Welcome to misalpav.com
लेखक: साती | प्रसिद्ध:
सध्या एक एक टप्प्यात निवडणू़का आटपत आहेत. राजकारणावर आणि राजकारण्यांवर बोलताना न थकणारे आपण मतदान हक्क मात्र बजावतो का ? या धाग्यावर तुमच्या भागातील मतदानाची तारीख, तुम्ही मतदान केले का, नसल्यास का नाही, असल्यास किती वेळ लागला इ. माहिती लिहिणे अपेक्षित आहे. बघुया कोण किती जबाबदारीने वागतंय ते! आपले मत आपले भविष्य... ढॅण ट डॅण!
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

>> माझा रांगेत तिसराच नंबर होता. साती चा तिसराच नंबर , अब की बार मोदी सर्कार :-)

केलं. ७.३० ला रांगेत लागलो ८ वाजता मतदान झालंसुद्धा. मी बाहेर येईपर्यंत बर्‍यापैकी गर्दी झाली. ह्या वेळी थोडा भारी प्रकार होता इकडे एकाच नावाचे दोन उमेदवार उभे आहेत. आप्पा उर्फ श्रीरंग बारणे युतीचे आणि अजुन एक कोणीतरी श्रीरंग बारणे अपक्ष म्हणुन उभे होते. युतीच्या उमेदवारांचे चिन्ह धनुष्यबाण तर अपक्ष बारण्यांच चिन्हं नुसता बाणं होतं. बाकी मतदानयंत्रात घोळ असल्याची चर्चा इथेही दबक्या आवाजात चालु होती. तसं काही नसेल अशी अपेक्षा. स्थळ प्राधिकरण, म्हाळसाकांत विद्यालय.

खरेतर खूपच इच्छा होती कि मतदान करावे पण कलकत्त्यात असल्याने आणि परीक्षा सोमवारपासून सुरु होत असल्याने मतदान करणे अजिबात शक्य नाही झाले.. आमच्या गावी आजच मतदान आहे..

भारतात झालेल्या पहिल्या दोन निवडणुका सोडल्या तर बाकी सर्व निवडणुकात मी मतदान करून आलेलो आहे . दान सत्पात्री[ ? ] करावे असे शहाणे म्हणतात ते मात्र मला अजून जमले नाही असे समजत असूनही मी आत्ताच मतदान करून आलो कारण मतदान करून लोकशाही जिवंत ठेवता येते पण " चांगले सरकार ''निर्माण होण्यासाठी मतदानाखेरीज अनेक गोष्टींची गरज असते हे मला पटले आहे

मतदान करून लोकशाही जिवंत ठेवता येते पण " चांगले सरकार ''निर्माण होण्यासाठी मतदानाखेरीज अनेक गोष्टींची गरज असते हे मला पटले आहे -दिलीप बिरुटे

१२.३० ला लायनीत उभारलो त १.१५ ला लंबर लागला. हे लंबी लाइन पाव्हुन त डोल्याल पानी आल बगा.

मी पण :( आमच्या मतदारसंघात सुसुतैंच्या विरोधात सक्षम उमेदवार नसल्याने बरेच लोक नोटा बटण दाबून आले असा रिपोर्ट आहे. अर्थात सुसुतैंच्या विजयावर काही परिणाम होणार नाही म्हणा...

मतदान दिनाची वाट पाहतो आहे, नेहमी हे माझ्या नावाची वाट लावुन टाकतात. दरवेळीला यादीत नाव पाहताना धास्तीच वाटते मला !

दुपारी १२ वाजता जाऊन केले मतदान स्लीप घरीच आली होती ह्यावेळेस त्यामुळे काहीच प्रॉब्लेम आला नाही :-) शक्य असेल तर मतदान पण online सुरु केले तर किती चांगले होईल याद्यांचा गोंधळ होणार नाही बाहेरच्या लोकांना आणि इलेक्शन ड्युटीवर असणार्यांना पण मत देत येईल आज जे जे लोक ड्युटीवर आहेत त्यांना मत देताच येणार नाहीये ना ? तेवढी मते कमी झाली मग :-(

आज जे जे लोक ड्युटीवर आहेत त्यांना मत देताच येणार नाहीये ना ? देता येतं प्रोसेस किचकट आहे. एक टपाली आणि दुसरं तिथेच मतदान केंद्रावरच करता येतं. -दिलीप बिरुटे

२४ तारखेची. बाकी, प्रत्येक वेळी मतदान केल्यावर निवडुन आलेल्या / न आलेल्या उमेदवारांच्या नावाने न केलेल्या कामापद्धल हक्काने बोंबा मारायला आम्ही मोकळे.

