Welcome to misalpav.com
लेखक: अत्रन्गि पाउस | प्रसिद्ध:
पूर्वी रेल्वेची तिकिटे सुद्धा प्रथम श्रेणी हिरवी , द्वितीय श्रेणी पिवळी/केशरी , platform पांढरी अशी वेगवेगळ्या रंगांची असायची.. आता मात्र सरसकट एकाच पद्धतीच्या कागदावर छपाई ... किती रटाळ वाटते.. आणि विमानाची तिकिटे तर सुरेख चेकबुक सारखी असायची .. प्रत्येक विमानकंपनीचे स्वतंत्र रंगसंगतने नटलेले कव्हर, सुरेखश्या पाकिटात घालून आपल्याकडे यायची. राजधानीचे तिकीट सुद्धा तसेच चेकबुक सारखे असायचे.. त्या तिकिटांना एक सौंदर्य, भारदस्तपणा असायचा, एक ऐट असायची.. हल्ली ई-तिकीट ह्या प्रकाराने हा सगळा प्रकार अतिशय रुक्ष झालेला आहे.. सगळी तिकिटे म्हणजे तो A४ आकाराचा कागद..चुरगळलेला ..प्रत्येकाच्या हातात...त्यावरील तो निस्तेज मजकूर .. श्या !!!
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

सध्या तरी रेल्वेचे तिकीट कागदावर छापायची गरज उरलेली नाही, फक्त मोबाईल वरचा sms दाखवावा लागतो. विमान कंपन्यांची स्पर्धा बघता, २४ वर्षापूर्वी पुणे दिल्ली airindia (economy)७५००/- होते ते आत्ताही तेवढेच किंवा खूप आधी काढल्यामुळे त्यापेक्षा कमीच असते. याचाच अर्थ हा प्रवास आज ५ पट स्वस्त दरात मिळतो आहे. त्या तिकीटाकडे बघण्यापेक्षा मी तरी नवीन कंपन्यामधील YOUNG & FRESH ATENDANCE कडेच बघतो.