Welcome to misalpav.com
लेखक: बबन ताम्बे | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आमच्या युवा नेत्या मा. प्रनितीतैंचे नाव कुठल्याच घडामोडीत नसल्याने निशेध निशेध निशेध. तुमचे हे सारे कल्पनारंजन असल्यामुळे माफ करण्यात आलेले आहे. ;)

सचिन व आमिताभ यांचे लायनीत शरद पवार यांचे नाव घालायचे राहिले आहे. त्याना २०४५ साली देखील सत्ता सोडवत नाही. असे असावयास हवे. बाकी ह ह पु वा ! २०४५ साली पुणे मेट्रोचे उदघाटन कृपाचार्य.... यांच्या हस्ते होणार आहे म्हणे .

पण २०४५ साली मिपा बंद न पडता चालत आहे का याबद्दल का लिहिले नाही?

पण खूप रात्र झाल्यामुळे मला तुम्हाला डिस्टर्ब करणे प्रशस्त वाटत नाही. तुम्हाला इतरही कामे असतात.
निर्वाण प्राप्त झाले आहे! - (बरीच कामे असणारा) सोकाजी

@ सोत्री २०४५ साल झाले म्हणून काय झाले. " सनातन उद्यम" माणसाला काही चुकणार नाही असे त्याना सुचवायचे आहे. तिथे रोबोचे काम नोहे |

खुसखुशीत कल्पनारंजन ! मजा आली. या लेखातल्या घराणेशाहीच्या मल्लीनाथीवरच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकिय पटलावर मा. पार्थ अजितदादा पवार प्रकट झालेले आहेत हे जाणवून फिस्सकन हसू आले. ही ब्र्यान्च अ‍ॅड करावी लागणार ताम्बेसाहेब तुम्हाला, मित्राच्या पुढील पत्रात ! पु.ले.शु.

श्री. चौथा कोनाडा , थँक यु. तुम्ही म्हणता तशी ब्रँच नक्किच अ‍ॅड करावी लागणार. सध्या महाराष्ट्रात निवडणूकीमधे दोन भावांचा कलगीतुरा रंगला आहे. त्यावर पण लिहीन म्हणतो.

आमचा धागा १५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश किमान इ.स.२९४७ पर्यंत चर्चेत असणार असल्यामुळे त्या पुर्वीच्या सर्व तारखांच्या भविष्यकालिन काल्पनिक लेखनात मिसळपाव या संकेतस्थळाचा उल्लेख असणे अत्यंत आवश्यक आणि अत्यावश्यक आहे. तो तसा आपल्या लेखनात न आढळल्यामुळे आम्ही या लेख धाग्यावर सख्त नाराज आहोत. बाकी ले.आ.पु.ले.शु.

श्री. माहितगार , मिसळपाव या संकेतस्थळाचा उल्लेख नसल्याबद्द्ल सॉरी.सन २०४५ च काय, २१४५ पर्यंत मि.पा. असणार आहे.

रेवतीजी, धन्यवाद . आपणा सर्वांच्या लाडक्या सचिन वरील कॉमेंट्सबद्दल एक गोष्ट सांगायची राहून गेली. हा लेख सचिन तेंडुलकरने रिटायरमेंट जाहीर करण्याच्या आधी लिहीला आहे.