Welcome to misalpav.com
लेखक: संजय क्षीरसागर | प्रसिद्ध:
India Today Conclave 2014 मधे अत्यंत सधन, निष्पक्ष आणि विचारवंत लोकांसमवेत अरविंद केजरीवालांचा झालेला हा पूर्णपणे खुला संवाद तुमच्या-माझ्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो. दीड तास लोकांचं अवधान एकचित्त आहे आणि कुणाही पूर्वग्रहरहित व्यक्तीचं तसं राहील यात शंका नाही. स्वतःवर झालेल्या टिकेला दिलेली उत्तरं. स्वतः दुसर्‍यावर केलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण. झालेल्या चुकांची प्रांजळ कबुली. देशाला पुढे नेण्यासाठी सरकारनं काय करायला हवं आणि सामान्यांचा सत्तेतल्या सहभागाची अनिवार्यता. पंतप्रधानपदाच्या संघरात त्यांची भूमिका. आणि सरते शेवटी देशासाठी एक स्वप्न अशा बहुविध अंगांनी हा मनमोकळा संवाद एखाद्या मैफिलासारखा बहरलायं. प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याचा अत्यंत तर्कशुद्ध दृष्टीकोन, कमालीची सुसंगत विचारसरणी, कोणत्याही प्रश्नाला सामोरं जाण्याचं साहस आणि अत्यंत समतोल व्यक्तिमत्त्व या इंडिया टुडेच्या निष्पक्षिय चित्रफितीतून व्यक्त होतं. या देशासाठी एक विधायक स्वप्न पाहणार्‍या प्रत्येक सुजाण नागरिकाला या विडिओमुळे समोर आलेल्या संधीचं सोनं करता येईल या अपेक्षेनं आणि खरं तर विनंतीनं ही पोस्ट संपन्न करतो.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

त्याला विडिओ कशाला पाहायला हवा?
>>> करेक्ट ज्यांनी आधीच अभ्यासकरुन मतं बनवली असतील त्यांना व्हिडीयो पहायची गरज नाही. अर्थात आधीअभ्यासकरुन बनवलेल्या मतांना पुर्वग्रहदुषित म्हणु शकता आपण. किंव्वा बायसड माईण्ड म्हणु शकता ! शेवटी सगळा परसेप्शनस चा खेळ आहे ...

जर दिड तास वेळ नसला तर १ मिनिट २२ सेकंदांच्या खालच्या चित्रफितीत देखील अरविंदचे दिलखुलास बोलणे बघायला आणि ऐकायला मिळेल. (कुजबुज असल्याने कॅप्शन्स देखील वाचू शकता)....

>>> अरविंदकडे नैतिकता आहे ह्यो विरोध्कांचा कट हाय. आमी आमच्या डोळ्यावर्चा चश्मा, कानात्ला मळ आनी डोस्क्यात्ल खूळ आजाबात काडनार नाय. यकदाच सांगून ठिव्तो. कारन आमाला म्हाय्त हा की, >>> अरविंदकडे नैतिकता आहे +D ... +D ... +D

कंटाळा कसा काय ह्या खेचराना येत नाही ह्याचे आश्चर्य वाटते.बर मोदी भ्रष्टाचारी आहे असे मानले तरी ज्याचा भ्रष्टाचार सिध्द झाला आहे अश्या ए राजाविरोधात ह्याने उमेदवार का उभा नाही केला? महाराष्ट्रात फक्त गडकरी भ्रष्टाचारी आहेत मग शरद पवार काय साधुसंत आहेत काय? हा कधीच सोनिया गांधी किंवा राहुल गांधी विरुध्द बोलत नाही, मग ह्याची शेरकि दहाड आहे कि गधे का गायन?अरविंद हा एक वाघाचे कातडे पाघरलेला गाढव आहे. हा कोणत्या एका तत्वावर घट्ट आहे हे संजय क्षीरसागर तुम्ही आम्हाला आठवुन सांगा.

हा कधीच सोनिया गांधी किंवा राहुल गांधी विरुध्द बोलत नाही
जावयबापूंचा भ्रष्टाचार, हरयाणामधील DLF चे जमीन घोटाळे 'आप'ने बाहेर काढले.जेट्ली वा स्वराज ह्यांनी नाहीत्(वर मुलाखतीत म्हंटल्याप्रमाणे ही सर्व माहिती भाजपवाल्यांनाही होती.)
अश्या ए राजाविरोधात ह्याने उमेदवार का उभा नाही केला
'आप' अर्थातच राजकिय पक्ष आहे.त्यांनी राजकिय फायदा बघू नये अशी अपेक्षा करणे जरा अती वाटते.वरच्याच चालीवर म्हणायचे तर राहूल गांधी,चिदंबरम्,शरद पवार ह्यांच्या विरोधात अडवाणी,स्वराज्,जेटली का नाही उभे रहात?

