Welcome to misalpav.com
लेखक: सुधीर कांदळकर | प्रसिद्ध:
मारिया ऍना शिकेलग्रुबर. ऑस्ट्रीयामधील वाल्डफीअर्टेल Waldviertel विभागातल्या (जन्म १५-०४-१७९५) स्ट्रोन्स या छोट्याशा खेड्यात श्री. योहान शिकेलग्रुबर आणि श्रीमती थेरेसा फेईसिंगर या दांपत्याच्या पोटी १५-०४-१८४७ रोजी जन्माला आली. या दांपत्याला एकूण ११ अपत्ये झाली पण त्यातली केवळ ६च जगली. मारिया २६ वर्षांची असतांना तिची आई वारली. नंतर ४० वर्षांची होईपर्यंत ती काय करीत होती याचा कुठे काही पुरावा सापडत नाही. आपल्या वयाच्या ४२व्या वर्षी तिने एका मुलाला जन्म दिला. मारिया ऍना शिकेलग्रुबरला ऍलॉईस हे पुत्ररत्न झाले तेव्हा ती स्ट्रोन्स या गावी ट्रमेल्श्लागर नावाच्या एका कुटुंबात काम करीत होती. लौकरच मारिया आपल्या बापाच्या घर क्रमांक २२, स्ट्रोन्स इथे राहायला गेली. ऍलॉईसच्या बापाचे नाव सांगायला मारियाने नकार दिला म्हणून शेजारच्या डॉलर्सहाईम Döllersheim गावातल्या चर्चमध्ये ऍलॉईसच्या जन्मनोंदीत नाव ‘ऍलॉईस शिकेलग्रुबर’ व बापाच्या नावाच्या जागी illegal म्हणजे अनौरस अशी नोंद झाली. शेजारचे हेर आणि फ्राउ (श्रीमान व श्रीमती) ट्रमेल्श्लागर यांची ऍलॉईसचे गॉडफादर आणि गॉडमदर म्हणून नोंद आहे. पुत्रप्राप्तीनंतर लौकरच मारिया घर क्रमांक २२, स्ट्रोन्स इथे आपल्या आईवडिलांकडे गेली. धर्माने कॅथलीक असलेल्या गरीब शेतकरी कुटुंबातली मारिया काटकसरीने खर्च करणारी, हातचे राखून वागणारी तसेच असाधारण धूर्त अशी शेतकरी महिला होती असे जर्मन इतिहासकार वेर्नर मेसर याने लिहिलेले आहे. नंतर १८-०५-१८४२ रोजी मारिया ऍना शिकेलग्रुबरचे योहान जॉर्ज हीडलर Johann George Hiedler याच्याशी तिचे तिच्या वयाच्या ४७व्या वर्षी झाले. नवरदेवाचे वय होते ५०. म्हणजे या लग्नाअगोदर पाच वर्षे ऍलॉईसचा जन्म झालेला होता. या जॉर्ज हीडलरचे अगोदर लग्न झालेले होते परंतु ती प्रथम पत्नी आणि पुत्र हे दोघही जॉर्जच्या या दुसर्‍या विवाहाअगोदर मृत्यू पावले होते. या लग्नानंतर पाच वर्षांनी १८४७ साली ऍना मारिया मरण पावली. त्यानंतर जॉर्ज हीडलर कुठे होता याचा काहीही अभिलेख उपलब्ध नाही. हा जॉर्ज हीडलर एक फिरता चक्कीवाला (itinerant miller) होता. त्यामुळे तो सतत फिरतीवर असावा. पिठाची फिरती गिरण कशीकाय असेल याबद्दल माझ्या डोळ्यासमोर काही चित्र उभे राहात नाही. फिरती गिरणी कशी असते, त्या काळच्या कोणत्या वाहनावर असे, घोडे ओढत की माणसे वगैरे कुतूहल देखील शमले नाही परंतु ते विषयांतर होईल म्हणून तो विषय सोडून दिला. युरोपात त्या काळी फिरती गिरण हे काय असेल कोण जाणे. ऍलॉईसची पाठवणी मग जॉर्ज हीडलरचा भाऊ योहान नेपोमक हीडलर Johann Nepomuk Hiedler याच्याकडे झाली. त्याची स्पिटाल इथे शेती होती. परंतु मारिया ऍनाच्या मृत्यूनंतर जवळजवळ २९ वर्षांनी हा जॉर्ज हीडलर प्रकट झाला. ६ जून १८७६ रोजी तीन साक्षीदारांसमोर त्याने या ऍलॉईस शिकेलग्रुबरचा जन्मदाता आपणच आहोत असे प्रतिज्ञापत्र दिले. २३-११-१८७६ रोजी हे प्रतिज्ञापत्र डॉलर्सहाईम इथल्या पॅरीश प्रीस्टकडे दाखल झाले. तेव्हा तिथे बाप्तिस्म्याच्या नोंदवहीत ऍलॉईसच्या बापाचे नावाच्या जागी - illegal - असे लिहिलेले होते. तिथे ऍलॉईस हिटलर असे नोंदवले आणि हिटलर या आडनावाने जन्म घेतला. हिटलर हे आडनाव अगोदर अस्तित्वातच नव्हते. हा ऍलॉईस हिटलर म्हणजेच जर्मनीचा दुसर्‍या महायुद्धातला एकमेवाद्वितीय क्रूरकर्मा ऍडॉल्फ हिटलर याचा बाप. अशातर्‍हेने अद्वितीय क्रूरकर्मा असलेला हिटलर हा आडनावाने देखील एकमेवाद्वितीय होता. हिटलरच्या बापाचा जन्म १८३७चा म्हणजे हिटलर आडनाव जेव्हा त्याला मिळाले तेव्हा सन १८७६ मध्ये तो ३९ वर्षांचा होता. आता युरोपातली तत्कालीन सामाजिक परिस्थिती पाहू. त्या काळात युरोपमध्ये नोकर स्त्रिया ज्या कुटुंबात काम करीत त्या कुटुंबातल्या पुरुषांपासून त्यांना अनौरस मुले पण होत आणि ती अनौरस मुले आईकडचे आडनाव लावीत असत. तेव्हा युरोपात तशी पद्धतच होती. त्या काळी जन्माला आलेल्या एकूण अर्भकांपैकी लोअर ऑस्ट्रियातील काही ठिकाणी अनौरस अर्भकांचे प्रमाण ४० टक्क्यापर्यंत पोहोचले होते. नंतर १९०३ पर्यंत हे प्रमाण २४ टक्क्यांपर्यंत घसरले. बर्‍याच वेळा मुले मोठी झाली की नंतर बाप ते मूल आपले आहे म्हणून जाहीर करीत असे. असो. ऍना शिकेलग्रुबर हिचा मुलगा ऍलॉईस याचा जन्म आहे ७ जून १८३७चा. ‘मारिया ऍना शिकेलग्रुबरला ऍलॉईस हे पुत्ररत्न झाले तेव्हा ती ग्राझ इथे फ्रांकेनबर्गर या ज्यू कुटुंबात स्वैपाकीण म्हणून कामाला होती. हा फ्रांकेनबर्गर नावाच्या ज्यू गृहस्थ ऍलॉईस शिकेलग्रुबर याला तो १४ वर्षांचा होईपर्यंत पितृत्व भत्ता देत होता. विविध संस्थळांवर विविध उल्लेख आढळतात. पण बहुधा ऐतिहासिक दृष्ट्या ग्राह्य धरता न येण्याजोगे. एके ठिकाणी म्हटले आहे की ऍना मारिया गरोदर राहिली तेव्हा योहान हीडलर महाशय तेव्हा ग्राझमध्ये नव्हतेच. तो पराक्रम श्रीमंत फ्रांकेनबर्गर यांच्या १९ वर्षीय लाडक्या चिरंजीवांचा. म्हणून मग मारिया ज्या कुटुंबात काम करीत होती त्यांना तिच्या गरोदर असल्याची चाहूल लागल्यावर तिथून तिला आपल्या स्ट्रोन्स येथील आईवडिलांकडे जावे लागले. त्यामुळे ऍलॉईस शिकेलग्रुबरचा खरा बाप हा फ्रांकेनबर्गर नावाच्या धनाढ्य ज्यू गृहस्थाचे लाडावलेले १९ वर्षीय चिरंजीव असण्याची शक्यता आहे’ असे काहींचे मत आहे. साहाजिकच आपल्या बापाच्या शरीरात फ्रांकेनबर्गर या ज्यू माणसाचे रक्त असू शकते त्यामुळे तो अर्धा ज्यू (फ्रांकेनबर्गर) असू शकतो हा सल हिटलरला ते कळल्यापासून मरेपर्यंत राहिला असावा असे बर्‍याच ठिकाणी म्हटले जाते. १९३१ साली वावड्या उठल्या की हिटलरचा वडीलांकडचा आजा ज्यू होता. फक्त विष्णूनेच अवतार घेतले असे नाही. रामायणातल्या रजकाचा हा कलीयुगातला ज्यू अवतार असावा. अतिरेकी वंशाभिनान असलेल्या हिटलरला आपण कसे शुद्ध रक्ताचे किंवा शुद्ध वंशाचे हे सिद्ध करावेसे वाटले नाही तरच नवल. याबद्दल जास्त माहिती काढण्यासाठी हिटलरने हे प्रकरण एस एस या नावाने नंतर कुख्यात झालेल्या शूट्झस्टाफेल या संस्थेकडे दिले. हिटलरचा