हणून जर ब्रिटिश वसाहतवादाचं प्रतीक ठरवायच्या असतील तर गोष्टच वेगळी. अन्यथा फाऊंटनने फार काही विशेष घोडं मारलंय असं वाटत नाही. तसं जर वसाहतवादाचं प्रतीकच शोधायचं झालं तर माझ्या मते गेटवेची इमारत ही वसाहतवादाचं प्रतीक ठरू शकते. कारण तिची उभारणीच मुळात ब्रिटिश सम्राटाच्या मावळत्या प्रतिनिधीला निरोप देण्यासाठी आणि उगवत्या प्रतिनिधीचं स्वागत करण्याचा हेतू मनाशी ठेवून करण्यात आलेली होती....

सहमत. माझ्या दृष्टीने ब्रिटीश वसाहतवादाचे प्रतिक म्हणजे एका अर्थाने भारतीय प्रशासकीय सेवा आणि राज्यपाल पद्धती आहे. पण तो वेगळ्या चर्चेचा विषय होईल. तेंव्हा तुर्तास असो. :)

अगदी अगदी. तसे तर छत्रपती शिवाजी टर्मिनस, महापालिका इमारत, संपूर्ण रेल वे व्यवस्था, पोस्टल सिस्टिम, अशा अनेक बाबी वसाहतवादाचे प्रतीक मानाव्या लागतील. आणि मुख्य म्हणजे ज्या कारंज्याविषयी चर्चा सुरू झाली होती ते फ्लोरा फाउन्टन. वेलिन्ग्टन फाउन्टन हे अगदी वेगळे कारंजे आहे. त्याचा फ्लोरा फाउन्टनशी काही संबंध नाही.

अरे काय आहे काय? राहीचे १००+ आणि विकासचा १+ (ते विकास अंमळ कंजूसच आहे म्येलं!!!)? आजचा दिवस लकी दिसतोय, लॉटरीचं तिकीट काढून बघतो आज!!!!! :)

अहो पिडां, ते १०० म्हणजे माझे शंभर पैसे आहेत आणि विकासभाऊंचा १ म्हणजे खणखणीत रुपया -किंवा डॉलर म्हणा हवं तर- आहे!

माझ्या मते गेटवेची इमारत ही वसाहतवादाचं प्रतीक ठरू शकते. कारण तिची उभारणीच मुळात ब्रिटिश सम्राटाच्या मावळत्या प्रतिनिधीला निरोप देण्यासाठी आणि उगवत्या प्रतिनिधीचं स्वागत करण्याचा हेतू मनाशी ठेवून करण्यात आलेली होती....
थत्तेकाकांनी नजरेस आणून दिल्याप्रमाणे जरी गेटवे नंतर व्हॉईसरॉयांच्या जाण्या-येण्यासाठी वापरात येत असलं तरी गेटवेची निर्मिती ही पंचम जॉर्ज राजाच्या स्वागतासाठी झाली होती. थत्तेकाका, धन्यवाद आणि तपशीलातल्या चुकीबद्दल माझी दिलगिरी. पण माझ्या मूळ गेटवे वसाहतवादाचं प्रतीक असण्याच्या मुद्द्याला त्यामुळे काही बाधा येत नाहीये असं मला वाटतं...

>>पण माझ्या मूळ गेटवे वसाहतवादाचं प्रतीक असण्याच्या मुद्द्याला त्यामुळे काही बाधा येत नाहीये असं मला वाटतं... अर्थातच...... वसाहतवादाचं प्रतीक तर आहेच.

वाचतोय. बाकी स.का.पाटील अतिशय गरीबीतून वर आले होते असं ऐकीवात आहे. हॉटेलात वेटरचं काम वगैरे केलं होतं त्यांनी असं कुठेसं वाचलेलं आहे.

चर्चा वसाहत वादाच्या प्रतीकांकडे वळली आहे; विचारपूर्ण प्रतिसाद येत आहेत आणि सध्या मीही वाचनमात्र मोड मध्ये गेलो आहे. स.का.पाटीलांबद्दल संयुक्त महाराष्ट्र चळवळी संबंधाने सोडलीतर व्यक्तीगत आणि इतर माहितीचा आंतरजालीय स्रोतात बर्‍यापैकी अभाव आहे. (एक संदर्भ चक्क न्युयॉर्क टाइम्सच्या अर्काईव्ह मध्ये शोधावा लागला) मराठी विकिपीडियावर सध्या उपलब्ध माहितीत कुणी संदर्भासहीत भर टाकू शकले तर हवे आहेच. माहितीपूर्ण प्रतिसाद आणि चर्चा सहभागा बद्दल सर्वांचाच आभारी आहे