Welcome to misalpav.com
लेखक: kurlekaar | प्रसिद्ध:
‘विनोद’ सगळ्यांनाच आवडतो. मलादेखील तो माझ्या लहानपणापासून आवडत आलाय. सुरुवातीस चिं वि जोशी(चिमणराव आणि गुंड्याभाऊ), नंतर पु. ल. व त्यानंतर गंगाधर गाडगीळ (बंडू आणि स्नेहलता), वि. आ. बुवा(मालन मोहिले), द. मा. मिरासदारांहवाच्या ग्रामिण पार्श्वभूमीवरच्या कथा, व इंग्रजी वाचायला सुरुवात केल्यानंतर P G Wodehouse. मोठेपणी वाटायला लागलं की आवडणं वगैरे ठीक आहे पण विनोद मला का आवडतो याचं विश्लेषण करावयास हवं. विनोदासाठी बुद्धी व शब्दकौशल्य आवश्यक आहे; एक पारदर्शक, स्वच्छ स्वभाव देखिल लागतो नाहीं तर विनोदाचा दर्जा व पातळी घसरायला लागते. शाब्दिक कोट्या करायला व उपरोधात्मक (कुजकं) बोलायला सुद्धा बुद्धी व शब्दकौशल्य लागतच पण कोट्याना तेवढंच भांडवल पुरत व कुजकं बोलायला तर चक्क अस्वच्छ स्वभाव लागतो. आपण ‘विनोदा’कडे सर्वसाधारणतः एक बुद्धीचा आविष्कार म्हणून बघू शकतो पण निव्वळ विनोदा ऎवजी त्या पेक्षा जास्त व्यापक असलेल्या ‘विनोदबुद्धी’ (Sense of Humour) कडे निरखून बघणं इथं मला आवश्यक वाटतं. आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंची कांही वाक्ये, त्यांचे शब्द आपल्या लक्षात रहातात कारण ती आपल्याला ते शब्द/वाक्यं तेंव्हा तरी पटलेले असतात, कधी कधी ते शब्द पूर्णतः पटले नसले तरी आपल्याला अजून खोलात जाऊन विचार करायला लावतात. मी विशीत असतांना मला दोनतीन वर्षांनी सिनिअर असलेल्या एकाचे शब्द आठवतात “आपण एखाद्याच्या sense of humour बद्दल जेंव्हा बोलतो तेंव्हा नकळत आपण स्वतःच्या sense of humour बद्दलही बोलत असतो”. अगदी बरोबर कारण जर व त्या (पहिल्या) व्यक्तीचा humour आपल्या स्वतःच्या Humour च्या चौकटीत बसत असेल तरच आपण म्हणतो की “ या अमुक अमुक व्यक्तीला चांगला sense of humour आहे“, नाहींतर नाहीं. मला याहि कक्षेच्या पलीकडे जाऊन Sense of Humour चा अजून व्यापक अर्थ शोधावासा वाटतो. पण त्या साठी आपल्याला थोडसं वैचारिक उंचीवर जाऊन विनोदाकडे फक्त बुद्धीचा आविष्कार म्हणून न पाहता तो स्वभावाचा एक पैलू किबहुना स्वभावाचं मुलभूत रूप असू शकतो हे ग्राह्य धरायला हवं. म्हणजेच की आपला sense of humour हा आयुष्याकडे बघण्याचा हा आपला एक दृष्टीकोन(attitude) असतो; तो फक्त हसण्यासाठी व हसण्यापर्यंत मर्यादित राहत नाहीं, तो आपलं आयुष्याचं एक तत्वज्ञान बनून जातो. प्रतिकूल परिस्थितीत देखिल ही व्यक्ति स्वतःचं Bearing बिघडू देत नाहीं. The yellow Rolls Royce या चित्रपटांत Shirley MacLaine जेंव्हा Alain Delon ला एका अल्पजीवी पण उत्कट affair नंतर अगदी अनपेक्षित रित्या सोडून निघुन जाते, तेंव्हा जवळच्या एका कठड्यावर बसून तो मस्त हसत बसतो. Roman Holiday मध्ये देखिल Gregory Peck ला Audrey Hepburn ही एक राजकन्या आहे हे शेवटपर्यंत माहित नसतं व तिला तो एक गरीब बिचारी समजून दिवसभर रोम दाखवीत फिरतो. प्रेमाचे अंकुर फुटायला सुरूवात देखिल होते. व चित्रपटाच्या शेवटी एका औपचारिक स्वागत समारंभातून त्याची ओळख या राजकन्येशी करून दिली जाते व या समारंभातून Gregory Peck स्वताशीच छान हसत हसत बाहेर पडतो.. चित्रपटांतला असला तरी हा खरा sense of humour.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

मला वाटतं Admin साहेबांनी Respond व Comment या दोन शब्दांचं भाषांतर करून प्रतिसाद व प्रतिक्रिया या शब्दांचा वापर केलेला दिसतोय. Response चं भाषांतर ‘प्रतिसाद’ होऊ शकतं पण मला वाटतं Respond चं भाषांतर ‘प्रतिक्रिया द्या’ असं व्हायला हवं. Comment चं भाषांतर मात्र ‘प्रतिक्रिया’ करणं योग्य आहे जरी ते १००% fit होत नसलं तरी. ‘प्रतिक्रिया’ हा एकच शब्द पुरेसा झाला असता. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