पण आपचे साधारण 35-40 सिटा लागायचा जर चमत्कार घडला तर मात्र सत्ताधारी 5 वर्षे सुखाने झोप घेऊ शकणार नाही हे नक्की.

अनुमोदन, एकदा आप लोकसभेत गेली की मग या काँग्रेस+ भाजप युतीला बरोबर तडा जाईल.आपला निवडुण देणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे.जयहिंद.

ही दिल्ली नाहीये, की बहुमत मिळवण्या इतक्या संखेचे उमेद्वार आपकढुन उभे केले जावेत. आपने तेव्हडी संघटना दिल्लीत निर्माण केली होती तसे इतर राज्यांबाबत अजुनही केलेले नाही. इतर राज्यात "आपची" डेवीड वर्सेस गोलायथ मधील डेवीड म्हणूनच "हवा" झाली आहे, एक प्रभावशाली संघटना म्हनुण न्हवे. इन शॉर्ट आप कॅन नॉट बी स्बस्टेनशीअल थ्रेट टु इवन इडिओट्टा, पापे. मान्य आहे राहुल वर टिका म्हणजे त्याचे महत्वच। वाढवण्यासारखे आहे, पण म्हणून इतके टारगेट करायचे केजुला ? करणारच म्हणा कारण तो थ्रेट नाही, त्याचे सगळे उमेदवार जिंकले तरीही तो दिल्ली प्रमाणे सत्ता स्थापना करण्या इतपत मोठा नाही, ही खुणगाठ पक्कि आहेच आणी म्हणूनच फक्त त्याच्यावरच टिका करत राहुन मेडीयामधे अनुल्लेखाने कॉग्रेसची गेम करायची चालही. पण तरीही ताक किती फुंकुन प्यावे याला खरे तर मर्यादा नको काय ? ज्या कोणाला केजरीवाल पंतप्रधान व्हायची स्वप्न बघत आहे असे वाटते अथवा हे खरेच तसे आहे असे वाटते त्याला वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा.

ही दिल्ली नाहीये, की बहुमत मिळवण्या इतक्या संखेचे उमेद्वार आपकढुन उभे केले जावेत. आपने तेव्हडी संघटना दिल्लीत निर्माण केली होती तसे इतर राज्यांबाबत अजुनही केलेले नाही.
हे इतक्या खात्रीने कसे बोलावे? सोमवारपर्यंत आपचे ३१७ उमेदवार उभे राहिले होते. महाराष्ट्रात सगळ्या ४८ जागांवर उमेदवार आहेत. नी यापैकी कित्येक उमेदवार आणि त्यांनी राजकारणाबाहेर असताना केलेली समाजसेवा निव्वळ थोर आहे. तरीही इतकी खात्री!?

दिल्ली सोडून अन्य राज्यांत आपची अशी काय संघटना आहे ते पहायला आवडेल. त्या त्या ठिकाणचे कामसू इ. लोक आपल्याकडे घ्यायचा प्रयत्न आहे, पण दिल्लीच्या तोडीचं काही आहे का? उगा भप्पार्‍यांवर किती विश्वास ठेवायचा?

सर्वांच्या डोळ्यांवरचे झापड मे महिन्या अखेर उघडेलच. पण उशीर झालेला असेल. ज्याला राजा समजले तो प्यादाच निघाला. तवाकी नावाचा तरस

ते तवाकीचे सोडा हो. लालकृष्ण आणि अरुण नावाचे रेडे आणि सुषमा नावाची म्हैस महाबलीच्या पाठीत शिंग खुपसण्याच्या तयारीत आहेत ते बघा :)

>>> India Today Conclave 2014 मधे अत्यंत सधन, निष्पक्ष आणि विचारवंत लोकांसमवेत अरविंद केजरीवालांचा झालेला हा पूर्णपणे खुला संवाद तुमच्या-माझ्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो. दीड तास लोकांचं अवधान एकचित्त आहे आणि कुणाही पूर्वग्रहरहित व्यक्तीचं तसं राहील यात शंका नाही. तुमच्यासारखे "आप"चे समर्थक केजरीवालांच्या मुलाखती व भाषणेच ऐकतात. त्यांची कृती व त्यांची नाटके एकतर तुम्ही बघत नाही किंवा बघून न समजल्यासारखे करता. त्यामुळेच ते बोलतात त्याच्यावर तुमच्यासारख्यांचा भाबडेपणाने विश्वास बसतो. "आप"च्या दुर्दैवाने इतर जनता केजरीवालांची उक्ती आणि कृती यांची तुलना करत असते. त्यामुळेच ते "आप"विषयी साशंक असतात.

