Welcome to misalpav.com
लेखक: rakhee | प्रसिद्ध:
आई म्हणोनी.. पिल्लू आज आजारी आहे ,त्यामुळे घरीच आहे शाळेत गेले नाही . मुलं आजारी असली कि कसतरीच होतं नाही ? रोज दंगा मस्ती करून आपल्याला त्रास देणारी , खूप बडबड करणारी मुलं आजारात गुपचूप निजून पडली असली कि आत काहीतरी तुटतं . काहीच सुरळीत वाटत नाही . बस आपलं बाळ लवकर हसत खेळत होऊ दे अशी प्रार्थना मन करू लागतं . ज्याच्या बडबडीचा आपल्याला त्रास होऊन आपण म्हणतो अरे बस कर आता , तीच बडबड पिल्लू लवकर करावं म्हणून आपलं मन धडपडू लागते . प्रत्येक पालकाचा हाच अनुभव असेल हो न ? किती गोड असतं नाही त्याचं बोलणं , निरागस हसणं बघतच रहावं असं . माझ्या पिल्लांनी मला खूप काही शिकवले . पाहिलं म्हणजे सहनशक्ती … हो खूप सहनशक्ती पाहिजे पालक व्हायला . त्यांना जन्म दिल्यापासून आपलाच आई म्हणू जन्म झालेला असतो ,आणि आई म्हणून आपणही त्यांच्या सोबत वाढत असतो . आपणही आई म्हणून सुरवातीला चुकतो , नवीन नवीन गोष्टी शिकत ,शिकवत राहतो . हा सर्वच काळ कसोटीचा असलातरी निखळ आनंदाचा पण असतो . बाळांनी मारलेली पहिली हाक , त्यांचे पहिले पाऊल , त्यांचा तो आपल्याच कडे येण्याचा हट्ट खूप सुखाऊन जातो. त्यांचा शाळेचा पहिला दिवस आपल्यासाठीही खूप तणावाचा आसतो. नंतर त्यांच्या शाळेतल्या achievements आपल्याच achievements असतात . त्यांची ती शाळेतून आल्यानंतरची बडबड , शाळेतली भांडण, त्यांचे रुसवे फुगवे खूप हवे हवे से असतात . त्यांनी शिकलेली शाळेतली प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी अभिमानाची असते . त्यांची घट्ट मारलेली मिठी , आणि दिलेला गोड पापा म्हणजे जगातली सगळ्यात सुखकारक गोष्ट आहे . पिलांसाठी केलेली जागरणं त्यांच्या आजारपणात, आपल्या आई वडिलांची महती सांगून जातात . वाटत अरे आपले आई वडील पण असेच जागले आपल्यासाठी , असेच खूप कष्ट केले आपल्यासाठी , खरंच किंमत कळते आई वडिलांची मग. म्हणजे महिती असतं आधीपासून पण ते उमगतं आतून तेंव्हा . अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट माझ्या लेकीनी शिकवली ती म्हणजे कृतज्ञता (gratefulness ) कुठलीही छोटी गोष्ट जरी केली तरी ती म्हणायची thank so much mamma . ड्रेस घालून दिला कि thank you . जेवण दिलं कि thank you . आणि ते हि खूप मनापासून . काही बनवलेलं आवडलं कि खूप कौतुक करायची . खूप टेस्टी आहे , yummy आहे . एव्हडीशी पिल्लू माझी , माझे प्रयत्न खूप appreciate करते कि माझा ऊर भरून येतो. छोट्या छोट्या गोष्टी मी एन्जोय करायला शिकले. त्यांच्याबरोबर मीही पोहायला शिकले . त्यांचे क्लासेस , त्यांच्या आत्मसात केलेल्या नवीन गोष्टी मलाही खूप आनंद देऊ लागल्या . मोठीचे violin ऐकून मीही सप्त सुरात न्हाहू लागले , त्यांचासोबत त्यांची गोष्टीची पुस्तकं वाचताना मलाही खूप आनंद मिळू लागला . पहिल्यांदा जेंव्हा त्यांनी त्यांची पुस्तकं स्वतंत्रपणे वाचली ,काय आनंद झाला तेंव्हा म्हणून सांगू ? मग त्यांच्या सोबत वाचनालयात जाऊन पुस्तकं आणणे आणि वाचणे एक आनंदाची पर्वणीच झाली . अजूनही शिकते आहे , धडपडते आहे . त्यांच्या प्रत्येक टप्प्यावरती नवीन आव्हान असतील , खूप कसोटी लागेल आमची , पण हा प्रवास आनंददायी मात्र नक्की असेल .
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

काही अ‍ॅप्रीसीएट केलं? काही वाचलं? काही अनुभवलंत? काय खुळेपणा चाललाय हा? एव्हढा बालीशपणा बालीश पोस्ट्वर करत जा. हरकत नाही.

