Welcome to misalpav.com
लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:
हिंदीत अमीर खुसरो यांनी 'साजन ' या विषया वर कित्येक मनोरंजक पहेलियाँ (चारोळी स्वरूपात लिहिल्या होत्या) त्याच धर्ती वर आजच्या परिस्थिनुसार काही 'साजण' चोरोळ्या (कोडे स्वरूपातल्या) (१) लपत छपत तो बिछान्यात येतो गोड गोड गाणी कानात म्हणतो कधी चुंबितो कधी चावतो सारी रात्र मला तो छळतो का सखी साजण? ना सखी डास. (२) कधी काळी येतो गोड गोड बोलतो खोटी वचने देऊनी सर्वस्व लुबाडीतो का सखी साजण? ना सखी नेता. (३) कधी येते, कधी जाते सारी रात्र मला ती छळते. तिच्या विना न चैन मिळे तिच्या साठी आसुसले डोळे. का सखा साजणी ? ना सखा वीज
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

चारोळी पुन्हा वाचा, कधी येते, कधी जाते सारी रात्र मला ती छळते. तिच्या विना न चैन मिळे तिच्या साठी आसुसले डोळे. का सखा साजणी ? ना सखा वीज मला वाटते उत्तर मिळाले असेल.

>>कधी येते, कधी जाते सारी रात्र मला ती छळते. तिच्या विना न चैन मिळे तिच्या साठी आसुसले डोळे. का सखा साजणी ? ना सखा वीज मराठीत मित्रमंडळी इतक्या विनम्रतेने प्रश्न विचारत नाहीत. ह्या कोड्याचं उत्तर 'झोप' आहे असं समजून एखादा मित्र उत्तर देईल: "कशी झोप यील, रातच्याला वषाट कमी खात जा भा*"