आपण ज्यांना classic किंवा अभिजात म्हणतो त्या कांही गोष्टी सोडून इतर सर्व कांही कालबाह्य होऊ शकते. आमचे हायस्कुलातले कांही शिक्षक व शिक्षिका चक्क धोतर व नऊवारी साडी नेसून यायच्या. शाळा सोडून कांही वर्षं झाल्यानंतर त्यांना त्याच वेशभूषेत पाह्यला थोडं विनोदी वाटायचं कारण आमच्या दृष्टीने ते कालबाह्य होतं. आता कुणी पंधरा विस पूर्वी प्रचलित असलेल्या flares bottom trousers घातलेलं पाहिलं की कसं वाटतं? या इतर गोष्टींप्रमाणे विनोद हा साहित्य-प्रकार सुद्धा कालबाह्य होऊ शकतो. तेंव्हा कांहीतरी सेलीब्रेट करायला बंडू स्नेहलतेला घेऊन रेस्तराँ मध्ये जातो व अर्धा डझन आईसक्रीम व आम्लेट मागवतो काय किंवा आईस्क्रीम खात खात उभ्या असलेल्या हमालगाडी वरून चालत येतो काय. तेंव्हाचे लेखक व वाचक या सर्वांचे सर्वच सामाजिक संदर्भ वेगळे होते आत्ता क्वचित मी तेवढा हसणार नाहीं पण तेंव्हा निश्चितच खूप हसलो होतो.

Roman Holiday मध्ये देखिल Gregory Peck ला Audrey Hepburn ही एक राजकन्या आहे हे ""शेवटपर्यंत"" माहित नसतं व तिला तो एक गरीब बिचारी समजून दिवसभर रोम दाखवीत फिरतो. please watch the movie again!!

ग्रेगरी पेक ला ऑड्रे हेपबर्न ही एक राजकन्या असते हे कधी कळतं या बाबतीत गफलत होऊ शकते पण माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे ती ग्रेगरी पेक ची शेवटची प्रतिक्रिया. एका अशक्यप्राय प्रेमसंबंधातून तो कसा हसत हसत बाहेर पडतो ते. I do not think I need to see that movie again for that. Thanks for your comments.

विनोदबुद्धीवर याहून अधिक व्यापक आणि मूलगामी लिखाणाची अपेक्षा ठेवणे वावगे ठरू नये. उदाहरणे आंग्ल चित्रपटांऐवजी चिमणराव वगैरेंची, किंवा स्वतःच्या जीवनातील प्रसंगांची दिलीत, तर जास्त भावतील.

मला वाटतं, सेन्स ऑफ ह्युमर (विनोदबुद्धी) ही आपण स्वतः किती विनोद करतो अथवा आपणाला किती समजतो यापेक्षाही, दुसर्‍याने आपणावर (आपल्या समाजावर) केलेला विनोद आपण कशा प्रकारे स्वीकारतो, यावर अवलंबून आहे.

यापेक्षाही, दुसर्यादने आपणावर (आपल्या समाजावर) केलेला विनोद आपण कशा प्रकारे स्वीकारतो, यावर अवलंबून आहे” अगदी बरोबर. पण इथं तुम्ही ‘विनोदबुद्धी’ या शब्दाचं प्रयोजन विनोदाशी संलग्न राहून केलेलं आहे. क्वचित मला ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवता आलेलं दिसत नाहीं पण मी इथं विनोदबुद्धी व विनोद यांची फारकत करून विनोदबुद्धी हे कसं आयुष्याचं तत्वज्ञान होऊ शकतं हे दाखवायचा प्रयत्न केलाय. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

यापेक्षाही, दुसर्यादने आपणावर (आपल्या समाजावर) केलेला विनोद आपण कशा प्रकारे स्वीकारतो, यावर अवलंबून आहे” अगदी बरोबर. पण इथं तुम्ही ‘विनोदबुद्धी’ या शब्दाचं प्रयोजन विनोदाशी संलग्न राहून केलेलं आहे. क्वचित मला ते तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचवता आलेलं दिसत नाहीं पण मी इथं विनोदबुद्धी व विनोद यांची फारकत करून विनोदबुद्धी हे कसं आयुष्याचं तत्वज्ञान होऊ शकतं हे दाखवायचा प्रयत्न केलाय. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

अगदी बरोबर म्हणून तुम्हाला मी पोच दिली असली तरी थोडसं hindsightने पाह्यला गेलं तर ‘आपल्या समाजावर’ केलेले विनोद आपण आपल्या चांगल्या ‘विनोदबुद्धी’ खाली स्वीकारावेत हे तितकसं पटत नाहीं. स्वतःवरचे-वैयक्तिक- विनोद स्वीकारणं वेगळ पण आपल्या समाजांत दुसऱ्या व्यक्ति देखिल घटक असतात तेंव्हा तुम्ही तुमच्या विनोद्बुद्धीसाठी तुम्ही तुमच्या समाजावर केलेला विनोद स्वीकारणं या इतर व्यक्तींचा विचार केला तर ते खुपच unfair वाटतं; असे विनोद स्वीकारण्याचा आपणांस कांहीच अधिकार नसतो.