वंशवृक्ष शोधून काढायच्या कामगिरीवर रुडॉल्फ कोपेनस्टाईनर याची नेमणूक झाली. याचा अहवाल नंतर १९३७ मध्ये पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. "Die Ahnentafel des Fuehrers" (The pedigree of the leader) हे त्या पुस्तकाचे शीर्षक. त्यात हिटलरचा वंशवृक्ष प्रसिद्ध झाला असून हिटलरचे कुटुंब हे ऑस्ट्रियन जर्मन असून त्यांचे कोणतेही पूर्वज ज्यू नसून हिटलर हा शुद्ध आर्यनवंशाचा आहे असे प्रशस्तिपत्रक आहे. ऍडॉल्फ हिटलरचे चरित्रकार रॉबर्ट पेन आणि जॉन टोलॅंड तसेच सुप्रसिद्ध लेखक विल्यम शिरर देखील तपशिलातल्या थोड्याफार फरकाने अशीच नोंद करतात असे जालावर म्हटलेले आहे. विल्यम शिररने असे कुठे म्हटले त्याचा उल्लेख मात्र तिथे नाही. राईज ऍंड फॉल ऑफ़ द थर्ड राईश मध्ये तसा उल्लेख केलेला मला आठवत नाही. ते पुस्तक मी वाचल्याला आता काही वर्षे लोटली आणि याबद्दलचा उल्लेख मला आता तरी आठवत नाही. न्यूरेंबर्ग खटल्याच्या वेळी हान्स फ्रांक म्हणाला की त्याला हिटलरने १९३० मध्ये सांगितले की हिटलरचा एक नातेवाईक हिटलरचा वडिलांकडून असलेला ज्यू वांशिक संबंध चवाठ्यावर आणण्याची धमकी देऊन हिटलरला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करीत होता. हिटलरचा सावत्र भाऊ ऍलॉईस ज्युनियर याचा मुलगा पॅट्रीक हिटलर हाच तो नातेवाईक असे एका संस्थळावर म्हटले आहे. तेव्हा हिटलरने फ्रांकला सत्य शोधून काढायला सांगितले. फ्रांकने या प्रकरणाचा शोध घेतला. मारिया ऍना शिकेलग्रुबर हिने जेव्हा ऍलॉईसला जन्म दिला तेव्हा ती ग्राझ येथे फ्रांकेनबर्गर कुटुंबात स्वयंपाकीण म्हणून काम करीत होती असे फ्रांकने केलेल्या चौकशीत आढळून आले असे त्याने हिटलरला सांगितले होते. महाजालावर विविध संस्थळांवर बरेच उलटसुलट वाचायला मिळाले. थिसेन आणि कोहलर Thyssen and Koehler या इतिहासकारंच्या मते तर चॅन्सेलर डॉल्लफस याने ऑस्ट्रीयन पोलीसांना मारियाबद्दल माहिती काढायला फर्मावले होते. त्या गुप्त अहवालानुसार मारिया जेव्हा गर्भवती झाली तेव्हा ती बॅरन सॉलोमन मायर फॉन रॉथ्सचाईल्ड - Baron Salomon Mayer von Rothschild यांच्याकडे व्हिएन्ना इथे काम करीत होती. बॅरन म्हणजे उमरावाचा अधिकृत वारस. उमराव हे त्या सरंजामशाहीच्या काळी फारच धनाढ्य गृहस्थ असत हे बहुतेकांना ठाऊक आहेच. ती गर्भवती आहे हे कळल्यावर तिची स्पिटाल इथे रवानगी केली गेली. अशा तर्‍हेने हिटलर १/४ ज्यू होता असे या संस्थळावर म्हटलेले आहे. हा गुप्त अहवाल डॉल्लफसने ऑस्ट्रीयाचा दुसर्‍या महायुद्धाच्या वेळचा चॅन्सेलर शूशनिग Schuschnigg याच्याकडे सुपूर्द केला. हा गुप्त अहवाल हसतगत करण्यासाठीच हिटलरने एवढे मोठे हत्याकांड घडवून आणले. तर दुसर्‍या एका संस्थळावर म्हटले आहे की हिटलरची राजकीय ताकद जरा वाढू लागल्यावर सन १९२० च्या दशकात केव्हातरी त्याच्या राजकीय विरोधकांनी ही वावडी उठवली. पण या वावडीला प्रसिद्धी १९३०च्या नंतर मिळाली असावी. ज्यूविरोधी जनतेची मते हिटलरला मिळू नयेत म्हणून. जसे बोलणार्‍याचे तोंड कोणी धरू शकत नाही तसेच लिहिणार्‍याची लेखणी वा टंकणार्‍याचा कळफलक आपण धरू शकत नाही. सारेच तर्कवितर्क. सत्य काय ते ऍना मारियाबरोबरच गाडले गेले. इयान करशॉ - Ian Kershaw आणि इतर जवळजवळ सर्व इतिहासकारांनी ही ‘ज्यू’ शक्यता फेटाळून लावली आहे. इतिहास अशा लिखित आधार नसलेल्या दंतकथा ग्राह्य धरीत नाही. हिटलर हा ऍलॉईस शिकेलग्रुबर-हिटलर याची तिसरी पत्नी क्लारा हिचा मुलगा. आपल्या पहिल्या पत्नीपासून त्याला ऍलॉईस ज्युनिअर हिटलर हा मुलगा झाला होता. म्हणजे हा ऍलॉईस ज्यूनिअर हिटलर हा क्रूरकर्माचा सावत्र भाऊ. या ऍलॉईस ज्युनिअर हिटलरचा मुलगा पॅट्रीक हिटलर. म्हणजे क्रूरकर्मा ऍडॉल्फ हिटलरच्या मोठ्या सावत्र भावाचा मुलगा हा पॅट्रीक हिटलर. ऍडॉल्फ हिटलर जेव्हा चॅन्सेलर झाला तेव्हा पॅट्रीक इंग्लंडमध्ये होता. पण जर्मनीचा सर्वेसर्वा ऍडॉल्फ हिटलर आपला काका आहे हे त्याला ठाऊक नव्हते. त्याने त्याच्या बापाला म्हणजे ऍलॉईस ज्युनिअरला म्हणजे हिटलरच्या सावत्र भावाला पत्र लिहून नाते वगैरे आहे का म्हणून विचारले. पण ऍडॉल्फने त्याला उत्तर पाठवून बोलावून घेतले. ऍलॉईस ज्युनिअरला आपल्या बापाने दत्तक घेतले असल्यामुळे आपला काही संबंध नाही आणि माझ्या घराण्याबद्दल जाहीर वाच्यता होता नये असा दम त्याला ऍडॉल्फ हिटलरने दिला. आता अमेरिकेतील वृत्तपत्रांना काहीतरी मसाला पुरवून पैसे मिळवता येतील असे वाटल्यामुळे त्याने अमेरिकन वृत्तपत्रांशी संधान साधले. एका फ्रेंच वृत्तपत्राने देखील पॅट्रीकचा मजकूर छापून धोडाफार धुरळा उडवला. त्यात त्याने ऍडॉल्फ हिटलरच्या तोंडी वरील अर्थाची वाक्ये घातलेली आहेत. २० एप्रिल १९९० रोजी पीट्सबर्गचे संशोधक डॉ. एरिक लीफ डेव्हीन न्यूयॉर्क टाईम्समध्ये म्हणतात की हा धुरळा उडेपर्यंत हिटलरला यातले काहीच ठाऊक नव्हते. लहानपणापासून त्याला स्वतःची ओळख ऍडॉल्फ हिटलर म्हणूनच होती. युद्धातील डावपेच म्हणून दोस्त राष्ट्रांनी या प्रकरणाला प्रसिद्धी दिली. तरीही रुडॉल्फ कोपेनस्टाईनरचा अहवाल आपण नाकारू शकत नाही. इतिहासकारांनी देखील पण तो नाकारलेला नाही. पण तरीही काही ठिकाणी म्हटले जाते की या कोपेनस्टाईनर आयोगाने चौकशीचे काम केले नाही तर जुने पुरावे नष्ट करून नवे बनावट पुरावे उभे करायचे काम केले. काही असले तरी जेत्यांच्या इतिहासकारांनी पराभूत जर्मनांची बाजू घेणारी खोटी बाब इतिहासात लिहायला कारण काय असू शकेल असा प्रश्न मनात उभा राहतोच. ते कारण मात्र कुठे दिसत नाही. संशोधन दिशांकित करून; नव्हे संशोधनाची दिशाभूल करून समाजाचा बुद्धिभेद करण्याचा हा खोडसाळ प्रयत्न आहे असे मानायला जागा आहे. शिवाय जो आरोप हे संस्थळ १९३१ च्या हिटलरच्या चौकशी आयोगावर करते तोच आरोप कोणीही व्यक्ती अशा संस्थळांवर करू शकते. सन २०१० मध्ये काही इतिहाससंशोधकांनी हिटलरचे दूरचे वंशज असलेल्या नातेवाईकांच्या रक्ताचे वगैरे नमुने घेऊन त्यांच्या जैव अनुवंशिकतेत ज्यू अंश सापडतो का हे पाहिले. परंतु त्यातही निर्णायक असे काही सापडले नाही. हिटलर राजकारणात