Welcome to misalpav.com
लेखक: साती | प्रसिद्ध:
सध्या एक एक टप्प्यात निवडणू़का आटपत आहेत. राजकारणावर आणि राजकारण्यांवर बोलताना न थकणारे आपण मतदान हक्क मात्र बजावतो का ? या धाग्यावर तुमच्या भागातील मतदानाची तारीख, तुम्ही मतदान केले का, नसल्यास का नाही, असल्यास किती वेळ लागला इ. माहिती लिहिणे अपेक्षित आहे. बघुया कोण किती जबाबदारीने वागतंय ते! आपले मत आपले भविष्य... ढॅण ट डॅण!
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

आज भल्या सकाळी केलं. अत्यंत शिस्तीत कारभार चालू होता. वॉर्ड ऑफिसरने दिलेली स्लीप आणि ओळखपत्रं- मी पारपत्रं दिलं एवढ्यावरच काम झालं. माझा रांगेत तिसराच नंबर होता. पाच मिनिटात काम झालं. कर्नाटकात केलेलं माझं पहिलं मतदान.

मी पण श्यै लावुन आलो . voter id नसल्यामुळे पॅन आणी आधार कार्ड घेउन गेलतो . माझ जीवनातील पहिलच मद्दान .20 मिंट लागली सगळ आटपायला .

साती,जेपी, अभिनंदन हो तुमचे.घटनेने दिलेला हक्क बजावलात हे उत्तम झाले. हे आताच जावून आले.देश स्वच्छ पाहिजे असेल तर झाडू हातात हवी असे ह्यांचे मत. (मतदान करायचे की नाही ह्या सम्भ्रमात पडलेली) माई

हातात झाडू हे काँबिनेशन दिल्लीत फेल गेलंय. आपला दिलेले काँग्रेस समर्थन. त्यामुळे विचार करा. एकवेळ नोटा वापरा. पण मतदानाला जाऊन याच!

अग पण पैशाचे राजकारण विरुद्ध तत्वाचे राजकारण अशी ही लढाई दिसतेय. मोदी माणूस असेल मोठा पण गडकरी,मुंडे,राजनाथ? परवाच राज ठाकरे म्हणाले:" कोण राजनाथ?". (राजाकारण्यांच्या आणि जनतेच्या पार्श्वभागावर अधून मधून हाणायला झाडू हवाच असे मत असलेली)माई

>>> हे आताच जावून आले.देश स्वच्छ पाहिजे असेल तर झाडू हातात हवी असे ह्यांचे मत. तुमचे "हे" म्हणजे नानासाहेब नेफळे आहेत ना? *LOL* *DANCE* *BRAVO*

देश स्वच्छ पाहिजे असेल तर झाडू हातात हवी असे ह्यांचे मत. आणि घर स्वच्छ असेल तर झाडू ह्यांच्या हातात हवी असे तुम्चे मत (असावे). कसं ? (डूआय्डी नस्ल्यास ह घ्या)

सकाळी ७ च्या सुमारास चिंचवड येथील मतदान केंद्रावर गेलो. १०/१२ जण रांगेत उभेच होते. १०/१५ मिनिटात नंबर लागला. वोटींग स्लीप आणि ओळखपत्र पुरावा केंद्र कर्मचार्‍यांनी पडताळून पाहिला. मग शाई लावून एका कर्मचार्‍याने वोटींग मशिन कार्यान्वित केलं मग आम्ही आमचा मतदानाचा हक्क बजावून बाहेर पडलो.

मीही आत्ताच आले हक्क बजावुन! वोटर स्लीपवर काम झालं. आमचा भाग कर्जत्,पनवेल ,उरण सह मावळ मतदारसन्घाला जोडलाय. आता पिं चिं मधल्या राजकारण्यांना आमच्या भागात रस नाही आणि आम्हाला ते पाच वर्षात दिसतही नाहीत ,तर्रीही आम्ही जातो ,मद्दान करायला! तसेही रायगड जिल्ह्याची स्थिती कोणीही यावे, टपली मारून जावे अशी असल्याने कोणालाच या बाबतित ना खंत ना खेद !!

