Welcome to misalpav.com
लेखक: Prajakta२१ | प्रसिद्ध:
आजच स्टार प्रवाह वर ' लग्न पहावे करून ' हा चित्रपट पहिला तसा बरा वाटला चित्रपटात तरुण शहरी उच्चमध्यम वर्गाची सद्यस्थिती दाखवली आहे (लग्नाबाबतची) शेवट काहीसा गुंडाळलेला आणि तद्दन फिल्मी वाटला ( हल्लीचे चित्रपट असेच असतात हा भाग वेगळा ते जास्त खोलात न जाता वरवरच गुंडाळतात उदा . हंसी तो fansi ) तेजश्री प्रधान हिची व्यक्तिरेखा( आनंदी ) तसेच ' मधुरा ' हि व्यक्तीरेखा ह्या दोन्ही एकांगी वाटल्या आपल्यापैकी कोणी पहिला आहे का ?
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

तेजश्री प्रधान कोण ते काय आठवत नाही हो. पण कालच हसी तो फसी पाह्यला. माझे त्याबाबतचे मत अनाहितामध्ये सव्वादोन ओळीत लिहिले आहे. कथा वरचेवर गुंडाळलेली वाटली. अगदी सहमत. तरी मनोरंजन झाले. मला गाणी आवडली. जरा वेगळ्या चाली होत्या म्हणून असेल कदाचित! पंजाबी वेडींग गाणे म्हणावे तसे चांगले झाले नाहीये, म्हंजे नाच! ती परिणीती चोप्रा मला आवडते म्हणून पाहिला. आता क्वीनबद्दल बरेच ऐकून आहे.

या धाग्याला एकही प्रतिक्रिया आली नव्हती म्हणून वर काढला हो. आता ती तेजश्री नाही म्हायती त्याला काय कर्णार? जे माहितीये ते ल्ह्यायचं झालं! तुम्ही बरे अगदी पाळतीवर आहात ते?

आणी अनुरागकश्य(चा डार्कनेस... खोलीत कोंडले गेले असल्याने अस्थीर मनाच्या व्यक्तीचे साडीतच मुतणे) वगैरेंचे स्टोरी टेलींग फॅक्टर्स कोठेही कथेचा ट्रॅक न घसरवता मिक्स केल्या गेल्याने दोन ध्रुव एकमेका भेटताही अनपेक्षिप पण अपेक्षीत तोल साधला गेला. परिणीता मात्र फारच आवडते. लै बोलके ड्वॉळे हायत तीचे, अभिनय करते मॉडेलींग नाही, हीच जमेची बाजु आहे. लॉट्स ऑफ सोफ्ट किसेस टु हर.

तेजश्री प्रधान कोण ते काय आठवत नाही हो>>>> *beee* :( अहो काय ओ रेवाक्का ...तुम्हाले ती सुप्रशिद्ध मालिका म्हायती नाय ? :P होणार सून(फूलं) *fool* मी त्या घरची *dash1* ...त्यातली सूनबाय हाय तेजश्री ...झेंडा मधली जुवेकरची भहीण. वेळ असल्यास लिंक बघा ... बाकी ह्यो पिच्चर कुड बघाया मिळल ? https://www.google.co.in/search?newwindow=1&site=&source=hp&q=tejashri+pradhan&oq=tejashri+&gs_l=hp.3.0.0l10.1477.4755.0.6055.9.7.0.2.2.0.232.1389.0j2j5.7.0....0...1c.1.37.hp..0.9.1416.htztYO310sU

++१११ काय तर म्हणे ६-७ सासवा.. त्यांचे बिंडोक वागणे-बोलणे, उगिचच त्या मधूराच्या नवर्‍याला अगदि कुक्कुल बाळ समजून त्याचे लाड करत राहणे आणि त्यावर कहर म्हणजे या मधूराचे उगिचच चेहर्‍यावर हसू दाखवणे (जे तद्दन खोटे वाटते..)

