Welcome to misalpav.com
लेखक: डॉ सुहास म्हात्रे | प्रसिद्ध:
जालावर सापडलेल्या खजिन्यातील काही रोचक हिरे-माणके मिपामित्रांबरोबर वाटाविशी वाटली... १. बदलते जग (चाळीस कोटी वर्षांपूर्वीपासून ते भविष्यात २५ कोटी वर्षे पर्यंत)... . २. जगाचा इतिहास (इ स पूर्व ३,००० ते इ स २०१३) चार मिनिटांत... . ३. युरोपचा इतिहास (इ स पूर्व ३,००० ते इ स २०१३) साडेपाच मिनिटांत... . ४. काही देशांच्या गंमतिशीर पण जटिल सीमारेखा... .
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

..... जगाचा इतिहास (इ स पूर्व ३,००० ते इ स २०१३) चार मिनिटांत... या व्हिडिओत आधी जवळ जवळ सगळे जग मोकळे ( मानव-विरहित ) होते, मग जिथे जिथे रंगीत दाखवले आहे, तिथे तिथे मानव-वस्ती होत गेली, असे त्यांना सांगायचे आहे काय ? असेल, तर पटत नाही. म्हणजे आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अमेरिका वगैरे खंडात मानव नव्हताच का? की अजून उत्खननात पुरावे सापडले नाही म्हणून असे म्हणायचे ? की ते रंग हे "संस्कृती" चे द्योतक आहेत ? अगदी आदिमानव म्हटले, तरी त्यांची काहीएक "संस्कृती" असतेच ना ? युरोपचा इतिहास' मधेही असेच आहे. जरा उस्कटून सांगाल का?

जिथे जिथे रंगीत दाखवले आहे, तिथे तिथे मानव-वस्ती होत गेली, असे त्यांना सांगायचे आहे काय ? हा नकाशा फक्त मोठ्या प्रमाणात पुरावे सापडलेल्या महत्वाच्या संस्कृतींच्या जागा सारांशाने दाखवतो. इतक्या त्रोटक वेळात त्यात मानवाचे सर्व जगभरचे प्रसरण दाखवणे शक्य नाही आणि तो या नकाशाचा उद्द्येशही नाही. मानवाचे प्रसरण इ स पूर्वी ८५,००० पासून इ स पूर्व १०,००० पर्यंतच्या काळात अंटार्क्टीका सोडून इतर सर्व खंडांत झाला होता... ते मानवाचे जगभरातले प्रसरण सारांशाने मी मिपावरच एका मालिकेत लिहीले आहे.