भारतातील पहिलाच मुख्यमंत्री असावा जो ओबामास्टाइल डायरेक्ट लोकांच्यात मिसळुन खुला संवाद साधतोय, ऐकुन घेतोय.मान गये केजरीवाल, गर्मी तो औरोने महसुस की जो मफलर तुमने ओढाथा.

यशवंतरावांपासुन बारामतीकर काकांपर्यंत सर्व मुख्यमंत्री लोकांमधे अगदी त्यातलेच एक बनुन मिसळायचे. पवारकाका आजही मिसळतात. आबा पाटिल (मुख्यमंत्री नसले तरी गृहमंत्री तर आहेत) पण तसेच. दिल्लीचे साहेबसिंग वर्मा, गोव्याचे पर्रिकर... किती नावे घ्यावीत. नेत्याचे नेतृत्वगुण, कर्तुत्व, पॉलिसी, अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा (वाद देखील) करता येते. व्यक्तीमहात्म्याची भुरळ पडणं देखील योग्य... पण अशी भुरळ ?? असो.

पंतप्रधान उमेदवार म्हणून केजरिपेक्षा जास्त योग्य वाटतात हे मी एका धाग्यावर नमूदही केलेले आहे. आणी हे जितके सत्य आहे तितकेच आप हां विरोधी पक्ष म्हणून असावा असेच वाटते. मला इन्केस मला भुरळ पडलीच असेल तर वैयक्तिक आवड निवड व देशाची गरज यातील फरकही माहीत आहे. तरीही ज्या वेगाने कजरी वर आला त्याच्या प्रसिध्दिची तुलना हिटलरच्या चढत्या कालखंडा सोबतच करावी वाटते. एका हार्मलेस व्यक्तीला टीकेचे असे धनी करणारे लोक बघितले की मात्र गंमत करायची विशेष लहर येते इतकच.

तसं मी जे काहि टंकलं ते केजरीसाहेबांच्या काळजीतुनच. लोकमतावर स्वार होण्याऐवजी हा बहाद्दर लोकभावनेवर स्वार होण्याची चिन्ह दिसताहेत. आणि खरच तसं झालं तर फार लवकर ते पायदळी तुडवल्या जाण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत तुडवल्या जातील जनतेची जाब विचारण्याची शक्यता व राजकारणाला मिळु लागलेलं स्वच्छ्तेचं परिमाण. तसंही, केजरीसाहेबांचा विस्तारणारा वर्तुळ बघितला तर साहेबांना लवकरातलवकर मखरात बसवण्याची घाई झालेले नव-बडवे दिसतील येत्या काळात(स्वतः साहेब देखील तोल सांभाळतील हा भरवसा वाटत नाहि मला). किमान जनतेने तसं करु नये हि इच्छा.

बोलायला काय माणूस काहीपण बोलतो, आणि त्यातून राजकारणी माणसाला तर वाट्टेल ते बोलायची जणू मुभाच असते. असल्या बोलण्यावर कितपत विश्वास ठेवावा याचं भान आपल्याला हवं.

अजून एक मिळाले... असे किती असतील कोण जाणे... :) केजूसमर्थकांकडून काय उत्तर मिळेल ह्याची जाणीव आहे. पण तशी देखील करमणूक होते आहे...

>>> अरविंदकडे नैतिकता आहे ह्यो विरोध्कांचा कट हाय. आमी आमच्या डोळ्यावर्चा चश्मा, कानात्ला मळ आनी डोस्क्यात्ल खूळ आजाबात काडनार नाय. यकदाच सांगून ठिव्तो. कारन आमाला म्हाय्त हा की, >>> अरविंदकडे नैतिकता आहे +D ... +D ... +D

