कट्टा ऊत्त्सवमुर्ती निनादने सुचवल्याप्रमाणे दरवेळी एकानेच संपुर्ण वृत्तांत लिहिण्याच्या प्रथेला छेद देऊन कोणीतरी एकाने सुरुवात करून बाकीच्यांनी त्या वृत्तांतांत प्रतिसादांमधुन भर घालायची असे ठरल्याने वृत्तांतांची सुरुवात करण्याचे काम माझ्यावर ढकलण्यात आले.
साडेसातच्या सुमारास नंदी पॅलेस येथे जमायचे ठरले असल्याने मी हॉटेलसमोर जाऊन इतरांची वाट पहात ऊभा होतो. माझ्या समोरच आणखी एक गृहस्थ इतर कोणाचीतरी वाट पहात ऊभे होते. निनाद आल्यावर एकमेकांची ओळख करून घेऊन आम्ही दोघे आतमध्ये शिरलो.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधला चेंडूफळीचा ट-२० विश्वचषक स्पर्धेचा उपांत्य सामना मोठया पडद्यावर पहायची सोय हॉटेलवाल्यांनी आधीच आमच्यासारख्या क्रिडारसिकांसाठी करून ठेवलेली बघुन हा कट्टादेखिल नेहमीप्रमाणे रंगणार याची खात्री झाली.
मी आणि निनादने स्थानग्रहण केल्यावर आम्ही इतर मिपाकरांची वाट पहात होतो. मघाशी बाहेर ऊभा असलेला इसम मला अस्वस्थ करत होता. निनादला सांगुन मी पुन्हा बाहेर आलो व सरळ त्या गृहस्थांसमोर जाऊन ऊभा राहिलो. त्यांच्याकडे विचारपुस केल्यावर ते गृहस्थ मिपावरचे कंजूस काका आहेत हे समजले. मग त्यांना माझी ओळख करून देऊन मी पुन्हा त्यांच्याबरोबर आतमध्ये गेलो. मग निनादबरोबर ओळख झाल्यावर, आम्ही तिघेही पक्के डोंबिवलीकर असल्याने, आमच्या डोंबिवलीविषयी गप्पा चालु झाल्या. इतक्यात भ ट क्या खे ड वा ला यांचे आगमन झाले. नेहमीप्रमाणे त्यांनी आम्हा सर्वासाठी कुपीतुन कुठलेसे अत्तर आणले होते. इतक्यात मुक्तविहारि यांच्याशी आधीच भमणध्वनीवरून संभाषण झाले असल्याचे निनादने आम्हाला सांगितले. तेव्हाच एका युवकाचे आगमन झाले. जिजामाता ऊद्यान कट्टा चुकवल्यामुळे तो युवक म्हणजे ज्यु. मुवि आहे याची मला कल्पना नव्हती. भ ट क्या खे ड वा ला यांनी आम्हाला त्याची ओळख करून दिली.
(च्यायला, मिपावर सुध्दा घराणेशाही!) आपण येऊ शकत नसल्याने आपला प्रतिनिधी म्हणुन ज्यु. मुवि! कट्टयाला मुविंची भासत असलेली उणिव त्यांच्या सुपुत्राने भरून काढली.
इतक्यात निनादच्या भमणध्वनीवर साक्षात मुक्तविहारि यांच्याकडुन बोलावणे आले. हे साहेब म्हणे तिकडे उंटावर बसुन शेळ्या हाकत… सॉरी, गप्पा मारत होते. मग निनादकडुन कट्टा सुरळीत चालु असल्याची खात्री करून झाल्यावर मुवि भ ट क्या खे ड वा ला यांच्याशी बोलले.
आमच्या गप्पा चालु असताना विनोद१८ यांचे आगमन झाले. पुन्हा एकदा ओळख परेड झाल्यावर आमच्या गप्पा रंगल्या. कुठलाही कट्टा सुबोध खरे यांच्याशिवाय अपुर्णच! आमच्या गप्पा चालु असताना डॉक्टरसाहेब आल्यावर आमचा कट्टा पुढे चालु झाला...
वरती लिहिल्याप्रमाणे कट्टा वृत्तांत अपुर्ण आहे. मधल्या गाळलेल्या जागा आणि पुढचा वृत्तांत इतर कट्टेकरी पुर्ण करतीलच. (तेव्हा प्रतिसाद देताना बोंबा मारू नयेत. शिमगा नुकताच झाला असल्याने ती संधी गेली आहे.)
या वृत्तांतांत मुद्दामुन खादाडीचा ऊल्लेख टाळला आहे. खादाडीचे फोटो घेण्याचा मोह टाळुन इतर फोटो विनोद१८ यांच्याकडुन येतीलच.
इस्पिकचा एक्का काका, जे.डी., हेमांगी के, दिपक कुवेत यांच्यासारख्या ऊत्त्सवमुर्ती बरोबर कट्टे साजरे केल्यानंतर 'निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी' समावेत हा माझा आणखी एक कट्टा!
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
मस्त लिहिताय!
+ १
हेच बोलतो.
मजा करा लेको.
छान लिहिलंय .
फोटोची प्रतीक्षा
मस्त व्रुत्तांत
नंदी पॅलेस म्हणजे अगदी आमच्या
स्व.रा. +१००!
स्व.रा. +१००!
कट्टयाचा काही उद्देश असावा
......डोंबिवली कट्टा वृत्तांत.....!!!!!
... वरील फोटो दिसत नाहीत.....
पब्लिक अॅक्सेस द्या
आद्दी द्या फोटू! मंगच आमी
मंगच आमी कट्टेकर्यांना भेटू!
मस्त वृत्तांत .
जिथे रामकथा तिथे .....
...मिपाकरहो...!!!!
(No subject)
हे काय भाते नी मिशी उडवलेली
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
संघ.... विकीर!
काय..
(No subject)
(No subject)
हे फोटो वरच नाव टाकायची
हे फोटो वरच नाव टाकायची
फोटो मध्ये सगळ्यांचे डोळे बरेच जड झालेले दिसताहेत.
?
जुळे भाउ !? मग
एक्कासर,
नाय हो. मी त्या "डोळे जड"
ज्यु.मुवि एकदम अनुष्का शर्मा
अनुष्काचे बाबा??
@.....प्रभाकर पेठकर .....!!!!
वा , मस्त झाला कट्टा, माझा
हरकत नाही...
ह्म्म!!
छान!
कट्ट्याचा वृत्तांत व प्रतिसाद