Welcome to misalpav.com
लेखक: शुचि | प्रसिद्ध:
अतिशय हलकाफुलका, जंत्रीवजा बराचसा निर्बुद्ध आणि हुच्चभ्रूच्या अगदी विरुद्ध निव्वळ मनोरंजनात्मक व पाश्चात्य (विशेषता: अमेरॆकेअन) संस्कृतीत जो डेटिंग गेम चालतो त्यात सर्वसाधारण कोणत्या नियमांवर खेळ खेळला जातो त्याचे उथळ चित्रण करणारा हा धागा असून सर्वांनी हलका घ्यावा अशी विनंती. धागाकर्ती सर्व मुद्द्यांशी सहमत असेलच असे नाही. जड्व्यागळ धाग्यांपासून हटके , डोक्यास नो कल्हई असे या धाग्याचे स्वरूप आहे. तसेच या धाग्याला स्त्री-पुरुष लढाईचा आखाडा बनवू नये, अथवा ...... ऑन सेकण्ड थॉट बनवा ना माझ्या तॆर्थरुपांचे काय जाते. फक्त् अशा भांडणात धागाकार्ती उत्तरे-प्रत्युत्तरे करत बसेल अशी अपेक्षा करू नये ;) तर सुरु करते. _______________________ बीच-बुक पण सेल्फ-हेल्पिश प्रकारातील एक पुस्तक वाचते आहे. नाव आहे - What Smart Women Know . पहिलाच मुद्दा हा आहे किंबहुना हेच गृहीतक आहे म्हणाना की smart होण्याचे २ च मार्ग आहेत - (१) कठीण (२) सोपा. कठीण मार्ग तो जेव्हा स्त्री स्वत:चे हृदय पोळून घेउन, अनुभवांती शिकते तर दुसरा राजमार्ग हा की अन्य पोळलेल्या स्त्रियांच्या अनुभवातून ती शहाणपणाचा धडा घेते. मग अर्थातच २ रा मार्ग बहुसंख्य निवडतील या अजून एका गृहीतकातून लेखक व लेखिका, वाचक स्त्रियांना शहाणे (smart) करुन सोडण्याचा घाट घालतात. एका प्रकरणात लेखकद्वयी पुढील द्न्यांमौक्तिक उधळतात - smart स्त्री हे जाणून असते की पहिली डिनरडेट ही केवळ जेवण नसून त्याहून अधिक काही असते. आता हे अधिक काही काय तर हे जेवण म्हणजे त्या पुरषाबरोबर पुढील संपूर्ण आयुष्य कसे जाणार त्याची नांदीच असते. मग पुढे येते जंत्री अशा वागणूकविशेषांची. अशी वैशिष्ट्ये जी प्रदर्शित करणार्या पूरशापासून स्त्रियांनी ४ हात लांब रहावे , पळून जावे असा सल्ला लेखकद्वयी देते. (१) असा पुरुष जो तुमच्यासमोर वेटर, वेट्रेस किंवा गल्ल्यावरच्या स्त्रीशी फ़्लर्ट करतो. (२) जो ठरल्या वेळेपेक्षा कमीत कमी १० मिनिटे उशीर करून तुम्हाला ताटकळत ठेवतो. (३) आपल्या ऑरडरमधील शीतही जो तुमच्याबरोबर शेअर करत नाही (४) जो काटाचमचा-चमचा न वापरता हाताने अन्न ओरपतो. (५) जो संपूर्ण जेवणाचे पैसे भरण्याचे साधे तोंडदेखलही ऑफर करत नाही. (६) तुम्ही अर्धे बिल भरणे ऑफर केल्यावर जो चिडतो. (७) जो आपण स्वत: तर खूपच महाग रेस्तोरंत निवडतो पण पैसे भरताना तुम्ही अर्धे द्यावेत अशी अपेक्षा करतो. (८) जो निवडताना तर महागडे रेस्तोरंत निवडतो अन मग मागवताना काटछाट करत बसतो. (९) जो एपेटायझर फार भारी भारी महाग अन खूप जास्त मागवतो मात्र शेवटी त्यात तुम्ही अर्धे पैसे शेअर करावे अशी अपेक्षा करतो. (१०) जो तुम्हाला आमंत्रण देतो, जेवतो वगैरे अन शेवटी त्याच्या लक्षात येते की तो पाकीट घरीच विसरलाय. (११) अर्धे बिल अर्थात तुमचा हिस्सा किती , त्याचा किती हे जो केल्युलेटर घेउन चिकटपणे पैशात मोजत बसतो. (१२) जो पुरुष एकाहून अधिक वेळा टेबल बदलतो किंवा खाण्याची ऑरडर बदलतो किंवा खाणेच परत पाठवतो. (१३) जो हेल्थ कोन्शस अर्थात fitness conscious असल्याने चलोरिएस baddal अति अति जागरुक असतो. (१४) जो संपूर्ण वेळ napkin लाळेर्यासारखा लाउन जेवतो. (१५) जो वेटरला दमात घेतो / त्याच्यावर खेकसतो (१६) जो जादा ब्रेडला पैसे पडतील का अन किती वगैरे चवकशा करत बसतो. किंवा बुफेमध्ये चहा अंतर्भूत आहे अथवा जास्त पैसे द्यावे लागतील आदी चवकशा करतो. (१७) तुम्ही किती अन कसे खावे याचे नियम सांगत जो तुमच्यावर सत्ता/अधिकार गाजवू पहातो. (१८) जो पीउन टाइट होतो, बेताल होतो. (१९) तुमच्याशी गप्पा मारण्याऐवजॆ बाजूच्या टेबलांवर काय चाललय यातच ज्याचे डोके असते. (२०) तुमच्याशी संभाषण कमी अन खाण्यातच ज्याचे लक्ष असते. (२१) जो स्वत:ची प्लेट तर संपवतोच पण जो तुमच्या प्लेटीवर डल्ला मारतो. (२२) एकाच खानावळीत/रेस्तोरन्त मध्ये गेली १० वर्षे आपण कसा एकच पदार्थ मागवतोय याच्या कहाण्या जो तुम्हाला ऐकवतो. (२३) मागवणे कमी अन पदार्थांची अल्लेर्ग्य जास्त अशी ज्याची स्थिती आहे तो. (२४) जेवणाचे ताट, पेले, चमचे, भांडी स्वच्छ अन कचरामुक्त आहेत याची सखोल चिकित्सा करण्यात जो अर्धा वेळ घालवतो. (२५) चेक येउन पडला तरी त्याकडे ढुनकुनही जो पहात तरी नाही किंवा चेक आल्या आल्या ज्याला बाथरूममध्ये जाण्याची उबळ येते असा. (२६) बिल पाहून ज्याचा चेहरा पडतो/ त्रासतो/वाकडा होतो असा. (२७) जेवताना अश्लील जोक्स सांगणे, अंगाचटीला येणे असले अशिष्ट प्रकार जो करतो. (२८) जो स्वत:बद्दल चकार शब्द बोलत नाही. (२९) जो फक्त स्वत:चे छंद, आवडी-निवडी आदी स्वत:चे पुराण लावतो. (३०) तुम्ही काय बोलता याकडे ज्याचे लक्षच नसते पण जो त्याला काय बोलायचे आहे तोच मुद्दा दामटत बसतो. ______________________________________
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