प्रसिद्धीसाठी मोदी कोणत्या थराला गेलेत ते पाहा! Narendra Modi interview was 'paid news', alleges Congress complaint ती मुलाखत (आप की अदालतमधे) लागल्यावर पाच मिनीटातच काय प्रकार आहे तो लक्षात आला! आयला, ही बातमी मतदानाच्या फक्त एक दिवस आधी प्रसिद्ध व्ह्यायला हवी होती! पंतप्रधान होण्यासाठी हा सत्तालोभी माणूस काहीही करु शकतो हे पुन्हा अधोरेखित झालं. आणि पैश्यासाठी रजत शर्मा कितीही वाकू शकतो याची लांछनास्पद प्रचिती आली. आज NDTV चे संचालक आणि संपादक कमार नक्वी यांनी राजिनामा दिला आहे. पोस्टच्या अनुषंगानं लिहायच तर मतदान केलं, कुणाला ते उघड आहे!

संक्शि, हितबी गरळ वकायला पायजे काय? धागा काय लोकं काय म्हंत्यात आनि तुम्च काय. पन एक हाय वन टरॅक मायंडचा ब्येस्ट नमुना दाकवाय्चा इडाच उचल्ल म्हना की. इक्त गरळ वकू नाय, मान्साचा साप बन्तो बाबा. आनि सग्ले लय हासतात त्ये येग्ळच बर्का. आता कान्ग्रेसची दर कंप्लेट खरी म्हन्ल तर कोन्तेहि बटन दाबलं तरी विलेक्शन मिशीनी कान्ग्रेसला मत जातय हे कोनी क्येलं ह्ये तुमच्या सपनात आल आसनच. त्येबी सांगा जरासुदिक. करा मणोरंजन आम्चे, व्होउद्या खर्च, मिपा हाये घर्चं. ह्या ह्या ह्या

रौल बाबानी अर्नब गोस्वामी समोर स्वत:ची ईज्जत काढुन घेतली त्याला पन मोदींनीच पैसे दिले असतील नै? सत्तेत राहाण्यासाठी खांग्रेस काय काय करतय त्यावर पण एक अभ्यासपुर्ण लेख येऊ द्या की.

मोदींनी मुलाखत फिक्स करुन सगळ्या जनतेला उल्लू बनवलं हे उघड झाल्यानं नाराज होऊन नसती शेरेबाजी करण्यात अर्थ नाही. प्रतिवादाला मुद्दा उरला नाही की मग गरळ (किंवा उद्दामपणा!) वगैरे कांगावा चालू होतो. मिडीया विकत घेणारा लाचखोर माणूस आतून किती पाताळयंत्री असेल याची कल्पना करा म्हणजे झालं!

पहिल्यांदाच मतदान करु शकलो नाही. पण अनेक मित्र / परिचयातल्या लोकांची नावे मतदारयादीतून गायब होती म्हणून मतदान करता आले नाही. गेली ८-१० वर्षे एकाच ठिकाणी राहणारे आणि नियमित मतदान करणारे सुशिक्षित मतदार कोथरूड / एरंडवणे वगैरे भागातल्या याद्यातून अंतर्धान पावले आहेत. ऐन वेळी काहीही करता आलं नाही. दुपारी फोटो आणि प्रूफ सह फॉर्म ६ भरल्यास लगेच मतदान करता येईल अशी अफवा उठली होती. त्याप्रमाणे महेश विद्यालय, कुमार परिसरजवळ गर्दी झाली. पण अखेर तसं काही करता आलं नाही आणि बरेच उत्साही मतदार निराश होऊन घरी परतले. एकूणात यावेळी पुण्यातला निकाल आजच जाहीर करायला हरकत नाही असं दिसतंय गेल्या काही दिवसातल्या बातम्यांवरुन..

