Welcome to misalpav.com
लेखक: स्वमग्नता एकलकोंडेकर | प्रसिद्ध:
आपण शाळेत असल्यापासून शिकत आलो आहोत, मानवाला पंचेंद्रीये असतात. स्पर्श, स्वाद, गंध, आवाज व दृश्य.( sight, smell, taste, touch, sound). पण मी तुम्हाला सांगितले कि ती माहिती चुकीची आहे तर? हो, आपल्याला वर नमूद केलेल्या पाच इंद्रियांच्याखेरीज अजून दोन लपलेले(हिडन) सेन्सेस असतात.


  1.  Vestibular - our sense of balance that is regulated by the inner ear. म्हणजे असं बघा, आपण बसमध्ये बसलो आहोत, बस डावीकडे वळाली तर आपण उजवीकडे कळतो कि नाही? (इनर्शिआमुळे) पण आपल्याला कशानेतरी कळते कि आपण जास्त उजवीकडे झुकलो आहोत. व आपण सरसावून नीट बसतो. हे कसे कळते? जेव्हा आपण एका बाजूस जास्त झुकतो (समजा दोरीवरून balance साधत चालत असताना) तेव्हा आपल्या त्या बाजूच्या कानातील फ्लुइड वाढते. व मेंदू त्याप्रमाणे सुचना देऊन शरीराची पोझिशन सुधारतो. या vestibular sense मुळेच आपल्याला आजूबाजूचे भान येते. आपण शरीराचा balance करत आहोत कि नाही, आपल्या शरीराच्या हालचाली या सर्व आपल्याला या  सेन्समुळे ज्ञात असतात. 
  2. Proprioceptive - या सेन्समुळे आपल्याला आपले हात, पाय अशासारखे अवयव कुठे आहेत हे समजते. आपल्या शरीरातील स्नायू, ligaments, joints हे आपल्या शरीराला ती माहिती पुरवत असतात. 



Autism spectrum वर असलेल्या मुलांचे वरील सातपैकी काही सेन्सेस हे नॉर्मल माणसाप्रमाणे काम करत नाहीत. त्यामुळे ही मुले कधी कान झाकताना दिसतात, तर कधी डोळ्यापुढे हाताने विचित्र हातवारे करतात, तर कधी दाणकन अंग टाकून देतात. हे असं का होते? माझ्या मुलाचे विचाराल तर तो आवाज व दृश्य याबाबतीत हायपरसेन्सेटिव्ह आहे. म्हणजे तो कधी कान झाकतो , कधी जाळीच्या खुर्चीतून बघायला त्याला आवडते. स्पर्श किंवा tactile sense बद्दल बोलायचे तर तो hyposensetive आहे. त्याला सोफ्यावर अंग फेकून द्यायला खूप आवडते. आवडते म्हणजे दिवसातून एकदा दोनदा तो असे करतो का? तर नाही. तो उठल्यापासून झोपेपर्यंत अगणित वेळा असे करत असतो. तसेच मार लागलेला कळत नाही. हे ही या सेन्स बद्दल असलेल्या कमी प्रतिसादामुळे होते. मेंदूपर्यंत हि सुचना जातच नाही.

स्वाद - खाणे. ही एक लढाई असते. कारण एरवी मुलांना खाण्याची चव आवडली तर तो पदार्थ मुलं खातात. पण स्पेक्ट्रमवर असलेल्या, Sensory Integration Disorder असलेल्या मुलांसाठी अजून एक factor विचारात घ्यावा लागतो. टेक्श्चर. पदार्थाचे टेक्श्चर कसे आहे यावर बर्याच गोष्टी ठरतात. त्यामुळेच ही मुलं अतिशय  Picky Eater असतात. त्यांना खायला घालणे ही त्यांच्या आयांसाठी अगदी जिकिरीची गोष्ट असते. तोंड उघडायाचेच नाही ही पहिली पायरी. उघडले तरीही जिभेला पदार्थाचा स्पर्श होताच सगळे बाहेर काढून टाकणे. मग त्यापुढे अजिबातच तोंड न उघडणे. vicious circle. जरी पदार्थ, त्याचे टेक्श्चर आवडले तरी तो पटापटा चावून सर्व ताट साफ करेल तर तसे नाही. तो पदार्थ गालात धरून बसणे. तुम्ही म्हणाल सगळीच मुले अशी करतात. तर नाही. तुम्ही माझ्या घरी या व बघा जेवणाच्या वेळेसची माझी कसरत. हे सारखे नव्हे. या सगळ्या सेन्सरी गोष्टींमुळे माझ्या मुलाला क्रंची, क्रिस्पी पदार्थ खूप आवडतात. लहान मुलांचे staple food मऊ गुरगुट्या भात अजिबात खात नाही माझा मुलगा. 
फक्त खाण्याबद्दलच नव्हे, आपल्याला कल्पना करता येणार नाही इतके या मुलांचे आयुष्य अवघड असते या sensory integration disorder मुळे. प्रखर प्रकाशात , गोंगाटाच्या ठिकाणी प्रचंड unsettling, uncomfortable वाटते या मुलांना. 
एक एक गोष्ट हळूहळू explore करत असल्याने व मुळातच सेन्सेस व्यवस्थित काम करत नसल्याने सतत जीभेशी खेळणे, तोंड वेडेवाकडे करणे, एखाद्याच गोष्टीला नको तितके attach  होणे, सततची पळापळ, चेहर्यासमोर हाताने काहीतरी अदृश्य हातवारे करणे, डोळ्याच्या कडेने बघणे, गोल गिरक्या घेणे, अतिशय अडगळीच्या जागेत कमी जागेत खुपसून बसणे, धोक्याची कल्पना नसणे,  दुसर्या व्यक्तीस बिग हग देताना अतिशय घट्ट कवटाळणे अशासारखे प्रकार घडत असतात. 