आमचं मतदान १२ तारखेलाच झालं. माझं नाव कॅन्सल केलेलं भाजपाच्या कार्यकर्त्यांनी झटपट लावून दिलं. व्यवस्थित नवीन कार्ड आणि स्लिप पण आली. सकाळी लायनी असणार हे माहित असल्याने मुद्दाम दुपारी १ वाजता गेले. केंद्रावर निवडणूक अधिकारी वर्ग सोडता कुणीही नव्हते. मात्र गोव्यात एकूण मतदान ७७% झालं. तेव्हा लेकांनी उत्तम प्रतिसाद दिला असं दिसतं. बोटाला शै लावण्यापूर्वी फक्त स्लिप घेतली. कार्ड पाहिलंसुद्धा नाही. अर्थात स्लिपवर फोटो प्रिंट केलेला होता, त्यामुळेही प्रॉब्लेम नव्हता. हा नेहमीचाच अनुभव आहे. आमच्या चेहर्‍यांवर मध्यमवर्गीय सभ्य असल्याचा छाप जोरदार दिसत असावा! वट्ट २ मिनिटांत आम्ही दोघेही मद्दान करून केंद्राबाहेर!

घाबरलो ना शीर्षक वाचून! हुश्य! मतदान होय! केले ना! दहा पंधरा मिनिटात झाले. निवडणुक आयोगाच्या नुसार माझे मतदान एका ठिकाणी होते पण प्रत्यक्षात तिथे गेल्यावर कळाले कि माझे नाव दुसर्या ठिकाणी आहे. ते ही केंद्र जवळच होते. काहि अडचण आली नाही.

काय हे! एवढ्या शिरेस गोष्टीवर जोक मारताय? =))

आज..सकाळी ८ ते ११ हा माझा वेळ..फक्त मतदान यादीत माझं नाव आहे की नाही? हे पहाण्यात गेला आहे.दहा वर्षांपूर्वी मी पुण्याच्या ज्या भागात रहायचो..तिथे-मागल्या निवडणुकिपर्यंत माझं(घरच्यांचं) नाव मतदार यादीत नीट येत होतं. शिवाय गेल्या ७ वर्षात सिंहगड रोडला शिफ्ट झाल्यामुळे..तिकडे नावनोंदणी(बदल) साठीचे फॉर्म ३/४ वेळा..अगदी यथासांग भरून झाले..पण आज असा प्रकार आहे,की सकाळपासून मी तिकडे आणि इकडे असा..७ टोलबुथवर नाव आहे की नाही??? हे शोधतोय..पण सर्वत्र उत्तर एकच-मतदार यादीत आपलं नाव नाहिये! आणि हाच प्रकार खूप लोकांच्या बाबतीत चालू आहे. प्रत्येक मतदान केंद्राजवळ दोन लायनी आहेत..एक नाव शोधण्याची..आणि दुसरी यावेळंची- 'मत-दानाची!' यावेळी बहुतेक मला मतदान करताच येणार नाही..असा या सगळ्या'चा अर्थ आहे. :(

मिपाकरांची नावं काढून टाकली काय होलसेलमधे? मध्यंतरी आतिवास यांचा एक लेख आला होता, मला वाटलं, तेव्हा बहुतेकांनी आपली नावं आहेत का नाही हे शोधलं असेल. कारण त्यात या सगळ्याची भरपूर चर्चा झाली होती.

आमचं याच्या विरुद्ध होतं. नविन पत्यावर नाव नोंदवलं होतं, त्यावेळेस जुन्या पत्यावरचे नाव काढून टाकायचा फॉर्म भरून दिला होता. महिन्याभरापूर्वी जुन्या पत्त्यावरच्या निवडणुक ऑफिसमधून फोन आला की आमच्याकडे तुमचा फोटो नाही तो जमा करा. त्यांना वस्तुस्थिती सांगून तिथले नाव काढून घेतले. (साय्बांचा सल्ला अगोदर समजला अस्ता तर दोन ठिकाणी मद्दान करायला मिळले अस्ते ना ;) :) )

कंपनीने फुल्ल दिवस फुल्ल पगारी सुट्टी दिल्याने येत्या २४ तारखेला दुपारी बारा वाजता आरामात उठून यंदा मतदान १०० टक्के केले जाणार.