आगोदर ऑनलाईन तपासता येत होतं ना?
एकूणात यावेळी पुण्यातला निकाल आजच जाहीर करायला हरकत नाही असं दिसतंय गेल्या काही दिवसातल्या बातम्यांवरुन..
+१

फुललं तरी "कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे" तसंच रहाणार की... "देई कोण हाळी त्याचा पडे बळी आधी हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे..""

चिंचवडमध्ये ५ मिन्टात मतदान झाले. बायको 'अब कि बार' वाली असली तरी राजकारणात फारसा रस नसलेली. मतदान करायला गेली तर कमळाचे चिन्हच नाही. तिने मला मोठ्याने विचारले 'चिन्ह नाही'. ती काय बोलतेय हे लगेच लक्षात आले, पण निवडणूक अधिकाऱ्यांसमोर कसे सांगणार . तेवढ्यात सुचले, म्हटले नावे वाच. सुदैवाने तिला उमेदवाराचे नाव ठाऊक होते. सारख्या नावाचे दोन उमेदवार असले तरी तिने योग्य नावापुढेच शिक्का मारला. कॉलेजमध्ये असताना निवडणूक बुथवर बसायचो तेव्हा मतदान करून आलेल्या बायका 'आपले' चिन्ह कुठचे रे भाऊ असे विचारायच्या त्याची आठवण आली. चिन्ह सांगितले कि हो हो त्यालाच दिले मत असे रेटून सांगायच्या. सक्रीय कार्यकर्ते तरी रात्री आणि सकाळी १० वेळा सांगून आले असायचे आपले चिन्ह कुठचे ते, पण सर्व मेहनत पाण्यात.

एक्दम एक्दम सेम स्टोरी. मला म्हणते जानकर च्या समोर कमळाचं चिन्ह कसं नाही, कपबशी का आहे. तिथे इलेक्शन अधिकार्‍याला विचारणार होती कमळाचं चिन्ह कुठाय म्हणून. नशीब नाही विचारलं.

सध्या भाजप म्हणजे फक्त मोदी असले तरी एनडीएमधे इतर पक्षही आहेत हे दाखवायला. :P असो, आमचाही असाच गोंधळ झाला होता. अहो इकडे कपबशीवाला पक्ष (एक माणूसवाला) आहे महायुतीतला. त्याला उमेदवारी दिली होती. स्साला काही प्रचारपण केला नाही त्यांनी आमच्या भागात. निवडणूकीच्या आधीच हत्यारे टाकल्यासारखी परीस्थीती होती. सातारा भागात पण महायुतीने उदयनराजेंसमोर कच खाल्ली म्हणे. त्यामानाने पुण्यात बरी परीस्थिती होती थेट कमळाचा उमेदवार दिल्यामुळे.

रत्नागिरीत अनेक जेष्ठ नागरिकांची नावे गायब आहेत. सिंधुदुर्गात धनुष्यबाणासमोरचे बटण दाबले तरी मत काँग्रेसलाच जातेय अशी बातमी पसरलीय इकडे, खरं-खोटं राणेना माहित! मी सकाळी सात वाजताच मतदान केले. मॉर्निंग वॉकवाल्यांनी गर्दी केल्याने अर्धा तास गेला.

वर मी लिंक दिलीय बघ, नारबची वाडी म्हणून. लोकांच्या लक्षात आल्यावर गोंधळ उडाला आणि मग मशीन बदलेपर्यंत ३ तास फुकट गेले. कलमाडी आणि नारायण राणे यांच्या एरियात हे प्रकार झाले हा मोठा 'गंमतीदार' योगायोग दिसतो आहे. पूर्वी बिहारमधे बूथ कॅप्चरिंग वगैरे व्हायचे. गुंड लोक धाडधाड मतपत्रिकांवर शिक्के मारताना शिनेम्यात पाहिले आहे. पण ही सॉफिस्टिकेटेड गुंडगिरी झाली.

नाही केले. मला आतापरेंत एकदाच शाई लावून घ्यायला मिळालीये. एकदा नाव बदलून सासरच्या गावी करणे वै. प्रयत्न केले आणि कोणी दाद लागू दिली नाही.