पडण्यापूर्वी एक साधा कॉर्पोरल म्हणजे सामान्य शिपाई होता. चॅन्सेलर झाल्यानंतर तो केवळ सत्तेच्या जोरावर सेनाप्रमुख झाला. सैन्यातला सर्वोच्च अधिकारी असलेल्या हिंडेनबर्गला हिटलरसारखा एक सामान्य दर्जाचा कॉर्पोरल हा जर्मनीचा चॅन्सेलर व्हावा असे वाटत नसे. चर्चिलने पण ही माहिती काही प्रमाणात शोधून काढली. त्यात बोहेमियन लोकांना इतर जर्मन लोक हीन वंशाचे समजत. हा साम्राज्यशाहीचा, सरंजामशाहीचा कट्टर पुरस्कर्ता असलेला गर्विष्ठ चर्चिल हिटलरचा उल्लेख खाजगीत ‘दॅट बोहेमियन कॉर्पोरल शिकेलग्रुबर’ असा तुच्छतेने करीत असे. हिटलरला हे कळले होते की नाही ठाऊक नाही. कळले असेल तर कळल्यावर हिटलरचा नक्कीच तिळपापड झाला असेल. मयमहालात दुर्योधन पाण्यात पडल्यावर द्रौपदीने त्याला आंधळ्याचा मुलगा आंधळा म्हणून हिणवल्यावर कसे वाटले असेल कोण जाणे. रामायणातल्या धोब्याचा अवतार युरोपात होता, नारदमुनींचा होता की नाही कोण जाणे. होता असला तर त्याने हे नक्कीच हिटलरला सांगितले असेल. आपल्याला ठाऊकच आहे की आर्यन वंशाचे जर्मन हे अखिल मानवजातीत सर्वश्रेष्ठ असून बाकी सारे हीन वंशाचे आणि दूषित रक्ताचे आहेत असे हिटलरचे वैयक्तिक तत्त्वज्ञान आणि वैयक्तिक मत होते. माईन काम्फमध्ये हिटलर अशाच अर्थाचे लिहितो. १९३६ बर्लिन ऑलिंपिकमध्ये त्याने इथिओपियाचे कृष्णवर्णीय राजे महाराज हेले सिलासी यांच्याशी हस्तांदोलन करण्याचे नाकारले. परिणामी कोणाही ऑलिंपिकविजेत्याशी हस्तांदोलन करण्यास त्याला आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने मज्जाव केला. काही असले तरी एक गोष्ट मात्र ध्यानात आली की तथाकथित ज्यू रक्त हिटलरच्या शरीरात नसले तरी हिटलरचा बाप मात्र हिटलरच्या आजीला तिच्या विवाहापूर्वी झालेले अपत्य होता. तो धार्मिक दृष्ट्या कर्मठ काळ लक्षात घेतला तर ही काही साधी गोष्ट नव्हे. अनौरस अपत्यांचा सुळसुळाट जरी युरोपात झाला असला तरी त्या अपत्यांना आणि त्या अपत्यांच्या मातांना तत्कालीन कर्मठ सरंजामी समाजात प्रतिष्ठा वगैरे मिळणे शक्यच नसणार. त्यांना अवहेलनेचीच वागणूक मिळाली असणार. ऍना मारियाची आणि ऍलॉईसची बरीच परवड झाली असणार. श्री. पंढरीनाथ सावंत लिखित हिटलरविषयी पुस्तक वाचनात आले आणि एकीकडे ऍना मारियाची परवड तर दुसरीकडे हिटलरचा अतिरेकी वंशाभिमान हा विरोधाभास पाहून गंमत वाटली तर ऍना मारिया शिकेलग्रुबरविषयी कणव देखील वाटली. अशा संमिश्र भावना मनांत दाटून आल्या. पुस्तक लेखक सावंत यांना, महाजालावरील या विषयातल्या उपलब्ध माहितीला आणि विलियम शिररला तसेच हिटलरच्या चरित्रकारांना अनेक धन्यवाद. गेल्या दोन वर्षात आणखी एक खास पुस्तक वाचनात आले. त्या वाचनातून अनेक प्रश्न मनात उभे राहिले. वंशश्रेष्ठत्त्वाची, जातिश्रेष्ठत्त्वाची भावना कशी आली असावी? श्रेष्ठत्त्वाचे निकष कोणते, श्रेष्ठत्त्व कोणत्या गुणांवर ठरते, अनुवंशिकता म्हणजे काय? गुणधर्म एका पिढीतून दुसर्‍या पिढीत कसे संक्रमित होतात, वैज्ञानिक दृष्ट्या मात्र अमुक एक जात किंवा वंश श्रेष्ठ आहे असे आपण म्हणू शकतो का? वगैरे प्रश्न मनात उभे राहिले. त्यातूनच नुकतीच पूर्ण झालेली, भरपूर अवांतर फाफटपसारा खच्चून भरलेली जीवनगाणे ही लेखमाला चित्रविचित्र वळणे घेत उभी राहिली. खरे तर जात, जमात, टोळी यातून मानवाची काही आदिम वैशिष्ट्ये दिसतात. काही गुणधर्म तर काही जातीत अद्वितीय असे असतात. एखाद्या घरात बहुतांश मुलेमुली कलावंत असतात तर एखाद्या घरी सरस्वतीचे वरदान असते. एखाद्या घराला गुन्हेगारीचा शाप असतो तर काही कुटुंबात यशस्वी उद्योजकांची परंपरा असते. काही जमाती दीर्घायुषी असतात तर काही जमातीत गंभीर अनुवंशिक आजार दिसतात. अर्थात हे १०० टक्के नव्हे पण एखाद्या जातीतले किंवा कुटुंबातले सर्वसाधारण सरासरीपेक्षा तौलनिक दृष्ट्या लक्षणीय प्रमाणात जास्त संख्येने असलेले प्रमाण आहे. भारतीय समाजातील बहुतांश व्यक्तींना स्वतःची जात ही श्रेष्ठ आहे असे वाटते. संगमनेरात एक म्हण आहे, 'बारा शहरी बरोबर एक संगमनेरी’. कोकणी माणूस तर कोणत्याही जातीचा असो, स्वतःला सर्वश्रेष्ठच आणि जगातला सर्वात बुद्धिमान माणूस समजतो. (मी देखील कोकणीच बरे का!) यात काही वाईट नाही. स्वतःला श्रेष्ठ समजले तर अंगी सकारात्मक दृष्टीकोन बाणतो आणि प्रगती होते. परंतु इतरांना तुच्छ लेखणे, इतरांचा द्वेष करणे मात्र नक्कीच वाईट आहे. महात्मा गांधींची हत्या झाली? द्या ब्राह्मणांची घरे पेटवून. इंदिरा गांधींची हत्या झाली? कापा शिखांना. राखीव जागांचा फायदा मिळतो? छळा दलितांना. मानाने जगायचा प्रयत्न करतात? करा दलितांवर अनन्वित क्रूर अत्याचार. हे पाहून मन विषण्ण होते. शेकडो वर्षातून शेकडो होळ्या पार पडल्या तरी या विषाचे काही अद्याप दहन होऊ शकले नाही. प्रत्येक वाचकाच्या भावना, मते अर्थातच यापेक्षा वेगळी असू शकतात. या प्रश्नांची उत्तरे आपली आपण विश्लेषण करून शोधावीत आणि निष्कर्ष काढावेत हे बरे. असो. या लेखात अवांतर फापटपसारा भरपूर झाला असला तरी पुस्तकपरिचय हा या लेखाचा मुख्य विषय आहे. राजकारणात पडल्यापासूनच्या हिटलरबद्द्ल मराठीतून बरेच लिहिले गेले आहे. परंतु त्याअगोदरचे, हिटलरच्या बालपणाबद्दल, फारच कमी लिहिले गेले आहे, म्हणून हे पुस्तक त्यांनी लिहिले असे लेखकमहाशय प्रस्तावनेत म्हणतात. दोन्ही पुस्तकांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत. १. पुस्तकाचे नाव: ऍडॉल्फ हिटलर लेखक: पंढरीनाथ सावंत प्रकाशक: अनिल रघुनाथ फडके, १०२ सी, माधववाडी, खोली नं. ११, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मार्ग, दादर मध्य रेलवे स्टेशनसमोर, दादर पू., मुंबई ४०० ०१४ पहिली आवृत्ती: दासनवमी २२ फेब्रुवारी २००६. पृष्ठसंख्या:३०४ किंमत रु. ३००/- २. रोझलिंड फ्रॅंकलीन ले.: वीणा गवाणकर प्रकाशक दिलीप माजगावकर, राजहंस प्रकाशन, १०२५,सदाशिव पेठ, पुणे ४११०३० टे.: ०२०-२४४७ ३४५९, फॅक्स: २४४३ ३७१९. rajhans1@pn2vsnl.net.in पहिली आवृत्ती: २० जुलै २००९. पृष्ठे : १४४ किंमत रु. १३०/-
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