राजकारणात तरबेज होतोय (कि झालाय ?) हा माणुस. गुजराथ का सच देखने गया था. त्यांनी जितका डाटा दिला गुजरात दौर्‍याचा, आणि ज्या घडामोडी झाल्या त्यादरम्यान... कोणि नि:ष्पक्षपणे अभ्यास करायला गेला तर खरच २-३ दिवसात इतका अभ्यास शक्य आहे काय? मला नाहि वाटत प्रॅक्टीकली शक्य आहे, अन्लेस तुम्ही अगोदर ठरवलं असेल कि काय "पहायचय" आणि काय सांगायचय. १०० गोष्टी ऐकवल्या मोदिंच्या विरुद्ध. एका अभ्यास दौर्‍यात त्यांना स्वतःहुन एक गोष्ट सुद्धा चांगली दिसु नये? मला नाहि वाटत. त्यांना गुजरात विकासाचय मॉडेलचं खरं रूप बघायचं होतं म्हणतात. मध्यंतरी मी एका टायर टु सिटी चा अभ्यास करायला घेतला होता. एकंदर कामाचं स्वरुप बघुन त्याकरता मला कमितकमि एक महिना लागेल असं एस्टीमेट समोर आलं. मी एक सर्व साधारण बुद्धीचा माणुस आहे. केजरीसाहेब माझ्यापेक्षा १० पट हुषार असावेत. तरीसुद्धा "गुजरात राज्याचं विकास मॉडेल" या पि.एच.डी. लेव्हलच्या अभ्यास विषयाला त्यांना किमान काहि महिने लागावे... अगदी डेडीकेटेड. अन्यथा २ दिवसाच्या ऑब्जर्व्हेशनमधे मोदीविरोधी केजरीवाल १० वाईट मुद्दे मांडेल व मोदीसमर्थक क्ष व्यक्ती १० चांगले मुद्दे मांडेल, मामला बराबर. त्यांच्या समोर काहि शिख शेतकरी रडले तसे कोणासमोर काहि शिख शेतकरी आनंदाने मोदिंचे गुणगान देखील गातील. काहि शाळा आणि दवाखान्यांची हालत खराब असेल तर काहिंची चांगलीही झाली असेल. केजरीवाल एक बायस्ड निर्णय अगोदरच ठरवुन गुजराथला गेले, त्याच दृष्टीकोनातुन त्यांना निवडक स्पॉट दाखवण्यात आले (कि त्यांनी स्वतःच ते निवडले) व तिथुन परतुन त्यांनी आपले बायस्ड निर्णय जनतेसमोर मांडले. त्यांना खरच मोदिंना भेटायचं होतं काय? कॉमनसेन्स आहे कि भेटायचं असेल तर चप्पल पायात चढवण्यापुर्वीच त्यांनी मोदिंच्या संपर्क विभागाला मोदिंची उपलब्धता विचारुन घ्यावी. पण हे महाराज तडक निघाले. आणि अगदी मोदिंच्या गेटसमोर तमाशा होण्यापेक्षा पोलिसांनी अगोदरच हस्तक्षेप करुन त्यांना थांबवलं तर भारताच्या आतिथ्यधर्माची दुहाई द्यायला लागले. कमॉन सर... यांच्या गाडीच्या काचा खरच मोदिंनी फोडल्या असतील? ऐन निवडणुकीच्या हंगामात अगदी युपी-बिहारचे राजकारणी देखील दहादा विचार करतील असं वागताना... कमॉन सर. प्रश्नोत्तरे पण भारी झालीत. काहि उत्तरे खरच छान दिली साहेबांनी. सोमनाथ भारतींच्या प्रश्नावर मात्र विकेट आणि चेहेरा, दोन्हि पडले साहेबांचे. आणि जबरी पडले बरं का. ऊर्जा मंडळाच्या प्रॉफीटवर देखील काहि उत्तर नाहि साहेबांकडे. म्हणाले उद्या सांगेन. त्यांच्याकडे सर्वच डाटा उपलब्ध असावा अशी काहि अट नाहि म्हणा. पण ते गुजराथच्या विकासाचा अभ्यास करायला गेले होते ना... मग हा चांगला मुद्दा खरच दिसला नाहि त्यांना? कि बघायचच नव्हतं? अपोझीशन पार्टीच्या लोकांना मोदि विकत घेतात म्हणतात... शक्य आहे... पण मरवा देते है?? गुजरात दंगलींबाबत मोदिंना जंग जंग पछाडणारं केंद्रातलं काँग्रेस सरकार १० वर्ष आपल्याच पार्टीच्या लोकांचं शिरकाण खपवुन घेतं? त्याहिपेक्षा भयंकर म्हणजे विरोधकांना खतम करण्यासारखा लोकशाहितला सर्वात गंभीर गुन्हा केजरीसाहेबांसमोर आला आणि त्यांचं हृदय पिळवटुन नाहि निघालं? अशावेळी त्यांच्याकडुन आपले बाकी सर्व प्रोग्राम रद्द करुन ताबडतोब आंदोलन करण्याची अपेक्षा होती. दिल्लीतल्या वेश्या व्यवसायाला थांबवायला आपण आंदोलन केलंत... इथे १० वर्षे शिरकाण चाललय-भलेही दुसर्‍या पार्टीच्या लोकांचं, दुसर्‍याच राज्यात- तरिही साहेबांना काहिच हालचाल करवली नाहि? इजण्ट इट स्ट्रेंज? आणि हा आरोप मोदिंवर करण्याबरोबरच केंद्रीय गृहमंत्रालयाला जाब विचारण्याची गरज वाटली नाहि? कमॉन सर... कॅगच्या स्पेशल बॉडीकडुन विजकंपन्यांचं ऑडीट होतं असं एकजण म्हणाला. तर हे साहेब म्हणतात कि प्रत्यक्ष्य कॅगकडुन का नाहि? अरे पण दुसर्‍या बॉडीकडुन ऑडीट होतय ना? त्यात काहि कमतरता असतील तर तुम्ही त्या समोर आणल्या का? त्यांचं विश्लेषण केलं का? कि जाहीरनाम्यात म्हटलय म्हणुन उगाच एक प्रोसेस वाढवायची? साहेबांनी पांच दिनमे ऑडीट के ऑर्डर निकाले म्हणतात... पाच दिवसात या दुसर्‍या ऑडीटच्या कमतरता समोर आल्या असतीलं असं मानुन चलु. भारताच्या विकासाच्या मूलभूत गरजा उत्तम मांडल्या साहेबांनी. सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, भ्रष्टाचाररहित राज्यकारभार... अगदी नेमकेपणानी मांडलं. उद्योग समुहांचे राजकीय लागेबांधे, त्यांच्यापुढे राजकारणी लोकांचं मिंधेपण, रिटेल क्षेत्र ओपन का करु नये वगैरे मुद्दे त्यांच्या दृष्टीकोनातुन व्यवस्थीत मांडले. देशात समुद्रमंथन चाललय, ट्रांझीशन फेजमधे देश आहे, आता नाहि सावरलं तर फार उशीर होईल, परिवर्तन घडवुन आणायला लोकांनी आता समोर यावं वगैरे संदेश देखील उत्तम मांडले. पण हे सर्व इतर पक्ष देखील म्हणतात. काँग्रेस, भाजपला नाकारुन आआपचा पर्याय निवडायचं आवाहन देखील केलं. आपल्याला कुठल्याच पदाची अभिलाषा नाहि वगैरे पालुपद लावलं शेवटी, पण राजकारणी केजरीवालांना तसं म्हणावच लागेल. एक अत्यंत महत्वाची गोष्ट मात्र दाद देण्यालायक. देश उम्मीद खो बैठा था. आम्हि ति उम्मीद परत जागवली हा त्यांचा दावा अगदी १०० % मान्य. मोदिंचे समर्थक देखील मोदिंना उम्मीद म्हणुनच बघतात. आआपच्या लोकांनी भाजप कार्यालयावर केलेल्या हुल्लडबाजीबद्द्ल देखील विनम्रतेने माफि मागितली. फुकटची मुजोरी केली नाहि. थोडक्यात काय, तर विरोधी पक्षावर पोकळ टिका केली, देशाच्या प्रगतीच्या सर्वमान्य गरजा सांगितल्या, आपल्या चुकांवर पांघरुण घालु शकले नाहित, व आपल्या प्रचाराने समरोप केला. एका नवीन राजकीय पक्षाची टिपीकल मुलाखत.

