"आर ए करड्या... कुठं मेलास रं !!"
सकाळपासनं करड्या दिसला नाही कोठेच.. सारखा ढुशी मारायचा प्वटात. आई लई ओरडायची पण करड्याची शिंगे लागली नाहीत कधीच..
सकाळपासनं म्याबी झ्याक बिझी व्हते. नव्या वहीनीला स्वैपाकात मदत केली. जेवण झाल्यावर मात्र करड्याची लई आठवण आली.
दादाच्या लग्नाअगोदर दोन दिवस आधीच आमच्याकडं करड्या आला होता. तेव्हापासनं सारखा माझ्याबरोबरच असायचा, जीव लावला त्यानं. माझा बायफ्रेंड म्हणायचे त्याला सगळे.. एकटाच गेला असेल माळावर बोंबलत चरायला.. चकणीला विचारते..
"काय गं चकणे, करड्याला घेऊन गेली व्हतीस?"
"आता करड्या करड्या करतेस.. मटण लई दाबात ओरपत होतीस की त्याचे" कुजकट चकणी बोल्ली.
पोटात ढवळलेच माझ्या.. करड्या आतनं ढुशी मारतं होता..
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
भारीच !
भारीयं .. शेवटाच्या पंचला एक
आवडलं!!
मस्त
मस्त
सॉल्लिड जमलीये!
प्रयत्न आवडला.
छान..!
मस्तच.
मस्त !!!
मस्त.
आभारी आहे
मस्त.
आभारी आहे
(No subject)
छान आहे
आवडली
क्लास्स्स्स्स्स
करड्याच जाण मनाला चटका लावून
छान
शतशब्दकथा.चांगला प्रकार आहे
शतशब्दकथा मिपावर आतिवास यांनी
'शशक' हा शब्द आवडला
झ्याक लिवलंय!!
आवडली
मस्तच,
छान! ट्विस्ट जमला आहे चांगला.