Skip to main content

काबुली चणा सॅलेड

लेखक दिपक.कुवेत यांनी मंगळवार, 22/04/2014 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
Salad साहित्यः १. वाफवलेले काबुली चणे - १.५ कप २. बारीक चीरलेला पालक (कच्चाच) - १/२ कप ३. मध्यम चीरलेला कांदा - १ ४. मध्यम चीरलेली काकडि - १/२ कप ५. मध्यम चीरलेली लाल सीमला मिरची - १/२ कप ६. ब्लॅक ऑलीव्ह्ज - ३ चमचे ७. बारीक चीरलेली कोथींबीर (पार्स्ले मिळाली तर उत्तम) ८. कुस्करलेलं फेटा चीज - २ मोठे चमचे ९. चवीनुसार मीठ (फेटाचीज मधेहि असतं ईनफॅक्ट जास्तच असतं) ड्रेसींगसाठि: १०. चीली फ्लेक्स किंवा बारीक चीरलेली लाल/हिरवी मिरची - १ चमचा (तिखट ज्या प्रमाणात हवं असेल त्या प्रमाणात कमी/जास्त करणे) ११. ऑलीव्ह ऑईल - ४ मोठे चमचे, व्हिनेगर किंवा लींबाचा रस - १/२ चमचा, मध १/२ चमचा कृती: १. एका मोठ्या बाउल मधे अनुक्रमे काबुली चणे, पालक, कांदा, काकडि, लाल सीमला मिरची, ब्लॅक ऑलीव्ह्ज, बारीक चीरलेली कोथींबीर किंवा पार्स्ले, कुस्करलेलं फेटा चीज आणि चवीनुसार मीठ घालुन हलक्या हाताने एकत्र करा २. ड्रेसींगसाठि दिलेलं सर्व साहित्य एका दुसर्‍या बाउल मधे मिक्स करा ३. तयार ड्रेसींग आणि सॅलेड फ्रिजमधे १/२ तास ठेवुन द्या ४. सॅलेड गार झालं कि ड्रेसींग सॅलेडवर घालुन परत हलक्या हाताने मिक्स करुन सर्व करा. हे सॅलेड गाsssssरच छान लागतं टिपा: १. कच्चा पालक आवडत नसल्यास नाहि घातलात तरी चवीत विशेष फरक पडत नाहि २. ड्रेसींग अगदि सर्व करण्याअगोदर घाला. ड्रेसींगसकट सॅलेड फ्रिज मधे ठेवलं तर पाणी सुटुन कदाचीत पाणचट लागण्याची शक्यता आहे ३. सॅलेड मधे थोडाशी नटि/क्रंची चव हवी असल्यास खारे शेंगदाणे किंवा भरडसर वाटलेले अक्रोड घालु शकता

वाचने 25908
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

झकास्स्स... :) @ कंजूस महोदय वाळक्यांच नाव काढुन तुम्ही आम्हासनी लयं त्रास दिला बघा. ;)

मस्तं सॅलड. प्रथिनांचा (प्रोटीन्सचा) फायदा शरीरास होण्यासाठी कर्बोदकांची (कार्बोहाड्रेट्सची) गरज असतेच. त्यामुळे भाज्या आणि चीझ सोबत काबूली चण्याचे प्रयोजन अगदी योग्य आहे. कांही पोषकद्रव्यांना शरीरात पचनासाठी तेलाची गरज असते. फक्त तेलातच त्यांचे विघटन होते. त्यामुळे माफक प्रमाणात घातलेल्या ऑलीव्ह ऑईलने हे सॅलड म्हणजे एक परिपूर्ण आहार झाला आहे. गरजेनुसार तेलाचे प्रमाण कमी करणे, चीझ टाळणे इ.इ. सुरक्षित पाऊले उचलण्यास हरकत नाही. ज्यांना मांसाहार वर्ज्य किंवा निषिद्ध नाही त्यांनी उकडलेल्या कोंबडीच्या मांसाचे बारीक तुकडे किंचित मीठ आणि काळीमिरी भुरभुरून वरील सॅलडात मिसळायला हरकत नाही. (हे सर्व जेवणाऐवजी खाल्ल्यास शरीरास सर्व पोषकद्रव्ये मिळूनही वजन आटोक्यात ठेवण्यास मदत होईल.)

