Welcome to misalpav.com
लेखक: प्यारे१ | प्रसिद्ध:
गेली कित्येक वर्षे काही शंका मनांत आहेत. १. मिपावरील खादाडी नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर अनुष्का तात्याला सापडलीच नसती तर खादाडी सुरु झाली असती का? २. मिपावरच्या पुणे-नॉन्पुणे दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे नॉनपुणेकरांनी छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? (असेच इतर दंगलींबाबत) ३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे? ४. मिपावरील अनेक प्रतिसादांना अप्रकाशित केलं गेलं तेंव्हा, सल्लागारांची नक्की भुमिका काय होती? ५. मिपा मधील विडंबनांचे प्रमाण अचानक कमी का झाले? ६. सदस्यांची संख्या अचानक कशी काय वाढली? ७. काथ्याकूट आणि कौल ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत? ८. 'ह्या' आणि 'त्या' स्थळांवरील सदस्यांचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या सदस्यांत हुच्च व्यक्ती का असतात? ९. मिपावरील खेचाखेचीत सदस्यांच्या प्रमाणात, सगळ्यांचा भाग का नसतो? विशेषतः राजकारण आणि चर्चा. १०. नवीन सदस्यांच्या आयातीचा, मिपावरील टीआरपीवर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी सदस्य आयात केले तर, मिपा बलवान होईल का? मला ह्याची उत्तरे माहीत नसल्याने, क्रुपया कुणी दिलीत तर फार बरे. -हलके घ्या! (होळीच्या याड्व्हान्स शुभेच्छा...!)
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

नवी माहिती मिळत होती

दुपारी धागा वाचुन सुरुवातीचे २-३ प्रतिसाद पाहिले होते आणि नंतर एकदम ७५! मध्ये संपादकांकडुन दम दिलेला पाहिला होता. आता फक्त ४९ प्रतिसाद दिसत आहेत! म्हणजे बाकीचे वायफळ प्रतिसाद संपादकांकडुन ऊडवले गेले आहेत. तरीही अजुन काही (डु) आयडी प्रतिसाद देत आहेत. बहुदा आपला प्रतिसाद संपादकांकडुन ऊडवला जाणार आहे याची त्यांना फिकीर नसावी. कशाला ऊगाच संपादकांनां त्रास देताहेत हे (डु) आयडी?

अरे एक विषय सुटला की भारतीय जनसंघ पार्टी हे संघाचे अनौरस अपत्य आहे का? याची उठठेव राहिलीच की. की मग त्यावेळेलाच विषय सर्वथा नावडो ही समर्थांची उक्ती आठवली

१. मिपावरील खादाडी नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर अनुष्का तात्याला सापडलीच नसती तर खादाडी सुरु झाली असती का? होय. कारण अर्थातच मी, मला अनुष्का शेट्टी तुफान आवडते. २. मिपावरच्या पुणे-नॉन्पुणे दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे नॉनपुणेकरांनी छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? (असेच इतर दंगलींबाबत) अर्थातच मध्यवर्ती ठिकाणचे लोक. ३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे? काही कल्पना नाही. पण मुळ आयडी डु आयडींना समान वरणाचे अथवा शिताचे समजत नसल्याची शक्यता नाकारता येत नाही. ४. मिपावरील अनेक प्रतिसादांना अप्रकाशित केलं गेलं तेंव्हा, सल्लागारांची नक्की भुमिका काय होती? नो, कमेंट्स. ५. मिपा मधील विडंबनांचे प्रमाण अचानक कमी का झाले? कोणीही लोक कट्टे करु लागले. ६. सदस्यांची संख्या अचानक कशी काय वाढली? देवाची करणी असावी, झोळीत भर वाढत असेल तर. अन्यथा लोकसंख्या आपोआप थोडीच वाढते. ७. काथ्याकूट आणि कौल ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत? गोपनीय नाहीत म्हणून. ८. 'ह्या' आणि 'त्या' स्थळांवरील सदस्यांचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या सदस्यांत हुच्च व्यक्ती का असतात? कारण तिथे मुवीना* एटंरटेन केले जात नाही. ९. मिपावरील खेचाखेचीत सदस्यांच्या प्रमाणात, सगळ्यांचा भाग का नसतो? विशेषतः राजकारण आणि चर्चा. माहित नाही. १०. नवीन सदस्यांच्या आयातीचा, मिपावरील टीआरपीवर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी सदस्य आयात केले तर, मिपा बलवान होईल का? परीणाम होत नाही. मिपा बलवान होते आणी राहील. *(मुवीना = मुर्ख विहारीना, मुर्ख विचारींना न्हवे).