Welcome to misalpav.com
लेखक: प्यारे१ | प्रसिद्ध:
सध्या गणपाशेठ हे मिपाचे जवळ जवळ शेफ बनलेच आहेत अशा प्रकारे वातावरण तयार केले जात आहे. यात प्रवाहाबरोबर वाहणार्‍या गणपासमर्थकां चे उन्मादक ;) प्रतिसाद विशेष लक्षात येण्याजोगे आहेत... गणपाहूनही गणपाभक्त किंवा मोअर कॅथोलिक दॅन पोप अशी या ढोंगी समर्थकांची अवस्था झाली आहे असो तर प्रश्न असा आहे खरेच गणपाशेठ मिपाशेफ बनतील का ? त्यासाठी ते किती रेसिपी टाकतील ? अपर्णा अक्षय, पैसा, लिमाऊ, यशो, दिव्यश्री, अ आ अशांची मदत किती होइल... बेरीज कितीपर्यंत जाइल... प्रश्न अनेक आहेत. हे पाहता होणारे मिपाशेफ हे कुणी दुसरेच होईल, झाले तरी इतर नवशेफ त्यांना टिकू देतील का? गणपाशेठचं मिपाशेफ पद २ २|| दिवसच टिकेल. आपल्याला काय वाट्टं? (अवांतर तरीही महत्त्वाचं (नसलेलं): सर्व संबंधितांनी वजनानं अतिशय हलकं घ्यावं. ;) आम्ही जुने असल्यानं कुणावरही भारी वगैरे नाही आहोत. असो! )
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

गणपा येडा आहे गणपा बावळ्ट आहे गणपा बाशिंग बांध्ले आहे गणपा हरणार आहे गणपा आला मोठा फार शाहणा लागुन गेला गणपा इत्का बिंडोक कोणी नाही गणपा सेटिंग कर्तो गणपा भ्रश्टाचारी आहे गणपा थापाड्या आहे गणपा अम्का गणपा ढ्म्का - मीएकशुन्य

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ १ १ १ १ ११ ११ ११११ ११११११ १११११११ १११११११११ ११११११११ ११११११११ १११११११११ ११११११११ ११११११११११

गणपा येवोत अथवा कोणीही! आपल्याला मिपावर अधिकाधिक सुविधा हव्यात. कुठलाही धागा कमीत्कमी संपादित केला जावा. जिलब्या पाडणे( प्रदूषण) कमी करण्याचे सक्षम पर्याय डुप्लिकेट आय्.डीज्.,खरडफळ्यावरचे प्रदूषण रोखता आले पाहिजे. या सर्वात मिपाकरांची वाढती जागरुकता व सहभाग हवाय! (आपल्या सर्वांचा)होमियोहित

अख्खा प्रतिसादच कहर आहे पण होमियोहित म्हंजे केकावरचे आयसिङ्ग आहे =)) लैच फुटलो =)) _/\_

अन घटकाभर धरा, झाला तुमचा गणपा मिपाशेफ.. त्यानं काय होणारे? पाककृती विभागाचा अत्याचार थांबणारे? वेगेवेगळ्या दालनातले वाचक अन त्यांचे पित्ते यांची पाककृती पाहुन होणारी जळजळ थांबणारे? चमचमीत पदार्थांचे नुसते फोटोच्या फोटो टाकून लोकांना त्रास देणे थांबणारे? सगळ्या गफ्फा आहेत हो गफ्फा....

पुणह्ह्ह्हा एकदा सहमत आहे . :D तसेही येथे सुग्रणीनची आणि सुग्रणांची(बल्लव हा शब्द आवडत नसल्याने ), पाककला निपुण लोकांची कमी नाही . भरपूर मातब्बर मंडळी आहेत येथे हे माझे(आपले) भाग्यचं आहे . :)

वरची नावं घेतलेले गणपाशेठचे स्पर्धक आहेत हो! ;) -'पेठकरकाकांची रेसिपी ४७.५ मिनिट वाली' वाला प्रायोजित कार्यक्रम बघायला उत्सुक =))

