Welcome to misalpav.com
लेखक: शुचि | प्रसिद्ध:
ऑफिसमधील काही डोक्यात जाणार्‍या गोष्टी - (१) Yup/Nope dudes. औपचारीक इमेल मध्ये सुद्धा Yup/Nope" शब्दांची पखरण करणारे महाभाग. (२) अजून एक प्रकार म्हणजे जे माहीत आहे तेच घोळवून सांगत, माहीतीपूर्ण असण्याचा आव आणणारे सहकारी. प्रकल्प पुढे न्यायला, नव्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी, जे स्वतःला माहीत आहे तेच घोळवत बसणारे अन मांडत रहाणारे. (३) "बड्डे" हा एक वैतागवाणा प्रकार. दर महीन्याला, आमच्याकडे ३-४ "बड्डे ग्रीटींग्स" वर शुभेच्छा लिहाव्या लागतात. कोणाचं कोणी गचकलं तर "शोकसंदेश" ची कार्डे. काल तर कमाल झाली, एकीचा कुत्रा गचकला तर ते कार्ड "शोकसंदेशाकरता" आलं. म्हणजे काम सोडा अन सही करा मग पुढच्याला ते कार्डं पास करा हा सव्यापसव्य! परत सही करणारी मी शेवटून दुसरी होते म्हणजे परत शेवटच्याला शोधा. ते यडं दार लावून मीटींगा करत बसलं तर येर्झारा घाला असला बावळट प्रकार. इथे "कल्चरल गॅप" जाणवते. कोणाचं कुत्रं मेलं तर भारतात असं करतो का आपण? पण इथे मात्र (या ऑफीसात) लगेच संदेशकार्डे जातात. असली शिवी घालावीशी वाटली ना काल!!! तुम्हाला कार्डं द्यायचं ना तुम्ही वैयक्तिक द्याना टीम-कार्डं कशाला? अन मी विरोध दाखवला तर सुनावलं गेलं "इट इज व्हेरी डिसपॉइंटींग. वी हॅव्ह अ टीम कल्चर हीअर" ...... घाला असलं कल्चर तुमच्या ***** नाही तर चूलीत. तळपायाची आग मस्तकात गेली. पण सांगते कुणाला? नोकरी तर टिकवायची आहे कारण बर्‍याच वर्षांनी कुटुंबाजवळ नोकरी मिळाली आहे.
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

एकदा मॅनेजर सांगत होता , अरे हे सर्व एक्स्ट्रा - करिक्युलम अ‍ॅक्टिविटी आहेत !! मी " सर मी इथ काम करायला येतो , हे फालतुचे धंदे करायला येत नाही !! ' ( आधीच भेंडी दिवसाचे १२ तास खाता आमचे, २ तास ट्रॅव्हलिंग चे, आणि वर हे केक थापुन घ्या तोंडाला !! ) कधी ही ऑफीस पार्टीज ला हजर नसलेला खडुस

माफ करा, पण मला तुमचा नेमका आक्षेप कशावर आहे तेच नाही कळलं. आपल्या सुख-दु:खात कुणी सहभागी झालं तर आपल्याला बरं वाटतच ना, मग ईतरांच्या सुख-दु:खात आपण औपचारिकता म्हणून सहभागी व्हायला काय हरकत आहे? बरं, एका सहीनं तुमचा असा कितीसा वेळ 'वाया' जातो, जो तुम्ही अदरवाईज सत्कारणी लावणार असता? हा प्रकार न आवडणं / पटणं हे देखील समजू शकतो, पण त्याचा ईतका राग करणं, त्याला शिव्या देण्याईतका गंभीर नाहीये. भारतात आपण काय करतो हे अमेरिकेत राहून कशाला तोलायचं? आपण आपल्या चॉईस ने हा देश निवडलाय. अशी तुलना केल्यामुळे आपण स्वतःला उगाचच दु:खी करतो (हा फक्त एक मैत्रीपुर्ण सल्ला आहे, दोषारोप नाही.)

भारतात आपण काय करतो हे अमेरिकेत राहून कशाला तोलायचं? आपण आपल्या चॉईस ने हा देश निवडलाय. अशी तुलना केल्यामुळे आपण स्वतःला उगाचच दु:खी करतो (हा फक्त एक मैत्रीपुर्ण सल्ला आहे, दोषारोप नाही.)
धन्यवाद. नक्की विचार करेन.

अन मी विरोध दाखवला तर सुनावलं गेलं "इट इज व्हेरी डिसपॉइंटींग. वी हॅव्ह अ टीम कल्चर हीअर" ......
होतं. होतं असं कधी कधी... याप्रकारात कधी आपण शिकारी असतो तर कधी शिकार इतकचं.... स्थान स्थळ आणी स्तवन... यातच काय तो फरक.

परवा खरं तर वैतागूनच हा धागा काढला होता. खरच फार फार वैतागले होते. पण बर्‍याच प्रतिक्रियांनी स्वतःमध्येच डोकावून पहाण्याची संधी मिळाली. माझा आत्मकेंद्रितपणा लक्षात आला. खरं स्वपरीक्षणासाठी, या धाग्याचा खूप उपयोग मला झाला. पेट थेरपी यांचे विशेष आभार ज्यांनी धाग्याला किंचीत बोचरी पण आवश्यक कलाटणी दिली. अन्य सर्व प्रतिसादकांचे आभार आहेतच.