Welcome to misalpav.com
लेखक: मालविका | प्रसिद्ध:
एस टि तिल काही अनुभव कायम स्वरूपी लक्षात राहिले. सध्याच्या महिलन्वरिल वाढत्या अत्याचारचे प्रमाण बघता हे अनुभव मला नेहमी आठवतात. मी पुण्याला नोकरी करायला होते. alternate शनिवार रविवार जोडून सुट्टी मिळत असे.तेव्हा मी रात्रीच्या एस टि ने चिपळुन ला येत असे.पहिल्या वेळी मला काहीच त्रास झाला नाही.तसहि त्या गडिने बरेच चिपलूणकर ये जा करीत असतात.बरेच विद्यार्थीही सोयिचि असते म्हणून त्या बस ने प्रवास करतात.रात्री 11ला स्वारगेट वरून बस निघते ति सकाळी 4.30/ 5पर्यंत चिपळुन ला पोचते.तशीच बस येताना रात्री चिपळुन हून पुण्याला यायला.खर तर खासगी बस पण अनेक अहेत.पण वाटेत बाथ रूम साठी कुठेही थांबतात.त्यापेक्षा एस टि सातारा स्टॅन्ड वर थांबते ते सुरक्षित वाटत.एकदा मी पुण्याहून येत असताना गदिने कात्रज घाट सुरू केल्यावर चालकने सर्व दिवे बंद केले.घाट उतरयला सुरवात झाली आणि मला जणवल कि मागुन कुनितरि मला स्पर्श करतय.मी खिडकिला डोक टेकुन झोपयचा प्रयत्न करत होते.तेव्हा लक्षात आल कि खिडकी आणि सीट यामधून मागचा माणूस हात पुढे करुन मला स्पर्श करु पाहतोय.एक क्षण अंगावर शहरा आला . 2/3वेळा हाच प्रकार झाल्यावर मी वैतगले. का कुणास ठवुक मला उठून कंदक्तर कडे त्याची तक्रार करायची हिम्मत झाली नाही.पण म्हणून त्या माणसाला असाच सोडुन देण शक्य नव्हत.मग तेव्हा माजी धारदार टोकेरि नख कामी आली. जेव्हा त्या माणसाचा हात पुढे यायचा मी चांगला बोचकरुन काढायचे.तरीही त्या दळभद्रि माणसाने चिकाटी सोडली नाही.जवळ जवळ 5/6 वेळा मी त्याला बोचकरल.शेवटी सातारा स्टॅन्ड वर गाडी थांबली.लाईट लागल्यावर मी उठून त्या मानसाकडे अश्य तीक्शण नजेरेने बघितल कि त्याने आपन्हुन मन खाली घातली.त्याच्या हातावर नखचे ओर्खाडे दिसत होते.मग मात्र पुढच्या प्रवासात त्याने काही फाजिल्पना केला नाही.दुसर्‍या वेलिहि हाच अनुभव मधल्या फटितुन मगचा माणूस हात लावतोय.या वेळी माझ्ह्या बरोबर माझी मैत्रिन देखिल होती.तेव्हा मात्र आम्ही उठून कंदक्तर ला लाईट लावायला सांगून रित्सर त्याची तक्रार केळी.मग त्याने दुसर्‍या एका स्त्री ला विनंती करुन तिला आमच्या पाठि बसायाची सोय केलि.एकदा मागचा एक माणूस पाठि टेकयचि आणि बसय्चि सीट असते त्याच्या मधल्या फटितुन पठि पाय लावत होता.तेव्हसुध्हा मी त्याची मजा केलि .सातारा स्टॅन्ड साठी गाडी वल्ली आणि मी एकदम वळून त्याचा पाय त्या सीट च्या फतितच पकडून ठेवला.माझ्या सुदैवाने त्याने बंद बूट घातले नवते त्यामुळे त्याची बोटे बरोबर माझ्या हातात सापडली.आणि तेवढ्यात लाईट लागले.आणि मग मात्र कंदक्तर ने त्याला जाम झाडले आणि या वेळी मला जागा बदलून दिली . या उलट देखील चांगले अनुभव अहेत.मज गाव चिपळुन पासून 25 किमी असल्याने याच पूना गदिने आल कि मला लगेच मुंबई हून आलेल्य पुढे जाणार्‍या गाड्या मिळत.बरिचशि गर्दी चिपळुन ला उतरत असे.आमचा बस थांबा मुंबई गोवा महामार्गावर एक तिठ्यावर आहे .मी आधी घरी कल्पना दिलेली असल्याने मी चिपळुन हून निघाले कि घरी फोन करुन कल्वित असे.मग साधारण अंदजने दादा किंवा बाबा मला नायायला येत.सकाळी 5/5.30 पर्यंत गाडी तिथे पोचत असे.मी उतरयचि तयारी करायचे आणि कंदक्तर ला सांगायचे कि मला तिथे उतरायचे.बर्यच वेळा ते मला विचारत कोणि येणार अहे का आणायला ? बाबा तिथे असयचेच.पण 2दा बबना चुकून उशीर झाला तर कंदक्तर ने गाडी थांबवून ठेवली आणि मला उतरु दिल नाही .जेव्हा बाबा आले तेव्हा त्याने दार उघडून दिल .एकदा तर गाडी 20 मिनितमधे आली.एरवी 30 मिनिटे लागतात .मग चक्क कंदक्तर खाली उतरून मला घरी सोडुन आला.घर अगदीच 10 पावला वर आहे .पण त्याचे कर्तर्व्य असल्यसरखे तो मला घरी पोचवयला आला.हे अनुभव देखिल नक्कीच लक्षात रहन्यसरखे अहेत. त्याचमुळे मि इतके वेळा पुणे चिपळुन प्रवास केला असेल पण भीती मात्र कधी नाही वाटली . आत्मविश्वास असला कि कुठल्याही प्रसंगला समोर जायला भीती नाही वाटत .
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