सकाळी ८ वाजताच जाऊन पवित्र कर्तव्य पार पाडून आलो. उमेदवारासमोरील बटन दाबल्यावर मत त्या उमेदवारालाच जाते की अजून कोणाला जाऊन पडते हे त्या साहेबांनाच ठाऊक!

http://www.dnaindia.com/pune/report-voting-stopped-at-shamrao-kalmadi-school-pune-machine-replaced-1979174 तुमचं मत त्या २८ मधे होतं काय?

नाही. आमचं केंद्र दुसरीकडे आहे. पण कलमाडी शाळेत ही गडबडच दिसतेय. प्रोग्रॅमेबल इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे हॅक करता येऊ शकतात. त्यामुळेच अनेक देशांनी त्यावर बंदी घातलेली आहे. भारतात मतपत्रिका वापरल्या तर मतदान केंद्रे ताब्यात घेतात. इलेक्ट्रॉनिक मतयंत्रे वापरली तर हॅक होण्याचा धोका असतो. उद्या ऑनलाईन मतदान सुरू केले तर मतदारांचे लॉगिन आयडी मिळवून त्यांच्या नावाने मते दिली जातील.

आम्ही चौघांनीही १२ तारखेला सकाळी ७.३० ला जाऊन केलं. जाऊन सरळ मतदान. रांगा नाही काही नाही. लोक फार शिस्तीत येत होते. दिवसभर वर्दळ होती म्हणे पण गर्दी नाही.

अजून विमानतळावर (अडकून) आहे. जुनं नाव गायब झालं - म्हणजे निदान ऑनलाईन तरी सापडलं नाही. नव्याने अर्ज करून, तहसील कार्यालयात जाऊन पडताळणी केली आहे - पण अजून नाव दिसत नाहीये. माझे शेजारी मतदान करायला गेलेत तेव्हा माझंही नाव शोधून येणार आहेत. दुपारी घरी येता येता मतदान करणार आहे - नाव यादीत असल्यास!!

सकाळी ९ वाजता एमायटी शाळेतील मतदान केंद्रात जावून मतदान करून आलो. सुदैवाने माझ्यासकट घरच्यांचीही नांवे यादीत सापडली. हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात झाली होती.

आपल्या पैकी किती लोकांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही? हे गेल्या महिनाभरात वेळोवेळी तपासले आहे. माझा पत्ता चुकीचा होता म्हणुन मी ऑनलाईन करेक्शन साठी अर्ज केला होता. एखादे वेळी नाव गायब होण्याचा प्रकार होउ शकतो हे गृहीत धरुन मी दर दोन दिवसाला आपले नाव यादीत आहे का हे कालपर्यंत पहात होतो. माझे नाव होते. मी मतदान केले.

निवडणूक आयोगानेच यावेळी मतदारांना मतदानाच्या वेळी अचूक क्रमांकाच्या मतदानस्लीप घर पोहोच केल्यात का ? बाकी, आमच्याकडे मतदान २४ ला आम्ही आपलं मतदान अधिकारी म्हणून इलेक्शन ड्युटीला असू... :) -दिलीप बिरुटे

आत्ता थोड्या वेळापूर्वीच पाषाण रस्त्यावरील एनसीएल जवळील न्यू मॉडर्न हायस्कूलमध्ये जाऊन मतदान करून आलो. माझ्या बूथवर तर कोणीच नव्हते, शेजारच्या बूथवर १५-२० जणांची रांग होती. ओळखपत्र म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स दाखवले. सगळे मिळून दोन-तीन मिनिटे लागली असतील. पहिल्यांदाच मतदान केले.

खांग्रेस कडून मतदान यंत्र आणि मतदार याद्यात घोटाळा (आमच्या खास प्रतींनिधिकडून) पुण्यात दोन लाख मतदारांचे नाव यादीतून गायब , मतदार यादीत आढळली सोलापूर ची नावे , अनेक ठिकाणी मतदान यंत्रात घोळ आढळला , काही ठिकाणी मतदान थांबवण्याची शक्यता . बाडमेर मध्ये सुद्धा मतदान थांबवले .लोकांचा लोकशाही वरून विश्वास उडू नये म्हणून कॉंग्रेस प्रेरित प्रसार माध्यमे बातम्या दाखवत नाही अशी टीका स्थानिक नेत्यांनी केली . गेल्या निवडणुकीत कर्नाटकात असली मतदान यंत्रे मिळाली होती , प्रत्येक तिसरे मत कॉंग्रेस ला जाणार मग तुम्ही कोणतेही बटन दाबा . अजून सुद्धा अमेरिका , जपान , फ्रांस हे देश शिक्का पद्धत वापरतात , निवडणुकी आधीच जपानी कंपन्या नि मतदान यंत्रातले दोष दाखवले होते . आपण कधी सुधारणार ? http://indiaevm.org/ India's EVMs are Vulnerable to Fraud

