Welcome to misalpav.com
लेखक: Prajakta२१ | प्रसिद्ध:
आजच स्टार प्रवाह वर ' लग्न पहावे करून ' हा चित्रपट पहिला तसा बरा वाटला चित्रपटात तरुण शहरी उच्चमध्यम वर्गाची सद्यस्थिती दाखवली आहे (लग्नाबाबतची) शेवट काहीसा गुंडाळलेला आणि तद्दन फिल्मी वाटला ( हल्लीचे चित्रपट असेच असतात हा भाग वेगळा ते जास्त खोलात न जाता वरवरच गुंडाळतात उदा . हंसी तो fansi ) तेजश्री प्रधान हिची व्यक्तिरेखा( आनंदी ) तसेच ' मधुरा ' हि व्यक्तीरेखा ह्या दोन्ही एकांगी वाटल्या आपल्यापैकी कोणी पहिला आहे का ?
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

अगदी अगदी!!!! स्मायली आकाशाएवढी अन धागालांबी तृणापाडी ;) (पळा आता कै खरं नै)

अरे मुलांणो, तुम्हाला काही सांगायची सोय ठेवली णाहीत. खरा शब्द सपीठ असावा पण बोलण्याबोलण्यात असा होऊन गेला की काय ते एक देवाला म्हाईत! अगदी बाऽऽऽरीक पीठ, उदा. मैदा हे सपीट! स. पेठेशी संबंध असायची शक्यता कणभर तरी आहेच म्हणते मी! आपण संधी सोडायची नै! काय?

रेवाक्का, आतातरी धागा 'योग्य विभागात' जौंद्या की! (सुतळी बॉम्बची वात पेटवून माणूस पटकन बाजूला जसा होतो त्या पोझिशन मध्ये) प्यारे

असं काय म्हंता प्यारेभौ! या गंभीर चर्चेनंतर एखाद्या शिरियली विषय मिळूण जाईल, कोनी सांगावे? आपन तुम्हाला त्यात व्हिलण बणवू. कसे? मिळाला ना योग्य रोल? मग आता आम्हाला बोलू द्या बरे.

त्या पेक्ष्या तू नळीवर प्रियतमा कालच पहिला. त्याची उगाच रामलीला ची तुलना केली नाही , ह्या सिनेमात रामलीला सारखा बटबटीत अभिनय व उगाच हिंसेचे थैमान नाही आणि ह्यात गोळ्यांची नाही तर रंगांची बरसात होते. गिरीजा जोशी व सिद्धार्थ भूमिका जगले आहेत . सिनेमाची प्रत्येक फ्रेम काळजाचा ठाव घेते. सिनेमातील गाणी , त्यांची शब्द रचना , रंगांची उधळण व हिरवागार निसर्ग सर्वच डोळ्यात भरते कुठेही काहीही मला खुपले नाही. जरूर पहावा असा हा प्रियतमा

तुमच्या लिखाणाची चेष्टा नाही केली कोणी! मराठी सिरियल्सच्या विषयाच्या निमित्ताने बर्‍याच जणाना धमाल करायला मिळाली, त्याबद्दल तुमचेच आभार!

प्राजक्ताबैंचे धागाशेञ्च्युरीबद्दल हबिणंदण!!!!

धागा भरकटवला ही अफवा आहे, त्यावर विश्वास ठेवू नये हे आवाहन करते. माझ्यामते आम्ही सगळेजण विषयानुरुप लिहीत होतो, मध्येच कोणाला जण्रल णॉलेज णसल्याणे वेगळी माहिती लागल्यास ती देने हे आमचे परम कर्तव्य होते. त्याशिवाय मराठी मानूस पुढे जाणार नाही. आम्ही जे केले त्याचा आम्हाला अभिमान तर आहेच पण ते कर्त्व्यदेखील आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र! आता जाते, लै बिल झालं!

पहिला बै हा शिणुमा . बरा आहे , फुकटात पहिला म्हणून वा ई ट वाटल नै आणि पैशे गेल्याच दुखः नै . :D बर्याच गोष्टी खटकल्या . विषय चांगला आहे खरतर असो . चांगला टेमपास झाला . :) उमेश कामत मस्त नेहमीप्रमाणेच , मुक्ता ची आदिती पण चांगली आहे , सिद्धार्थ चांदेकर ने पण छान काम केल आहे . सगळ्यात जास्त भाव खाल्लाय स्वातीतै चिटणीस यांनी . :)