Welcome to misalpav.com
लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:
माझा फुलांच्या रांगोळ्यांमधला सगळ्यात अवडता प्रकार. फुलांची सप्तपदी ============================ हम्म्म्म्म...पण हा प्रकार एकंदर सगळ्याच बाबतीत खर्चीक...बरं का! वेळ/पैसा/फुलांची बाजारहाट-ने आण/आणि आमच्या मंगल-कार्यालयातनं यासाठी मिळवून घ्यायचं सहकार्य! या सगळ्याला खर्चीक..हाच टॅग लावावा लागेल. कारण,ही सप्तपदी माझ्याकडनं करवून घेणारा माझा एखादा यजमान असो! (हल्ली क्लायंट म्हणातात ना हो त्यांना!? ;) ) किंवा त्या'खेरीज फक्त सप्तपदी काढण्याची आलेली ऑर्डर असो. घाम काढल्याशिवाय होणारं ,हे काम नाही! तुंम्ही म्हणाल..काय काय ..असं होतं तरी काय? तर होतं त्याचं ते अस्सं.. आमच्या एखाद्या यजमानाकडनं लग्न-लावण्या बरोबरच अगदी अवर्जून केलेली रिक्वेस्ट असते. "गुरुजी ती..त्यांच्या लग्नात केलीवतीत ना..तशी फुलांची सप्तपदी हवी बरं का! काय लागयचा तो वेळ लागू दे,पण कार्यक्रम कसा..दणक्यात झाला पायजे..!!!" अता हे एव्हढं जोरात रॉकेट पडल्यावर..नाही कुठनं म्हणा! मग मी त्यांच्या लग्न मुहुर्ताच्या आदला दिवस डायरीत बघतो..आणि त्या दिवसापासून ही सप्तपदी सुरु-होते! म्हणजे...आधी दिवस कोणत्या सिझन मधला आहे त्याचा विचार,नंतर अदला दिवस आपल्या कामा'चा फुल्ल आहे की नुस्ताच फू...ल आहे याचा विचार,मग फुलांच्या कटिंग साठी,कुणि बरोबर मॅनेज होइल का? हा विचार, झालच तर 'कितीत-होइल' :D हा ही विचार,नाही झालं तर आदल्या दिवशी किती वेळ आपल्यालाच ही पुष्प-कात्रणांची बुंदि-पाडायला बसावं लागेल हा विचार! (बुंदी पाडणे! =)) काय शब्द सुचलाय..व्वा! =)) ..पण लोकहो..हाच शब्द बरोब्बर आहे. तुंम्ही फक्त १ किलो झेंडू..आमच्या मागे इथे http://misalpav.com/node/25283 सांगितलेल्या धाग्यातल्या..झेंडू कापणी-तंत्रानुसार कापुन बघा..मायला..जाम रग लागते,पाठीला!!!) तर..असं होता होता..मग अखेर तो लग्नाच्या आदला दिवस उजाडतो..एकदाचा आणि मग मी प्लॅन केल्याप्रमाणे,सकाळी किंवा दुपारी पळतो आमच्या मार्केटयार्डात..फुलांच्या महा-मंडईमधे..इथे- http://misalpav.com/node/20666 आणि मग..तासाभरात सगळी खरेदी होऊन घरला येतो.. आणि मग थोड्याच वेळात सुरु होते..पूर्व तयारी! आता,आपण आज जी 'काढलेली सप्तपदी पहाणार आहोत..ति कशी होते...हे (थोड्ड्सं..) रेसिपी श्टाइलनी बघू प्रथम फुलं:- १)लिली:-मिनिमम १० गड्ड्या..गुलाबः-अर्धा किलो..गुलटोक-२ गड्ड्या,जरबेरा:-२ गड्ड्या.. https://lh4.googleusercontent.com/-5w_DCkPsD70/U14XfIctyZI/AAAAAAAACuk/pt0N1M26O0A/w702-h570-no/lahan+cinga+260.jpg २)स्प्रिंगल गवतः- ६ गड्ड्या.. https://lh3.googleusercontent.com/-HY2vXxTgfuE/U14YCFIlbMI/AAAAAAAACuw/zo4HAvboPWI/w702-h533-no/lahan+cinga+262.jpg ३) मोगरा:-१किलो,कामिनी(पाला):-३ ते ५ गड्ड्या,तुळजापुरी झेंडू:-१ किलो. https://lh6.googleusercontent.com/-YI4mbxKuY4w/U14YSYsQ3kI/AAAAAAAACu4/u4p6t7hpthw/w702-h530-no/lahan+cinga+263.jpg ४)झेंडू:- ७ ते १० किलो.. https://lh3.googleusercontent.com/-x2IeeZNRl-w/U14aVHENVLI/AAAAAAAACvA/Mk-9xwxWFl8/w497-h585-no/IMG_20130910_130327.jpg ------------ हे झालं साहित्य.. आता मी ऑनस्टेज करतो काय? त्याचा थोडासा वृत्तांत. सगळ्यात आधी दिशा पाहाणे..