जर व त्या (पहिल्या) व्यक्तीचा humour आपल्या स्वतःच्या Humour च्या चौकटीत बसत असेल तरच आपण म्हणतो की “ या अमुक अमुक व्यक्तीला चांगला sense of humour आहे“, नाहींतर नाहीं.
हे अगदी खरं .. विनोद्बुद्धी ही सापेक्ष असते .. म्हणजे आपण स्वतः दुसर्‍यावर विनोद केला, चेष्टा केली तर ती चांगली विनोद्बुद्धी असं म्हणायचं... आणि दुसर्‍याने जर चेष्टा केली तर त्याला टवाळखोर म्हणायचं . बाकी विनोद या विषयावर इतक गंभीर लेखन केलत हे विशेषच. "रोमन हॉलीडे" परत एकदा पहावा ही विनंती.

विनोदबुद्धी सर्वसाधारणता सापेक्ष असते हे अगदी बरोबर ग्रेगरी पेक ला ऑड्रे हेपबर्न ही एक राजकन्या असते हे कधी कळतं या बाबतीत गफलत होऊ शकते.या व्यतिरिक्त या post मध्ये त्रुटी असल्यास ज्याने आपणास वाटतं की मी तो चित्रपट पुन्हा पहावा ते जरूर कळविणे.माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे ती ग्रेगरी पेक ची शेवटची प्रतिक्रिया. एका अशक्यप्राय प्रेमसंबंधातून तो कसा हसत हसत बाहेर पडतो ते. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

तुमच्या लेखात, नायकाला सत्यं शेवटी कळतं पण तो ते हसत हसत स्विकारतो.. पण ते तसं नाहीये ना? त्याला जर सत्यं आधीच माहिती आहे... (पण ते माहिती नाही असं तो भासवतो), तर मग घटनांचे सगळे संदर्भच बदलून जातात ना? (कारण इथे गृहितकच चूकीचे आहे). आणि मग त्या संदर्भाला धरून आलेल्या तुमच्या कल्पना, निष्कर्षं निकाली निघतात. बाकी काही नाही.. (आणि तो हसत बाहेर पडला हा त्याचा "सेन्स ऑफ ह्युमर" आहे असं तुम्हाला का वाटलं कळलं नाही. )

हा चित्रपट मी १९६० नंतर पाहिलेला आहे व आठवणीतल्या सगळ्या gaps गुगल भरून काढू शकणार नाहीं. ग्रेगरी पेक त्याच्या संपादकाबरोबर या राजकन्येचा एक exclusive interview घ्यायची पैज स्वीकारतो पण तेन्व्हापर्यंत त्याला कांहीच ठाऊक नसतं, पण त्याला ते नंतर समजतं. तिच्याबरोबर रोम बघतांना त्याला हे ठाऊक झालेलं असावं. त्याला तिचे फोटो त्याच्या वृत्तपत्राला विकत देता आले असते पण तो तसं शेवटी करत नाहीं व ते तिलाच परत करतो व your secret is safe with me असं कांहीतरी पुटपुटतो. यांत तिच्या वरचं बसू लागलेलंत्याचं प्रेम असतंच पण त्यापेक्षा तो एक gentleman होता हे आहे. sense of humour ची व्याख्या मी इथं थोडीशी बदललीय व या विनोदबुद्धीला मी विनोदापासून वेगळे केलंय. sense of humour म्हणजे आयुष्याचं तत्वज्ञान असं कांहीतरी. दुसऱ्या महायुद्धात जपानी सैनिक ब्रह्मदेशावर हल्ला करून येत असतांना जेंव्हा ब्रिटीश सैनिकांना याची बातमी लागली तेंव्हा त्यांनी जपानी आक्रमणापासून थोडसं दूर अशा ठिकाणी चाललेला त्यांचा क्रिकेट चा सामना थांबविला नाहीं कारण त्याच्या मते सामना संपेपर्यंत जपानी तिथं पोहोचणं असंभव होतं. दुर्देवाने sense of humour ची व्याख्या जेवढी विस्तृत आहे तेवढी विनोदबुद्धीची नांहीय.

"Gallows humor is humor in the face of or about very unpleasant, serious, or painful circumstances. Any humor that treats serious matters, such as death, war, disease, crime, etc., in a light, silly or satirical fashion is considered gallows humor. Gallows humor has been described as a witticism in the face of – and in response to – a hopeless situation" From Internet.

जे वरती व्हिडीयो देणार असे म्हणालो होतो ते आता इथे देतो :- एन्जॉय ! चेहर्‍यावर हसु आलं तर अ‍ॅनिमेटर्स ना धन्यवाद द्या.