डिनरडेट चा अनुभव नाsssssssssssssssé ही ... बाकी शुचिमामींचा काही अनुभव असल्यास आम्हाला वाचायला काही हरकत नाही ..धन्यवाद !!

हाहाहा फार काही अनुभव नाही. माझ्या बी एस सी नंतर, नवरा मुंबईहून मला पहायला पुण्यात आलेला तेव्हा मी भला मोठा गॉगल लावून लुनावरुन आलेले. अजूनही नवरा म्हणतो अगं केवढा मोठा तो गॉगल, संपूर्ण चेहराभरच की. (अन तेव्हा मी समजत होते गॉगलमध्ये मी स्मार्ट दिसते आहे ;) )आम्ही फर्ग्युसन टेकडीवर गेलो, गप्पा मारल्या अन मग फर्ग्युसनच्या समोर तेव्हा व्हेन्कीज होते तिथे आईस्क्रीम सोडा अन चिकन नगेट्स मागवले होते. गप्पा चांगल्या रंगल्या होत्या. सोडा अफलातून होता. मला तो आवडलेला. माझा होकार होता पण याने १ वर्ष घेतलं होकार कळवायला. तोपर्यंत मी आय आय टी मध्ये अ‍ॅड्मिशन घेतली होती पण त्याला विसरले नव्हतेच नव्हते.

Friendships of women have usually been not merely unsung , but mocked, belittled and falsely interpreted.
दाट संशय येतोय हे सहितले वाक्य याच What Smart Women Know पुस्तकातील असावे.

पुस्तकाचे शिर्षकच गंडलेले आहे किंवा पुस्तक खपावे म्हणुन प्रकाशकाच्या डोक्यातुन निघालेली भन्नाट आयडिया आहे.