Autism झालेल्या मुलांच्या आयुष्यात Sensory Integration Disorder ने अगदी ठाण मांडलेलेच असते म्हणा ना..  
-स्वमग्नता एकलकोंडेकर
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

अतिशय सुंदर माहिती ... तुम्हाला किंवा संपादकना विनंती जर शक्य असेल तर तुमच्या प्रत्येक लेखात इतर लेखांच्या लिंक देता येईल का ते पहा !!!!

ही मुलं असं का करतात याचं परफेक्ट उत्तर मिळालं. अशा मुलाला सांभाळणं ही खरंच तारेवरची कसरत आहे. आणि त्याहून कठीण म्हणजे आपल्याला काही झालं तरी राग येऊ न देणे.

माहितीपूर्ण लेख. मुलाच्या अशा शारीरीक समस्येबरोबर आई-वडील आणि इतर कुटुंबिय ह्यांची भावनिक गुंतणूक असते. त्यामुळे त्यांना अशा मुलांना वाढविणे फार क्लेषदायक होत असणार. पण, ह्यावर अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी वगैरे उपचारपद्धतींच्या शाखांमध्ये कांही दिलासादायक उपचारपद्धती नाहीत का? तसेच, अशा मुलाची अशी अवस्था त्याच्या वयाच्या कुठपर्यंत राहते? नैसर्गिकरित्या कांही सकारात्मक बदल घडतात का? तुमच्या धैर्याचे कौतुक आहे. तुमचे मनोबळ वाढते राहो एवढीच प्रार्थना देवाकडे करू शकतो.

जगात असा एकही प्रश्न नाही की ज्याचे उत्तर नाही. फक्त शोधण्याचे थोडे कष्ट घ्यावे लागतात व त्याचबरोबर पुण्य हवे असते नशिबाला म्हणजे योग्य ते सल्ले/उपचार/गुरु लवकर तरी भेटतात व आपल्यालाही त्याचा फायदा घ्यावासा वाटतो. पुण्य नसेल तर डॉक्टर अगदी बाजूला असूनही माहिती होत नाही किंवा माहिती झाली तरी त्याच्याकडे जावेसे वाटत नाही किंवा अगदी उपचार सुरु होऊन देखील खंड पडतो. पुण्य मिळवण्यासाठी मन शुद्ध ठेवून इतरांची/गरजूंची योग्य प्रकारे मदत करणे गरजेचे आहे. अगदी देवाचे पूजा पाठ केले नाही तरी चालतील पण कोणालाही दुखविता कामा नये. इतरांना वेळीच केलेली मदत आपल्या अडचणीच्या वेळी कोणत्या ना कोणत्या स्वरुपात देव नक्कीच मिळवून देत असतो. फक्त सर्व काही चांगलेच होईल हा विश्वास येण्यासाठी आधी स्वत:हून पुढाकार घेवून चांगले करावे लागते.