कारण..ही कित्तीही रांगोळी म्हणून असली तरी ती सप्तपदी आहे.त्यामुळे पूर्वगमनी आणि होमाच्या उत्तरेला अशी दिशा व जागा पाहून सुरवात करायची. जागा फिक्स झाली की आधी त्याच्या चहूबाजूनी ७/८ खुर्च्या लाऊन,भस्सकन-आत येणार्‍यांसाठी तटबंदी आणि ती तटबंदी टिकायला आमच्या यजमान पार्टीतला कोणितरी रांगोळीप्रेमी रक्षक अथवा रक्षिका (सुद्धा! :D ) ...त्याला/तिला..जरा(कार्यालयातलाच! ;) ) चहा वगैरे मागवून "तुमच्या सारख्यांमुळे या रांगोळ्या होतात हो..नायतर कसलं काय आलय? :D .. असं जरा चढवून एका खुर्चीवर अडवुन किंवा अ‍ॅडवून ठेवायचा. (फक्त या कामी हौशी व्यक्तिस घेऊ नये..कारण,सारखा त्यांना 'मदती'ला यायचा मोह होतो...आणि दर अर्ध्या तासानी बुरुज सोडून ते मैदानाकडे येतात. ) मग सर्व प्रथम कट केलेल्या लिलीची पिशवी घेउन साधारण १ वीतीच्या अंतराने ..एकापुढे-एक अशी,त्याची ७ कमळं करून घ्यायची. मग कमळाच्या बॉर्डरला तुळजापुरी झेंडू हा .देठाकडून कमळाच्या बाहेरच्या परिघाला एकेक एकेक असा प्रेस करत लावायचा.मग मधे झेंडूच्या पाकळ्या इतरत्र पडणार नाहीत अश्या टाकायच्या(या कमळ बनवायचा समग्र व्हिडिओ..या- http://misalpav.com/node/25283 लिंकेत आहे) नंतर मग बाहेरनं मोगरा लाऊन आधी ही सप्तपदीमाळ पूर्ण करायची. मग थोडा(ऑन द स्पॉट कारावा लागणारा)कुटीर उद्योग... गुलटोक..गुलाब..जरबेरा हे डेखाकडून फुलाला डेख चिकटत तिथे हलक्या हतानी (कात्री वापरू नये) तोडायचे. अगदी गुलाबाच्या पाकळ्यां अलिकडे असणार्‍या देठाच्या ५ हिरव्या..सपोर्टिंग पाकळ्याही नखानी उडवायच्या..(म्हणजे नंतर तो गुलाब/गुलटोक..पाकळ्यांच्या थरामधे न हलता/कलंडता शंभर टक्के स्थानापन्न होतो) ही तयारी एका ताटात लाउन..मग परत जरा चहा(आणि तंबाखू :D ) करून..फ्रेस्स होऊन यायचं.मग सगळा शोभेचा पाला.. त्याचे बुडखे उडवून कटवून घ्यायचा... मग फायनली खुर्च्यांच्या तट-बंदीच्या आत..पाला/जरबेरा ठेऊन..त्याच्या आत झेंडू-पाकळ्यांची पिशवी,आणि त्याच्या आत गुलाबाच्या ताट आणि अक्षतेच्या वाटिसह आपण!!! अशी रचना झाली की मग पुढचा खेळ चालू..मगाशी पूर्ण केलेल्या कमळामधे,मध्यभागी आधी १ गुलाब ठेऊन..त्याच्या पाकळ्यांमधे १ चिमूट अक्षता टाकायच्या,तद् नंतर कमळाच्या आतल्या परिघावर गुलटोकासारखी फुलं लावायची.(आपल्याला हवी तितकी) मग सप्तपदीमाळेच्या भोवती शेवटच्या लेअरकडून बाहेर असा.अंदाजे अर्ध्या फुट रुंदिचा झेंडू-पाकळ्यांचा (दाट) थर हाताने सारखा करत टाकायचा. अर्धा/१फुटाचा थर टाकुन झाला. की मग बाहेरनं वर दाखवलेलं स्प्रिंगल-गवत बाहेरनं लागून घ्यायचं. त्यात वरनं..गुलाव जरबेर्‍याचं टॉपिंग करायचं. आणि सगळ्यात शेवटी यायचं ते मास्टरपिसवर! ..सप्तपदा'च्या.. कमळा बाहेर जो कलश ठेवतात,त्याच्या बाहेरच्या डिझाइनवर...! (हे डिझाइन मी नेहमी मला सुचेल तसं गोल..दिल-शेप आकारात/चौकोनी/अष्टदली असं त्याक्षणी सुचेल तसं करतो.) यातही फुलं लावण्याची सगळी कृती वरील प्रमाणेच आहे...(आणि तसंही मी वर जी कृती-कथन केलेली आहे,ती निव्वळ कशानंतर काय? हे ध्यानात याव म्हणून! एरवी रांगोळ्यांना "शिकवणे" हा प्रकार तंत्रोक्ताच्या पलिकडे लागूच पडत नाही.) तर...अश्या एकंदर ४/५ तासाच्या मेहेनती नंतर तयार होते ..........................
ती
........
ही
.................

