Welcome to misalpav.com
लेखक: ज्ञानव | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

बाकी कोणी तरी फुकट लोकल प्रवासाची स्किम काढली होती ते काय प्रकरण होतं हो ? अवांतरः- मिपावर अर्थविषयक दालन असावेच. मिपाला केवळ दंग्याचे बंधन नको.

होते. भाइंदर आणि घाटकोपर इथे बरेच ऑपरेटर होते असे ऐकून आहे. त्रैमासिक पासच्या ३०-३५% रक्कम भरायची आणि तिकीट पास न काढता विरार ते चर्चगेट सगळीकडे विना तिकीट फिरा जर पकडले गेलात तर पैसे भरा पावती दाखवा आणि पावतीतील दंडाचे पैसे परत घ्या. कार इन्शुरन्स किंवा तत्सम सारखे. ह्याहून विस्तारित नको.. कारण क्राईम बघणे, चर्चा करणे आणि ऐकणे म्हणजे क्राईमला प्रोत्साहन देणे असते असे माझे मत आहे.

अशीच स्कीम उल्हासनगरला सिंध्यानी राबविली होती. पण एक दिवस मध्य रेल्वे च्या अधिकार्यांनी मनावर घेतले आणि सगळ्या अंबरनाथ गाड्यांमध्ये तिकीट तपासनीस मोठ्या प्रमाणात तैनात केले. पंधरा दिवसात ती स्कीम कोलमडली आणि ती तयार करणाऱ्या सिंधी माणसाचे दिवाळे वाजले. काळजी नसावी

नको. पण सावधतेचा इशारा म्हणून तरी ती यायलाच हवी. आर्थिक गुन्हे अतिशय बेमालूमपणे मांजराच्या पावलाने होतात. अगदी अलीकडेच एक आयकर बाबतची केस होती एका बाईला पुरुष म्हणून दाखवले आणि क्लेम नोटीस काढली. नंतर आयकर अधिकारी तिला म्हणाला "तुमचे लिंग बदलायला २५००० खर्च येईल." (ह्या पुढील त्याची भाषा इथे उधृत करणे शक्य नाही.) पण त्याच्या लिंगबदलाची पूर्ण व्यवस्था लाऊन दिली आहे.

पिडाकाका, नवीन दालन नसावे, या मताशी आपल्याशी असहमत आहे. मीसुद्धा मिपावर पहिल्या दिवसापासून सभासद आहे आणि मिपाच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. पण एकंदरीत, मिपावरील खेळीमेळीच्या आणि प्रामाणिक वातावरणाबद्दल मला शंका वाटत नाही, उलट अभिमानच वाटतो. आर्थिक गुंतवणुकीचं ज्ञान असणे, ही आजची गरज आहे. त्यासाठी हातात आयते मासे देण्याऐवजी, मासेमारी कशी करावी हे शिकणे आणि शिकवणे अधिक गरजेचे आहे, असे मला वाटते. तशी तज्ञ मंडळीपण आपल्यामध्ये आहेत (उदा. क्लिंटन वगैरे). डॉ. खरे यांनी पण त्यांच्या एका लिंकमधे हाच मुद्दा मांडला होता की शाळांमध्येपण हा विषय शिकवला जात नाही. त्यामुळे होते काय की बरोबर काय आहे आणि चूक काय तेच कळत नाही. आर्थिक गुंतवणूक म्हणजे केवळ शेअर मार्केट नाही, तर इतर अनेक चर्चा महत्वाच्या असतात उदा. पैशाची किंमत महागाईने कशी कमी होते (NPV), स्टॉक्/बाँड्/डिबेनचर्स, सोने/स्थावर मालमत्ता, टॅक्स आणि त्याचे नियोजन, पीपीएफ, विमा, पेन्शन, फिक्स डिपॉझिट, रिटायर झाल्यावर किती पैसे लागतील याचा अंदाज आणि त्याचे नियोजन, इमर्जन्सी फंड, मुला/मुलींच्या शिक्षणाचा खर्च, लग्नकार्यासाठी पैशाची तयारी, आकस्मित खर्च (आजारपण, मोठी गाडी-दुरुस्ती), त्याची सोय (क्रेडिट कार्ड वापरू की फिक्स डिपॉझिट वगैरे). असे अनेक विषय असतात, ज्याची सरळ-सोप्या शब्दात मराठीमध्ये माहिती देणारी साइट माझ्या माहितीत तरी नाही. माझ्यामते मिपावर गुंतवणूकविषयक सल्ला न देता, असे दालन चालवणे शक्य आहे. असा एखादा प्रयत्न करण्याआधीच तो हाणून पाडू नये, इतकेच म्हणावे वाटते.