उत्तम लेख. आपल्या अंगातील ज्यू रक्ताची शक्यता नाकारण्यासाठी हिटलर अधिक कट्टर ज्युद्वेष्टा बनला अशी एक उपपत्ती वाचल्याचे आठवते.

हिटलरचा वंशाभिमान अतिरेकी असेल, पण देशाभिमान मात्र वाखाणण्या जोगा होता. ह्या माझ्या प्रतिसादावर आपला "उगा काहितरीच" हा प्रतिसाद वाचून जरा आश्चर्य वाटले. माझे काही चुकले असेल तर कृपया अधिक माहिती पुरवावी ही विनंती, जेणेकरून माझा भ्रम दूर होऊ शकेल. धन्यवाद.

बरं. प्रयत्न करतो. हिटलरच्या लेखी वंशाभिमान आणि देशाभिमान हे अद्वैत होतं. किंबहुना देशाभिमान हा वंशाभिमानाचा सबसेट होता. "जगात आर्य श्रेष्ठ, आणि जर्मनी जर पूर्ण-आर्य झाला तरच तरणोपाय आहे." हे त्याच्या "माईन काम्फ"चं सार म्हणता येईल. हिटलरला त्याच्या जर्मनीत ज्यू आणि मिश्रवंशीय तर नकोच होते, पण अंध, अपंग, समलैंगिक, तार्तर, भटक्या जमातीही नको होत्या. त्यांचंही घाऊक शिरकाण त्याने केलं. (परवा आपले मिपाकर मित्र जाऊन आले तो डखाऊचा कॅम्प १९३३ मध्ये सुरू झाला होता तो याच कारणासाठी.) हिटलरची भारतीयांविषयीची मतं तर मुळातूनच वाचण्यासारखी आहेत. म्हणजे, याचाच अर्थ - हिटलरला जर्मनी "होता तसा", सर्व विविधतेसह नको होता, तर जर्मनीमधले त्याला प्रिय असे घटक घेऊन त्यांना तो जर्मनी म्हणत होता! त्याला देशाभिमान नव्हता, "सोयिस्कर-काहितरी-अभिमान" होता आणि त्याला तो देशाभिमान म्हणत होता! --इथे फॅक्ट्स संपतात-- आता प्रश्न उरतो - "सोयिस्कर-काहितरी-अभिमान" होता त्याला वाखाणावं का? तर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर - तुमच्यापुरतं - तुम्ही शोधा. -

हिटलरने आपल्या अपमानित राष्ट्रासाठी जे काही केले ते खरोखरच अतुलनीय आहे. हिटलरचा इतिहास माहीत नसताना फक्त त्याने युद्धात केलेला संहार आणि ज्युंची केलेली कत्तल म्हणून त्याला शिव्या देणारे भरपूर जण आहेत. जर आपल प्रभुत्व गाजवायच असेल तर प्रथम त्या लायकीच व्हाव लागत आणि हिटलरने तेच केल. मी हिटलरने महायुद्धात नेमक काय जिँकल होत तेच सांगतो-: 1) फ्रान्सकडुन व्हर्सायच्या तहान्वये गेलेला RHINELAND प्रांत सार प्रांत, AUSTRIYA हा 70 लाख लोकसंख्येचा प्रदेश, त्याचप्रमाणे झेकोस्लोवहाकिया, हंगेरी हे देश फक्त धमकीच्या जोरावर रक्ताचा एकही थेंब न गाळता त्याने युद्धाआधीच मिळवले. 2) पोलंडचा तीन आठवड्यात फडशा पाडुन पोलंड मिळवला. 3) 15 दिवसात डेन्मार्क आणि नाँर्वेच्या राजांना बिनशर्त शरणागती पत्करायला लावली. 4) ज्या फ्रान्सने पहिल्या महायुद्धात जर्मनीला रेल्वेच्या डब्यात शरणागती पत्करायला लावुन आपल्या शौर्याचे प्रतिक म्हणुन तो डबा आपल्या देशात नेला होता त्याच फ्रान्सचा महिन्याच्या आत पाडाव करुन देशाच्या अपमानाचा बदला घेताना त्याच रेल्वेच्या डब्यात फ्रान्सच्या प्रमुखांना 22 जुन 1940 ला शरणागती पत्कारत शस्त्रसंधी करार करायला लावला. फ्रान्सच्या लष्करी कमकुवतपणाचा अंदाज फक्त हिटलरलाच आला होता त्यामुळे सेनानीँच्या विरोधाला न जुमानता त्याने फ्रान्सचा पराभव केला. 5) ज्या ब्रिटीशांच्या संपुर्ण जगात वसाहती होत्या त्या ब्रिटीशांना एकट्या हिटलरने BLITZCREIG तंत्राचा वापर करुन पळता भुई थोडी केली. भुमध्य समुद्रातील क्रिट बेट मिळवत ब्रिटीशांना पाऊल ठेवायला जागा ठेवली नाही आणि रोमेलच्या साहाय्याने इजिप्तला पराभुत करुन इंग्लंडला सगळ्या बाजुंनी कोँडले. 6) बाल्कन प्रदेशात हिटलरने युद्ध करुन ग्रीकांना पराभुत केले आणि युगोस्लोव्हाकियाचा घास गिळला. 7) मुत्सद्देगिरीच्या जोरावरच रुसो-जर्मन कराराची अभुतपुर्व घटना हिटलरने घडवुन आणली. पहिल्या महायुद्धात पश्चिम आघाडी उद्ध्वस्त करण्यासाठी जर्मनीला 4 वर्ष लागली होती पण हा चमत्कार हिटलरने केवळ सव्वा महिन्यात केला. इतरांचे राष्ट्रीय नेत्रुत्व दुबळे पडत असेल तर ती दुर्बलता अचुक हेरुन वाढवली हिटलरनेच...! त्याच्या या सर्व विजयाची तुलना केवळ फ्रेडरिक द ग्रेट किँवा नेपोलियन बोनापार्ट यांच्याशीच होऊ शकत होती.हिटलर 19 व्या शतकातील सर्वशक्तीमान व्यक्तिमत्व होते. जर्मन राष्ट्रवादाला त्याने अशी फुंकर घातली की सारे जग स्तिमीत झाले. जर्मनीवर अखंड 12 वर्षे तर युरोपवर 4 वर्षे सत्ता प्रस्थापित केली. पहिल्या महायुद्धात झालेल्या अपमानाचा सुड घेतल्याचे समाधान त्याने जर्मनीला मिळवुन दिले. लक्षात ठेवा कोणतेही युद्ध भयानकच असते पण देशाची बेईज्जत त्यापेक्षा भयानक असते. हिटलरच्या ज्या विकासाविषयी मी सांगतोय तो काय होता ते सांगतो-: 1) हिटलरने शिक्षणाव्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवत शारिरीक शिक्षण सक्तीचे केले. 2) शेतक-यांची हलाखीची परिस्थिती सुधारण्यासाठी शेतजमिनीची विक्री बेकायदेशीर ठरवल्याने शेतकरी आपल्या शेतावर बांधला गेला. राईश अन्नसाठा यंत्रणेत शेतक-यांना अन्नधान्याच्या पुरेशा कायदेशीर व निश्चित किँमती बांधुन दिल्याने जर्मनी अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाला. 3) जे कारखानदार रोजगार वाढवुन बेकारी नष्ट करतील अशा कारखानदारांना करमाफी देण्यात आली. त्यामुळे कारखानदार व कामगार वर्ग हिटलरवर खुष होते. 4) जर्मनीने आर्थिक क्षेत्रातप्रगती केली ती शस्त्रोत्पादनां च्या धोरणामुळेच. या सर्व योजनेला युद्धकालीन अर्थकारण म्हणतात. 5) हिटलरने CHANCELLER होताच सर्व राजकीय व सामाजिक संघटनांना शरणागती पत्करण्यास सांगुन पुर्ण जर्मनीला "एक विधान एक निशाण एक प्रधान" मिळवुन दिले. जे कार्य करण्याचे धारिष्ट्य प्रिन्स बिस्मार्क व वायमर प्रजासत्ताकला झाले नाही ते कार्य रक्ताचा एक थेंब न सांडता हिटलरने प्रत्यक्षात उतरवले. हिटलर राजवटीत 3 वर्षातच बेकारी नष्ट होऊन उद्योग आणि व्यापार यांची चक्रे प्रचंड गतीने फिरताना दिसु लागली. कोणत्याही अन्य राजवटीने 3 वर्षात एवढे यश मिळवले नसेल. हिटलरच्या या विकासाच महत्व अजुन वाढत कारण त्यावेळी जर्मनीतील परिस्थिती पुर्णतः प्रतिकुल होती. अशा परिस्थितीत हिटलर 30 जानेवारी 1933 ला जर्मनीचा CHANCELLER झाला आणि पुढील 5 वर्षात त्याने जर्मनीचा जो काही विकास केला त्यामुळे जर्मनीची गणती जगातील सर्वशक्तीमान राष्ट्रात होऊ लागली आणि 1 सप्टेँबर 1939 पर्यँत दुस-या महायुद्धास सामोरे जाऊन आपल्या अपमानाचा बदला घेण्याची ताकद या राष्ट्रात आली. हिटलरने कोणत्या परिस्थितीत विकास साधला हे जाणुन घ्यायला अगोदर जर्मनीतील प्रतिकुल परिस्थिती जाणुन घेणे आवश्यक आहे. 1) पहिल्या महायुद्धातील पराभवानंतर 1$ ला 4 MARKS असलेली जर्मन चलनाची किंमत 1$ ला 10000 MARKS एवढी कमी झाली होती. 2) व्हर्सायच्या तहाने जर्मनीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन जाचक अटी लादण्यात आल्या होत्या. प्रत्येक गोष्टीत जर्मनीला बाकी राष्ट्रांकडुन प्रथम परवानगी घ्यावी लागत होती अशा परिस्थितीत अन्यायाने त्रस्त जर्मनीला सावरले ते हिटलरनेच...!!! या तहाच्या सर्व अटी झुगारुन देत चतुराईने त्याने इंग्लंडकडुन 35% आरमार उभारण्याचे स्वातंत्र्य मिळवले आणि थोड्याच काळात जर्मनीला एवढे बलशाली बनवले की. ज्या इंग्लंड सारख्या देशांनी जर्मनीवर अटी लादल्या होत्या तेच देश युद्धाच्या भितीने हिटलरच्या अटी मान्य करु लागले होते. देशाच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावणाऱ्या राष्ट्रभक्त हिटलरला माझा सलाम....! साभार:चेपू हिटलर यात आपण सांगतात तो "सोयिस्कर-काहितरी-अभिमान" कोणता आहे हे जरा सांगाल का?