फुलांची

..................................

सप्तपदी!

https://lh3.googleusercontent.com/-wdMXOjfvj2Q/U14dDkqe_II/AAAAAAAACvg/asT-nrcZ1CQ/w670-h585-no/lahan+cinga+266.jpg https://lh4.googleusercontent.com/-zsR8FmyHM24/U14beGkjw-I/AAAAAAAACvI/3FdTEj1CIsI/w524-h585-no/lahan+cinga+272.jpg https://lh5.googleusercontent.com/-9Om1hScpWIs/U14cnbpo4xI/AAAAAAAACvY/BfCEoJDKHss/w702-h531-no/lahan+cinga+276.jpg https://lh6.googleusercontent.com/-St5RHppi2b0/U14cB3_hsAI/AAAAAAAACvQ/CVhhOJAQHTk/w702-h531-no/lahan+cinga+275.jpg https://lh3.googleusercontent.com/-9Aw4-QcIXmM/U14daBMl6RI/AAAAAAAACvo/KbgWQXTHpe4/w702-h531-no/lahan+cinga+274.jpg ============================================== ही सप्तपदी (एकट्यानी)काढायला लागणारा एकंदर वेळ:- आदल्या दिवशी फुलं-कटिंग साठी जाणारे ६ ते ७ तास+दुसर्‍या दिवशी सप्तपदी काढायला जाणारा वेळ ३ ते ४ तास = कमितकमी ८ ते १० तास. ==============================================

आता अज्जुन एक मज्जा!!!

बरेचदा ..वधू'चे सप्तपदी-वरून-चालून झाल्यावर,मी यजमान पार्टिला सगळी फुलं वेगवेगळ्या पिशव्यांमधे भरून घरी पायघड्यांसाठी न्यायला सांगतो. फुलं तिथे वापरली जातातच. पण काहिवेळा बरीचशी टाकुन दिली जातात.कारण.. हे सर्व तिथे असलेल्या उप-स्थितांच्या उत्साहावर अवलंबून असतं. मग लोकं फारच कंटाळलेले असले..तर मग यजमान परत मलाच गळ घालतात..."गुरुजी तुम्म्हीच चला ना..प्ली..............ज!!! आणि मलाही त्यादिवशी संध्याकळी दुसरीकडे "वर्णी" नसली. तर मग मी त्यांचा कार्यालयातला सगळा धार्मिकविधिंचा कार्यक्रम अवरून...जेऊन घरी जाऊन १ मस्त पडी लावतो..आणि संध्याकाळी ५ च्या सुमारास त्यांच्या घरी जातो.. आणि मग सकाळच्याच सप्तपदिच्या फुलांचं री-सायकलींग होऊन तयार होतात........त्या...या..
नवपरिणितां-साठीच्या
..........
गृहप्रवेशनीय..अश्या
.................