आणि भरीस भर म्ह. अशा कैक सीर्यल्समध्ये 'चांगली' स्त्री पात्रे कधीही जीन प्यांट इ. घालत नाहीत, कायम साडी तरी नैतर पंजाबी तरी. तेच एखादी व्हँप इ. असेल तर मात्र जीन्समध्ये दाखवणार, या दीडदमडीच्या लोकांच्या मेंदूची कीव येते राव.

मलातर अशा सीरीयल्स मधील व्हॅम्पच आवडतात ... गुळुमुळु नायिकेपेक्षा त्याच भारी वाटतात.... शिवाय There is nothing more sexier than a women with secrets असं कुणीतरी म्हणुन ठेवलय :)

हे बाकी खरं हो पूर्णपणे! कैतरी जान पायजे, उगा नैतर ताटाखालची मांजरी झालेल्या गुड गर्ल अन इमोशनली डायबेटिक गोग्गोड नायिकेकडे बघवतही नै.

अरे सहीच काय एक एक शब्द आहेत ...माण गयेले हय उस्ताद आपुण तेरेकु . :D बाकी काहीही असो मिपामुळे माझ्या शब्दसंपदेमध्ये आणि जनरलच कणोलेजमध्ये भर पडत चालली आहे . :P *wink* *good*

ब्याटम्यान व प्रसादकाकांशी सहमत. उंच माझा झोका ही एक सिरियल सोडल्यास मी एकही मराठी किंवा हिंदी सिरियल पाह्यलेली नाही ती याच कारणाने. घरातल्या घरात नटून बसणार्‍या नायिका व कपाळावर नागिणीच्या आकाराचे कुंकू/ टिकली लावणार्‍या दुष्टांगना पाहण्यात विंटरेष्ट नाही. एकदा काहीतरी पाहिले तर त्यात एक वाक्य तीनवेळा ढ्यांटढ्यां (हेही ३दा) वेगवेगळ्या कोनांमधून दाखवले होते. जौ दे ना राव!

उंच माझा झोका ही एक सिरियल सोडल्यास मी एकही मराठी किंवा हिंदी सिरियल पाह्यलेली नाही ती याच कारणाने. रेवतीताई कित्ती कित्ती सुखी आहात तुम्ही ! जिच्या हाती पाळण्याची दोरी असायची ,हल्ली तिच्या हाती हल्ली रिमोट अस्तोय. सगळा इमोशनल अत्याचार सहन करावा लागतो..

इमोशनली डायबेटिक गोग्गोड नायिकेकडे
वाह! काय गोड उपमा (खायचा नव्हे ;-) ) आहे. मान गये, चेंडूफळीमाणसा..

अगो दिव्यश्री एक सांगायचे र्‍हायले. तेजश्री प्रधान कोण? हे एक मैत्रिण विचारत होती आणि मग मला ती कोण हे फाईंडौट्ट करायची भयंकर गरज वाटू लागली. शेवटी तिचा फोटू बघितलाच! चांगलीये दिसायला वगैरे.

ती कोण हे फाईंडौट्ट करायची भयंकर गरज वाटू लागली.>>> :D शेवटी तिचा फोटू बघितलाच! चांगलीये दिसायला वगैरे.>>>गोरी नाय ...सावळी हाय . *beee*

सौंदर्याच्या रेसिस्ट कल्पनांनी चांगलेच मनोरंजन झाले बरंका!>>>आपल्या सगळ्यांच्याच मणोरंजणासाठीच तर मिपा आहे नै का ? मला जरा रेसिस्ट या शब्दाची मराठीत व्याख्या सांगाल का ? तुमची स्वतः तयार केलेली नको . सौंदर्याच्या कल्पना या व्यक्तिसापेक्ष आहेत असे मला तरी वाटते . एकच गोष्ट , व्यक्ती , ठिकाण एकाच वेळेस सगळ्याच लोकांना आवडू शकेल अस मला नाही वाटत *NO* . प्रत्येक रंगामध्ये निरनिराळ्या छटा असतात . कोणाला कुठली छटा आवडावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे . :) मलातरी ती सावळीच वाटते . ती काही गोरी अथवा गहुवर्णीय नाही हे माझ स्पष्ट मत आहे . अगदी वैयक्तिक . बाकी ती तुम्हाला विश्वसुंदरी वाटली तरी मला काही समस्या नाही . :)