हम्म. माझ्या प्रतिसादाचा मुद्दा "वंशाभिमान = राष्ट्राभिमान" आणि "फक्त पाहिजे तेच लोक घ्यायचे आणि त्याला राष्ट्र म्हणायचं हे बरोबर नाही" असा होता. तरी, परत एकदा: - हिटलरने जर्मनीसाठी जे केलं असं तुम्ही लिहिलंय, ते मुख्यत्वेकरून आर्यवंशासाठी केलं - अन्यवंशीयांना कुत्र्यागत वागवलं (१९३८ बर्लिन ऑलिंपिकमधल्या सुवर्णपदक विजेत्या कृष्णवर्णीय अ‍ॅथलीटशी त्याने साधं हस्तांदोलनही केलं नाही) हिटलरचे (?) लष्करी विजय आणि तथाकथित आर्थिक प्रगती - "सिलेक्टेड फ्यू"साठी झालेली - याला कमीत कमी राष्ट्राभिमानाचं लेबल लावू नका. "युद्धात केलेला संहार आणि ज्यूंची केलेली कत्तल" यांच्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे "तसा चांगला आहे हो तो, पण बायकोला मारतो" किंवा "थोड्या चोर्‍यामार्‍या करतो, पण मनाचा लाख माणूस बघा" असली लंगडी समर्थनं देण्यासारखं आहे. ---- सौजन्यः चेपु हे वाचून जरा विरस झाला. "आईच्या गावात अन बाराच्या भावात" या चेपु पानाला संदर्भ म्हणून घेणं कितपत योग्य आहे ही आपापली आवडनिवड आहे. "हिटलरचा इतिहास माहीत नसताना..." वगैरे कोपरखळ्या मारायच्या आधी चेपुवरच्या लेखातली स्पेलिंग दुरुस्त केली असती आणि ठळक चुका सुधारल्या असत्या तर बरं वाटलं असतं.

इतिहासाला नाण्यासारख्या दोन बाजु असतात. युरोपातही परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. जितांचे आयुष्य जेत्यांनी लिहिलेल्या इतिहासावर कधीच तपासुन पाहु नये. नाझीवादाकडे पाहणे व हिटलरचे व्यक्तिगत आयुष्य पाहणे यात फरक आहे. हिटलरचे आयुष्य 56 वर्षांचे होते तर त्याने ज्यु लोकांवर केलेल्या अत्याचारांचा कालखंड फक्त 4 वर्षाचा होता. मग त्याचे उरलेले 52 वर्षाँचे आयुष्य आपण सहानुभुतीने तपासायला नको का...? जगाच्या इतिहासात एकाच आयुष्यात कायमस्वरुपी उलथापालथ करण्यासाठीच आपला जन्म होता अशी हिटलरची आपल्याविषयी कल्पना होती पण ती अगदीच अयथार्थ ठरली नाही कारण जगाच्या इतिहासात कुणी घडवली नव्हती एवढी उलथापालथ त्याने घडवली. हिटलरने ज्युंची केलेली कत्तल जर किळसवाणी असेल तर ब्रिटीश आणि स्टँलिन यांनी आपल्या देशात जी क्रुत्ये केली ती कमी लांच्छनास्पद नव्हती. अमेरिकेने निरापराध्यांवर अणुबाँम्ब टाकुनच युद्ध संपवले.हिटलर एवढे जेतेही पाशवी होते त्यामुळे हिटलरने ज्युंवर केलेले अपक्रुत्य नजरेआड करता त्याचे जे राष्ट्रवादी दिसुन येते ते समजुन घेतले पाहिजे. हिटलर मद्य,मांसाहार आणि तंबाखुसेवन या व्यसनांपासुन पुर्णपणे अलिप्त होता. जे जे जर्मन आहेत त्याविषयी विलक्षण प्रेम आणि ज्या जर्मनवंशाशी एकरुप न झालेल्या जाती देशात वावरत आहेत त्यांच्याविषयी अतोनात तिरस्कार या दोन भावनांनी त...ो जबरदस्त भारला गेला. हिटलर वयाच्या 20 व्या वर्षी पोरका झाला. व्हिएन्ना शहरात आल्यावर त्याला कोणताच व्यवसाय त्याला जमेना. त्याच्याकडे राहते घर नव्हते तर भुक हा त्याचा एकमेव साथीदार होता. व्हिएन्ना शहरात हिटलरने ज्युंना फार जवळुन पाहिले होते. हिटलर म्हणतो- "शहरातील वेश्याव्यवसाय आणि गुलामांच्या व्यवसायात मुख्यतः ज्युंचा हात आहे. जेव्हा माझ्या लक्षात आले निर्लज्ज ह्रुदयशुन्य ज्युच या शहरात चालणा-या किळसवाण्या धंद्यांचा चालक मालक आहे. तेव्हा माझ्या पाठीत एक सणक उत्पन्न झाली." आभार:हिटलर - आक्रमक सैनिक की एक राष्ट्र भक्त? आपल्या मुद्द्याबद्दल बोलायचे झाल्यास १) हिटलरने जर्मनीसाठी जे केलं असं तुम्ही लिहिलंय, ते मुख्यत्वेकरून आर्यवंशासाठी केलं:- असे जर खरे असते तर हिटलरने राजकारणात न येता "आर्यवंश महासंघ" स्थापन केला असता, "आर्यवंश जयंती" साजरी करत बसला असता व आर्यवंशासाठी आरक्षण मागितले असते, जरी त्याने जर्मन देशाचे नुकसान का होईना! २) अन्यवंशीयांना कुत्र्यागत वागवलं :- याची कारणे वरच विषद केली आहेत. ३)हिटलरचे (?) लष्करी विजय आणि तथाकथित आर्थिक प्रगती - "सिलेक्टेड फ्यू"साठी झालेली - याला कमीत कमी राष्ट्राभिमानाचं लेबल लावू नका:- उद्या तुम्ही म्हणाल महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह फक्त "सिलेक्टेड फ्यू"साठी (हिंदूंसाठी) केला होता कारण त्यांना मुसलमान या देशात नको होते. महात्मा गांधींनीच हिंदूंराष्ट्र बनवण्यासाठीच पाकिस्तान ची निर्मिती केली. खरी परिस्थिती आपल्याला ठावूक असावी अशी किमान अपेक्षा! ४)"युद्धात केलेला संहार":- एका राष्ट्राध्यक्षाने देशहितासाठी याची चिंता कधीच करू नये. ५)"ज्यूंची केलेली कत्तल":- तत्कालीन ज्यू जर्मन हितासाठी वागत नसावे हेच खरे कारण असावे.व्हिएन्ना शहरातील अनुभव परत एकदा वाचा. ६)चेपू वर जे काही आहे ते आपल्याला पूर्ण "माईन काम्फ" मध्ये सापडले नाही म्हणून दिले आहे.ते खोटे आहे का? परत एकदा म्हणेन कि हिटलर ने जे काही केले ते देशहित सर्वतोपरी ठेवूनच केले आहे. संपादित

ओके. संपादित अंश कळला नाही, पण आपलं एकमत होणार नाही यावर दुमत असू नये. त्यामुळे या चर्चेला माझ्याकडून इथेच पूर्णविराम देतो आहे.