मी नाही करु शकले... मागच्या वेळी तिथे होते तर माझं नाव पुर्विच्या कंपनीच्या टाउनशीप जवळच्याच गावात होतं. तरिही धडपडत जाउन हक्क बजावुनच आले होते.. यावेळी वाईट वाटतय खूप....आधी नी मैं कमली कमली असले तरि यावेळी माझ्यावर आप ची फुल्ल सहानुभूती लाट आहे...

महाराष्ट्रात मावळ मतदारसंघात कर्जत तालुक्यातील डिकसळ मतदान केंद्रावर नवरदेवाने मतदान वाजत गाजत येऊन मतदान केले. (फोटोः संतोष दळवी) महाराष्ट्रात मावळ मतदारसंघात कर्जत तालुक्यातील डिकसळ मतदान केंद्रावर नवरदेवाने मतदान वाजत गाजत येऊन मतदान केले.

ह्येला म्हंत्यात जागरूक मतदार!!! नायतर तुमी बाकीची लोकं! एकानंबी वाजत गाजत जाऊन मतदान केल्यालं नाय!!! धत्तेरेकी!!! ;)

साहेबांच्या आदेशानुसार आता शाई पुसुन दुसर्‍यांदा मतदान करण्याचा विचार आहे. *LOL* *DANCE* *BRAVO* साहेब म्हणतात मतदान करो दो बार, अबकी बार मोदी सरकार पप्पूला फुगे, टॉफी प्रिय फार, अबकी बार मोदी सरकार केजरीवालांच्या झाडूचा चमत्कार, अबकी बार मोदी सरकार सुपर रिन की चमक बारबार, लगातार अबकी बार मोदी सरकार

दिवसभर सगळीकडे ' मतदान करा' चा प्रचार केल्यानंतर संध्याकाळी एक प्लेजंट सरप्राईज! काम कमी असल्याने नवर्याने चक्क पिक्चरची तिकीटे बुक करवली. पिक्चर होता भूतनाथ रिटर्नस. लहान मुलांचा असेल म्हणून मुलाबाळांसकट गेलो तर काय, तो पिक्चर ' मतदानाबद्दल जागृती ' या विषयाबद्दल होता. अगदी नोटाबद्दलही फार रंजक पद्धतीने माहिती होती. बालकलाकारांसह सर्वांचीच कामे अत्त्युत्तम . पण सगळ्यात महत्त्वाचे काय तर 'आपले मत आपले भविष्य' हाच विचार मांडला होता. वेळ आणि संधी मिळताच नक्की पहा.

अनिवासी भारतीयांना ह्यावेळी सुद्धा मतदान करता येणार नाही असेच दिसते. ह्या संधर्भात कोणाकडे काही माहिती असेल तर जरूर कळवावे.

आमचे आडनांव कुळ्कर्णी , देशपांडे अथवा जोशी नसल्याने कोथरुड मध्ये असूनही आमच्या दोघांची नांवे योग्य पत्त्यासह होती .( आमचे कुलकर्णी हे मूळ आडनाव गांधी हत्येनंतर बद्लून घेणार्‍या स्वर्गीय आजोबांच्या दूरदृष्टीचे प्रचंड कौतुक वाटले.१९४९ चे कष्ट आता कामास आले.) बदलून मी आठ दिवसापूर्वीच " मीखासदार " नावाचे श्री.शिरोळे यांचे एक अ‍ॅप मोबाईलवर उतरवून घेतले होते , त्यात मिळ्णारी नावे शंभर टक्के मतदान करु शकत होती ! आमच्या सार्‍या सोसयटीचे मतदान होईल असा आमचा प्रयत्न होता. बाकी दिवसभर महेश विद्यालय/शिवराय प्रतिष्टान परिसरातच होतो. ज्यांची नावे नव्हती त्यांचे हिरमुसलेले चेहरे बघून खूप वाईट वाटत होते आणि संतापही येत होता.....! कदमांनी हा रडीचा डाव खेळायला नको होता.. स्साले पाकडे सुद्धा असे वागत नाहीत.

>>> कदमांनी हा रडीचा डाव खेळायला नको होता.. स्साले पाकडे सुद्धा असे वागत नाहीत. सहमत! मतदार यादीतील आडनावे बघून निवडक नावे वगळलेली दिसत आहेत. निवडणुक जिंकण्यासाठी हे कितीही खालच्या थराला जातील. कसबा, कोथरूड व पर्वतीमध्ये शिवाजीनगर, वडगाव व कॅम्पच्या तुलनेत मतदान जास्त असल्याने यांचा हा घाणेरडा डाव यशस्वी होणार नाही अशी आशा आहे.