प्रसन्नोत्सुक-पायघड्या!

https://lh3.googleusercontent.com/-woa7L-rYgrs/U14d__6AUrI/AAAAAAAACvw/7Xty-gpk3mk/w702-h577-no/lahan+cinga+283.jpg https://lh3.googleusercontent.com/-96KGWjszps0/U14eU_FMEeI/AAAAAAAACv4/MwhQwYl-UcU/w702-h531-no/lahan+cinga+286.jpg https://lh6.googleusercontent.com/-sCdynzPqSKo/U14e-hnIkqI/AAAAAAAACwI/JYBtNyq9Lk8/w702-h531-no/lahan+cinga+288.jpg https://lh6.googleusercontent.com/-2rpgakYKA4k/U14ewH-4k6I/AAAAAAAACwA/z9X4Tt55fzA/w702-h531-no/lahan+cinga+287.jpg ==========================================================
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

@मधे मधे येणा-या स्मायल्यांना क्षमा करतो. >>> =)) स्मायली..हे जीवनाचं तिखट आहे..त्यांच्या शिवाय लेखन करणं बिकट आहे! =))

>>>> स्मायली..हे जीवनाचं तिखट आहे अंहं...वरीजनल आयुष्यात हस-या स्मायली सारखं गोड काही नाही. -दिलीप बिरुटे (हस-या स्मायलींचा चाहता) :)

वाह ! गुर्जी ! वाह! सप्तपदी, पायघड्या तर सुरेख आहेतच, पण प्रतिसादात बॅटींग सुद्धा एकदम दमदार. धागा तर आवडलाच पण प्रतिसादसुद्धा आवडले.

लग्नकार्यातले गुर्जी ही अशी सुंदर कामंपण करतात??? आम्हाला भेटलेले सगळे गुर्जी एकदम grumpy old men होते!! गुर्जींकडुन जास्तीत जास्त कलाकुसर म्हणजे आंब्याच्या पानातनं रांगोळी काढणे ही पाहिली आहे!!

@लग्नकार्यातले गुर्जी ही अशी सुंदर कामंपण करतात??? >>> सामान्यतः कुणिही करत नाहीत.कारण हा धर्मशास्त्राचा भाग नाही. ही फुलं..ह्या रांगोळ्या..सप्तपदी,,ही आपली माझी वैयक्तिक कला आहे. तिचा मी काहि वेळा फक्त कला म्हणून तर काहि वेळा..पूर्ण व्यावसाइक-कलाकारी म्हणून वापर करत असतो. हां.... अता आमच्या क्षेत्रातली काहि मंडळी उत्तम रांगोळ्या काढतात..माझा एक मित्र-गणेश खरे हा तर भटजी आहे,शिवाय प्रोफेशनल चित्र-रंगावलीकार सुद्धा आहे. पण फुलांच्या रांगोळ्या..या अश्या (माझ्या पद्धतीच्या) इतरत्र होत नाहीत. माझे काहि मित्रही या फुलरांगोळ्या काढू शकतात/काढतातही..पण अगदी म्हणजे..अगदी क्वचित..(बरेचदा..स्वतःच्या घरच्या कार्यक्रमांना) त्यांचं म्हणणं-याची(नेहमी) गरज काय????? असंही असतं. :) आमच्यातल्या अनेकांना या (कले)चा पोथि-बाहेरचं म्हणून (खरच!) तिरस्कारही आहे. तरिही मी गेल्या ५ वर्षात आलेल्या नविन गँग पैकी काहि जणांना मार्केटयार्डात फुलं खरेदीला वारंवार पाहिलं आहे. आणि त्यांच्या रांगोळ्या'ही पाहिल्या आहेत. हा नवप्रकार हळूहळू जम धरतो आहे..आणि मला त्याचा आनंद आहे! http://www.sherv.net/cm/emoticons/flower/flower-smiley-emoticon-emoji.png ======================== गणेश खरे..यानी रांगोळी/रंगांनी काढलेली ही काहि चित्र... https://fbcdn-sphotos-a-a.akamaihd.net/hphotos-ak-ash3/t1.0-9/p720x720/1001026_576297372409045_2124437758_n.jpg https://fbcdn-sphotos-c-a.akamaihd.net/hphotos-ak-ash3/t1.0-9/q77/s720x720/1150253_664132550292193_1630623020_n.jpg

एकदम सुंदर !ह्या सप्तपदीचा चांगला प्रसार व्हावा 😃 घरात सगळ्या पाहिलं माझच उरकल्यामुळे अशा बर्याच कल्पक गोष्टी राहून गेल्या.नंतर मात्र जिथे जमेल त्या कार्यात मी माझी कल्पकता वापरते ,आता ही वापरणार :)... एवढ्या सुंदर सप्तपदीवर कोणतीही वधू फिदा होईल एक सुंदर आठवण तयार होईल :)