+१. मलाही टॉम रीडलबद्दल वाचताना हिटलर आठवला होता. ७व्य भागातील सुरवातीचा डम्बलडोरचा भाग देखील हिटलरची आठवण करून देणारा.

वॉल्डी = हिटलर. परफेक्ट मॅच. ग्रेट हा विचार आधि कधी पुस्तक वाचताना केला न्हवता. मानणा पडेगा.

हॅरी पॉटरवर मला दुसऱ्या महायुद्धाचा प्रभाव नेहमीच जाणवला होता. वोल्ड्मोर्त - हिटलर डम्बलडोर - चर्चिल halfblood - ज्यु मगल्स - नॉन युरोपियन डम्बलडोरचा सातव्या भागातला मित्र (नाव आठवत नाही) - नित्शे आणि इतर जर्मन विचारवंत असे बरेच काही..

+१ डेथ इटर्स - नाझी दिमेंतोर - गेस्टापो

आपले लिखाण नेहमीच आवडते. या आधीची 'जीवन-गाणे' ही लेखमाला देखील आवडली होती.' हिट्लरच्या सावत्र वंशातील, इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या लोकांनी पुढे आपले आडनाव बदलून ते 'हेड्लर' असे केले असे वाचले आहे. ही माहिती आधी वाचली होती तरी अतिशय रंजक वाटली.

लेख आवडला महाभारतात अजगराने विचारलेला प्रश्नांचे उत्तर देताना युधिष्ठिर उत्तर देतो : वर्ण संकरतेमुळे कुठेच जाती शुद्धता उरलेली नाही. आचारच माणसाच्या श्रेष्ठत्वचा आधार आहे. उत्तम गुण असलेला शुद्र हा ब्राह्मण आहे आणि दुर्गुणी ब्राह्मणाला शुद्र समजावे.

हिटलरच्या अंगात ज्यू रक्त असल्याबद्दल कुठे कुठे काही वाचलेलं आहे. आता मूळ घटनांनंतर इतक्या वर्षांनी पुन्हा चिकाटीने याचा शोध घेणार्‍यांचं कौतुक वाटतं. पुस्तके मिळवण्याचा प्रयत्न करीनच.

कोकणी माणूस तर कोणत्याही जातीचा असो, स्वतःला सर्वश्रेष्ठच आणि जगातला सर्वात बुद्धिमान माणूस समजतो.
अगदी अगदी
उत्तम गुण असलेला शुद्र हा ब्राह्मण आहे आणि दुर्गुणी ब्राह्मणाला शुद्र समजावे.
सहमत

@आयुर्हित 7) मुत्सद्देगिरीच्या जोरावरच रुसो-जर्मन कराराची अभुतपुर्व घटना हिटलरने घडवुन आणली. पहिल्या महायुद्धात पश्चिम आघाडी उद्ध्वस्त करण्यासाठी जर्मनीला 4 वर्ष लागली होती पण हा चमत्कार हिटलरने केवळ सव्वा महिन्यात केला. इतरांचे राष्ट्रीय नेत्रुत्व दुबळे पडत असेल तर ती दुर्बलता अचुक हेरुन वाढवली हिटलरनेच...! चेंबर्लेन, शूशनिग इ. तसेच फ्रान्स, झेकोस्लोव्हाकियाचे राज्यकर्ते इ. च्या नाकर्तेपणाचे श्रेष्ठत्त्व हिटलरला: नवल आहे. त्यांची दुर्बलता हिटलरने वाढवली: कशी काय याचे विवेचन केलेले नाही. 2) शेतक-यांची हलाखीची परिस्थिती सुधारण्यासाठी शेतजमिनीची विक्री बेकायदेशीर ठरवल्याने शेतकरी आपल्या शेतावर बांधला गेला. राईश अन्नसाठा यंत्रणेत शेतक-यांना अन्नधान्याच्या पुरेशा कायदेशीर व निश्चित किँमती बांधुन दिल्याने जर्मनी अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाला. वि. ग. कानिटकरांनी याचे श्रेय जर्मनीतले तत्कालीन कृषीतज्ञ आणि कृषीमंत्री तसेच सतत तीन वर्षे शेतीला अनुकूल राहिलेले हवामान यांना दिलेले आहे. आपण ते हिटलरला देत आहात. अर्थात स्वत:चे मत असण्याचा आपल्याला अधिकार आहेच. @मा. खटपट्या साहेब: दुसरे युधिष्ठिराचे अवतरण मा. विवेकपटाईत यांनी दिलेले आहे, मनापासून धन्यवाद.

