स्कूटरची चोरी! भाग २...
तेथे खूप लोकांना लांबपर्यंत बसायची जागा, ऑफिसर्ससाठी वेगळी बसायची सोय, अती गर्दी नाही. प्रत्येकाला बसायला ऐसपैस जागा. स्कूटर पार्क केली. जवळ-जवळ दिड-दोनशे स्कूटर्स तिथे लागलेल्या होत्या. जागा मिळेल तिथे स्कूटर पार्क केली. मुलांनी पटकन धावत जाऊन तिकिटं काढली आणि आम्ही थिएटरात सिनेमा पाहायला बसलो.
सिनेमा चालू झाला होता. मी दहा-पंधरा मिनिटं तो सिनेमा पाहिला. आधी पाहिला असल्यामुळे मला त्यात एवढा रस नव्हता. मी चिन्मयला म्हटलं, ‘बसा रे तुम्ही मी आलो. थोडसं घरातलं काम करून तुम्हाला घ्यायला येईन पुन्हा’ तर तो माझ्याकडे न बघता, ‘बरं, बरं’ असं म्हटला आणि सिनेमा पहाण्यात रंगला. नेहाने ‘बाबा खायला दे ना काहीतरी’ असं म्हटले. त्यांच्याकरता दिलेला डबा तिच्या हातात सोपावला आणि थोडेसे पैसे दिले. मग तिचा चेहरा उजळला. मी घरी आलो. तोपर्यंत पत्नी हातात सामानाची यादी, पैसे आणि पिशव्या घेऊन तयारच होती. आल्या पाऊली आम्ही पुन्हा एअरफोर्सच्या शॉपिंग कॉंप्लेक्समध्ये गेलो. अर्धा पाऊण तासानंतर सगळं संपवून परत घरी आलो. इथं तिथं करेपर्यंत पुन्हा मुलांच्यासाठी त्या ओपन एअर थिएटरमध्ये जायची वेळ आली. मी निघालो, पार्किंग पुन्हा करण्याकरता तेथे बऱ्याच स्कूटरमध्ये जागा शोधली. मध्येच एके ठिकाणी दिसली जागा. त्याठिकाणी स्कूटर पार्क केली. हेल्मेट त्याच्यावरच ठेऊन मी मुलांच्याकडे गेलो. तो सिनेमा नेहमीप्रमाणे संपला आणि त्या थिएटरमधून बाहेर पडण्याकरता म्हणून निघालो आणि तेवढ्यातच लाईट गेले. एकदम अंधार झाला, समोरच काही दिसेना. तरी सुध्दा रस्ता थोडासा पायाखालचा असल्यामुळे प्रत्येकजण हळूहळू त्या गर्दीच्या बरोबरच फाटकाकडे निघाला. असं करत-करत आम्ही स्कूटर पार्किंगच्या एरियामध्ये आलो आणि प्रत्येकजण आपापल्या स्कूटरकडे निघाला. मी स्कूटर शोधायला म्हणून बघायला लागलो, तर मला जरा गोंधळल्यासारखं झालं. स्कूटर नक्की कुठे लावली हे काही आठवेना. त्याकाळी बजाजच्या स्कूटर इतक्या असायच्या अन् सगळ्या एकसारख्या दिसणाऱ्या होत्या. होता-होता मला कोणीतरी म्हटले, ‘अरे इथं हेल्मेट कोणाचं आहे? म्हणून त्याने त्याच्या स्कूटरवर ठेवलेलं हेल्मेट असं वर धरलं आणि नेहा ओरडली, ‘ये तो हमारा है!‘ असं म्हणून ती पटकन तिथे गेली. तिनं बघितलं जाऊन तर ते हेल्मेट माझचं होतं. तिकडे कसं गेलं. ‘पता नही. यहाँ मेरे स्कुटरपर रखा था!‘ असं म्हणून तो त्याची स्कूटर घेऊन निघुन गेला. होता, होता सगळ्या स्कूटर्स गेल्या. मी आणि माझी मुलं आणि हातात हेल्मेट असं उभे राहिलो आणि काय करावं ते सुचेना. अगदी तेवढ्यात लाईट आले. पहातो तो फक्त मी माझ्या स्कूटरविना उभा!