नाय रे बाबा, मी कोण बापडा हाणून पाडणार? मी आपलं माझं मत सांगितलं... जे काय करायचं ते नीलकांताच्या हातात आहे असंही सांगितलं... गुंतवणूक या विषयावर तज्ञांनी लिहिलेलं खूप मटेरियल उपलब्ध आहे. ज्याला सांगोपांग अभ्यास करायचा आहे त्याला कोण कशाला अडवेल? पण माझ्या पहाण्यात अभ्यास करण्याऐवजी, शॉर्टकट वापरून नंतर हात पोळून घेतलेले अनेक आहेत. जरी धागाकर्त्यांनी टीप्स देणार नाही असं म्हंटलं (आणि ते खरोखरीच देणार नाहीत असा माझा विश्वास आहे) तरी वाचणारा काय निष्कर्ष काढेल हे आपण ठरवू शकत नाही. आणि जेंव्हा माणूस गुंतवणुकीत मार खातो तेंव्हा मी पुरेसा अभ्यास केला नाही म्हणुन मार खाल्ला असं म्हणण्याऐवजी, मला अमूकामूक ठिकाणावरून सल्ला मिळाला म्हणुन माझं नुकसान झालं असं म्हणतो. तो अप्रत्यक्ष दोष देखील मिपावर येऊ नये असं मला वाटतं. आणि मिपाच्या जनरल सेक्शनमध्ये गुंतवणूकविषयक धागे टाकायला मी कुठे हरकत घेतोय? ज्याला ते धागे संग्रहणीय वाटत असलील तो पर्सनल बुकमार्क्स करू शकतोच की!! वेगळा सेक्षन केला म्हणजे या विषयावर दणादण धागे येतील असं थोडीच आहे? बाकी माझं अजून काही म्हणणं नाही...

श्री पिवळा जी, वेगळे दालन म्हणजे शेअर्सच्या टिप्स देणारे दालन नव्हे हे मी वर सतत नमूद करत आलो आहे. विमा, आयकर,सेवाकर, अर्थ नियोजन (वैयक्तिक, व्यावसायिक, बँक्स,विश्वस्थ संस्था, एच यु एफ ) एखाद्या व्यवसायाचे अर्थकारण, लोकांचे पैसा, संपत्ती,अर्थशास्त्र ह्या बद्दलचे समज - गैरसमज------- यादी भरपूर आहे. ज्या "इतिहासाचा" उल्लेख तुम्ही केलात त्याबद्दल मला आलेल्या व्य. नि.तून माहिती मिळाली. सुरवतीला मी त्याबद्दल अनभिज्ञच होतो. पण जेव्हा ते कळले तेव्हा दोन गोष्टींचे वाईट वाटले १) जी घटना घडली ती घडू नये म्हणूनच साक्षरता हवी असा विचार करण्याऐवजी नकोच ते असा विचार आपण करावा हे कितपत योग्य आहे. २) मी शेअर्सबद्दल लिहितो म्हणजे मी किंवा अन्य कुणीतरी त्या इतिहासाची पुनरावृत्ती करेल की काय हा विचार ही दुखः दायकच आहे.(सबब आता मी ते बंद केलच आहे.) आज अनेक माध्यमांद्वारे मिळणारी माहिती ही दिशाभूल करणारीसुद्धा असते म्हणून आपण माध्यमांना दोष देतो तसे उद्या कुणी मिपाला दोष देईल हा विचार जितका तीव्र आहे तितकाच मिपावरून जर योग्य माहिती आणि तीही माझ्या मराठीत (जी इतरत्र फार कमी उपलब्ध आहे.)मला मिळाली असती तर मी वेळीच सावध झालो असतो असे एखाद्याला वाटणे शक्य आहे. तसेच मिपावर चर्चा होऊन काहीतरी निष्पन्न होऊ शकते मात्र इतर मध्यामांद्वारे मिळणार्या माहितीची योग्यायोग्यता पडताळून पाहणे शक्य नाही जे इथे चर्चेद्वारे शक्य आहे. राजकारण, भटकंती,पाक कृती जरी निरुपद्र्वी असले तरी ते वेगळ्या दालनातून का ? फक्त मुख्य धाग्यातच ते येऊ देत थोडक्यात तो पंक्तिप्रपंच नकोच. झालेल्या लॉसबद्दल उल्लेख केला आहे तो का आणि कसा झाला त्यातून तुम्ही कुणाला सावध करू शकता का? कसे? तुमचा अनुभव जर शेअर केलात तर इतर सावध होतील आणि होणार्या चर्चेतून नक्कीच अगदी नक्कीच काहीतरी चागले निष्पन्न होऊ शकेल. मिपावर बरेच सी ए असू शकतील त्यांनी काही अनुभव लिहून इतराना सावध करणे किंवा इतरांच्या ज्ञानात भर घालणे असे विधायक स्वरूपाचे थोडेसे कार्य करावे असे मनापासून वाटते.