मतदान केंद्रावर असणाऱ्या यादीत नाव नसेल तर खालीलपैकी एका शक्यतेच्या दृष्टीने तपास करा. १. केंद्रावर असणाऱ्या मूळ मतदान यादीत नाव नाही, पण पुरवणी यादीमध्ये आहे. (केंद्रावरील अधिकाऱ्यांकडे पुरवणी यादी मागणे) २. पुरवणी यादीच केंद्रावर नसणे. (झोनल अधिकारी किंवा त्यावरील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पुरवणी याद्या केंद्रावर तात्काळ पोचवल्या जातील, याची खात्री करून घेणे.) ३. अन्य मतदान केंद्रावर नाव स्थलांतरीत झालेले असणे. (ते केंद्र शोधून काढणे) महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर बऱ्याच अंशी पुरवणी याद्यांसकट मतदार याद्या उपलब्ध आहेत. त्यामध्ये सर्च करणे थोडेसे क्लिष्ट आहे, पण साधारण तासभर मेहनत घेतली तर वरील तीनही शक्यतांबाबत खातरजमा करून घेता येईल. अभिराम साठे यांनी (किंवा दुसऱ्या एका ठिकाणी उपेंद्र थत्ते यांनी) कॉपी पेस्ट केलेली "तरीही मतदान करता येईल" अशा आशयाच्या पोस्ट गेले काही दिवस फिरत आहेत, पण त्यात काहीही तथ्य नाही. त्यांनी नमूद केलेला फॉर्म ७ हा मतदान यादीवरील नावांबद्दल आक्षेप नोंदवण्यासाठी आहे. खरेतर फॉर्म ६ हा नाव नोंदवण्यासाठी आहे, आणि फॉर्म ८ हा नोंदवल्या गेलेल्या नावातील काही तपशील चुकीचा असेल तर त्यात दुरुस्ती करण्यासाठी आहे. नाव नसल्याचे आढळल्यास आजच्या आज फॉर्म ६ भरून, पुरवणी यादीत नाव समाविष्ट होणे आणि मतदान करायला मिळणे थोडे अशक्य वाटते. पण गेल्या निवडणुकीतील मतदान यादीत नाव आहे, आणि आता नाही अशा अनेक घटना असतील तर त्या सगळ्यांनी एकत्रितपणे जोरदार मागणी केली तर मतदान थांबवण्याचा निर्णय निरीक्षक किंवा सक्षम अधिकारी घेवू शकतात. अशा परिस्थितीत त्या केंद्रांवर काही दिवसांनी फेरमतदान घेता येवू शकते. पण यासाठी issue should should be blown up to that proportion and to the highest possible authority. यासाठी तातडीने थेट दिल्लीच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे हजारोंच्या संख्येने इमेल ताबडतोब रवाना करता येवू शकतील.

आमच्याकडे गोव्यात १२/०४/२०१४ ला होत,भल्या सकाळी ७.१५ वाजता केलं. अत्यंत शिस्तीत कारभार चालू होता. B.L.O ने दिलेली स्लीप आणि EPIC CARD नेल होत. पण ती स्लीपच पाहिली आणि काम झाल. खूप मोट्ठी गर्दी जमली होती मतदान करायला. मोस्टली युवा वर्ग. वेटिंग १५ मिंट. वोटिंग- शाई लावणे वगैरे २ मिनिट.टोटल १७ मि. मधे मी बाहेर. मला मज्जा यासाठी आली, की बराच युवा वर्ग उत्साहाने आणि जबाबदारीच्या जाणीवेने बाहेर पडला होता. अर्थात हे एका मैत्रीणीने सांगितल. जिच्या आयुष्यातल हे पहिल मतदान होत.