‘पटकन जवळच असलेल्या गार्डरूमपाशी चला’ असं मुलांना म्हटलं. मुलं म्हणत होती, ‘बाबा स्कूटर गई कहाँ? आप को ठिक तरह से याद नही कहा रखी थी आपने?’ मी म्हटलं, ‘अरे आता ते विचारायला वेळ नाहीये. चला पटकन’ म्हणून आम्ही गार्डरूमपाशी पोहोचलो आणि ‘मे आय हेल्प यु’ विंडो समोर ऊभा राहिलो. त्या तेथे कोणीतरी बोलताना ऐकलं. ‘हा हा, एक हरे रंग की स्कूटर थी और पता नही हमने ध्यान नही दिया लेकिन उसपर बडे-बडे अक्षरों में लिखा था नंबर और वो जल्दबाजी में एकदम चले गए। उनके हाथ में और कुछ था’!
मी सहज ते कुठल्या स्कूटरबद्दल बोलतायत ते कान देऊन ऐकलं. त्या फॅमिलीतल्या मॅडमनी मला पाहिलं, ‘अरे स्क्वाड्रन लीडर ओक! तुम्ही? तुम्ही काय करताय इथे? मी त्यांना विचारतोय, ‘तुम्ही काय करताय इथे? ते होते स्क्वाड्रन लीडर रवी महाजन आणि मिसेस महाजन! त्यांची पत्नी अलकाची मैत्रिण. ‘अहो आता आम्ही गावातून परत येत होतो. क्वॉर्टरमध्ये आत यायच्या आधी एक स्कूटर अशी जोरात आमच्या फाटकातून बाहेर आली अन निघून गेली. हे तिकडे दरवाजा उघडाय म्हणून गेले होते. पण मी पाहिलं की, स्कूटर हिरव्या रंगाची असावी आणि नंबर काही लक्षात नाही आला पण ती खूप मोठी-मोठी अशी अक्षरं होती.’
मी म्हटलं, ‘MHT -1240?’
‘हो-हो बरोबर तीच असं त्या म्हणाल्या आणि मला खात्री पटली. मी म्हटलं, ‘अहो माझी स्कूटर चोरीला गेलीय. तिच्या शोधासाठी गार्डरूममध्ये आलोय.’ तोपर्यंत रवि म्हणाले, ‘अरे आमच्या घराचे कुलूप तोडलेले होते. दरवाजा उघडाच होता. आम्ही आत जाऊन लाईट लावून सगळं पाहिलं तर माझं काही काही साहित्य गायब, कॅमेरा, टिव्ही हे सगळं गायब आणि ते आमच्या डोळ्यादेखत चोर पळवून गेला. वेळ काही फार झालेला नाही आणि ते पाहिल्याबरोबर आम्ही तसेच गार्डरूमध्ये येऊन रिपोर्ट करायला आलोय.’ मी माझ्याबाबतची गोष्ट सांगितली आणि एकदम एअरफोर्सचे पोलीस कामाला लागले. त्यांनी ताबडतोब जीप काढली आणि दोन्ही बाजूचे गेट बंद करण्याची आज्ञा दिली. त्यामुळे लोहगाव कारागृहाच्या बाजूचा गेट होते तो बंद केले गेले. लोहगाव गावात जाण्यासाठी म्हणून एक रस्ता होता त्याच्यावर गेट नव्हते पण त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी माणसं धावली. आम्ही एका जीपमधून निघालो. कुठे जावं, कुठल्या बाजूला आधी जावं, हा प्रश्न निर्माण झाला. मी पटकन म्हणालो की यांनी जर माझी स्कूटर पळवली असेल तर मला खात्री आहे की ती स्कूटर आसपासच कुठेतरी असणार. कारण त्या स्कूटरमध्ये इतकं कमी पेट्रोल आहे की इथून जिथे पहिला पेट्रोल पंप आहे त्या गुंजन टॉकिजपर्यंतसुध्दा ते पोहोचू शकणार नाहीत. असं मी म्हणेपर्यंत येरवड्याच्या कारावारासाजवळ असलेल्या गेटपर्यंत पोहोचलो. रस्त्यावर लक्ष होतच परंतु काही दिसलं नाही. गेटवर गार्डींग करणाऱ्या सार्जंटला विचारलं, ‘काय रे अशी काही स्कूटर जाताना दिसली का? तो आपलं नेहमीप्रमाणे ‘नाही माहित सर’, म्हणाला.