श्री. ज्ञानवसर, सॉरी हां, वर उपाशी बोक्याला रिप्लाय दिला पण इथे खाली येऊन बघितलंच नाही, त्यामुळे तुमच्या प्रतिसादाला उत्तर दिलं नाही, तरी राग नसावा... 'इतिहासा'ला बाजूला ठेवूया. कारण त्यावर इथे इतकी चर्चा झालेली आहे की अजून नवीन चर्चा करण्यासारखं काही शिल्लक नाही. मी वर उ.बो.ला सांगितल्याप्रमाणे जनरल सेक्षनमध्ये असे आणि कोणतेही धागे टाकायला माझी काहीच हरकत नाहीये.
राजकारण, भटकंती,पाक कृती जरी निरुपद्र्वी असले तरी ते वेगळ्या दालनातून का ? फक्त मुख्य धाग्यातच ते येऊ देत थोडक्यात तो पंक्तिप्रपंच नकोच.
मी या प्रपोजलशी सहमत आहे... :)
झालेल्या लॉसबद्दल उल्लेख केला आहे तो का आणि कसा झाला त्यातून तुम्ही कुणाला सावध करू शकता का? कसे? तुमचा अनुभव जर शेअर केलात तर इतर सावध होतील आणि होणार्या चर्चेतून नक्कीच अगदी नक्कीच काहीतरी चागले निष्पन्न होऊ शकेल.
तीच तर शिंची अडचण आहे ना. प्रत्येक वेळेची परिस्थीती वेगवेगळी असते, कारणं वेगवेगळी असतात हो. नाहितर पहिल्या लॉसनंतर मीच सुपरज्ञानी होऊन नंतरचे लॉसेस टाळले नसते काय? :) असो. माझा काही अमुक एक कराच किंवा करूच नका असा हट्ट नाही. मी एकंदर मिसळपाव या संस्थळाच्या भल्यासाठी मला काय योग्य वाटतं ते एक मिपाचा हितचिंतक म्हणून सांगितलं. धोरण ठरवणारे आणि अंमलबजावणी करणारे अन्य आहेत. पिडां म्हणे आता, उरलो उपदेशापुरता!! :)

तीच तर शिंची अडचण आहे ना. प्रत्येक वेळेची परिस्थीती वेगवेगळी असते, कारणं वेगवेगळी असतात हो. नाहितर पहिल्या लॉसनंतर मीच सुपरज्ञानी होऊन नंतरचे लॉसेस टाळले नसते काय?
हे उत्तर अपेक्षाभंग** करणारे आणि अस्वस्थ करणारे आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळची परिस्थिती वेगळी भासत होती, कारणे (!!!!!????) वेगवेगळी होती तरीही असे जे तुमच्या बाबतीत घडले ते इतरांच्या बाबतीत घडू नये आणि लोक वेळीच सावध व्हावेत हा विचार तुमच्या मनात रुजला नाही किंवा अजून ही रुजत नाहीये हेच मराठी माणसाचे दुर्दैव आहे. सुपरज्ञानी होण्या आधी ज्ञानी होणे आवश्यक असल्याने आपण त्या दृष्टीने एक पाउल तरी उचलुया असे वाटले नाही तर कठीण आहे आणि त्याही पेक्षा वेदनादायी दुखःद आहे. आणि सुपरज्ञानी ह्या शब्दाने "नेसेन तर शालूच नेसेन नाहीतर ....." ह्याची आठवण झाली. मराठी माणसाच्या ह्या उदासीन स्वभावाची कीव येते. परप्रांतीय असोत कि अन्य कुणी जे आम्हाला टोपी घालून जातात ते आपण डिझर्वच करतो कारण पैसे, नफा म्हणजे लोच्या, फसवेगिरी अगदी वाईटच सगळे आम्हाला दिसू लागते. नाटक राजकारण हे विषय बरे "निरुपद्रवी" तरीही शिरा ताणून बोलायला.