मलातरी ती सावळीच वाटते . ती काही गोरी अथवा गहुवर्णीय नाही हे माझ स्पष्ट मत आहे
आणि
बाकी ती तुम्हाला विश्वसुंदरी वाटली तरी मला काही समस्या नाही .
यात गोरे असणे=सुंदर असं अ‍ॅझम्प्शन जाणवतंय. शिवाय 'तुम्हांला विश्वसुंदरी वाटली तरी हर्कत नै' इ.इ. अनावश्यक शेर्‍यांवरूनही अ‍ॅटिट्यूड कळून येतो. हाच रेसिझम आहे. उदाहरण पुरवल्याबद्दल धन्यवाद.

कोणत्या चित्रपटांच्या? फक्त सांगा, आम्हाला चित्रपटाची चिरफाड (मत वगैरे नाही हां) करायला भयंकर मजा येते. ;) तुम्ही जर समीरसूर साहेबांना सांगितलत तर ते काम भन्नाट होते याची खात्री कोणीही मिपाकर देतील. ;)

आजकाल बरेच मराठी शिणेमे लग्न या विषयावर येतात वाट्टे आणि त्यात काम करणारी ही मराठी शीरियल्समधली मंडळी असतात काय? (मराठी शिरियल्स आणि सिनेम्यांबाबत घोर अज्ञानी)

दुर्दैवाणे हो असेच उत्तर आहे . हे दुष्टचक्र आहे . जे शिरेलीत त्येच पिच्चर मंदी (आर्थिक नव्ह ) आणि ज्ये पिच्चर मंदी तेच शिरेलीत . त्यांनी तरी णवीण , तडफदार , शिरेली आणि पिच्चारला शोभणारे थोबडे *shok* आणि नाजूक हिर्वनी कुडून आणायच्या ;) :D ? परतेग वेळेस नवीन क्ष्टुरी , सगळ चांगल त्येबी नवं कुढून आणाचे ?? *NO* येक तर बख्खळ पैका घालून हे बणवयाचं मग लोकांच्या श्या खायच्या *dash1* , मिपावाले तर टपूनच असतात कंदी बकरा मिळतोय म्हून . *beee*

कस्ल कस्ल ...हे कस्च कस्च च्या ष्टायलीत वाचावे . :D बाकी साक्षात गुर्जीं बरोबर तुलणा केली गेल्याणे अजुण हवेतच आहे . *shok* योग्य वेळी योग्य उत्तर देणेत येयील . *stop*

>>कंदी बकरा हल्ली बकरे पण 'कंदी' मिळायला लागले? आमच्यावेळी असं नव्हतं. फक्त पेढेच कंदी मिळत असत, तेही सातार्‍याचे!!

ठ्ठो =)) वशाडी येवो या सुडक्यावर =)) अन बकरा जर कंदी मिळाला तर खाणारेस काय रे, इतका हरखून विचारायलास ते =))

त्यांणा णवीण ष्टुरी हवी असल्यास आपन देऊ शक्तो की! पन खोलात जाऊण विचार वैग्रे करावा लागल त्याचं काय? दर्वेळी काय नवे चेहरे आनायची चिंता कराया नगं, हितं मिपावरची दोनचार मंडली पाठवूण दिली तर काम होईल. पैतै तर कायमस्वरुपी मिपासासू आणि मी कायमसोरुपी मिपाआज्जी हायेच! तू हिरवीन होते का? त्यामुळे आपन कुनाचं नुस्कान करत णाही. शिरेस विषयावर्ची शिरेल केली आनि विणोदी म्हणून गाजली तरी पैसा वसूल! माझ्याकडे फँड्रीसारखी एक ष्टुरी तयार है. नाव हाई 'लाँड्री'!