In reply to by प्रभाकर पेठकर

पेठकर काका, आपला प्रतिसाद आवडला, पण "प्रथिनांचा (प्रोटीन्सचा) फायदा शरीरास होण्यासाठी कर्बोदकांची (कार्बोहाड्रेट्सची) गरज असतेच." हे मात्र डोक्यावरून (tangently)गेलंय! कृपया, जरा अधिक स्पष्ट करून हवे आहे. धन्यवाद,

In reply to by आयुर्हित

माझा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी आपल्या पारंपारीक पाककृतींकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. जसे आमटी-भात, भाजी-पोळी, डाळीची खिचडी, कोंबडीचे, बोकडाचे कालवण - भात, आंबोळ्या, भाकरी इ.इ.इ. गोर्‍यांकडे मांसाहारा बरोबर पाव, अरबस्थानात मांसाहाराबरोबर खुप्स (पिटा ब्रेड) इ.इ. खाल्ले जातात. ह्या सर्व आहार पद्धतीत प्रथिनांबरोबर कर्बोदकाची साथ असते. कर्बोदकांमुळे 'पोट भरल्याची' भावनाही लवकर निर्माण होऊन माणूस समाधान पावतो. बाकी माहिती गुगलावर मिळेलच.

यात कुरकुरित पिटा चिप्स घातल्याकी फतूश सॅलडसारखेच लागेल. अर्थात फतूशमध्ये छोले/चणे आणि ऑलिव्ह्ज नसतात पण चालेल एक वेगळे फतूश म्हणून.

व्हेरी गुड आयडिया. हे फतुश सॅलेड पण मला फार आवडतं ते त्यात असण्यार्‍या कुरकुरीत चिप्स मुळेच.

तेल कोणतेही खावे .त्यात चव आणि परवडणे हे जास्त महत्त्वाचे .कोलेस्टरॉलची वाढ फक्त तेलानेच होते असं नाही .अतिआहार आणि जिवाला नाही कहार तर रक्तातला वाहाता मेद वाढतो . राहिला मुद्दा प्रतिष्ठेचा .आम्ही यँव करतो वगैरे त्याच्याशी उपयुक्ततेचा काहीच संबंध नाही . तेलाच्या केमिस्ट्रीविषयी नंतर कधीतरी .

In reply to by राघवेंद्र

फोटो टाका कि राव त्यामुळे ईतरांना पण हुरुप येईल. ड्रेसींग साठि वरील साहित्य टाळुन (चीज/ऑईल असल्यामुळे) अजुन एक करता येईल.... आलं, मिरची, पुदिना, कोथींबीर आणि ब्लांच केलेला पालक हे सर्व मिक्सर मधे मुलायम वाटुन दह्याच्या चक्क्यात घालावं. जरुरी पुरतं पाणी घालुन हे ड्रेसींग सॅलडवर घालुन मिक्स करणे.

फोटो काल मोबाईलवर पाहिले. छान आलेत. पण ईथे दिसत नाहियेत. नुसती दोन टिंब दिसत आहेत.

In reply to by दिपक.कुवेत

मित्रा, मला ऑफिस मधुन सुध्दा व्यवस्थित दिसत आहेत. ( गुगलच वापरले आहे ) हा विकांताला तुमची सॅलड व मिर्च का सालन व सप्रे साहेबांची दावणगिरी दोसा पाककृती करुन बघितली. मस्त झाली होती. मिर्च का सालन फोटो टाकण्यासाठी अजुन एकदा करावी लागेल.

कच्चा पालक आवडत नसल्यामुळे पुदिना घालून करून पाह्ते. बाकी हा 'चखणा' आहे हे नवीन समजलं. माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे चखणे हे तळलेले पदार्थ असतात.