जर्मनीची आगळीक: १९३९च्या सुमारास जर्मनीने जाहीर केले होते की व्हर्सायच्या तहात गमावलेला सगळा प्रदेश जर्मनीने जिंकलाच पाहिजे. शिवाय, ज्या ज्या प्रदेशात जर्मनवंशीय व्यक्तींचे बहुमत असेल, ते प्रदेशही जर्मनीचेच भाग झाले पाहिजेत. जर्मनीच्या अधिकृत परराष्ट्र धोरणात म्हणले होते की पोलंड व चेकोस्लोव्हेकियातील काही प्रदेशात जर्मन बाहुल्य होते व तेथील जर्मनवंशीय व्यक्तींच्या हक्कांची पायमल्ली होत होती. त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी असे प्रदेश जर्मनीत असले पाहिजेत. युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान नेव्हिल चेम्बरलेन बरोबरच्या चर्चासत्रात हिटलरने अनेक पुरावे दाखवले ज्यानुसार जर्मनीच्या शेजारी राष्ट्रातील जर्मनवंशीय लोकांवर अत्याचार होत होते. या सबबीवर हिटलरने असे प्रदेश जर्मनीत समाविष्ट करण्याचा आग्रह धरला. हिटलरच्या या युक्तिवादाला जर्मन जनतेचा पूर्ण पाठिंबा होता. जर्मनीला पहिल्या महायुद्धात नामुष्की पत्करावी लागली होती. व्हर्सायच्या तहातील काही कलमे जर्मनीच्या आर्थिक व सैनिकी विकासाला जाचक होती. याच सुमारास जगभर आर्थिक मंदी सुरू होती, त्याचा प्रभाव जर्मनीवरही पडला होता. व्हर्सायच्या तहानुसार जर्मनीला सैन्य बाळगण्यावर कडक निर्बंध होते व प्रत्येक सैनिकी हालचालीबद्दल लीग ऑफ नेशन्स द्वारे परदेशी राजवटींना जबाब द्यावा लागत होता. ततः जर्मनीत गरीबी, बेकारी व असंतोषाचे लोण सर्वदूर पसरलेले होते. याचे भांडवल करून हिटलर व नाझी पक्षाने सत्ता मिळवली व हळूहळू लोकशाही व्यवस्थेत बदल करून अधिकाधिक हुकुमशाहीगत व्यवस्था जर्मनीत आली. नाझींनी जर्मनीला पटवून दिले की अनिर्बंध सत्तेशिवाय जर्मनीचा उद्धार कोणीही करू शकणार नाही. हळूहळू हिटलरने र्‍हाइनलँड व रुह्र प्रदेशात सैन्य उभारणीलाही सुरुवात केली. याशिवाय अश्या अनेक कृती केल्या ज्या व्हर्सायच्या तहाविरुद्ध होत्या परंतु जर्मन राष्ट्रहितकारक होत्या. याचा परिणाम जर्मन जनता हिटलरच्या मागे एकमुखाने उभी राहण्याचा झाला. हिटलर व नाझी पक्षाने याचे पूरेपूर फायदा घेतला. जर्मनवंशीयांवर अन्याय होत असल्याचे भासवून त्यांनी याकाळात अनेक इतरवंशीय व्यक्तींचे (रोमा जिप्सी, ज्यू, इ.) सर्रास शिरकाण सुरू केले. युरोपीय देशांची अति-सहिष्णुता व युद्धापूर्वीचे मैत्री-करार: जर्मनीत हे सुरू असताना ब्रिटीश व फ्रेंच सरकारने त्याविरुद्ध पावले उचलायच्या ऐवजी जर्मनीच्या तुष्टीकरणाचे धोरण अवलंबिले. त्यांना जर्मनीशी उघड संघर्ष टाळायचा होता कारण पहिले महायुद्ध संपून जेमतेम २० वर्षे होत होती. संपूर्ण युरोप त्यातून सावरत होता व अजून एक युद्ध झाल्यास युनायटेड किंग्डम व फ्रांसच नव्हे तर युरोपमधील प्रत्येक देशाला त्याची मोठी किंमत मोजावी लागली असती. त्यामुळे दोन्ही देशांनी जर्मनीला ढील देणेच पसंत केले. याचे पर्यवसान १९३८च्या म्युनिक करारात झाले. याआधी जर्मनीने चेकोस्लोव्हेकियातील काही प्रदेश बळकावले होते व अजून पुढे सरकण्याच्या तयारीत असताना फ्रान्स व ब्रिटनने जर्मनीची ही आगळीक मान्य केली व चेकोस्लोव्हेकियाचे प्रदेश जर्मनीला देउन टाकले. चेम्बरलेनने जाहीर केले की म्युनिक करार हा "आपल्या काळातील शांततेचेच प्रतीक" आहे. मऊ लागल्यावर कोपराने खणल्यासारखे जर्मनीने मार्च १९३९मध्ये उरलेले चेकोस्लोव्हेकियासुद्धा बळकावले. जर्मनीच्या मनसूब्यांबद्दल भ्रमात राहिलेल्या दोस्त राष्ट्रांकडे नुसते बघत बसण्यापेक्षा काही गत्यंतर नव्हते. या व अशा छोट्या-मोठ्या चालींनंतर वर्षभरात युद्धाला तोंड फुटले. म्युनिक करार निष्फळ ठरल्यावर ब्रिटन/फ्रांसना कळले की हिटलरच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून चालणार नव्हते व जर्मन महत्त्वाकांक्षा नुसते आसपासचे प्रदेश गिळंकृत करून थांबणार नव्हती. मे १९, १९३९ला पोलंड व फ्रांसने परस्पर-मैत्री करार केला व एकावर आक्रमण झाल्यास दुसऱ्याने मदतील धावून येण्याचे मान्य केले. ब्रिटन व पोलंडमध्ये असाच करार मार्चमध्ये झालेला होता. इकडे जर्मनी व सोवियेत संघाने ऑगस्ट २३, १९३९ला मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करारावर सह्या केल्या. या करारात जर्मनी व सोवियेत संघाने युरोप जिंकून घेणे गृहित धरले होते व त्यानंतर युरोप आपापसात कसा वाटून घ्यायचा याची नोंद होती. तोपर्यंत दोन्ही राष्ट्रांनी एकमेकांच्या सैनिकी कार्रवाईत दखल न देण्याचे कबूल केले व सोवियेत संघाकडून जर्मनीला खनिज तेल व इतर रसद पुरवण्याची तरतूद घातली. या कलमामुळे जर्मनीची उत्तर समुद्रातून येणाऱ्या मालवाहतूकीवरील भीस्त कमी झाली. पहिल्या महायुद्धात हा वाहतूकमार्ग रोखून धरुन ब्रिटनने जर्मनीच्या नाकीतोंडी पाणी आणले होते. ही तरतूद झाल्यावर हिटलरची पोलंड व वेळप्रसंगी ब्रिटन व फ्रांसशीही युद्ध करण्याची तयारी झाली. पुढचे पाउल होते ते काहीतरी कुरापत काढणे. जर्मनीने जाहीर केले की डान्झिगच्या स्वतंत्र शहरात जर्मन व्यक्तींवर अन्याय होत आहे व याचा उपाय करण्यासाठी जर्मनी डान्झिग व पोलंडमधील अन्य शहरे जिंकून घेईल. हे पाहून पोलंड ने ऑगस्ट २५रोजी युनायटेड किंग्डमशी नव्याने मैत्री करार केला, पण त्याचा जर्मन बेतांवर काही प्रभाव पडला नाही. जर्मनी व सोवियेत संघाचे पोलंडवर आक्रमण: जर्मन आक्रमकांशी लढणारे पोलिश सैनिक, सप्टेंबर १९३९सप्टेंबर १, १९३९रोजी जर्मनीने खोट्या पोलिश हल्ल्याची सबब सांगून पोलंडवर आक्रमण केले. युद्धोत्तर अहवालात कळून आले की पोलंडने केलेला जर्मन ठाण्यावरील तथाकथित हल्ला झालाच नव्हता. सप्टेंबर ३ला भारतासह(!) युनायटेड किंग्डम व फ्रांसने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. काही दिवसातच कॅनडा, ऑस्ट्रेलिया व न्यू झीलँडनेही त्यांचा साथ देण्याचे जाहीर केले. फ्रांसने जरी युद्ध जाहीर केले असले तरी त्यांची हालचाल संथ होती. सार प्रांतात नावापुरती चढाई केल्यावर काही दिवसात तीसुद्धा सोडून दिली. युनायटेड किंग्डमला नौसेनेच्या कवायती करण्याशिवाय काही करणे शक्य नव्हते. इकडे जर्मनीने पोलिश सैन्याची वाताहत करीत सप्टेंबर ८ रोजी पोलंडची राजधानी वॉर्सोपर्यंत धडक मारली. सप्टेंबर १७ला सोवियेत संघाने मोलोटॉव्ह-रिबेनट्रॉप करारात ठरवल्याप्रमाणे पोलंडवर पूर्वेकडून चाल केली. पोलिश सैन्याला आता दुसरी आघाडी उघडणे भाग पडले व त्यामुळे आधीच खिळखिळी झालेली बचावाची फळी कोलमडली. पराभव अटळ दिसताना पोलंडच्या राष्ट्राध्यक्ष व सरसेनापतीने दुसऱ्याच दिवशी रोमेनियात पळ काढला. वॉर्सोतील सैन्याने महिनाभर तग धरली पण ऑक्टोबर १ रोजी जर्मन सैन्य शहरात घुसले. ४-५ दिवस घराघरातून युद्ध करून ऑक्टोबर ६ला पोलिश सैन्याने हत्यारे खाली ठेवली. काही तुकड्या पळून शेजारील राष्ट्रांमध्ये गेल्या व तेथून त्यांनी भूमिगत सशस्त्र चळवळ उभारली. या चळवळीने युद्धाच्या अखेरच्या दिवसांत दोस्त राष्ट्रांची मोठी मदत केली. जरी राजधानी व जवळजवळ संपूर्ण देशाचा पाडाव झाला तरी पोलंडने अधिकृतरीत्या जर्मनीकडे शरणागती पत्करली नाही. खोटे युद्ध: पोलंडच्या पाडावानंतर १९३९च्या हिवाळ्यात जर्मनीने आपली वाटचाल तात्पुरती थांबवली. परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी आपली बचावफळी पक्की केली व पुढील हल्ल्यांची योजना आखणे चालू ठेवले. इकडे ब्रिटन व फ्रांसने आपले बचावात्मक धोरण चालूच ठेवले. एप्रिल १९४०पर्यंत कोणीच काही मोठी हालचाल केली नाही. वृत्तपत्रांनी या कालावधीला खोटे युद्ध अथवा सिट्झक्रीग असे उपहासात्मक नाव दिले अटलांटिकची लढाई :पूर्व युरोपमध्ये लढाई सुरू होताच उत्तर अटलांटिक समु्द्रात जर्मन यु-बोटींनी दोस्त राष्ट्रांच्या व्यापारी जहाजांविरुद्ध कारवाया सुरू केल्या. छुप्या पद्धतीने हल्ला करणाऱ्या या पाणबुड्यांची संख्या जास्त नसली तरी ही कसर त्यांनी त्यांची कुशलता, हिंमत व नशीबाने भरून काढली. ब्रिटीश क्रुझर एच.