पुर्वी मला वाटायचे की कसली प्रायव्हसी?
काही लोक ना उगाच जरा जास्तच करतात प्रायव्हसी प्रायव्हसी!
माझ्या सर्च त्या काय असणार आणि त्यातून कुणाला काय फायदा असणार?
पण एकदा सहज आपला गुगल इतिहास पाहिला आणि हादरलोच!
माझ्या काय वाटेल त्या सर्चेस तेथे तरिखवार जपून ठेवलेल्या होत्या.
अगदी एयरक्रॅश इन्वेस्टिगेशन ते नर्मदा परिक्रमा.
तरी विचार केला की मग काय बिघडले? बिघडले हे की मी काय आणि कसा विचार करतो यावरून या कंपन्या माझे प्रोफाईल तयार करतात.
मग मला जे 'आवडेल' तेच मला जालावर पुरवतात. याला बबल सर्च असे म्हणतात.
मला न आवडणारे विषय येथे वर येतच नाहीत. थोडक्यात तुमची सर्च ही खरी नसतेच!
म्हणजे मला खरी माहिती मिळत नाहीये.
शिवाय माझीच माहिती - माझे कुटूंबिय, माझे राजकीय विचार, माझ्या आवडी, मेडिकल प्रॉब्लेम्स, त्यावरचे उपाय, अशी माहिती विकून अजून कुणीतरी भलतेच गब्बर होतेय.
याशिवाय हीच माहिती लागेल तशी माझ्या विरुद्धही वापरायची परवानगी मीच देतोय!
अरे काय चाल्लेय काय?
बरं हे टाळायचे म्हणून तुम्ही मोबाईलवर सर्च केलीत तर खलासच!
ते तर डिव्हाईसच गुगलचे आहे. म्हणजे तुम्ही जे काय कराल ते सर्वात आधी तेथे कळेल.
त्याची नोंद ठेवली जाईल.
मी विकत घेतलेल्या मोबाईलचा कॅमेरा कधीही आणि कसाही वापरायचे हक्कही मी गुगलच्या युट्युब ला देऊन बसलो आहे!
आता माझ्या लक्षात येतेय की हा प्रश्न मला वाटतो तितका साधा नाही.
माझी सहज सर्च टाकलेली मेडिकल हिस्ट्री गुगलने माझ्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीला विकली तर माझा प्रिमियम वाढू शकतो! म्हणजे माझा सर्च इतिहास मला महागात पडू शकतो.
मग माहिती शोधायला सुरुवात केली.
सुरुवातीला मला तर कळेचना की कोणते सर्च इंजिन वापरावे ते.
बिंग वापरावे तर परत तेच आणि याहू पण गुगलचा भाऊ!
शोधाशोध केल्यावर स्टार्ट्पेज सापडले.
स्टार्टपेजची येथे अजून माहिती मिळाली
https://startpage.com/mr/protect-privacy.html
आता लक्षात येऊ लागले की तुम्हाला प्रायव्हसीचा प्रश्न असेल तर गुगल आणि फेसबुक हे सर्वात मोठे ट्रॅकर आहेत.
आणि लोकांची नुसतीच माहिती गोळा केली जात नाहिये तर चक्क पाळतच ठेवली जाते आहे.
आपण जॉर्ज ऑर्वेलने रंगवलेल्या १९८४ या कादंबरीपेक्षाही वाईट स्थितीत आहोत.
प्रायव्हसी तुम्हाला कशी त्रास देऊ शकते ते येथे सोप्या भाषेत पाहायला मिळाले.
http://donttrack.us/
आता यातून सुटायचे असेल तर सर्वात आधी क्रोम बाऊझर काढून टाकला पाहिजे.
क्रोम उडवले.
गुगल लॉग इन राहणे सोडले. आता सर्च टाकली तरी लॉग इन न करता करू लागलो.
फेबुवर लॉग आउट करण्याची सवय केली.
तरी गुगल आणि फेसबुक नकोच अशीच धारणा हळू हळू होऊ लागली.
मग डकडकगो किंवा स्टार्टपेज हे सर्च इंजिन वापरू लागलो.
मग कळले की टॉर वापरणे सर्वात चांगले आहे. सध्या तेही वापरतो.
हे टॉर मोबाईलवरही वापरता येते हे कळले.
'माझी अशी ती काय माहिती असणार' असे वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे.