अगदी मनातले बोललात अर्धवटराव. जो माणूस गुजरातमध्ये खरोखरच विकास झाला आहे की नाही हे बघायला चार दिवसांचा (वरकरणी) अभ्यासदौरा काढतो तो अगदी पहिल्याच दिवशी तिथे गेल्यानंतर काही तासांमध्येच 'गुजरातमध्ये अजिबात विकास झालेला नाही' असे म्हणतो यात कोणालाच काहीच विसंगती वाटत नाही? हे विधान करण्यापूर्वी त्याने स्वत: दीड तास तरी अभ्यास केला होता की नाही अशी शंकाच वाटावी इतक्या लवकर त्याने गुजरातमध्ये 'अजिबात विकास झालेला नाही' हे विधान केले.आणि अशा मनुष्याने नाटकीपणे दीड तास काही बोलले तर त्यावर विश्वास टाकून देश चालवायची याची योग्यता आहे असे मानण्याइतका मी तरी भाबडा नक्कीच नाही. आणि संबंधित लेखक आणि इतर अनेक त्याने काहीही बोलले तरी त्यावर विश्वास कसा टाकू शकतात हे मात्र कळण्याच्या पलीकडचे आहे.याच न्यायाने यांना निळू फुले चित्रपटांमध्ये खलनायकाचे काम करायचे म्हणून प्रत्यक्षातही ते वाईट होते असे वाटायचे का? दुसरी गोष्ट म्हणजे मोदींनी विकासाचे दावे केले की लगेच मोदी विरोधक गुजरात पूर्वीपासूनच विकसित राज्य आहे असे म्हणायचे.आता तर केजरीवाल म्हणतो की गुजरातमध्ये अजिबात विकास झालेला नाही.या दोन मोदी विरोधकांच्या बोलण्याची सुसंगती कशी लावायची? रच्याकाने--राज ठाकरे सुध्दा गुजरातमधील विकास झाला आहे की हे बघायला आठ दिवस गुजरातमध्ये अभ्यासदौर्‍यांतर्गत गेले होते.