@अर्पणाताई-व्यनी केला आहे . @आं चि- सूड यांची स्वाक्षरी उसनी मागितली आहे .नंतर प्रतिसाद देईन . @बॅटमॅन-तुमच्याशी प्रतिवाद करण्याची कुवतही आणी गरज ही नाही . चपला घातल्या आहे

अजूनही शिकते आहे , धडपडते आहे . त्यांच्या प्रत्येक टप्प्यावरती नवीन आव्हान असतील , खूप कसोटी लागेल आमची , पण हा प्रवास आनंददायी मात्र नक्की असेल .
बर्‍याचदा कठोर सुद्धा व्हाव लागत. आज मी कठोर झाली आहे अन ते मला बोचतयं. वर टेक्नॉलॉजी वापरुन मॅडम मला खरमरीत मेसेज पाठवुन रिकाम्या झाल्यात. पाहू! लेखन आवडले.

अगदी खरं अपर्णा ताई . आणि एकदा नाही म्हटले कि त्यावर पण ठाम राहावे लागते नाहीतर मुलं आपल्यालाच गुंडाळतात . आमची मोठी लेक लवकरच teen age मध्ये येईल , तेंव्हा मात्र खूप कसोटी लागेल ।बघु कसं जमेल ते . तुम्हाला खूप खूप शुभेच्छ्या

खरंच खूप आनंददायी प्रवास असतो हा, जेव्हा आपण आधी शिकलेल्या बऱ्याच गोष्टी परत नवीन प्रकारे शिकत असतो. माझा मुलगा जेव्हा प्लेग्रुपला जेव्हा "A" लिहायला शिकत होता तेव्हा कळले (त्यांच्या level ला)लाईन काढणे किती कठीण असते. आमच्या Patience चा अगदी कस लागत होता. आपली "छोट्या छोट्या गोष्टी मी एन्जोय करायला शिकले" ही गोष्ट हि आवडली. सर्वांना हे जमत नाही! आणि हो ह्या वयात त्यांच्या वाढत्या शरीराच्या सर्व गरजा पूर्ण होणारा आहार देण्याबाबत काळजी घ्यावी.तसेच त्यांची रोग प्रतिकार शक्ती कशी वाढेल ह्या कडे हि लक्ष हवे. बस आपलं बाळ लवकर हसतं खेळतं होऊ दे हीच परमेश्वराला प्रार्थना.

तुम्ही तुमच्या पिलुविषयी माझ्या मुलिचि कला़ या धाग्यात काहीतरी सांगणार होतात ते तसेच राहिले. काही सांगितलतंच नाही. त्यानंतर जे गायब झालात ते आत्ता ५ वर्षांनी दिसलात. आता तुमची मुलगी किती वर्षाची आहे. बाकी वर आयुर्हित यांनी म्हंटल्या प्रमाणे आपलं बाळ (आता बाळ नाही तर मुलगी) लवकर हसतं खेळतं होऊ दे हीच आमचीही परमेश्वराला प्रार्थना.

हो तेंव्हा मोठ्या मुलीने केलेले चित्राचे फोटो टाकणार होते , पण ते upload झालेच नाहीत ।मग ते राहुनच गेले . आता हे लिहिले वाटलं इथे share करावे . धन्यवाद …

माझा मुलगा जेव्हा प्लेग्रुपला जेव्हा "A" लिहायला शिकत होता तेव्हा कळले (त्यांच्या level ला)लाईन काढणे किती कठीण असते. आमच्या Patience चा अगदी कस लागत होता.
१००% सहमत. अवांतर : बाकी "लाईन"*** काढणे कठीणच आणि "पेशन्स" अपरिहार्य. *** ट्रान्सपोर्टची, पेपरची, दुधाची....वगैरे वगैरे

लेख आवडला ...अनुभव हाच सच्चा गुरु , मित्र आहे. पिलांसाठी केलेली जागरणं त्यांच्या आजारपणात, आपल्या आई वडिलांची महती सांगून जातात . वाटत अरे आपले आई वडील पण असेच जागले आपल्यासाठी , असेच खूप कष्ट केले आपल्यासाठी , खरंच किंमत कळते आई वडिलांची मग. म्हणजे महिती असतं आधीपासून पण ते उमगतं आतून तेंव्हा .>>>++++ १ कितीही म्हणूनच माझे आईवडील माझ्यासाठी देवच होते ,आहेत आणि राहतीलही :) ... अजून तरी अशी जागरणं केली नाहीत . अवांतर : 'जोडी तुझी माझी' मध्ये श्री व सौ.अंजली भागवत यांचा भाग खूप आवडला . विशेषतः त्याचं लहानग पिल्लू त्यांना म्हणत कि मम्मा मला धर , तुला काही होणार नाही हे , मी आहेना ... :)

मम्मा मला धर , तुला काही होणार नाही हे , मी आहेना ...
मी माझ्या लहानग्या मुलाला घेउन जेंव्हा रस्त्याने चालायचे तेंव्हा तो जर रस्त्याकडच्या म्हणजे रहदारीच्या बाजुला असेल तर जरा घट्ट हात पकडायचे,की गाडी वगैरे आली तर माझ्या हातात त्याचा हात असावा. मग एकदा तो आतील बाजूस अन मी रस्त्याच्या बाजूला असे चालत होतो, अन हा माझा हात घट्ट पकडुन गाडी आली की मला जवळ ओढत होता. माझ्या गुडघ्यापर्यंत पोहोचणारा माझा मुलगा माझी अशी काळजी करताना पाहुन किती भरुन आलं काय सांगु?