तुमचे सर्च इंजिन तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त ओळखते.
तुम्ही सहज टाकलेली प्रत्येक सर्च जपून ठेवते. तुमच्या विरुद्ध वापरू शकते!
वेळ प्रसंगी हे सर्व कोणत्याही संस्थेला विकते.
तसेच सरकार पोलिस वगैरे खात्यांनाही देते.
तुम्हाला तुमचा गुगल इतिहास पाहायचा असेल तर हे पाहा
google.com/history येथे लॉग इन करा आणि पाहा.
हा तुमचा गुगल इतिहास तुम्ही पुसू शकता.
सेटींग्ज मध्ये जा
Turn off वर क्लिक करा.
आता गुगल तुमचा इतिहास जपणार नाही म्हणते.
पण गुगलने ही तो इतिहास पुसला असेल याची खात्री नाही!
असे सगळे असेल तर मग अशा ठिकाणी कशाला जा?
त्यापेक्षा डक्डक्गो वापरा.
https://duckduckgo.com/about
नाही तर स्टार्टपेज आहेच
https://startpage.com/
येथून https://www.torproject.org/download/download.html.en टॉर उतरवून घ्या.
आता टॉर वापरा म्हणजे त्यातल्या त्यात बरे!
मात्र सर्च करताना गुगलवर लॉग इन राहू नका!!!
तसेच कोणतेही एकच सर्च इंजिन वापरू नका.
तुम्हाला जर प्रायव्हसी इतका मोठा प्रश्न वाटत नसेल तर हे एकदा पाहून घ्या!
http://donttrack.us/
निव्वळ वेब अॅड्रेस टाईप करायचा कंटाळा येतो म्हणून आपली माहिती फुकटात कुणाला द्यायची का याचा विचार केलाच पाहिजे.
मदनबाणाने ब्राऊझर एक्सटेंशनचा धागा काढला आहे.
त्यात प्रायव्हसी विषयी चर्चा झाली म्हणून हा लेखन प्रपंच केला आहे.
लेखन जरा विस्कळीत झाले आहे.
पण उपयोगी मानून घ्याल अशी आशा आहे.
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
छान माहिती...
धन्यवाद. अत्यंत उपयुक्त
तुम्ही दिलेल्या साईट्सदेखील
मोबाईलवर?
एके काळी गावगाडा होता. त्यात
"गावाला बित्तंबातमी" असण्याचा
हेच
'आपली माहिती' हा शब्दप्रयोग
एकाच
यावरून मला एक नाटकवाल्याचा
मग
कदाचित अशा माहितीच्या आधारे
हेच चुकीचे आहे
तुम्ही दिलेली लिंक काळजीपूर्वक वाचली
खरयं...
जगभरातले लोक प्रायव्हसीच्या
त्यापुढे
च्च्लेअनेर अर्थात 'CCleaner'
CCleaner हो हे मी वापरतो,
च्च्लेअनेर
माझ्या माहितीप्रमाणे विदा ही
मस्त माहिती....
धन्यवाद
वाचते आहे. हळु हळु समजतय
धन्यवाद. तुमची माहीती वापरुन,
एक शंका:
शक्य आहे
इनकॉग्निटोचा काही फायदा?
तुमची
टॉर आणि प्रायव्हसी
अर्रर्रर्र...
टॉर
धन्यवाद निनाद
माझे दोन पैसे अजून...
डिस्क्लेमर
उपयुक्त माहिती
छान माहिती, उपयुक्त चर्चा.
व्हॉटसप
व्हॉटसपला काय काय परमिशन
व्हॉटसपला काय काय परमिशन तुम्ही देता ते एकदा वाचले कीहायला कधीच नाही वाचलेतसेच फेसबुकचे ही अॅप आपल्या फोन वर असायचे कारण नाही.कारण ते ब्राउझरने पण पाहता येते.हायला ते पण ईजी पडते म्हणून आहेच. तसा फेसबूकचा मी शौकीन नाही पण त्यात नोटीफिकेशन कळत असल्याने बरे पडते.उपयुक्त माहिती.
फायद्यांचाही विचार करु
उपयुक्त माहिती
एक वाचनिय दुवा देण्याचे कष्ट
अजुन एक वाचनिय दुवा देण्याचे
यावरून
अरारा.. बेक्कार जमलाय!
गुगल
एक दिवस सकाळी मला अॅलर्ट