मी पयला. फारच छान. असे धैर्य पाहीजे. अशा माणसांना चांगली अद्दल घडवली पाहीजे.

चांगला लेख! प्रवासात गैरफायदा घेऊन स्त्रियांना त्रास देणार्‍या विकृतांना चांगली अद्दल घडविलीत. नुसत्या नखांनी ओरबाडण्यापेक्षा नेलकटर किंवा पिन जोरात टोचायला हवी होती.

+++ १ . माझ्या एका मैत्रिणी ने सहाआसनी गाडीमध्ये हा प्रयोग केला होता . ती व्यक्ती ५ मिनिटात गाडीतून खाली उतरली . सर्वशक्तीनिशी तिने पिन टोचली होती कदाचित रक्तही आलं असेल . अशा माणसाना सोडता कामा नये . एका वेळेस सुटले तर पुढे नक्कीच ते असा प्रयत्न करणार . ८-१० वर्षाच्या रोजच्या प्रवासात घडलेले बरेच किस्से आहेत . आपले आपणच धाडस केले पाहिजे . बऱ्याच वेळा मुली घाबरतात आणि अशा हलकटांचे फावते . एक मुलगी अक्षरशः रडली होती बस मध्ये . तशी लहान होती बिचारी घरारून गेलेली . तो बेशरम उतरून गेल्यावर बोलली आधीच बोलली असती तर काहीतरी करता आलं असत . याला कोणी अपवाद नाही अगदी सुशिक्षित लोकांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत . म्हातारे जास्त नालायक असतात कारण वयामुळे कोणी संशय घेणार नाही असे त्यांना वाटते / खात्रीच असते . एकवेळ तरुण परवडले पण म्हातारे नाही . तरुण माणसांना चांगलच माहिती असत गडबड केली तर आपणच बदडून निघू म्हणून तरी ते गप्प बसतात . असो . नियमाप्रमाणे अपवाद सगळीकडेच असतात . कोणीही लगेच याचा उपयोग करून मनोरंजन करू नये . धन्यवाद .

नियमाप्रमाणे अपवाद सगळीकडेच असतात . कोणीही लगेच याचा उपयोग करून मनोरंजन करू नये . धन्यवाद .
तुमच्या कल्पना शक्तिची खिल्ली उडवली नसती जर किमान सोदाहरण हे वाक्य मांडले असते. आता मात्र अतिशय कीव येतेय. धिक्कार असो.

चला प्रतिसाद देण्याचे अगदी सार्थक झाले . उदाहरण मीच द्यायला हवे असे आहे का ? अहो जर डोळस पणे वावरल कि कैक उदाहरणे सापडतील . मला जर कोणी सांगेल का कि मिपावर काही लोकाना इतर सदस्यांची अक्कल / बुद्धी / संस्कार / कल्पनाशक्ती आणि अजून काही काढण्याचे लायसन दिलेय का पेशल ??? इथे मी कोणाला उद्देशून लिहील नाही पण बर्याच वेळा मी पाहिलं आहे काही आयडी सर्रास या गोष्टी करत असतात . आणि त्यांच्या हे लक्षात येत नाही कि या प्रकारात आपल्याही बर्याच गोष्टी निघतात . जस एक बोट दुसर्याकडे केल तर आपल्याकडे काही बोटे येतात . गळ्यात माळ पोटात काळ , साठी बुद्धी नाठी असंही असतच कि पण म्हणून याचा अर्थ असा नाही की सगळे लोक तसेच असतात . उडदामाजी काळेगोरे . सुदैवाने, अर्थातच माझ्या माझी कोणी कीव करावी अशी वेळ अजून पर्यंत ना आली आहे न मी ती येऊ देईल , तुम्ही करावी अशी तर नक्कीच नाही . बाकी मला काही लोकांचे नेहमीच कौतुक वाटते कि बरोबर अशी काही वाक्ये / शब्द निवडतात, वाट्टेल तसे अर्थ काढतात ; वाद घालायला कि ते म्हणतील ते पटेल काही लोकाना तरी . असो काही प्रतिसाद फाट्यावर मारण्याच्याही पलीकडचे असतात पण क्या करे .

