या लेखात विद्या कॉमर्स लायब्ररीचा चुकीने उल्लेख महाराष्ट्र लॉ हाऊस असा झाला होता, आदुबाळ यांनी प्रतिसादातून लक्षात आणून दिल्या नंतरर शीर्षक बदलले आहे,
अजून पाच मिनीटे, घडाळ्याचे काटे रात्रीच्या १२ वर जातील पुढच्या २४ तासांना भारतात १ मे म्हणतील, महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन.
आठवणींनी मला जवळपास २० वर्षे मागे नेलं पुण्यातल्या अप्पाबळवंत चौकाकडे जाणार्या रस्त्यावर (मला वाटते केळकर रस्ता) एक एस.एन.डि.टी नावाची मुलींची शाळा आहे त्या शाळेच्या थोडसं डायगोनली आपोझीट एक कायद्याच्या पुस्तकांच वाचनालय होत. नाव आता नेमक आठवत नाही पण बहुधा महाराष्ट्र लॉ हाऊस असाव. (आदुबाळांनी ते नाव विद्या कॉमर्स लायब्ररी असे होते हे लक्षात आणून दिले आहे.) त्या वाचनालयाच्या मालकांचा तेथूनच अजून एक व्यवसाय चालत असे म्हणजे गावोगावच्या मुलांना शासकीय आणि बँकींग इत्यादी स्पर्धा परीक्षांचे फॉर्म पाठवणे. केवळ वाचनालय चालवण किंवा फॉर्म विकायचा म्हणून विकण या पलिकडे जाऊन व्यक्तीगत सेवा देण्याचा त्या वाचनालय काकांचा कटाक्ष असे. आणि म्हणून स्पर्धा परि़क्षांना बसणार्या असंख्य होतकरू तरूणांचा तिथे नेहमी राबता दिसत असे.
मी त्यांच्या वाचनालयाचा सदस्य नव्हतो ना स्पर्धा परिक्षेच्या फॉर्मचा ग्राहक, कुणाचा कुठे आणि का परिचय व्हावा ? पण त्या काकांचा माझा परिचय होण्याचा योग आला आणि तेही ते अतं:करणातन कष्टी असताना. आणि त्यांच्या मनाला कष्ट कसल होत ? पुणे विद्यापिठान लॉ हा विषय मराठीतून शिकवण्याच बंद करण्याचा घेतलेला निर्णय. काकांकडे एक फाईल होती त्यात लॉ विषयाच मराठीतन शिक्षण का चालू राहील पाहीजे या बद्दलचे लेख ते वाचकांची पत्रे मधे आलेली त्यांची पत्र ते त्यांनी विद्यापीठाला या विषयावर केलेल्या पाठपुराव्याच्या प्रती. आयुष्यात कोण कशासाठी लढतो तर कोण कशा साठी, प्रत्येक लढाई यशस्वी होत नाही आणि प्रत्येक लढवय्याच गाणही गायल जात नाही. मीया बीबी राजी तो क्या करेगा वाचनालयका काजी, बहुधा पुणे विद्यापीठाचा तो निर्णय अंतीम असावा , ते काकाही तसे वृद्धत्वाकडे झुकलेले होते.
नंतर त्या वाचनालयाकडे दहा पंधरा वर्षेतरी पुन्हा जाण्याचा प्रसंग आला नाही. काही कारणानी एक कॉपीराईट बद्दलच पुस्तक शोधण्याचा योग आला, काकांच्या वाचनालयाची आठवण आली तशी गाडी तीकडे वळवली. ते वाचनालय आता त्या जागेवर नव्हतं म्हणून आजू बाजूच्या दोनचार दुकानदारांकडे चौकशी केली तर कुणीतरी ते दुकान मागच्या गल्लीत गेल्याच सांगीतल म्हणून शोधत गेलो. दुकान त्याच नावाने चालू होते, दुकानात एक हिंदी भाषिक माणूस होता मला आधी वाटल तो कर्मचारी असावा म्हणून चौकशी केली त्यानी ते वाचनालय/दुकान स्वतः चालवण्यासाठी विकत घेतल्याचे सांगितले.
मी काही अधीक चौकशी केली नाही, ते वृद्ध काका आता असतील नसतील, पण मराठी भाषेसाठी भाषिकांसाठीचा एक निर्व्याज्य व्यवसाय माझ्या लेखी तरी मृत झाला होता. मी खीन्न मनाने हव्या असलेल्या पुस्तकासाठी अप्पाबळवंत चौकाचा रस्ता धरला.
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
सुंदर लेखन खुप खुप आवडलं
तुम्हाला कन्या शाळेसमोरची
"विद्या कॉमर्स लायब्ररी"
मस्त लेख....
उत्तर नसलेले प्रश्न न्यायालयांनी सरकारला विचारावेत का ?