" मला माहीत होतं हा प्रश्न विचारल्या जाणारच! " पत्रकारांचा प्रश्न ऐकून नेताजी किंचितही विचलीत झाले नव्हते .
" बघा माझ्यावरचा दलबदलूपणाचा आरोप हा काही नवीन नाही. प्रत्येक निवडणुकीत माझे विरोधक हा निराधार आरोप माझ्यावर नेहमीच लावत असतात, त्यात काहीही तथ्य नाही. उलट असल्या आरोपांनी माझी जनतेप्रती निष्टाच सिद्ध होत नाही का? तुम्हीच सांगा प्रत्येक निवडणुकीत जनता वेगवेगळ्या पक्षाला निवडुन देते, दर निवडणुकीत जनतेचा कल बदलतो त्यात माझा काय दोष? आणि तुम्हाला तर माहीतच आहे की मी जनतेशी नाळ जुळलेला एक समान्य कार्यकर्ता आहे "
नेताजींच्या चेह-यावर पुनश्च चिरपरिचित हास्य आले.
टाळ्यांचा गडगडाट झाला.
जुन्याच ' निष्ठावंत' कार्यकर्त्यांच्या साथीने नवीन चिन्हाचा प्रचार सुरु झाला.
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
जय भाजप , जय राष्ट्रवादी , जय
नेताजींना विज्ञान आणि आध्यात्म, दोन्हि साधलय.
झिंदाबाद !!!
:)
वर्षभरा पूर्वी हिंदीत ही
मग ती मूळ लघुकथा इथे देऊन बघा
अभिषेक अभिनंदन आणि धन्यवाद
आत्ता वाचले...
भारतात पक्षांतराचा विक्रम