टॅबु आहे की काय शंका नेहमी येते. जे व्हायचय ते होउदे झुकती है दुनीया झुकानेवाला चाहिये हेच खरे. आर्थीक बाबींवर मुक्त चर्चा हवीच हवी.

पण तुम्ही माझ्यावर कशाला नाराज होताय? मी इथे मिपावर कुणालाही कोणत्याही विषयावर मग ते अर्थकारण असो की आणखी काही, लिहायला हरकत घेतलेली नाही. मी फक्त नवीन दालन सुरु करावं की नको या विषयावर माझं मत व्यक्त केलं. ठरवणारा मी नाही हेदेखील सांगितलं. आता आणखी काय करायला पाहिजे होतं? मी माझं मतही व्यक्त करू नये का?
जे तुमच्या बाबतीत घडले ते इतरांच्या बाबतीत घडू नये आणि लोक वेळीच सावध व्हावेत हा विचार तुमच्या मनात रुजला नाही किंवा अजून ही रुजत नाहीये हेच मराठी माणसाचे दुर्दैव आहे.
हा गंभीर आरोप आहे. पिवळा डांबिस आयडीच्या मनात कधी काय रुजलं किंवा रुजलं नाही याची तुम्हाला काही कल्पना असण्याची सुतराम शक्यता नाही. प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात, तेंव्हा असा उगीच मोठा घास तोंडी नये घेऊ...
परप्रांतीय असोत कि अन्य कुणी जे आम्हाला टोपी घालून जातात ते आपण डिझर्वच करतो कारण...
हेच मी माझ्या पूर्वीच्या प्रतिक्रियेत म्हंटलं होतं. आम्हाला कोणी टोपी घालून जात नाहीत, आपणच ती टोपी घालून घेतो पण गंडल्यावर दोष मात्र त्या परप्रांतीय की अन्य कुणी यांच्यावर लावतो. तसाच दोष मिपावर येऊ नये म्हणूनच मी खास दालन नको म्हंटलं होतं!
नेसेन तर शालूच नेसेन नाहीतर ....."
आयुष्यात शालू कधी नेसला नाही त्यामुळे ही म्हण माहिती नव्हती पण जर तुम्ही "खाईन तर तुपाशी..." असं काहिसं म्हणत असाल तर ते थोडंफार खरं आहे आमच्या बाबतीत! काही गोष्टींशी अजिबात तडजोड आम्ही करत नाही, मग त्यासाठी कितीही कष्ट/यातना पडल्या तरी बेहेत्तर!! :) असो. तेंव्हा तुम्ही आमच्याविषयी काही विशेष अपेक्षाभंग वगैरे करून घेऊ नका. ज्या कारणासाठी पिवळा डांबिस या आयडीचा जन्म झालाय त्यात अर्थकारणविषयक लेखन हे बसत नाही. आतापर्यंत वर जे काही लिहिलं ते मिपाचं हित लक्षात ठेवून लिहिलं. चालकांपर्यंत ते पोचलं असणार याची खात्री आहे. यापुढील निर्णय त्यांचा. आणि तो कोणताही असला तरी राग नाही. आणि तुमच्यावरही काही राग नाही....

** एकूण आपले लेखनातून दिसणारे आपले व्यक्तिमत्व,विचार आणि आपणास आलेले अनुभव त्याचे न केले गेलेले विश्लेषण वगैरे

शेअर बाजाराचा वापर करून फ्रोड कसा करावा/ करतात :) यानुशंगाने एखादा लेख(माला) केस स्टडी येउदे.

हे मला माहित नाही. ट्रेड करताना होणार्या चुका मी लिहू शकतो कारण अनेक वर्षांचा संबंध आहे त्या गोष्टीशी; पण सध्या ऑडीट आणि कर विषयक कामात बर्या पैकी व्यस्त आहे. तेव्हा लेखमालेला थोडा वेळ लागेल.

विविध बड्या धेण्डा काढून शेअर ट्रेडिंग व्यवस्थेच्या अभ्यासातून तांत्रिक त्रुटी मधून कसा फायदा उपट्ला जातो यावर प्रकाश हवा. जसे समजा आधीच माहीत आहे उदया मोठा दहशतवादी हल्ला होणार आहे बाजार खाली जाइल तर अर्थातच शोर्ट सेलिंग करून अकल्पित फ़ायदा काढला जाईल. अशाच काही माहितीपर गोष्टी , व्यवस्थेतिल त्रुटी वगैरे वर प्रकाश टाकावा.