एम.एस. करेजस अशाच एका यु-बोटीला बळी पडली तर अजून एका यु-बोटीने एच.एम.एस. रॉयल ओक या युद्धनौकेला बंदरातून बाहेर पडण्याची संधी न देताच जलसमाधी दिली. युद्धाच्या पहिल्या चार महिन्यात यु-बोटींनी ११० जहाजे बुडवली व व्यापारी जहाजवटीवर भीतीचे सावट पसरवले. दक्षिण अटलांटिक समुद्रात जर्मन पॉकेट बॅटलशिप ॲडमिरल ग्राफ स्पीने ९ ब्रिटीश व्यापारी नौका बुडवल्या. अखेर एच.एम.एस. अजॅक्स, एच.एम.एस. एक्झेटर व एच.एम.एन.झेड.एस. अकिलीस ने तिला मॉँटेव्हिडियोजवळ गाठले. प्लेट नदीच्या लढाईत ग्राफ स्पीला पराभव अटळ दिसता तिच्या कप्तान हान्स लांग्सदोर्फ याने समुद्राकडे प्रयाण केले व पकडले जाण्यापेक्षा स्वतःच ग्राफ स्पीला जलसमाधी दिली. पॅसिफिक रणांगण (दुसरे चीन-जपान युद्ध):पूर्वेतील युद्ध युरोपच्या आधीच दोन वर्षे सुरू झाले होते. जपानने १९३१मध्ये मांचुरिया जिंकून तेथे तळ ठोकलेला होता. जुलै ७, १९३७ रोजी जपानने मांचुरियाची हद्द ओलांडून बिजींगवर (तेव्हाचे बिपींग) हल्ला चढवला. विद्युतवेगाने आगेकूच करीत जपानी सैन्य शांघायपर्यंत पोचले परंतु तेथे त्यांची प्रगती थांबली. डिसेंबर १९३७मध्ये शांघाय पडले व लगेचच राजधानीचे शहर नानजिंग (तेव्हाचे नानकिंग) ही जपानने जिंकले. चीनी सरकारने नानजिंगहून पळ काढून चॉँगकिंग येथे कामचलाऊ राजधानी उभारली. नानजिंग जिंकल्यावर जपानी सैन्याने तेथील युद्धकैदी व नागरिकांवर अनन्वित अत्याचार केले (पहा - नानकिंगची कत्तल)व एका महिन्यात सुमारे ३,००,००० व्यक्तींची कत्तल केली. दुसरे रशिया-जपान युद्ध: जपान व मंगोलियाच्या सरहद्दीवर खाल्का नदी आहे. मांचुरियातील जपानी राजवटीनुसार ही मांचुरिया-मंगोलियाच्यामधील हद्द होती. मंगोलियाच्या मते हद्द नदीपलीकडे ३० किमी पूर्वेस होती. मे ८, १९३९ रोजी ७०० मोंगोल घोडेस्वार नदी पार करून पूर्वेस आले. ते पाहताच मांचुरियन सैन्याने त्यांच्यावर हल्ला केला. काही दिवसातच सोवियेत संघाने मंगोलिया व जपानने मांचुरियाच्या सैन्याच्या मदतीला आपले सैन्य पाठवले व तुंबळ युद्धास सुरुवात झाली. सप्टेंबरपर्यंत चालू असलेल्या या युद्धात १८,००० जपानी तर ९,००० सोवियेत-मंगोल सैनिक मृत्यू पावले. येथे सुरू असलेले युद्ध थांबले नाही व जर्मनीशीसुद्धा लढायची पाळी आली तर सोवियेत संघाला दोन्ही आघाड्या संभाळणे कठीण गेले होते. सोवियेत संघाने मोलोटॉव्ह-रिबेनट्रॉप करारावर सही करण्यामागे हेही एक कारण होते. युद्ध पसरले - इ.स. १९४०: युरोपीय रणांगण सोवियेत संघाचे बाल्टिक देशांवर आक्रमण: जर्मनी व सोवियेत संघात युद्धाच्या आधी झालेल्या मोलोटॉव्ह-रिबेनट्रॉप करारानुसार फिनलंडला सोवियेत संघाचे मांडलिक राष्ट्र ठरवण्यात आले होते. त्यानुसार सोवियेत संघाने नोव्हेंबर ३०, १९३९ रोजी फिनलंडवर हल्ला केला. येथून सुरू झालेल्या युद्धाला हिवाळी युद्ध म्हणतात. सोवियेत संघाने फिनिश सैन्याच्या चौपट सैनिक पाठवले तरीही त्यांची पुरेशी प्रगती झाली नाही. फिनिश बचावाची फळी भक्कम होती व त्यांनी पहिला हल्ला रोखून धरला. हळूहळू लाल सैन्याने आपले हल्ले तिखट केले व फळी फोडण्यात यश मिळवले. फिनलंडने तहाची बोलणी सुरू केली व लेनिनग्राडला लागून असलेले व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाचे प्रदेश सोवियेत संघाला दिले. या अकारण सुरू केलेल्या युद्धाविरुद्ध जगातील इतर देशांनी विरोध दर्शविला व डिसेंबर १४ला सोवियेत संघाची लीग ऑफ नेशन्समधून हकालपट्टी झाली. यामुळे सोवियेत संघाला जणू अधिक आगळीक करण्याची मुभाच मिळाली. जून १९४०मध्ये त्यांनी लात्व्हिया, लिथुएनिया आणि एस्टोनियाचा पाडाव केला व तेथील सत्ताधारी व्यक्तींना सैबेरियातील गुलागमध्ये पाठवून दिले. याशिवाय सोवियेत संघाने रोमेनियाकडून बेसारेबिया व उत्तर बुकोव्हिना हे प्रांतही बळकावले. जर्मनीचे डेन्मार्क व नॉर्वेवर आक्रमण: सोवियेत संघ व फिनलंडमधील हिवाळी युद्ध संपताना जर्मनीने एप्रिल ९, १९४०ला एकाच वेळी डेन्मार्क व नॉर्वेवर ऑपरेशन वेसेरुबंग या सांकेतिक नावाखाली मोहीम काढली. डेन्मार्कने लगेचच नांगी टाकली पण नॉर्वेने प्रतिकार केला. युनायटेड किंग्डमने नॉर्वेवर चढाई करण्याचा बेत आखलेलाच होता. त्यांनी आपले सैनिक उत्तर नॉर्वेत उतरवले पण जूनपर्यंत जर्मन सैन्य वरचढ ठरले व दोस्त राष्ट्रांनी नॉर्वेतून काढता पाय घेतला. नॉर्वेच्या सैन्याने शरणागती पत्करली व जवळजवळ संपूर्ण नॉर्वे जर्मनीच्या ताब्यात आले. नॉर्वेचा राजा आपल्या कुटुंबियांसह लंडनला पळून गेला. नॉर्वेचा सागरी किनारा हातात आल्यावर जर्मनीने तेथे हवाई व नौसेनेचे तळ उभारले व आर्क्टिक समुद्रातून होणाऱ्या पुढील मोहीमेची तयारी सुरू केली. जर्मनीचे फ्रान्स व 'खालच्या देशांवर' आक्रमण: पॅरिसच्या शाँझ एलिझे रस्त्यावर जर्मन सैनिक, जून १९४०लक्झेम्बर्ग, बेल्जियम व नेदरलँड्स हे समुद्रसपाटीपासून समतल व काही प्रदेशात समुद्राच्या पातळीच्याही खाली आहेत म्हणून त्यांना लो कन्ट्रीज अथवा खालचे देश असे म्हणतात. मे १०, १९४० रोजी जर्मनीने या तीनही देश व शिवाय फ्रांसवर हल्ला केला. या घटनेने खोटे युद्ध संपले व खरे युद्ध परत सुरू झाले. जर्मनीला रोखण्यासाठी ब्रिटीश एक्स्पिडिशनरी फोर्स व फ्रेंच सैन्य उत्तर बेल्जियममध्ये घुसले. दक्षिणेत फ्रांसने मॅजिनो लाईनवर आपली बचावफळी तयार केलेली होती. तेथे जर्मन सैन्याला अडवून ठेवून उत्तरेत गनिमी काव्याने जर्मनीशी लढायचे असा त्यांचा बेत होता पण जर्मनीने ब्लिट्झक्रीग अथवा विद्युतवेगी युद्धाचा अत्युत्तम नमूना दाखवत फ्रेंच व ब्रिटीश सैन्याचा धुव्वा उडवला. इकडे लुफ्तवाफेने नेदरलँड्सच्या रॉटरडॅम शहरावर बॉम्बफेक करून शहराचा विनाश केला. हल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात वेह्रमाख्टची (जर्मन सेना) पॅन्झरग्रुप फोन क्लाइस्ट ही तुकडी सुसाट आर्देन्नेस पार करून गेली. दोस्त राष्ट्रांचा अंदाज होता की दाट जंगल असलेला हा प्रदेश यांत्रिकी व रणगाड्यांना पार करणे अशक्य होते. हा अंदाज चुकीचा ठरवत जर्मन सैन्याने सेदान येथे येउन धडकले. सेदानचे रक्षण करणारे सैन्यदल हे फ्रेंच सैन्याचे नेहमीचे सैनिक नव्हते. येथे हल्ला होण्याची शक्यता कमी असल्याकारणाने येथे कुमक जास्त नव्हती. वेह्रमाख्टने सहजगत्या बचावाची फळी फोडली आणि पश्चिमेकडे आगेकूच करीत थेट इंग्लिश चॅनेल पर्यंत जाउन पोचले. जर्मन सैन्याच्या दुसरे सैन्याने बेल्जियम, लक्झेम्बर्ग व नेदरलँड्सचा सहजगत्या पाडाव केला. आता दोस्तराष्ट्रांचे सैन्य दुभागले गेले व उत्तर फ्रान्स व खालच्या देशातले सैनिक जर्मन सैन्याच्या कचाट्यात सापडले. त्यांच्या समोर आता आत्मसमर्पण करणे किंवा पळ काढणे हेच पर्याय होते. ऑपरेशन डायनॅमो या मोहीमेंतर्गत ३,३८,००० दोस्त सैनिकांना डंकर्कहून उचलण्यात आले. युद्धनौका, होड्या, व मिळेल त्या तरंगणाऱ्या वाहनातून या सैनिकांनी इंग्लंड गाठले. जून १०ला इटली जर्मनीच्या बाजूने युद्धात उतरले व फ्रांसच्या दक्षिणेकडून त्यांनी हल्ला केला. जर्मन सैन्याने फ्रांसमध्ये अनिर्बंध कूच सुरू ठेवली व जवळजवळ सगळे फ्रान्स आपल्या टाचेखाली आणले. जून २२, १९४० रोजी फ्रांसने शस्त्रसंधीची याचना केली व शरणागती पत्करली. जर्मन सैन्याने पॅरिसमध्ये तळ ठोकला व आग्नेय फ्रांसमध्ये विची फ्रांस हे नावापुरते स्वतंत्र परंतु खरेतर जर्मनधार्जिणे सरकार बसवले. अशाप्रकारे बॅटल ऑफ फ्रांस ही एकतर्फी लढाई जर्मनीने जिंकून युरोपमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले साभार:दुसरे महायुद्ध