जवळपास १ लाख लोकांची नवे गायब आहेत १ महिना आधीपासून सरकार नवे तपसायला सांगत होते नवे नसणार्यांम्ध्ये अमोल पालेकर , सलिल कुलकर्णी हे पण आहेत पैकी अमोल पालेकर ह्यांनी नवे नसण्याचा १ महिना आधी पाठपुरावा करून देखील काहीही झाले नाही आणि त्यांना काल मतदान करता आले नाही असेच बऱ्याच लोकांचे झाले असण्याची शक्यता आहे :-( :-( आणि ज्यांची नावे मागच्या यादीत होती ते ह्या वेळेस निर्धास्त राहिले असतील आणि एकदम मतदानाच्या दिवशीच जागे झाले असतील it is bit natural

पुण्यातील मतदार यादीचा घोळ; स्वतंत्र मतदानाची मागणी (18-04-2014 : 11:08:43) पुणे : पुणे शहरातील मतदार यादीतून अनेक नागरिकांची नावे गायब झाल्याने संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना घेराव घातला. प्रामुख्याने सुशिक्षित आणि सोसायटी परिसरातील नावेच गायब झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्ष, मनसे आणि आम आदमी पक्षाने केला असून, पुण्यात फेरमतदानाची मागणी केली आहे. नागरिकांनी उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत लेखी तक्रारी दाखल कराव्यात, असे राव यांनी सांगितले. मात्र, या आश्‍वासनावर समाधान न झाल्याने भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी वगळलेल्या नावांसाठी स्वतंत्र मतदान घ्यावे, अशी मागणी करत शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून उपोषणाचा इशारा दिला आहे. आपचे सुभाष वारे यांनीही सत्याग्रह करणार असल्याचे सांगितले आहे. पुण्यातील अनेकांची नावेच मतदार यादीतून गायब झाल्याने आज अनेक ठिकाणी नागरिकांचे निवडणूक अधिकार्‍यांशी खटके उडत होते. प्रामुख्याने कोथरूड, कॅन्टोंमेंट आणि पेठांच्या परिसरातील अनेक सोसायट्यांतील सर्वच नावे गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांचा संताप वाढला. असंख्य नागरिकांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याने संतप्त झाल्याने मतदारांनी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक मारून थेट जिल्हाधिकारी सौरभ राव यांना घेराव घातला. वर्षानुवर्षे मतदान करणार्‍यांना मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे. शिवाय नवमतदारांची नावे यादीत आली पाहिजेत, या मागणीसाठी शिरोळे, प्रा. वारे, विनिता देशमुख हे देखील घेरावामध्ये सामील झाले. राव यांनी कार्यालयाबाहेर शिरोळे यांच्याशी चर्चा केली. त्या वेळी निवडणूक आयोगाशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले. शिरोळे म्हणाले, ''पुणे लोकसभेसाठी ज्या मतदारांना यादीत नाव नसल्याने मतदान करता आले नाही, त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्र दिवस ठरवून मतदान करण्याची संधी द्यावी. तसेच, मतदारांची नावे वगळण्यास जबाबदार असलेल्या अधिकार्‍यांवर फौजदारी करून त्यांना निलंबित करण्यात यावे. या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून कौन्सिल हॉलसमोर उपोषण करणार आहे.'' दरम्यान, दुपारपासूनच मतदार यादीत नाव नसल्याच्या तक्रारी घेऊन अनेक नागरिक जिल्हाधिकार्‍यांना भेटण्यासाठी येत होते. मात्र, जिल्हाधिकारी किंवा कोणतेही वरिष्ठ अधिकारी त्यांना भेट देत नव्हते. सायंकाळी सहा वाजता मतदान संपल्यावर शेकडो नागरिक येथे जमा झाले. नागरिकांचा संताप वाढल्यावर जिल्हाधिकार्‍यांनी त्यांची भेट घेतली. या वेळी नागरिकांनी त्यांना घेराव घातला. वातावरणात तणाव निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. विधान भवन परिसराला लष्करी छावणीचे स्वरुप आले होते. विधानभवनाची दारेही बंद करण्यात आली. आत जाऊ इच्छिणार्‍या नागरिकांना पोलीसांनी मनाई केली. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर घोषणाबाजी सुरू झाली. प्रा. वारे यांनाही आतमध्ये येऊ देण्यात आले नाही. तसेच शिरोळे यांनाही जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊ दिले नाही. काही वेळ विधानभवनासमोरील रस्ताही अडविला होता. नागरिकांचा संताप वाढल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी बाहेर येऊन त्यांची भेट घेतली. लोकसभा मतदार संघातील मतदार यादीतून नावे वगळली असल्याच्या तक्रारी नागरिकांनी उद्या (शुक्रवारी) सकाळी ११ वाजेपर्यंत निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल कराव्यात. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडे संबंधित निवेदने पाठवून पुढील निर्णय़ घेण्यात घेण्यात येईल, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आज दिले. त्यानंतर पुढे काहीही बोलण्यास त्यांनी नकार देऊन राव त्यांच्या कार्यालयात निघून गेले. त्यानंतरही नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले होते.