गमतीदार प्रकार आहेत. यातला १४वा प्रकार मी आणि माझा नवरा दोघे रेग्युलरली करतो. १०वा प्रकार मीच कधीतरी करते आणि २४वा प्रकार नवरा कायम करतो. :)

खाण्याचं राहू देत हो...पहिल्या भेटीत मी मुलीच्या मराठी व्याकरण, उच्चारांच्या चुका काढेन की काय याची भीती वाटते आताशा. माझं नावंच ही चूक काढायला पहिलं कारण ठरु नये ही ईश्वरचरणी प्रार्थना!! ;)

यातलं बहुधा मी काहीच करणार नाही पण सणसणीत अपवाद क्र. ४! काही पदार्थ हातानेच खायला मजा येते. इन फॅक्ट, आपले जेवण काटा-चमच्याने कसे जेवावे? डाळगंडोरी, भरीत, भाकरी, शेवभाजी, सावजी चिकन, उकडलेल्या बटाट्याची लालेलाल रस्सा असलेली भाजी (भूक लागली राव!), इत्यादी स्वर्गीय पदार्थ काटा-चमच्याने कसे बरे खायचे? आणि तसा प्रयत्न करणे देखील अपमान आहे; त्या पदार्थांचा! रात्री १२ वाजताची वेळ आहे; पिक्चरचा शेवटचा खेळ झाल्यानंतर मित्रांचे टोळके घरी जायला निघाले आहे. थंडी कपड्यांमधून शिरून बोचते आहे. 'मैं खिलाडी तू अनाडी' बघून लक्ष्मीनारायण टॉकीजवरून दोन-तीन दुचाक्यांवर स्वार होऊन तुम्ही रस्त्यावर घरंगळत जात आहात. "च्यायला, भूक लागली राव!" असं कुणीतरी कोकलतं. मग तुम्ही गाड्या स्वारगेट बसस्थानकाजवळ हळू करता. बाहेरच्या गाड्या तुम्हाला प्रेमळ साद घालतात. गरमागरम भुर्जी, भाजलेला पाव कळकट ताटल्यांमध्ये घेऊन तुम्ही चापायला सुरुवात करता. भूक शमेपर्यंत पावाचा रतीब सुरु असतो. लागल्यास अजून एक डबल भूर्जी मागवता. जठराग्नी शांत झाल्यावर गाड्यांवर निवांत बसून चहाचे घोट घेत घेत बिड्यांचा धूर सोडत गप्पा ठोकत बसता. बाकीचं जाऊ द्या पण हा भुर्जी-पाव काटा-चमच्याने खाणार कसा? तो गाडीवाला गाडी तशीच सोडून पळून जाईल. :-) बाकीच्या मुद्द्यांशी लई वेळा सहमत.

इकडे सिडनीत चायनिज मैत्रिणीसोबत हाटेलात गेलो, तर वेटरने ऑक्टोपस सलाड आणि नूडल्सच्या बाऊल्स सोबत त्या खायला लाकडी कांडक्या (चॉपस्टीक का कसलीशी अवदसा) आणून ठेवल्या. आमची परिस्थिती छोटी सी बात मधल्या चायनिज हाटेलात गेलेल्या असरानीसारखी. :))

हाहाहा असा वाक्य दोहरायला (मराठी शब्द?) लावणारा खवचट प्रश्न विचारणे हा सूड मोडच झाला आहे. मी पहिल्यांदा लंबूटांग यांच्या प्रतिसादानंतर पाहिला व आता परत :)

(२२) एकाच खानावळीत/रेस्तोरन्त मध्ये गेली १० वर्षे आपण कसा एकच पदार्थ मागवतोय याच्या कहाण्या जो तुम्हाला ऐकवतो.
यावरून तर पोरगा पोरीशी एकनिष्ठता पाळू शकतो असंच वाटत... १० वर्षे बिच्यार्याची खायची सुद्धा टेस्ट बदलत नाही तर बाकी तर सोडाच ;)

माझ्या मते काही पदार्थ हे हाताने खाण्याचे असतात तर काही काटा चमच्याने चपखल उदाहरण द्यायचे तर मेकडोनाल्ड चे बर्गर व के एफ सी चे चिकन हे जगाच्या पाठीवर कोठेही हाताने खातात मात्र जगाच्या कोणत्याही पंचतारांकित हॉटेलात बर्गर हा सर्व करतांना काटा चमचा देतात .आणि त्याने खातांना मी माणसे पहिली आहेत. परदेशात भारतीय उपहार गृहात गोरेच काय पण भारतीय सुद्धा भात व बिर्याणी चमच्याने खातात. मला आमच्या घरी चमच्यानेच खावा लागतो. पण हा अपवाद वगळता , डोसे , ते नान हे हाताने खातात. आम्हाला हॉटेल व्यवस्थापनाच्या पहिल्या वर्षाला टेबेल मेनेर्स शिकवत असतांना एका चुकार मुलाचे लक्ष नव्हते ते पाहून आमचे सर त्याला सणसणीत पारशी शिवी हासडून म्हणाले ,ह्या कोर्स मध्ये शिकवली जाणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधी ना कधी तरी उपयोगी पडणार ,