ह्यावर अ‍ॅलोपथीमध्ये काहीही उपचार नाहीत. होमिओपथीत अशा लक्षणांना टार्गेट करणारी औशधे म्हणे असतात. आम्ही त्या वाट्याला गेलोहो होतो. पण एक म्हण्जे ते डॉक्टर कुठल्या पाण्ढर्या गोळ्या देतात त्याची माहीतीदेखील सांगायला तयार नाहीत. आम्हाला हे कम्फर्टेबल वाटत नाही. त्याहीपेक्षा महत्वाचे कारण मुलगा त्या गोळ्या घेत नाही. प्रचंड ओरल अ‍ॅव्हर्जन्स असतात या मुलांना सेन्सरी प्रोसेसिंग डिसॉर्डरमुळे. त्यामुळे जमत नाही. फ्लॉवर रेमेडीत काही उपचार आहेत. आम्ही पुढे एक बायोमेडिकल उपचार पद्धती अवलंबली होती/आहे. सगळ्यात कॉमन फॅक्टर आहे औषधे घेणे. व तिथे आम्हाला यश येत नाही. (तसेच गोळ्या घेतल्या तरीही यश आले नाही. कारण मूळात ऑटीझम ही स्पेक्ट्रम डिसॉर्डर आहे. एकाला उपयुक्त पडेल ते दुसर्याला नाही. आम्हाला नाही उपयोग झाला.) मुलांची ही अवस्था लाइफलाँग आहे हे डायग्नोसिसच्या वेळेस सांगितले गेले होते. तो आत्ता वयच्या ४-४.५ वर्षीदेखील एकही शब्द उच्चारत नाही. तो कधी बोलेल आम्हाला माहीत नाही. तो पॉटी ट्रेन्ड होईल का माहीत नाही. आयुष्यभर डिपेंडंट असेल का- माहीत नाही. नैसर्गिकरीत्या- वय वाढेल तसं समज वाढून काही सकारात्मक बदल घडावेत ही आशा आहे. अगदी मुंगीच्या पावलाने घडतात देखील. इट्स जस्ट व्हेरी स्लो प्रोसिजर. नीड्स लॉट ऑफ पेशन्स. आणि अर्थातच आशेच्या अदृश्य दोरीला लटकत राहायचे कायम.

जाता जाता माझ्या मित्राच्या मुलीला (ते अमेरिकेत असतात) पण हाच आजार आहे. तिला मुंबईत एक होमियोपथ औषध देतो असे कळल्यामुळे हा मित्र तेथे गेला होता. त्याची फी ५००० रुपये होती/ मित्र अमेरिकेत असतो हे कळल्यावर त्याने ५००० डॉलर्स द्या असे सांगितले. मित्राने संतापाने सांगितले तुम्हाला ५००० रुपयात औषध द्यायचे तर द्या नाहीतर नको. अमेरिकेत डॉलर्स मिळवायला आम्ही किती कष्ट घेतो ते तुम्हाला माहित नाही. तात्पर्य - बुडत्याला काडीचा आधार शोधात असणार्या माणसाना सुद्धा लुबाडणारे लोक फार आहेत. काळजी घ्या

म्हणूनच आजकाल वकिल / डॉक्टर / अर्थसल्ला देणारे यांच्याकडे गबाळ्या वेशात स्लिपर घालून जावे :) अवांतर - वरच्या वाक्यास तुम्ही अपवाद :)

आपल्या माहितीत एक वेगळी भर sense of balance आणि Proprioception बद्द्दल नौदलातील कमांडो पाणबुडे जेंव्हा अंधार्या रात्री पाण्याच्या खालून पोहत जातात तेंव्हा समुद्राच्या थंड पाण्याच्या जडपणामुळे त्यांची पंचेंद्रियेच नव्हे तर sense of balance-vestibular appartus काम करीत नाहीत. हा कानातील अवयव गुरुत्वाकर्षणावर काम करीत असतो आणि आपण पाण्यात "बुडतो"म्हणजे खाली(पृथ्वीच्या केंद्राकडे) जातो हि जाणीव मेंदूला देत असतो पण थंड पाण्याची घनता जास्त असल्याने तो "वर" ढकलला जातो. या प्रकाराला जर तो पाणबुडा आपण बुडत आहोत हे समजला तर पाण्याच्या तळाकडे पोहू लागतो. त्यातून जर तो एखाद्या भोवर्यात सापडला तर त्याच्या दिशेबद्दल्चे संदर्भ साफ नाहीसे होतात. अंधळ्या कोशिम्बिरीत माणसाला चार चकरा फिरवून सोडले जाते तसेच पण येथे त्रिमितीत होते दिवसा प्रकाश "वरच्या" दिशेकडून येत असतो तो प्रकाशही रात्री येत नसल्यामुळे दृष्टी असून पाणबुडा अंध असतो. आणि अशा परिस्थितीत त्याचे Proprioception काम करत नसेल तर तो समुद्राच्य तळाशी पोहत जाऊन बुडू शकतो. यासाठी त्याला या सातव्या संवेदनेचे Proprioception प्रशिक्षण दिले जाते.