आपली नाराजी नोंदवा "एसएमएस'वर गुरुवारी (ता. 17) झालेल्या मतदानाच्या वेळी पुण्यातील हजारो मतदार मतदानापासून वंचित राहिले. आयोगाच्या या कारभाराबाबत मतदारांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. "सकाळ'ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शुक्रवारी तब्बल 10 हजार मतदारांनी "एसएमएस'वर तक्रारी नोंदविल्या. जे मतदार मतदान करू शकले नाहीत, त्यांच्यासाठी तक्रार नोंदविण्याची सुविधा उद्यादेखील (ता. 19) सुरू राहणार आहे. "एसएमएस'च्या माध्यमातून एकत्र आलेल्या तक्रारी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत पोचवल्या जाणार आहेत. तसेच, यावर योग्य कार्यवाहीसाठी "सकाळ' आग्रही राहणार आहे. "एसएमएस' पाठविण्यासाठी VOTE (space) Full name (space) vidhan sabha constituency या स्वरूपात माहिती टाइप करून 9922421511 या क्रमांकावर पाठवा साभार: हजारो मतदारांच्या 'सकाळ'कडे तक्रारी मटा उद्रेकानंतर आता निकराची लढाई

लोकशाही म्हणजे काय? मतदान का करावे? एकवेळ विचार करुन पहा मतदानाशिवाय नेते निवडून येण्याची एखादी प्रक्रिया असेल तर काय होईल यांचा कधी विचार केला आहे का? http://www.misalpav.com/node/24074

निवडणुक आयोग कर्मचार्यांच्या कृपेने मतदार यादीत नाव शाबूत राहिल्याने मतदान करायला मिळाले. :)

काय मतदान केलं का ? आम्ही मतदान केलं म्हणजे मोठी समाज सेवा केली असे दाखवणारा एक वर्ग उदयास आला आहे. ( व्होटस एप वर आपले उलटे बोट फोटो काढून लोकांना/ तुम्हाला पाठवून तुमची उलट तपासणी करणारा) यातील एकाने मला तुम्ही बिझी लोक तुम्ही कशाला मतदान करताय म्हणून विचारले. मी शांतपणे त्याला आपले बोट दाखवले . त्यावर त्याने ओशाळून सांगितले कि मी दुपारी जाणार आहे. मी त्याला एकच सांगितले कि मतदान केले हे कुणावर उपकार किंवा समाजसेवा नसून आपले(तुमचे आणि आमचे) कर्तव्य आहे. आणि केवळ मतदान केले म्हणून आता राजकारणी लोकांना शिव्या देण्याचा आपल्याला हक्क प्राप्त झाला असे समजायचे कारण नाही. तेंव्हा मतदान केले यात शेखी मिरवण्यासारखे काही नाही. केवळ १८ वर्षपूर्वी जन्माला आलात यात आपले कोणते कर्तुत्व? बहुधा पुढच्या निवडणुकीपर्यंत मला तोंड दाखविणार नाही असे वाटते.

मतदान म्हणजे एक फ्याडच झालंय सध्या. एक स्टाइल-स्टेटमेंट.