एक आयआयटी एम.टेक. इंजिनिअर, IAS ऑफिसर ,आयकर विभागाचा माजी कमिशनर , ,मॅगसेसे पुरस्कार विजेता ,जनलोकपालसाठी सत्तेला लाथ मारणारा ,विलक्षण निर्भय ,निस्वार्थी असलेल्या व्यक्तीला गुजरातच्या विकासाचे(?) मुल्यमापन करायला चार दिवस बास झाले.

,मॅगसेसे पुरस्कार विजेता ,जनलोकपालसाठी सत्तेला लाथ मारणारा ,विलक्षण निर्भय ,निस्वार्थी या गोष्टींचा आणि मूल्य मापनाला लागणार्‍या वेळेचा संबंध स्पष्ट करून सांगता का?

केजरीवाल आय ए एस नव्हते. आय आर एस म्हणजे रेव्हेन्यु खात्यात होते. त्यामुळेच ते दिल्लीचे इन्कम टॅक्स जॉइंट कमिशनर होते. आय ए एस केडरचे रँकिंग खूप वरचे असते. आणि इतक्या अनुभावावर सहसा कलेक्टर / अ‍ॅडिशनल कलेक्टर वगैरे पदे मिळतात.

या गोष्टींचा आणि मूल्य मापनाला लागणार्‍या वेळेचा संबंध स्पष्ट करून सांगता का?
कसं आहे कुठल्याकुठल्या मुलाखतींमध्ये, भाषणांमध्ये काहीतरी बोलणे यावरून तो मनुष्य किती चांगला पंतप्रधान होऊ शकेल अशी अनुमाने काढणारे केजरीवाल समर्थक असे कोणतेही बादरायण संबंध जोडून वाटेल ती अनुमाने काढायची क्षमता ठेवतात हे नक्की. असे काही विचारलेत तर ही मंडळी सोयीस्करपणे खोकून प्रश्नाला बगल देऊन मोकळी होतील. यांच्यापुढे लॉजिक चालत नाही हेच खरे :)

>>> अरविंदकडे नैतिकता आहे ह्यो विरोध्कांचा कट हाय. आमी आमच्या डोळ्यावर्चा चश्मा, कानात्ला मळ आनी डोस्क्यात्ल खूळ आजाबात काडनार नाय. यकदाच सांगून ठिव्तो. कारन आमाला म्हाय्त हा की, >>> अरविंदकडे नैतिकता आहे +D ... +D ... +D

काही तपशीलातल्या चुका... १.
एक आयआयटी एम.टेक. इंजिनिअर
- माझ्या माहितीप्रमाणे आणि विकीपिडीयावर लिहील्याप्रमाणे केजरीवालांनी आय आय टी, खडगपुर मधून ग्रॅजूएअशन केलंय. एम.टेक. ही पोस्टग्रॅजूएशन पदवी आहे.. २.
IAS ऑफिसर
- कधी? कसे? कुठे? ते आय आर एस अधिकारी होते. ३.
आयकर विभागाचा माजी कमिशनर
- त्यांनी आयकर विभागाच्या जॉईंट कमिश्नर पदाचा राजिनामा दिला. जॉईंट कमिश्नर आणि कमिश्नर मध्ये लै फरक असतो राव.. उद्या अंडर सेक्रेटरी आणि चीफ सेक्रेटरी सारखेच म्हणाल. ;-) आता पुढे..
जनलोकपालसाठी सत्तेला लाथ मारणारा ,विलक्षण निर्भय ,निस्वार्थी
- असं ते म्हणतात. असम्प्शन आहे हे..
गुजरातच्या विकासाचे(?) मुल्यमापन करायला चार दिवस बास झाले.
- भक्तीचा प्रश्न आहे शेवटी.. काय बोलणार?

अठ्ठावीस वेगवेगळ्या टीम पाठवल्या होत्या आप ने गुजरात भर हे केजरीवालांनी अनेकदा सांगितले आहे ते वाचले किंवा ऐकले नाही का? की सोयीस्कर दुर्लक्ष केल्या जातय?