तोपर्यंत दरवाजा बंदही झालेला होता आणि प्रत्येक जाणाऱ्या-येणाऱ्याचं चेकिंग चालू होतं. आम्ही तिथे बोलतोय तेवढ्यात एक सतरा-अठरा वर्षांचा तरूण मागून आला आणि मिनिटभर आमचं ते बोलणं ऐकून एकदम पटकन म्हणला, ‘अंकल, कॅन आय हेल्प यू? व्हॉट यू आर सर्चिंग?’ ‘माझे वडील बसमधून खाली उतरले आणि केंद्रीय विद्यालय दोनच्या – (आताच्या ‘सेव्हन टेट्रा’ गेटच्या) आसपासच्या जागेतून पायवाटेवरून जात असताना त्यांना कॉंग्रेस गवताच्या झुडुपात एक स्कूटर आडवी तिडवी टाकून दिलेली आढळली. म्हणून माझे वडील घरी आले आणि त्यांनी मला पिटाळलं गार्डरूममध्ये सांगायला की एक अशी बेवारस स्कूटर त्या पायवाटेवर पडली आहे म्हणून.’
वेळ न घालवता आम्ही तात्काळ गेलो आणि रस्त्यापासून पंधरावीस फुटावर पायवाटेच्या एका भागात स्कूटर अशीच लुडकून पडलेली पाहिली. त्याच्यावरचा नंबर पाहताच ही माझी आहे हे समजायला वेळ लागला नाही. मी स्कूटर ऊभी करून हातात घेतल्यावर मला हायसं वाटलं. परंतु स्क्वाड्रन लीडर महाजनांना त्यांच्या गेलेल्या सामानाविषयी चिंता लागून राहिली. चोर तर सापडले नाहीत परंतु माझी स्कूटर मात्र माझ्या हातात मिळाली. त्यात पटकन कोणीतरी आपल्या स्कूटरमधून पेट्रोल काढून माझ्या स्कूटरमध्ये पेट्रोल भरल्यावर माझी स्कूटर अगदी पहिल्या किकला स्टार्ट झाल्यावर मी घरी परतलो. माझ्या स्कूटरचा हॉर्न खराब झाला होता. वाटेल तशी टाकून दिल्यामुळे 2-3 पोचे आले होते आणि मुख्य म्हणजे त्यादिवशी काहीना काही कारणांनी मी पेट्रोल न भरल्यामुळे पेट्रोल संपले म्हणून चोरांनी ती वाटेत टाकावी लागली, म्हणून वाचली अन मला वापरायला, चालवायला हातात आली होती! असे म्हणून मी समाधानी होतो.
हे काम कोणाचं असेल याचा मी विचार करू लागलो. एकमेकांशी चर्चा करीत असताना मला आमच्या क्वॉर्टरमधून पळून गेलेल्या त्या नोकराची आठवण झाली आणि मी त्यांना त्या व्यक्तीच्या शोधार्थ एअरफोर्सच्या पोलिसांना कामाला लावले. शेवटी सिव्हील कंप्लेट झाली आणि बाहेरचेही पोलीस शोधकार्यासाठी लागले. दोन महिने निघून गेल्यानंतर आमच्या घरात काम करणारी बाई म्हणायला लागली, ‘माझा नवरा रोज रात्री या इथे येतो. मला अगदी पक्की खात्री आहे. दारूच्या बाटल्या आणतो त्या ज्या बायका आहेत त्या बायकांच्याकडे रंगरलिया करतो. त्यांच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे’ असे ती सांगत असे. परंतु त्या सर्वंट क्वॉर्टरमध्ये जाऊन पाहण्याचा प्रसंग आला की तो नेमका निघुन गेलेला असे. असे काही वेळा झालं. त्यावर मी स्वतः लक्ष ठेऊन होतो. एक दिवशी असाच हसण्याचा आवाज आल्याबरोबर मी गार्डरूमला फोन करून पाच-सहा लोकांना आमच्या क्वॉर्टरच्या पळून जाण्याच्या रस्त्यावर दबा धरून बसायला सांगितले आणि त्या मोलकरणीच्या दरवाजावर पोलिसांनी ठक ठक केल्यावर एकदम धावाधाव झाली आणि एक व्यक्ती मागच्या दरवाजाने गेली. तो जो पळून गेला तो दबा धरून बसलेल्या लोकांना आवरता आला नाही. त्यानंतर त्याचे त्या क्वॉर्टरमध्ये येणेसुध्दा बंद झालं.