>>> याला कोणी अपवाद नाही आँ? सगळेच असं करतात असं म्हणताय का काय तुम्ही? आमचं जौ द्या (आम्हाला नावंच ठेवतात लोक) पण बाकी बरेच खरंच खूप सज्जन लोक आहेत हो!

>>> आँ? सगळेच असं करतात असं म्हणताय का काय तुम्ही? >>> नाही हो साहेब, असं नाही ते. अपवाद नाही म्हणजे सुशिक्षित-अशिक्षित, तरुण-म्हातारे, गरिब, श्रिमंत अश्या समाजाच्या सगळ्या थरांमधे हे विकृत लोक आढळतात. माझा अनुभव देतेय ..

हेच ते वाट्टेल तसा , आपल्या सोयीने अर्थ काढणे आणि मग वाद घालणे . असो . बाकी तुमच्याकडून तरी हि अपेक्षा नव्हती . परत सांगते पुरुष हा पुरुष असतो यात गरीब /श्रीमंत / काळा/ गोरा / उंच /बुटका / म्हातारा /तरुण आणि अजून जे काय असेल ते हा भेद नाही . फक्त चांगला कि वा ई ट इतकाच फरक असू शकतो अस मला तरी वाटतय . लोकांना स्पष्टीकरण देण्यात वेळ घालवू नये करण ते त्याच गोष्टी ऐकतात ज्या त्यांना ऐकायला आवडतात हे अगदी पटले . चावल्याशिवाय गिळत नाही अन अनुभवाशिवाय काळात नाही . स्वरा धन्यवाद ... :)

आवडला. बादवे, मी आणि माझे कुटुंब सकाळी ५:५०च्या चिपळूण-पुणे एशियाडने जायचो. फार मस्त प्रवास असायचा.सातार्‍याला आमलेट पाव आणि मग पुण्यात उतरलो की लगेच जेवायला हॉटेलात. ते फार मस्त दिवस होते.

अशा प्रवाशांना तक्रारकरून वाटेत उतरवता येते .मात्र पुढच्या पोलिस स्टेशनलाही नोंद करायला बस न्या म्हटले की मात्रा चांगलीच लागू पडते .अशा घटना मुळातच घडता कामा नयेत . आम्ही एकदा लोणावळ्याहून खोपोलीला (त्यांची सिटि बस)दुपारी येत होतो .एकजण ड्रायवरच्या बाजूच्या असणाऱ्या सिटवर बसून ड्रायवरशी वाद घालत होता ,त्याला सांगत होता घाल अंगावर लोकांच्या .विशेष म्हणजे ड्रा० त्याचे गुमाने ऐकून घेत होते .कंडक्टरने तिकीट पण फाडले नाही .तो बहुतेक त्यांचाच युनीअनचा असावा आणि प्यायलेला वाटत होता .खंडाळ्याचा घाट आल्यावर मात्र मी कंडक्टरला तक्रार केली ड्रायवरशी बोलून अपघात होईल .आता मात्र कंडक्टरने घंटी मारली त्याला सांगितले प्रवाशांची कंप्लेट आहे उतर इकडे .आणि तिकीट काढ .पोलिस स्टेशनला गाडी नेतो .बारा रुपयांचे तिकीट काढून गुपचूप बसला .

नविन नविन नोकरीला लागले होते. सकाळी ठाणे स्टेशन ते १६ नंबर बसस्टॉप वागळे ईस्टेट आणि संध्याकाळी उलट असा जिवघेणा प्रवास करायचे बस ने. एकदा संध्याकाळी अशिच धडपडुन बस मधे घुसायला आणि जेमतेम उभं रहायला जागा मिळाली. आणि...क्षणात मागुन काहितरी टोचल. मला वाटल कि पेन असेल म्हणुन मी मागच्याला सांगितल कि तुमचं पेन टोचतय मला. तर तो एक्दम कावराबावरा झाला आणि 'हो, हो, ठिक आहे ठिक आहे ' असं काहितरी म्हणाला. परत दुसर्‍या दिवशी आणि एक दोन वेळा हा प्रकार झाल्यावर विचित्र वाटायला लागल. बर, बिन गर्दिची बस आणणार तरी कुठून..? माझ्या एका मैत्रिणीला हा अनुभव सांगितल्यावर तिने जे काही सांगितले ना ते ऐकुन लाज, किळस, अपमान अश्या संमिश्र भावना दाटुन आल्या. नंतर मी अश्या लोकांच्या पावलावर चपलेचा जोरदार पाय द्यायला शिकले. आणि हो, या 'पेन' टोचणार्‍यांमधे तरुण-म्हातारे असा कुठलाही अपवाद नव्हता, बाकी त्यांच्या सामाजिक परिस्थितीची कल्पना नाही.