आपच्या २८ टीम गुजरातच्या खोट्या विकासाचा दावा फोल ठरवत होते तेव्हा भाजपा फूकटच्या चहाची लाच देशाला देत होते, त्यांची टपरी आयोगाने उचलली तेव्हा आता केजरीवालांवर घसरले आहे. भाजप जर एवढा प्रतिष्ठीत ,सुष्ट पक्ष आहे तर ज्या काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप इतक्या वर्ष केले त्याच काँग्रेसमध्ये चाळीस वर्षे घालवलेले जगदंबिका पाल यांना कसे चालतात? रामकृपाल यादव ,जे लालु यादवांचे अत्यंत जवळचे सहकारी होते ते कसे या भाजपाला चालतात?लालू भ्रष्ट मग कृपाल कोण ,सुष्ट का? युडुयुराप्पा ,जो भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर भाजपने काढुन टाकलेला नेता ,इलेक्शन जवळ आले की परत भाजपात घेतला गेला ..का? "भाजपात आला पवित्र झाला" आधी काय केले विसरुन जा .असा नियम आहे भाजपात? अटलजी आणि आडवाणींच्या कारकीर्दीत' काळ्याला काळा म्हणायचे तरी धारिष्ट भाजपात होते परंतु नमो आल्यापासून आयपीएलच्या टीम प्लेअरचा जसा खरेदी लिलाव होतो ,तसा भाजपात चालू आहे. आयात केलेल्या उमेदवारांवर सत्ता मिळवायची वेळ मोदींनी भाजपात आणली आहे.

//अठ्ठावीस वेगवेगळ्या टीम पाठवल्या होत्या आप ने गुजरात भर// असतीलही, हो.. पण म्हणून केजरीवालांनी गुजरातमध्ये पाय ठेवल्याठेवल्या त्या टिम्सनी दिलेली माहिती 'क्राॅसव्हेरीफाय' केली की काय? की त्याची गरजच नाही 'आप'ची टिम आहे म्हटल्यावर? म्हणजे आतापर्यंत केजरीवालांना 'देवमाणूस' समजण्यासाठी भडमार होत होता, आता 'आप'ची टोपी घालणारा प्रत्येक चंगुमंगु देवमाणूस म्हणायचा? साहेब, मी कोणालाच देव किंवा देवमाणूस मानत नाही.. हा माझा पर्सनल प्राॅब्लेम आहे म्हणा..

प्रतिसाद पटला.. कारण हेच प्रश्न मलाही पडले होते.. १. विरोधी उमेदवाराचा "काटा काढल्या जातो" हा फार मोठा आरोप आहे. लोकांशी गप्पा मारताना जे ऐक्लं ते सांगितलं असा प्रकार वाटला.. त्यावर केजरीवालांनी काही पुरावे शोधले का? २. इतक्या कमी वेळात "गुजरातचा काहीही विकास झालेला नाही" ह्या निष्कर्षावर पोहोचणे शक्यच नाही. खरं तर चांगल्या / वाईट कुठल्याच निष्कर्षावर पोहोचणे शक्य नाही. शिवाय जनरली गुजराथी लोक तरी मोदी आणि त्यांच्या मुळे आलेल्या बदलाचे मनापासुन कौतुक करताना दिसतात. आणि मी जेवढ्या भागात फिरले (अहमदाबाद, गांधीनगर, मोढेरा, अडालज..) तो तरी भाग उत्तम वाटला (रस्ते आणि इतर सोयींबाबत..). जी जी ठिकाणे पाहिली ती फारच उत्तम स्थिती मध्ये होती. गैरसोय अशी कुठेच झाली नाही हे खरं..

काल रात्री जागून (एक ते अडीच) मुलाखत नीट ऐकली. अर्धवटराव, तुमचा प्रतिसाद तंतोतंत.. आवडलाच! एकूणात मुलाखत प्रश्न त्यांची उत्तरे द्यायचा केलेला प्रयत्न आवडला, (पण ते कैक वेळा नेमक्या क्षणी खोकणे डोक्यात जाते राव... ) पण मुळात आपवर केजरीवालचं स्वतःचं नियंत्रण नाही हे कुठेतरी जाणवतय.. त्यांचा कुठलाही नेता जबाबदार आणि विश्वासार्ह नाही आणि दिल्ली प्रकारानंतर आणि एस्सेम्मेस हवं तेव्हा मागवायच्या 'जनमत'चाचणीच्या खेळामुळे नको त्या गोष्टींचं उदात्तीकरण होतय असं वाटू लागलय. आप ने पर्याय दिलाय हे स्पृहणीय आहे नक्कीच आहे! पण डोक्यात हवा जाऊन तमाम भारतियांच्या आशांना ते सुरुंग लावणार नाहीतच असं नक्कीच वाटत नाही! अशाच स्वरुपाची मोदींची मुलाखत बघायला आवडेल, कुणाकडे लिंक्स असतिल तर देणार का?