पुढे झालं असं की एक दिवशी हेअर कट घेऊन स्कूटर चालू करायला गेलो पण लॉक उघडेना. पुन्हा पुन्हा स्कूटरचं लॉक उघडण्याचा प्रयत्न करत होतो. त्या लॉकशी कोणीतरी बळजबरी केल्याने त्यातील लीव्हर तुटून गेलेले असल्यामुळे ती चावी त्यात जात नव्हती. ती वाकड्याने मानेने स्कूटर तशीच ठेऊन मी लोहगावातील किल्ली बनवणाऱ्या माणसाला बोलवून नवी किल्ली बनवली आणि सावध झालो की माझ्या अपरोक्ष त्या नोकर माणसाने पुन्हा एकदा स्कूटर पळवून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या घरातल्या प्रत्येक कुलुपाची चावी, घराची चावी त्याने डुप्लिकेट केली होती म्हणून सगळी कुलुपं बदलेली होती. तरीसुध्दा स्कुटरचं कुलुप बदलले नव्हते. ते बदलायला मला तो दिवस उजाडला! असं झालं अपहरणाचं ....... आणि स्कूटरची चोरी!
स्कुटर परत मिळाल्यामुळे माझं नुकसान झालं नाही परंतु महाजनाचा बऱ्याच हजारांचा ऐवज मात्र गेला. त्यांची बोअरची एक बंदुक, टि.व्ही. आणि कॅमेरा अशा काही मोजक्या वस्तुंची किंमत त्या काळात हजारोंच्या घरात होती. पुढे काही महिन्यानंतर त्या पकडलेल्या माणसाला कोर्टात ऊभे करण्यात आलं. महाजनांनी त्याच्याविरूध्द साक्ष देऊन मोक्कामध्ये त्याला अडकवून तो बरेच काळ कैदेत होता. असं म्हणतात तो इतका चलाख होता की ज्या वेळेला तो साक्ष द्यायचा त्या वेळेला तो स्वतःच्या डोळ्यात मुद्दाम अणकूचीदार शस्त्र खुपसून घेऊन न्यायाधीशांच्या समोर आपल्याला पोलिसांनी किती मोठ्या प्रमाणात मारलेलं आहे, असा आभास निर्माण करे!
त्यानंतर त्या घरकामवाल्या बाईंनी मला सांगितले की, ‘साहेब मी आता इथून निघून जाते. कोणालाही कळू देऊ नका मी कुठे गेलीय.’ मी म्हटलं, ‘तुला कुठे पोहोचवायचं?’ त्यावर ती म्हणाली, ‘ते मी ठरवीन.’ नंतर एक दिवशी तिला गाडीमधे घालून शनिवारवाड्याजवळील एका गल्लीच्या तोंडाशी सोडलं. ती म्हणाली, ‘खूप उपकार केलेत. आता स्वतःची काळजी घ्या. माझं काय बरं वाईट झालं तरी मागे पाहणारं कोण आहे?’ असं म्हणून तिची ती छोटी मूर्ती दिसेनाशी झाली. त्यानंतर पुढे तिचा व त्याचा कधी संबंध आला नाही.
अशी ही चिन्मयच्या अपहरणाची आणि स्कुटरच्या फसलेल्या चोरीची हवाईदलातील पुण्यातील पहिल्या पोस्टींगमधे घडलेली त्या दिवसांची आठवण, धन्यवाद.
भाग 2 समाप्त
...पण मला त्यावेळी कल्पना नव्हती की एक मोठे वादळ घोंगावत येतय. माझ्या दिशेने...