यांच्याशी अंशतः सहमत .. अंशतः सहमत नाही कारण गणपा मिपाशेफ झाल्यावर रोजच्या लेखन-प्रतिसादात फार मोठा फरक पडला नाही तरी लोकांच्या मानसिकतेत थोडासा फरक पडेल असे वाटते. एकूणातच सर्व पाकृंमध्ये जी मरगळ आली आहे त्यात थोडे चैतन्य येईल. शेवटी फील गुड वाटायला आणि खरोखरच्या सुधारणा व्हायला मानसिकता फार महत्वाचा भाग आहे. इतर बल्लवाचार्यांनी कुरापत काढली , महागाई वाढली , संपादनशाही वाढली, ब्रह्मघोटाळे झाले ,धाग्याचे भाव गगनाला भीडले तरी आमचे शेफ ढीम्म ! नॉट मोअर द्यान अ वेजिटेबल ! गणपा मिपाशेफ झाल्यावर त्यात थोडासा बदल होईल अशी अपेक्षा आहे. लोकांना "हाणा" म्हणणारा शेफ लागतो मगच राष्ट्रात बुभुक्षु चैतन्य निर्माण होते. त्यसाठी भौतिक साधनसामुग्रीची फार आवश्यकता असतेच असे नाही. मिपाकर म्हणून आमची काही एक अस्मिता आहे आणि ती राहीली पाहीजे असे मूळात प्रत्येक मिपाकराला वाटत असतेच! हल्ली परदेश प्रवास आणि एकूणच जग जवळ्येत चालले आहे त्यामुळे ही भावना अधिक जोमाने वाढीस लागली आहे आणि म्हणून गणपा मिपाशेफ झाल्यास फरक पडायला सुरुवात होईल. गणपाच असे नव्हे तर कोणी ही एक प्रसन्न मुद्रेने हाणण्याचे आवाहन करणारा माणूस आत्ता हवा आहे ही काळाची गरज आहे.. बॅटेकर गॉथमी गुहेसमीप मत्त जोकर मारला ! मत्त जोकर मारला !! (ह.घ्या. हेवेसांनल)

खो खो हसलो ! धमाल .. (पीसासारखे हलके घेतले आहे... हेवेसांनल ) आत्मुस .. एक पिसाची स्मायली टाका बघू..

गेल्या आख्ख्या आठवड्यात सर्व जगभरच्या अतिरेक्यांनी मिळून एवढा गोळिबार केलेला नाही, हे पहिलेच नमूद करतो. आता तुम्ही याचा पुरावा मागणार, मग तुमच्याशी चर्चा शक्य नाही. गॉथमी गुहेसमीप मत्त जोकर मारला ! मत्त जोकर मारला !! हे पहा तुम्हीच तुमच्या अतिरेकीपणाचा पुरावा देताहात. जो तुमचे इतके मनोरंजन करतो त्या जोलरलाच तुम्ही खलास करता. मग फिल गुड फॅक्टर कसा येईल ? आणि 'फिल गुड' ऐवजी 'फिल शक्कर' वापरली तर मग पाकृ बिघडणार नाही तर काय ? तुम्हाला हे कळणं कठीणच आहे म्हणा. कारण तुम्ही सर्व पदार्थ पातेल्याच्या बाहेरून बघता आहात. कधी पातेल्यात बसून किचनकडे बघण्याचा प्रयत्न करा आणि पहा किती फरक पडतो ते. हे मला माहिती आहे पण तुम्हाला समजणे कठीण आहे. तुमच्याकडे ती मानसिकताच नाही. आता परत पुरावा पुरावा म्हणायला लागू नका. कारण किचनमध्ये पदार्थ कसा पुरणार?... फारतर आपण तो जाळू शकतो. बघा मीच जिंकलो तुम्ही सर्व हारलात, नेहमीप्रमाणे.

अरे ब्याटमाणा, शेवटी झालीच ना माझी आठवण? प.पु. गुर्जीन्नना णमास्कार क्रून सांगट्त्टो,... आणुभवावीण माण हालवू णको रे... .

यावरुन हरिभजना "वीणकाळ" घालवू नको रे....!!! हे आठवले :P

मिपा-शेफनं त्यांना किचनमधे यायला मज्जाव केल्यामुळे ते गर्दभ-शेफ "पातेल्यात बसून किचन कसे दिसेल" याचा अंदाज घेत आहेत.

बाकी कसल्याही आठवणी काढा ओ, पातेली आणि भांड्यांच्या नका काढू! अत्रुप्त आत्मे बंदुका घेऊन धावत येतील!

खतर्नाक! =)) "कधी पातेल्यात बसून किचनकडे बघण्याचा प्रयत्न करा आणि पहा किती फरक पडतो ते." हे वाक्य सही म्हणून घेउ का हो काका? ;)