India Today Conclave मध्येच नरेंद्र मोदी यांचे भाषण आणि प्रश्नोत्तरे झाली होती. साल २०१३ आहे. भाषण प्रश्नोत्तरे तसेच Network 18 Think India Dialogue मध्ये भाषण आणि प्रश्नोत्तरे (साल २०१३) भाषण आणि प्रश्नोत्तरे बरेचसे मुद्दे सारखेच आहेत पण काही गोष्टींवरती ठोस उपाय पण दिसले. जसे कि रेल्वे, उर्जा क्षेत्र, भ्रष्टाचार वगैरे. Hindustan Times Leadership Summit मधील भाषण बरेच जुने आहे परंतु प्रश्नोत्तरांचा भाग अतिशय चांगला आहे. भाषण आणि प्रश्नोत्तरे

दोन्ही नेत्यांचे (वरचे आणि लेखातले) एकाच प्लॅट्फॉर्मवर बोलतानाचे व्हिडिओ पाहिले. कोणतेही "संतुलीत" मत बनविण्याआधी दोन्ही बाजू बघणे जरूरीचे आहे. व्यवस्थापन शास्त्राचा विद्यार्थी आणि व्यावसायिक असल्याने असेल पण मला असे वाटते की फक्त समस्यांच्या नावे ओरडत राहण्यार्‍यांपेक्षा असेल त्या परिस्थितीत त्या समस्या प्रत्यक्ष सोडवून दाखवणार्‍या माणसांवर जास्त विश्वास ठेवला तर फायद्याचे असते.

दोन्ही नेत्यांचे (वरचे आणि लेखातले) एकाच प्लॅट्फॉर्मवर बोलतानाचे व्हिडिओ पाहिले. कोणतेही "संतुलीत" मत बनविण्याआधी दोन्ही बाजू बघणे जरूरीचे आहे. व्यवस्थापन शास्त्राचा विद्यार्थी आणि व्यावसायिक असल्याने असेल पण मला असे वाटते की फक्त समस्यांच्या नावे ओरडत राहण्यार्‍यांपेक्षा असेल त्या परिस्थितीत त्या समस्या प्रत्यक्ष सोडवून दाखवणार्‍या माणसांवर जास्त विश्वास ठेवला तर फायद्याचे असते.

कमालच आहे गुजरात च्या जनतेची ! असल्या विकास न करणार्‍या आणि निव्वळ पोकळ दावे करणार्‍या माणसाला गुजरात पुनःपुन्हा निवडून देते आहे ! किती हा मूर्खपणा ! अच्र्त बावल्ट कुथले ! हे तारणहार केजरीवाल आले नसते तर भारतीयांचे खरे नव्हते ! कल्की कल्की अवतार म्हणतात तो हाच असावा की काय ? ( जाणकार अधिक प्रकाश टाकतीलच ) की नॉस्त्रेडेमस चे भविष्य खरे ठरु लागले आहे ? . . . . . . . आवरा !

प्रचलित व्यवस्था बदलून टाकू, भ्रष्टाचार संप वू, रामराज्य (सगळं आलबेल असलेलं प्रशासन नि सुशासन ह्याला काही लोकांनी दिलेलं नाव) आणू, सगळे समान असतील अशा प्रकारच्या आशा/ स्वप्नं सामान्य माणसाला दाखवायची नि स्वतःच्या वागण्यानं पूर्वीच्या लोकांपेक्षा प्रचंड वेगानं दाण्णकन जमिनीवर असं आपटायचं की पुन्हा सुशासनाचं स्वप्न बघण्याचं धाडस सामान्यांनी करु नये. ३००-३५० वर्षं एकाच शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची वेळ आपल्यावर येत राहते. अजून किती वर्षं येत राहील कुणास ठाऊक. (आज महाराज असते तर त्यांना लोकांनी काय त्रास दिला असता कुणाला माहिती)

'शामची आई' पुस्तक वाचून लोकांची आयुष्यं बदलतात आणि केजरीवाल यांचा व्हिडिओ बघून लोकांचा त्यावर विश्वास बसतो. आणि या दोन्ही गोष्टींवर लोकांचा विश्वास बसतो, यावरून सत्ययुग नक्की येणार याची खात्री पटली आहे. तसं तर बिचारे राहुल गांधीसुद्धा फार प्रामाणिकपणे अर्णवला उत्तरे देत होते पण तुम्हा इंटरनेटवाल्यांनी त्या कार्यक्रमाचं विनोदी कार्यक्रमात रूपांतर की हो केलं! कुठे फेडाल ही पापं?!