हरवले ते गवसले का? व कसे? प्रत्येकाच्या जीवनात काही तरी हरवते, सटकते, चोरीला जाते अन आपल्याला त्या गमावलेल्या गोष्टींची चुटपुट लागते की हे कसे व का घडले? सोन्याची चेन व इतर दागदागिने लंपास झाल्याचे ऐकताना आपण त्या पीडित व्यक्तिला वेंधळी व बेसावध या रकान्यात टाकतो. ‘आपण नाही तसे’ असे प्रशस्तिपत्रक उगीचच घेऊन टाकतो. काही वेळा हरवलेल्या गोष्टी अनपेक्षितपणे परत मिळतात त्याचा आनंद ती गोष्ट विकत घेताना झालेल्या आनंदापेक्षा जास्त असतो असे वाटते. नुकतीच अशी एक घटना माझ्या मुलीच्या बाबतीत मला अनुभवायला मिळाली. त्यावरून आठवले विविध असेच काही किस्से... काही हवाईदलात असताना काही त्या नंतर... एक एक करून लिहावे आणि आपल्या जीवनात असे काही घडले असेल तर आठवून त्याची उजळणी वाचकांनी करावी. ही विनंती.चिन्मयचे अपहरण टळले.... पण... पुढे झाले असतील आठ एक दिवस. मी काही कामाकरता पुण्यात गेलेलो होतो आणि परत येताना येरवड्याच्या गुंजन टॉकिजच्या आसपासच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल घ्यावं असं मनात म्हणत निघालो होतो. घरी परतायला जरा उशिरच झाला असं म्हणताना तो पेट्रोल पंप केव्हा गेला कळलं नाही. पुढे लोहगावच्या कँप येण्याच्या आधी नागपुर चाळीच्या भागात येरवडा गार्डरुम लागतं तिथे एक क्षणभर विचार आला की काय करावं? परत जावं मागे आणि पेट्रोल भरून घ्यावं? का जाऊ असंच पुढे? मनात म्हटलं, ‘आहे आपल्याकडे आपण पेट्रोल घेऊन ठेवलेलं आहे एका कॅनमध्ये, क्वॉर्टरपर्यंत पोहोचलो तरी खूप झालं. तिथं भरता येईल.’ आणि तशीच स्कूटर दामटत क्वॉर्टरपर्यंत आलो. तिथे चित्र वेगळं होतं. तिथे मुलं माझी वाटच पहात होती. ‘बाबा, बाबा, चला. आज इंग्लिश पिक्चर आहे, आम्हाला आवडतो तो. आज सगळ्यांनी जायचं.’ मुलांच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावरून ‘अर्जुन ओपन थिएटर’ असल्यामुळे मुलांना कोणता पिक्चर पहायला मिळणार हे गुपित कळत असे. त्यामुळे मुलांना लगेच स्कूटरवर घालून मी जायला निघालो. पत्नीला विचारलं, ‘काय गं तुझं काय? ‘मला नाही यायचय, मला नाही इंटरेस्ट आणि असं करा मुलांना त्या तिथे ठेवा आणि परत या, मग आपल्याला थोडं बाजारात जायचय. ते घेऊन परत येऊ’ तोपर्यंत सिनेमा सुटायचा वेळ होईल. मग मुलांना घ्यायला थिएटरात जा.’ त्याप्रमाणे ‘बरं’ असं म्हटलं आणि स्कूटरवर मुलांना घेऊन एअरफोर्सच्या क्वॉर्टरच्या कँपमधून एअरफोर्सच्या मेन एरियातील मार्शल ऑफ एयर फोर्स अर्जुनसिंहांच्या नावावरून ठेवलेल्या नावाच्या ओपन एअर थिएटरला गेलो.
Book traversal links for 5. स्कूटरची चोरी ! - हरवले ते गवसले का? व कसे? भाग 2
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
प्रतिक्रिया हरवलेला धागा
दोन्ही स्टोरीज जबराटच आहेत..
मृगनयनी, माझाही ज्योतिषावर
बरं ज्योतिषावर विश्वास
मृगनयनी, माझाही ज्योतिषावर
सविस्तर उत्तराबद्दल अनेक
लवकर एक कादंबरी प्रकाशित होत आहे.
Its my pleasure... शुचि..
अतींद्रिय शक्तींचे इतके जिवंत अनुभव
नवी दिल्लीत सेक्युरिटी ऑफिसर